मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रगती!!! नक्की कशासाठी?

मराठमोळा · · काथ्याकूट
माणसाने प्रगती केली. आपला देश प्रगती करत आहे, जगाची फार प्रगती झाली आहे.... अनेक वाक्ये, अनेक लेख, वाद-विवाद, चर्चा, बातम्या, गप्पा बरंच काही. लहानपणापासुन बघतो, ऐकतो आहे, चालत आहे. पण मग ही प्रगती म्हणजे काय? आणि का? याची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला, कदाचित जमला नाही. ;) बरं प्रगतीची व्यख्या करुयात.. माणसाला सुखी, समाधानी, ऐश्वर्य असेललं आयुष्य देऊ शकेल असे काहीतरी करण्याचा यशस्वी झालेला (?) प्रयत्न म्हणजे प्रगती असे म्हणुयात. मग भारत असो, पाकिस्तान , युरोप वा अमेरिका. ही प्रगती माणसं बदलु शकली का? माझ्या मते नाही. कितीही सुख, समाधान, ऐश्वर्य लाभलं तरी माणसं माणसंच. आमच्या आयटीत (हो तेच ते आयटीवाले) नेहमी नविन तंत्रज्ञान शिकुन स्वत:ला जगाच्या स्पर्धेत पुढे ठेवावे लागते, पण त्यात आयुष्य असेच कुठेतरी हरवुन जाते. प्रत्येक तंत्रज्ञान हे काहीतरी चांगलं आणि काहीतरी वाईट घेऊन येतं. उदा. प्लॅस्टीक आलं, दुष्परिणाम बघतोच आहोत. ईंटर्नेट आलं, दुष्परिणाम अतिशय वाईट पण आहेत. पण निसर्गानेच दिलेल्या एका वरदानामुळे आपण त्यालाच दुर्लक्षित करुन पुन्हा त्याच चुका करीत आहोत? अ‍ॅडॅप्टेबिलिटी.. आणि टेंडेंसी टु सर्वाईव. कितीही प्रगती केली तरी पुन्हा नवे रोग, नवे वादळ हा निसर्ग उभा करतो. अहो साधी उदाहरणं घ्या. आजकाल अ‍ॅरेंज्ड मॅरेज बघा, किती प्रॉब्लेम्स, किती क्लिष्ट.. कुंडली जमत नाही, मुलगी बँकेत आहे, मुलगा आय्टीत, डॉक्टर, दिशा वेगळी, ईच्छा वेगळ्या, कसं जमायचं? नवे नवे रोग जन्माला येताहेत. नवे शत्रु जन्म घेत आहेत. आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, अमेरीकेप्रमाणे भारतात पण मुलं आई-वडीलांबरोबर रहात नाहीत. सगळे आजकाल बेसीक्स बदलण्याच्या प्रयत्नत आहेत. इथे काही लोकं म्हणे माणुस ह समाजशील प्राणि नाहि हे सिद्ध करायसाठी वर्षभर बाहेर राहिले, एकटेच. त्याना वेड्याचा ईस्पितळात भरती करावे लागले, आजतागयात वेडेच आहेत. जेवण.. किती महत्वाचे असते. पण त्यात पण ह्या प्रगतीने झक मारली. आजकाल म्हणे क्रूत्रीम रित्या खाद्य उगवतो. का? तर भरपुर उत्पन्न मिळते, भरगोस उत्पादन होते. अरे वा. चालु द्या. इथे गायींना मांस खायला घातले जाते, जास्त दुध मिळते म्हणून. ईंजेक्शन्स मारली जातात. साधं दही सुद्धा साधं राहिलं नाही आता. एखादं सफरचंद खायचं म्हंटल तरी भिती वाटेल असे काही प्रकार आहेत. तुर्तास एवढेच अजुन लिहायची ईच्छा नाही.. खरं लिहिताना सुद्धा त्रास होतो, पुढच्या पिढीला काय देणार आहोत देव जाणे. शब्द उरले नाहीत!!

वाचन 14394 प्रतिक्रिया 0