गिफ्ट ऑफ मॅगी .

तर्री's picture
तर्री in पाककृती
13 Oct 2010 - 1:33 am

इंग्रजी साहित्याच्या रसिकांना ह्या शीर्षकाने वाटेल , तर्री "तर्र" झाला की काय ?
"गिफ्ट ऑफ मॅगी " पाककृती मधे कशी ? गल्ली चुकली बहुतेक !
मी पाककृती लिहीणार म्हणजे गल्ली चुकली बहुतेक हे खरेच आहे पण मंडळी शीर्षक ही बरोबर आहे.

मी देत असलेल्या दोन पाककृती नेसले च्या " मॅगी " वर " बेतलेल्या " आहेत , म्हणून शीर्षक " गिफ्ट ऑफ मॅगी ".

ह्या पाककृतीचे "झुणका" तथा " पिठले " ह्या दोनही पदार्थां बरोबर आणि "गरज ही शोधाची जननी " आहे ह्या म्हणी बरोबर घनिष्ठ संबंध आहे .

पाककृती

१. पिठले अथवा झुणका आवडी प्रमाणे करावा . ऊकळी आल्यावर त्यामध्ये " मॅगी " टेस्ट मेकर चे १/२ पाकिट त्यामध्ये घालावे. एक वाफ आल्यावर भाकरी / पोळी सोबत ( ह्याला "बोर्डो मिश्रण " हे नाव ठेवून एक दोस्त खातोय ) खावे .

२ . मॅगी करताना "दुप्पट " पाणी घ्यावे , ऊकळी आल्यावर त्यामध्ये १/२ चमचे "बेसन" घालावे मग रीतीप्रमाणे नुडल घालाव्या व मॅगीप्रमणे नुसतेच खावे . कांदा , टोमॅटो ने शोभा व चव वाढवता येते.

जिथे जागु ताई / गणपा et.al. छान छान पाकॄ लिहून जातात , तेथे हे असे लिहीणे रुचणारे नही हे मान्य आहे .

हे वाचून जर राग आला तर दणक्यात निषेध करा.

* ह्यांना प्रकाराना "पाककृती " म्हणणे म्हणजे xxxxxxxxx ला xxxxxxxxxxxx म्हणणे ह्या चाली वर अथवा आपापल्या स्टायली मध्ये .

प्रतिक्रिया

रेवती's picture

13 Oct 2010 - 1:52 am | रेवती

पाकृ वाचवत नाहिये.
फोटू नसल्याचा आनंद पहिल्यांदाच झाला.
दणक्यात निषेध!
अतिअवांतर: आपण नोकरी/व्यवसायानिमित्त घर सोडून दुसरीकडे राहता असा अंदाज करायला वाव आहे.
कृपया सुट्टीत घरी गेल्यावर चार सोप्या भाज्या/भाताचे प्रकार शिकलात तर तुमचीच सोय होइल.

समई's picture

13 Oct 2010 - 3:08 am | समई

काहि पाहुणे नेमके जेवणाचि वेळच गाठुन येतात आणी जेवल्याशिवाय जात नाहित्..
अतिथि तुम कब जाओगे वेळ आलि कि.....त्यांच्यासाठि बनवेन मि...
नवरया बरोबर भांड्ण झाल्यावर त्याच्यासाठि बनवेन मि...

सविता's picture

13 Oct 2010 - 10:10 am | सविता

आयडिया भारी आहे....




दिपाली पाटिल's picture

13 Oct 2010 - 3:14 am | दिपाली पाटिल

बापरे, खरंच पाकृ वाचवत नाहीये, नुसतंच पिठलंच खा किंवा मॅगी खा... दोन्ही वेगवेगळेच बरे लागतात...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Oct 2010 - 11:28 am | विश्वनाथ मेहेंदळे

दीपाली ताई, तुमच्या सारखीने (स्वत: पाककुशल असणारीने) असे म्हणावे याचे आश्चर्य वाटले. दोन्ही वेगवेगळे चांगले लागतात म्हणून एकत्र केल्यावर वाईट लागतील असे नाही. माणसाने प्रयोगशील असणे चांगलेच आहे की. वरचे प्रकार करून पाहिले पाहिजे, चांगले लागेल कदाचित. पहिली कृती तर अजिबात वाईट लागणार नाही. पण टेस्ट मेकर पिठल्यात घातला तर त्या मॅगी मध्ये काय घालायचे असा प्रश्न मला पडला आहे.

यावरून आठवले. एकदा माझ्या रूममेट ने मला मॅगी बनवून खायला घातली. काहीतरी वेगळे लागले. अत्यंत झकास झाली होती. त्याला विचारल्यावर त्याने सांगितले की पाणी उकळताना थोडे अमूल बटर घातले होते आणि टेस्टमेकर च्या जोडीने MDH चा पावभाजी मसाला.

अवांतर :- संजीव कपूर खानाखजाना मधल्या निम्म्या पाककृती "On the Spot" प्रयोग करून तयार करायचा असे ऐकले होते.

मराठमोळा's picture

14 Oct 2010 - 11:09 am | मराठमोळा

>>माणसाने प्रयोगशील असणे चांगलेच आहे की. वरचे प्रकार करून पाहिले पाहिजे, चांगले लागेल कदाचित. पहिली कृती तर अजिबात वाईट लागणार नाही. पण टेस्ट मेकर पिठल्यात घातला तर त्या मॅगी मध्ये काय घालायचे असा प्रश्न मला पडला आहे.

म्हणजे काय म्हणायचे ते कळाले नाही. प्रयोग पण करायचा आणी त्यानंतर त्याची शिक्षा पण आपणच भोगायची. काही काही लोकं नशिबवान असतात, स्वतः खाय्च्या आधी जोडीदाराला भरवतात, टेस्टींग म्हणुन.
पण मग ब्याचलर लोकांनी असले प्रयोग करु नयेत (गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड जवळ असल्याशिवाय) असे मला वाटते. ;)

विजुभाऊ's picture

13 Oct 2010 - 10:04 am | विजुभाऊ

पाहुण्याना हमखास पळवून लावायचे आहे?
मॅगी नूडल्स नुसत्याच वाफवून घ्या. श्रीखंड देताना वाफवलेल्या नूडल्स श्रीखंडावर घालून द्याव्या,
धोक्याची सूचना: यावर वेलदोड्याची / जायफळाची पूड अजिबात घालू नये. पदार्थ आवडण्याची शक्यता असते

tastemaker नसलेल्या नुड्ल्स ह्या सुप मघे वापरा

तर्री's picture

13 Oct 2010 - 11:48 pm | तर्री

विश्वनाथ राव समजून घेतल्याबद्दल आभार .
दिपाली ताईंचा प्रतिसाद अगदी स्वाभाविक आहे .
म्हणून मी आवरते घेतले. "पीझा" टोमॅटो साराची अजून एक "रेसेपी " टाकली नही .
पण आत तुम्हाला सांगतो :
एकदा एक मित्र अचानक घरी आला , म्हणून पीझा मागवला . त्याला हा प्रकार कशात तरी "बुडवून" खायचा होता .
मग फ्रीज मध्ये "टोमॅटो सार " सापडले .....अगदी काही वाईट नही लागत.
घरी कळ्ल्यावरची प्रतिक्रिया , अशीच होती .
तुमच्या सारखे " पुरोगामी " विचारांचे खवय्ये विरळाच...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

14 Oct 2010 - 1:41 am | विश्वनाथ मेहेंदळे

>>तुमच्या सारखे " पुरोगामी " विचारांचे खवय्ये विरळाच
धन्यवाद !!! भारताच्या बाहेर काय होते माहित नाही, पण निदान आपण भारतीय तरी खाण्याच्या बाबतीत खूप restrictive (मराठी?) असतो. एखाद्या उत्तरभारतीय बांधवासमोर दुधभात खाऊन बघा, जेवणात पाल पडल्यासारखे अंग काढतात. जेवणात नारळ वापरता येतो हे त्यांना मान्य नसते. अशी अनेक उदाहरणे देता येतील, सगळ्या बाजूंची. वेगळा लेख होईल यावर. आश्चर्य या गोष्टीचे वाटते की आपल्याकडे आधीच ५६ वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती असूनही आपण या बाबतीत ओपन नसतो.

तुम्ही अजिबात घाबरू नका, अजून अनुभव असतील तर शेअर करा, फसलेले पाहिजे तर खव मध्ये द्या यशस्वी इथे द्या. मी पण करतो काही प्रयोग स्वयंपाकघरात. काही फसतात, काही छान होतात.

(स्वयंपाक घरात जाऊन कधी कधी भीम बनणारा) वि.मे.

वाटाड्या...'s picture

14 Oct 2010 - 12:42 am | वाटाड्या...

ही रे'शी'पी वाचुन डोळ्यात अलगद पाणी तरारलं...

- वा रे पी 'शी'

सुनील's picture

14 Oct 2010 - 2:19 am | सुनील

ही घ्या एक सोपी आणि मस्त पाकृ -

पाणी उकळवायला ठेवा. त्यात थोडे मीठ आणि थोडे विनिगर घाला. उकळी आली की त्यात अंडे फोडून घाला. विस्तवाची धग मंद करून झाकण ठेवा. पाच मिनिटे उकळू द्या. मग विस्तव बंद करा.

पाण्यावर तरंगणारे शिजलेले अंडे ताटलीत काढून घ्या. त्यावर मीरपूड टाका. फस्त करा.

राजेश घासकडवी's picture

14 Oct 2010 - 10:28 am | राजेश घासकडवी

इथे दोन प्रवृत्तींचं द्वंद्व दिसतं. एका बाजूला आहेत प्यूरिस्ट्स - खायचा पदार्थ करायचा तर तो चवीला छान झालाच पाहिजे. दुसऱ्या बाजूला आहेत सामान्य माणसं - जे हाती आहे ते वापरून पोट भरण्यासाठी साधारण चवदार पण पटकन काहीतरी तयार करण्याचा प्रयत्न करणारे.

प्युरिस्ट्स सर्वसाधारणपणे बूर्ज्वा, कर्मठ व परंपरावादी असतात. याउलट सामान्य लोक प्रोलिटरेट, प्रयोगशील, नवीन काहीतरी शोधणारे असतात. प्युरिस्टांना त्यांच्या एकाच तत्वाचा आग्रह असतो - चव चांगली झाली पाहिजे. पण ते हे विसरतात की प्रोलिटरेटांकडे एका पदार्थाची सामग्री आणणं, तयारी करणं, तो बनवणं आणि मिटक्या मारत खाणं यासाठी लागणारी संसाधनं (मुख्यत: वेळ आणि काही प्रमाणात बिनआळशीपणा) नसतात.

शेवटी पाककृती म्हणजे भूक भागवण्याचे मार्ग. मग त्यांत नेहेमीच चवीला का प्राधान्य द्यावं? आठ मिनिटांत बरा पदार्थ आणि दीड तास खर्चून उत्तम पदार्थ यात दुसराच नेहेमी उजवा का ठरावा? ही प्रोलिटरेटांची कळकळ आहे.

दुसरी एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे प्युरिस्ट गटांत स्त्रिया व प्रोलिटरेटांत पुरुष अशी विभागणी झालेली आहे. हा निव्वळ योगायोग असेल कदाचित, किंवा ती लिंगभेदाविषयी टिप्पणी असू शकेल.

असो. द्वंद्व काय दिसतंय हे आम्ही मांडलं. आता ते पुढे चालू राहिलं तर त्यातून अभ्यासपूर्ण निष्कर्ष काढता येतील. तेव्हा चालूद्यात.

(फ्रिजमध्ये सापडतील त्या पदार्थांपासून जेवण तयार करणारा) राजेश

नगरीनिरंजन's picture

14 Oct 2010 - 10:51 am | नगरीनिरंजन

बिनआळशीपणा हा शब्द मनाला भिडला.
लिंगभूमिकांविषयीच्या काळ्या विनोदावरच्या आणि लिंगभेदाविषयी टिप्पणीवरच्या आगामी अभ्यासपूर्ण लेखाची वाट पाहत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Oct 2010 - 11:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपला प्रतिसाद वाचून आमचे पूजावाले घासकडवी गुर्जी आठवले.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

14 Oct 2010 - 11:22 am | विश्वनाथ मेहेंदळे

>>प्युरिस्ट्स सर्वसाधारणपणे बूर्ज्वा, कर्मठ व परंपरावादी असतात. याउलट सामान्य लोक प्रोलिटरेट, प्रयोगशील, नवीन काहीतरी शोधणारे असतात.
बहुतांश सामान्य लोक जेवण बनवण्याच्या बाबतीत प्युरिस्ट्सच असतात :-)

>>आठ मिनिटांत बरा पदार्थ आणि दीड तास खर्चून उत्तम पदार्थ यात दुसराच नेहेमी उजवा का ठरावा? ही प्रोलिटरेटांची कळकळ आहे.
केवळ तसे नाही हो. दीड तास खर्च करून पदार्थ बनवतानापण दर वेळेला आधी केला तसाच का करावा? Going wild with your experiements sometime gives you excellent and surprising results. स्वानुभवावरून सांगतो.

>>दुसरी एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे प्युरिस्ट गटांत स्त्रिया व प्रोलिटरेटांत पुरुष अशी विभागणी झालेली आहे.
जगातील उत्तमोत्तम बल्लवाचार्य (शेफ) हे बहुतकरून पुरुष का असतात असे कोडे मला अनेक वर्षे पडले होते. उत्तर लवकरच मिळेल कदाचित.

मराठमोळा's picture

14 Oct 2010 - 11:31 am | मराठमोळा

>>जगातील उत्तमोत्तम बल्लवाचार्य (शेफ) हे बहुतकरून पुरुष का असतात असे कोडे मला अनेक वर्षे पडले होते. उत्तर लवकरच मिळेल कदाचित.

कारण पुर्वी कढई आणि डाव खुपच जड होते. स्त्रियाना त्याने ढवळणे जमत नव्हते. मग खुप सार्‍या लोकांचे जेवण बनवायचे असेल तर पुरुषच स्वयंपाक करायला लागले. आणि ही प्रथा रुढ झाली.

( वरील विधानाला स्पष्टीकरण मागु नये. ) ;)