(शापीत मेघ ) ...

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
13 Oct 2010 - 8:59 pm

आदिती आणि अडगळ यांच्या प्रेरणेने.

सारे बोबाट शब्द, फेकीत चाललो मी
सोडुन सार्या वाटा, का पीत चाललो मी ?

रिचवुनी अनेक प्याले, रातीचे ओसाड नाले
अडखळीत का असेना, धुंदित चाललो मी

रात्रीत विरले दु:ख, सरलेली सारी स्वप्न
झुगारुन लक्ख नभास , ऐटीत चाललो मी

झाले आप्त ही परके, रक्तबंध विस्कटलेले
नजरेच्या तप्त ज्वाला, सोशीत चाललो मी

डागाळलेला चंद्र उरी, नभास का खंत आहे
आपुलेच खोटे नाणे, घाशीत चाललो मी

करुणविडंबन

प्रतिक्रिया

प्रभो's picture

13 Oct 2010 - 9:00 pm | प्रभो

क ह र!!! रे भावा..

मेघवेडा's picture

13 Oct 2010 - 9:03 pm | मेघवेडा

खरंच कहर!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2010 - 9:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विडंबन कसं, लगेच समजतं! जमलंय विडंबन!!

नगरीनिरंजन's picture

13 Oct 2010 - 9:25 pm | नगरीनिरंजन

छान जमलंय.
मूळ कवितेपेक्षा उत्तम!

पैसा's picture

13 Oct 2010 - 10:12 pm | पैसा

आपल्याच कवितेच विडंबन! पण जमलंय.
फक्त एकच वाटलं, शेवटचे २ शेर विडंबन नाहीत. ती एका स्वतंत्र गजलची सुरुवात आहे.

पैसा ताई

गझल नाहीये वरील .. कारण अक्षरवृत्त . गणवृत्त (लघु -गुरु) सम्थींग काही पाळले नाहीयेत.

पण तरीही स्वतंत्र गझलची सुरुवात हे चुकीचे वाटते आहे.

---------
कविता आणि गझल मधील मुळ फरक हा आहे की
गझल मध्ये प्रत्येक २ ओळींचा शेर हा स्वतंत्र कविता असतो ..
आणि कविता मध्ये प्रत्येक कडवे हे कवितेचा मुळ गाबह विस्तारीत नेत असते.

असो आणि मतला आणि शेर वेगळा असतो .

म्हण्जे मतला मध्ये दोन्ही ओळीत रदिफ , काफिला असते
उदा.

-- शापीत चाललो मी
-- कापीत चाललो मी

पण शेरा मधेय फक्त दूसर्या ओळीत रदिफ , काफिला असते.

--------

असो गझल चा अभ्यास केला आहे.
पण ती लिहायला लागणारी प्रतिभा आपल्याकदे नाही .. त्यामुळे कवातरी त्या फॉरमॅट मध्ये लिहुन तलप भागवतो ..

डॉ अशोक कुलकर्णी's picture

13 Oct 2010 - 11:07 pm | डॉ अशोक कुलकर्णी

हे खरंय की ही गझल नाही. मात्र कविता झकास !