घ्या....मेतकूट! रेसिपी सौजन्य : जाईची आई :)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture
जाई अस्सल कोल्हापुरी in पाककृती
13 Oct 2010 - 2:31 pm

साहित्य :
१) चणा डाळ - ४ वाट्या
२) बासमती तांदुळ - १ वाटी
३) उडिद डाळ - १ १/२ वाटी ( दीड वाटी)
४) मूग डाळ - १ वाटी
५) १/२ वाटी गहु
६) पाव वाटी धणे
७) पाव वाटी जिरे
८) हिंग २५ ग्रॅम
९) मिरे - ७-८
१०) लवंग - २० ग्रॅम
११) दालचीनी - २० ग्रॅम
१२) वेलची - २० ग्रॅम
१३) मेथी दाणे - १/२ चमचा
१४) मोहरी * - २० ग्रॅम
१५)मसाला वेलची / बडी इलायची - २
१६) १ जायफळ
१७) लाल मिरच्या ४-५
१८) हळद १ ते १ १/२ चमचा (दीड)

झाल्या का १८ वस्तू?.... इति मातोश्री

कृती :
१) सगळी धान्ये वेगवेगळी भाजुन घ्यावीत. खमंगपणावर भाजुन घ्यावीत. भाजताना त्याचा कच्चट रंग जाईपर्यंत भाजावीत्.आणि छान खमंग वास सुटायला हवा. पुढे जाउ द्यायची नाहीत. जरा अलिकडे भाजले तरी चालेल. इति आई :) भावार्थ : (पुढे म्हणजे जास्त भाजु नका. काळ्सर रंग येउ देउ नका..नाहितर मेतकूटाला काळसर रंग येतो आणि चव पण कड्सर लागते.)

२) हिंग चणा डाळ भाजत आली की मग डाळीतच घालावा.. तेवढ्या गरम पणावर छान होतो. त्याचा कच्चे पणा जातो. वेगळा भाजाला तर काळसरपणा येतो.

३) बाकी सारे मसाले फक्त गरमावर परतून घ्यावे. म्हणजे त्याचा मूळ फ्लेवर न जाता फक्त moisture निघुन जावे.म्हणजे मिक्सर वर छान बारीक होतिल.

४) मोहरी आस्त भाजु नका. मेतेकूट काळसर पणावर जाते. :) मोहरी जर्रा पांढरट झाली की काढुन घ्या. नाहीतर ...? काय सांगा?.....बर्रोब्बर ...काळसरपणा येतो आणि? चव कडसर लागते.!

५) मिरच्या पण काळ्या न होता फक्त चुरचुरीत भाजुन घ्याव्या.

६) सगळे मसाले मिक्सर वर बारीक करुन घ्या.... अगदी छान पूड...!

७) मग सगळी धान्ये बारीक करा....तशीच अगदी पूड.

आणि मग सगळे एकत्र करा...छान हलवा. चाळणीतुन चाळा.परत हलवा .परत चाळणीतून काढा. असे नीट करा.

मग झालं की मेतेकूट! हे साधारण १ ते दीड किलो होइल..! इत्के करय्चे नसेल तर प्रमाण निम्मे घ्या. किंवा वाटी छोटी नैवेद्याची घेउन करा.छोटी वाटी घेतली तर मसाले चमचा चमचा घ्या.

आता खरा खरा कूकर लावा. बासमती लावा...आंबेमोहोर लावा....गुर्गुट्या लावा. लावा एकदाचा!
३ शिट्ट्या. वाफ जाउ द्या.
भात काढा. प्लेट घ्या. त्यामध्ये मीठ, डावीकडे लिंबाचे लोणचे घाला .
गरम गरम वाफ येणारा भात प्लेट्मध्ये वाढुन घ्या.त्यावर तूप घाला ....असा भात तुपाने ओलसर झाला पाहिजे बरं!
आणी आता ते दिव्य चवीचं ...मेतकूट ३-४ चमचे घाला. भात कोरडा वाटला तर अजुन तूप घाला.
असा बोटानी मस्त हलका हलका कालवा. आणि पाची बोटांनी मुखात घाला.
नाही ब्रम्ह दिसला तर नाव जाई बदलून धोंडु ठेवा.
मध्येच लिंबाच्या लोणच्याचे चुटूक अशी जिभेवर लावा.
आणि मग मनसोक्त ....जाणि़जे "यज्ञकर्म" करा.
असं मनात आणि पोटात 'राम कृष्ण हरी ' होइल.....
बास.....!
बस दुवा में याद करना| :)

प्रतिक्रिया

अवलिया's picture

13 Oct 2010 - 2:32 pm | अवलिया

!@$^%$@#*^@#)(*(@$)(*#$()*()*@()#*#)@(#*)@(

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

13 Oct 2010 - 2:35 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

मग का.... ?
फार घाई असेल तर मग केप्र . कॉम...

विसोबा खेचर's picture

13 Oct 2010 - 2:38 pm | विसोबा खेचर

महाविद्यालयीन जीवनात आमचं कुणाकुणा मुलींशी मेतकूट असायचं..

अर्थात, खाण्यातलं मेतकुटही आम्हाला आवडतं.. जिथे शब्द संपतात असा साजूक तुपातला मेतकूट-मऊभात! :)

छान पाकृ.. ! :)

आपल्या मातोश्रींना प्रणाम सांगावा..

तात्या.

--
शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!

असुर's picture

13 Oct 2010 - 2:40 pm | असुर

व्वा जाईतै!! केवळ __/\__!!

आणि तुमच्या मातोश्रींना माझा नमस्कार सांगा!! त्यांच्यामुळेच इतक्या लवकर मेतकुटाची रेसिपी मिपावर आली!

--असुर

प्राजक्ता पवार's picture

13 Oct 2010 - 2:45 pm | प्राजक्ता पवार

छान . मागीतल्यावर लगेच पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद. लवकरचं करुन बघेन व मग तुला कळवेन :)

प्राजक्ता पवार's picture

13 Oct 2010 - 2:46 pm | प्राजक्ता पवार

छान . मागीतल्यावर लगेच पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद. लवकरचं करुन बघेन व मग तुला कळवेन :)

मनि२७'s picture

13 Oct 2010 - 2:51 pm | मनि२७

मस्तच ग जाई ....!
वाचूनच तोंडाला पाणी सुटलय...
सुरेख लिहिलंय...

गणपा's picture

13 Oct 2010 - 3:06 pm | गणपा

धन्य ती जाई अन् तीची आई :)

परिकथेतील राजकुमार's picture

13 Oct 2010 - 4:09 pm | परिकथेतील राजकुमार

आधी हे लेखन जाईतैंचे आहे ह्यावार विश्वासच बसेना ;)

मस्त पाकृ. एकदम झ का स !

जाई प्रिंट काढून घेते. आणि तयारीला लागते.
मी एकदा चण्याचे डाळे आणि कढीपत्ता घालुन मेतकुट बनवल होत. आता त्याच पुर्ण साहित्य एवढ आठवत नाही पण माझ्याकडे लिहीलेल आहे.

यशोधरा's picture

13 Oct 2010 - 4:39 pm | यशोधरा

मस्त पाकृ! मेतकूट भात...

मितान's picture

13 Oct 2010 - 5:11 pm | मितान

जाई पाकृ साठी धन्यवाद :)
आमच्याकडे करतात त्यात गरम मसाल्याचे प्रकार घालत नाहीत. बहुदा त्यामुळेच आजारी व्यक्ती, लहान मुले यांनाही भूक वाढण्यासाठी मेतकुट भाताचे औषध चालत असावे. जिरे मोहरी, हिंग, हळद नि मेथ्या एवढेच मसाले असतात त्यात.
तुझी पाकृ मस्त मसालेदार दिसतेय. करून बघतेच आता :)

असुर's picture

13 Oct 2010 - 6:31 pm | असुर

मायातै, मला हे पण पायजे! म्हणजे आता पहा, लाडू आणि मेतकूट! आणच तू, घेऊन जाईन मी, नक्की! :-)
जाईतै, तुमच्या या अगदी वेळेत आलेल्या पाकृमुळे फार फार मदत झाली आहे. त्यामुळे मायातैला माझ्यासाठी मेतकूट पण आणता येईल!
हे 'ताई' लोक फारच मदत करतात ब्वॉ!

--असुर

चिंतामणी's picture

13 Oct 2010 - 6:11 pm | चिंतामणी

परन्तु फटु कोठे आहे?????

साहीत्य, कृतीचे फटु टाकले असतेत तर अजून मजा आला असता.

निवेदिता-ताई's picture

13 Oct 2010 - 8:13 pm | निवेदिता-ताई

जाई...........मस्त ग...........

"धोंडु अस्सल कोल्हापुरी"... कसं दिसेल याचा विचार करतेय.... (ह. घ्या)

शिल्पा ब's picture

14 Oct 2010 - 1:48 am | शिल्पा ब

मस्त..

जाई,

एक अख्खं जायफळ? इतर साहित्याच्या प्रमाणाच्या मानाने जरा जास्तच वाटत नाही का? बाकी ही मसालेवाली पाकृ झकासच वाटतेय.

प्रिया

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

15 Oct 2010 - 2:56 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

सगळ सामान ४ -२-१ वाट्या जरी दिसत असले ना तरी त्यातुन जे मेतकूट बनते ते जवळ्जवळ १ ते दीड किलो बनते. त्या १ ते दीड किलो साठी ते एक जायफळ आहे.....
जेव्हा छोटी वाटी घ्याल ना तेव्हा जायफळाचे प्रमाण कमी करा.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

15 Oct 2010 - 3:29 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

सगळ सामान ४ -२-१ वाट्या जरी दिसत असले ना तरी त्यातुन जे मेतकूट बनते ते जवळ्जवळ १ ते दीड किलो बनते. त्या १ ते दीड किलो साठी ते एक जायफळ आहे.....
जेव्हा छोटी वाटी घ्याल ना तेव्हा जायफळाचे प्रमाण कमी करा.