राजगड

केदार बर्वे's picture
केदार बर्वे in कलादालन
9 Oct 2010 - 7:09 pm

नमस्कार मि.पा.वरच्या सर्व मित्रानो आणि मैत्रिणिनो,

नेहमी प्रमाणे शनिवारी सुटी होती आणी काय करायचे असा ? होता. राजगड ला जायचा विचार नक्की केला, पण कोणिच बरोबर यायला तयार नव्ह्ते म्हणुन मग औफिस मधल्या एका मित्राला विचारले तो पण लगेच तयार झाला आणि निघालो, या वेळेस गुजवणे मार्गे न जाता, वाजेघर मार्गे जायचे ठरवले.

या मोहिमेची काही निवडक क्षणचित्रे.

वा़जेघर रस्त्यावरुन घेतलेला फोटो.

सर्व पठार या सारख्या भरपुर फुलानि भरुन गेले होते.

या झाडा वर मात्र निसर्गा ची जादु झालि नसावि.

अखेरिस पालि दरवाज्याचे दर्शन झाले.

सुवेळा माची

आदरणिय गो.नि.दा ना मुजरा, त्याच्या मुळेच असा पण फोटो काढता येतो हे कळाले.

बालेकिल्या वरिल चन्द्र तळे

बालेकिला

प्रवास

प्रतिक्रिया

पैसा's picture

9 Oct 2010 - 7:11 pm | पैसा

अ प्र ति म!

केदार बर्वे's picture

9 Oct 2010 - 7:16 pm | केदार बर्वे

काहि छायाचित्रे आकारात न बसल्याने स्ट्रेच झालि आहेत. (बालेकिला, फुलाचा ). तरि चागले छायाचित्र पहाण्यासाठी - http://barvekedar.blogspot.com वर जाउन छायाचित्रा वर click करा.

धन्यावाद.

जिप्सी's picture

9 Oct 2010 - 11:58 pm | जिप्सी

छान आहेत फोटो ! तुम्ही ज्या दरवाज्यानं गेला त्याला पाली दरवाजा म्हणतात.राजगड माझ्या अतिशय आवडीचा आहे,मी आजपर्यंत ५० पेक्षाही जास्त वेळा राजगडावर गेलेलो आहे.राजगडाच्या संवर्धनासाठीही मी काम करतो.

राजगडावरचे माझे अनुभव मी इथ लिहिलेले आहेत.
http://www.misalpav.com/node/14301

अवांतर :- गो.नि.दांच्या पुस्तकात तुम्ही बाबुदा भिकुले,हनुवती,यशोदा यांच्याबद्दल वाचले असेल्,त्यांच्याशी माझी उत्तम ओळख आहे,मागच्याच शनिवारी मी,मिपाचे एक सदस्य त्यांच्या घरी मुक्कामाला होतो.

मदनबाण's picture

10 Oct 2010 - 8:22 am | मदनबाण

मस्त... :)

प्रचेतस's picture

10 Oct 2010 - 12:04 pm | प्रचेतस

अतिशय सुरेख फोटो. डोळे निवले.

मितान's picture

10 Oct 2010 - 12:08 pm | मितान

अप्रतिम !!!

खरोखरंच डोळे निवले :)

गणेशा's picture

11 Oct 2010 - 5:29 pm | गणेशा

मला फोटो दिसत नाहीत .
त्यामुळे कंपणी बाहेर येवुन नेट कॅफे मध्ये पहावे लागेल
साईट ब्लॉक आहेत काही म्हणुन तसे होते वाटते ..

सुमीत's picture

13 Oct 2010 - 1:34 pm | सुमीत

फोटो तर निव्वळ अप्रतिम, तोडलस मित्रा !

गणपा's picture

13 Oct 2010 - 1:48 pm | गणपा

सारीच सुरेख... खास करुन बालेकिल्या वरील चन्द्र तळे

चिंतामणी's picture

13 Oct 2010 - 5:59 pm | चिंतामणी

आठवणी जाग्या झाल्या. आत्त्तापर्यन्त ४-५ वेळा गडांच्या राजाचे दर्शन झाले आहे.

एका भेटीत दस्त्रुरखुद्दा गोनीदांचा सहवास लाभला होता. त्यांच्या मुखातुन गडाची महती, आजुबाजुच्या परिसराची माहिती इत्यादी ऐकुन धन्य झालो.