मैत्रि (एक खोडकर ओलावा)

कल्पेश इसई's picture
कल्पेश इसई in जे न देखे रवी...
11 Oct 2010 - 12:38 am

कल्पेश इसई.(एप्रिल २०००) शाळेच्या काळातली.....

शाळेतल्या एकाच बेन्च्वर बसण्यासाठी भान्डण करणारे...
तर.. मधल्या सुटिमध्ये आम्बट लोणच्यालाही गोड चव आणणारेही ..तेच हे मित्र
सरान्ना मुद्दामुन नाव सान्गणारे ...
तर..मार बसु नये म्हणुन त्यान्च्याच समोर खोटे बोलणारेही ....तेच हे मित्र
सरान्नी प्रश्न विचारल्यावर घाबरवणारे..
तर्..परिक्षेच्यावेळी येत नसलेले उत्तर सान्ग्ण्यासाठी इशारे करणारेही ....तेच हे मित्र

कधिच विश्वास नाहि ठेवावा असे वाटणारे..
पण.. तरिही आपसुकच विश्वासाच्या पलिकडे गेलेलेही ....तेच हे मित्र
कोणत्याहि मुलीची खोडि काढुन त्यात गुन्तवणारे...
तर..आपल्या मैत्रिणी साठी धावपळ करणारेही...तेच हे मित्र
खेळतान्ना रडीचा डाव खेळुण चिड आणणारे...
तर.. पड्ल्यावर धावत डॉक्टरान्कडे उचलुन घेऊन जाणारेही...तेच हे मित्र

रोज सन्ध्याकाळी खेळ्ण्यासाठी आइच्या नजरेतुन वाचवण्यासाठी मदत करणारे..
तर्..परिक्षेच्या दिवसामधे 'अभ्यासच कर्'..असे सान्ग्णारेही..तेच हे मित्र
शाळेच्या परिक्षेत स्पर्धा देणारे..
तर्.. नाटकाच्या तालमित लय आणणारेही..तेच हे मित्र

चालता चालता पाय अडकवुन अडखळवणारे...
तर..गुन्तागुन्तिच्या नागमोगडी रस्त्यामधुन सरळ वाट दाखवणारेही..तेच हे मित्र
दिवसेन्दिवस जिवनात हसु आणणारे....
पण्..आपल्यापासुन दुर जातान्ना रडु आणणारेही...तेच हे मित्र

शांतरसकविता

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

11 Oct 2010 - 8:58 am | स्पंदना

आवडली.

पाषाणभेद's picture

11 Oct 2010 - 9:27 am | पाषाणभेद

मैत्रीचा महिमा आवडला

शरदिनी's picture

11 Oct 2010 - 9:47 am | शरदिनी

मयत्रीचया कथा आवड्ल्या...
तुमाला आयुशात खूप भारी मयत्री कर्नारे लोक्स भेतले अस्नार..
तुमी लकी आअहात

कल्पेश इसई's picture

12 Oct 2010 - 9:02 pm | कल्पेश इसई

आपण सगळेच लकी आहोत्....आपल्या आजुबाजुला बघा खुप मस्त लोक असतात्...खुप इन्ट्रेस्टींग....मित्रच तर असतात, मजा मस्ति करायला..

शिवाय ते कंसात लिहिलेले खोडकर ओलावा हे शब्द तर खूप सुंदर आहेत.. जियो...

कल्पेश इसई's picture

12 Oct 2010 - 9:02 pm | कल्पेश इसई

मला हि ते खुप आवडल....

वसुधा विनायक जोशी's picture

11 Oct 2010 - 10:36 pm | वसुधा विनायक जोशी

ख्ररी मेत्री अशीच असते. कधी हसविणारि तर कधि रडायला लावणारी.
व्वा;कवीता फारच छान आहे. मनाला भावुन गेली.

कल्पेश इसई's picture

12 Oct 2010 - 9:06 pm | कल्पेश इसई

खरचं....जुने मित्र भेटले कि तासन तास कसे जातात ते कळतच नाहि...

उत्साहवर्धक प्रतिक्रिया मागच्या कवितेला दिली होती. आता कवीला फॅन बेस मिळालेला आहे. पुन्हा तेच लिहायची गरज नाही.

२००० सालानंतर कवनात कसेकसे सुधार झाले, हे जाणण्यास उत्सूक आहे. कविता २०१० पर्यंत येईल त्याची वाट बघत आहे.

कल्पेश इसई's picture

12 Oct 2010 - 9:07 pm | कल्पेश इसई

नक्किच...