अमुच्यावरच्या धाग्यासंगे युद्ध आमुचे सरू

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
1 Oct 2010 - 4:08 pm

आमच प्रेरणा: ओळखा बघू

अमुच्यावरच्या धाग्यासंगे युद्ध आमुचे सरू
टंकू आणिक मरू

पकतिल प्रेक्षक, पको नागरिक
पकतिल महिला, पकतिल वाचक
विडंबने पण करू, टंकू आणिक मरू

लेख आमुचा आढाव्याचा, स्वप्नामधल्या संदेशाचा
अट्टहास हा सुरू, टंकू आणिक मरू

विडंबनाला लगेच उत्तर, वेळ न देऊ आम्ही क्षणभर
पुरून त्यांना उरू, टंकू आणिक मरू

हानी होवो कितीही भयंकर, प्रतिसादांचे चालो संगर
अंती विजयी ठरू, टंकू आणिक मरू

हास्यवीररसविडंबन

प्रतिक्रिया

सूड's picture

1 Oct 2010 - 4:16 pm | सूड

ह्याला म्हणतात विडंबन, परफेक्ट.

दत्ता काळे's picture

1 Oct 2010 - 4:18 pm | दत्ता काळे

विडंबनाला लगेच उत्तर, वेळ न देऊ आम्ही क्षणभर
.. खरं आहे त्यामुळे 'आमची प्रेरणा' ऐवजी 'आमच प्रेरणा' झालं .. सर !
क्वालिटी जर्रा घसरली..

'आमच प्रेरणा' : हे बहुधा कानडी मराठी असावं. ;)

यशोधरा's picture

1 Oct 2010 - 4:21 pm | यशोधरा

किती सूट घेतली आहे ती... पण हे जास्त छान आहे हां! ;)

श्रावण मोडक's picture

1 Oct 2010 - 4:39 pm | श्रावण मोडक

चालू द्या... ;)

आंबोळी's picture

1 Oct 2010 - 4:46 pm | आंबोळी

चालू द्या!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Oct 2010 - 4:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चालू द्या......! :)

-दिलीप बिरुटे

प्रियाली's picture

1 Oct 2010 - 5:00 pm | प्रियाली

पकले, थकले.

बास्स की आता
लै कट्टाळा !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Oct 2010 - 5:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

केसुगुरूजी लायनीवर आले, आपलं मार्गी लागले! ;-)

मिसळभोक्ता's picture

1 Oct 2010 - 10:04 pm | मिसळभोक्ता

बोळा निघाला, पाणि वाहते झाले...

करा व्हिज्युअलाईझ. ;-)

पैसा's picture

1 Oct 2010 - 8:44 pm | पैसा

लिहून देऊ पायजे तर!

बेसनलाडू's picture

2 Oct 2010 - 1:38 am | बेसनलाडू

मस्त विडंबन! आवडले.
(प्रतिसादक)बेसनलाडू

आत्मकथनापर ऊत्तर आवडले !!

अवलिया's picture

2 Oct 2010 - 10:53 am | अवलिया

बस ना भो आता.. संपादकांना आवरा हो कुणीतरी ! की नियम फक्त सामान्यांसाठीच? ऑ !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2010 - 11:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवितेचं नाव आहे......
संपादकांच्या नावासंगे बोंब आमुची सुरु

संपादकांच्या नावासंगे युद्ध आमुचे सुरु
टंकू आणिक मरू

पकतिल वाचक, पको संपादक
पकतिल मित्र , पकतिल लेखक
भांडन नक्की करू, टंकू आणिक मरू

रोख आमुचा संपादकांवर, भडास काढू प्रतिसादातून
जमेल तसे हे सुरू, टंकू आणिक मरू

संपादकांना लगेच प्रत्युत्तर , वेळ न घेऊ आम्ही क्षणभर
पुरून त्यांना उरू, टंकू आणिक मरू

हानी होवो कितीही भयंकर, प्रतिसादांचे चालो लंगर
अंती येथेच मरु, टंकू आणिक मरू

अंती येथेच मरु, टंकू आणिक मरू

अवलिया चालले??? :ऑ :ऑ

रेस्ट इन पीस!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2010 - 11:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>अवलिया चालले??? :ऑ :ऑ

अवलिया यांच्या कुंडलीत नवव्या स्थानी सिंह राशीत मंगळ गुरू राहू आहेत.
परिणाम वाईटच होतात असे ऐकून आहे.

आपण फक्त देवाकडे मित्रावरचे संकट जाऊ दे, इतकेच म्हणू शकतो. :)

-दिलीप बिरुटे
[अंदाजपंचे ज्योतिषि]

अवलिया's picture

2 Oct 2010 - 11:39 am | अवलिया

>>>>अवलिया यांच्या कुंडलीत नवव्या स्थानी सिंह, राशीत मंगळ गुरू राहू आहेत.
परिणाम वाईटच होतात असे ऐकून आहे.

नवव्या स्थानी सिंह? स्वल्पविरामाची जागा चुकली का? मराठीच्या प्राध्यापकांना प्रमाणलेखनाचे नियम समजावुन सांगायची वेळ यावी हे भारतातील शिक्षणक्षेत्राची दशा दर्शवत आहे.

नवव्या स्थानात सिंहेतले मंगळ गुरु राहु असल्यास काय होते यावर गुंडोपंत प्रकाश टाकतील.

>>>>आपण फक्त देवाकडे मित्रावरचे संकट जाऊ दे, इतकेच म्हणू शकतो. Smile

वरिल वाक्यात मित्रावरचे हे मिपावरचे असे वाचले आणी डोळे पाणावले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2010 - 11:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>नवव्या स्थानी सिंह, राशीत मंगळ गुरू राहू आहेत.
स्वल्पविराम तर तुमच्याच वाक्यात दिसतोय. बाकी, चालू द्या.....! :)

शुद्धलेखन : समजावून आणिआणि असे हवे. :)

-दिलीप बिरुटे

दिलीपशेट लढायचं तर मर्दासारखं लढावं !

संपादकीय अधिकाराचा गैरवापर करुन प्रतिसाद संपादित करुन शहाजोगपणा करु नये.. .

बाकी प्रमाणलेखनाची पोपटपंची आमच्यासमोर नको. धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2010 - 11:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>प्रमाणलेखनाची पोपटपंची आमच्यासमोर नको. धन्यवाद
प्रमाणलेखनाची पोपटपंची आपणच सुरु केली.

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

2 Oct 2010 - 11:53 am | अवलिया

बरोबर आहे. परंतु माझा दोष नाही. कारण प्रमाणलेखनाची तुम्ही तरफदारी करत असता पण त्याप्रमाणे वर्तन करत नाही हेच मला दाखवायचे होते. मी कधीही कुठेही प्रमाणलेखन हवे असे प्रतिपादन केलेले नाही त्यामुळे मजवर दोष येत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2010 - 12:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>प्रमाणलेखनाची तुम्ही तरफदारी करत असता
शुद्ध आणि अशुद्ध असा लेखनाच्या बाबतीत आम्ही भेद करत नाही. त्यावरुन आमची बरीच बेअदबी मराठी संस्थळावर झाली आहे. त्यामुळे प्रमाणलेखनाच्या तरफदारीचा आणि वाक्यातील वर्तनाबद्दलचा प्रश्नच उरत नाही.

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

2 Oct 2010 - 12:11 pm | अवलिया

>>>शुद्ध आणि अशुद्ध असा लेखनाच्या बाबतीत आम्ही भेद करत नाही.

शुद्ध आणि अशुद्ध असा भेद भाषेत अस्तित्वातच नसतो. त्यामुळे अस्तित्वात नसलेली गोष्ट मी मानत नाही असे सांगुन फार मोठा तीर मारल्याचा प्रयत्न.

>>त्यावरुन आमची बरीच बेअदबी मराठी संस्थळावर झाली आहे.

मसंवर गेंड्याची कातडी आवश्यक असते याचे भान आपणास असावे असे वाटते.

>>>त्यामुळे प्रमाणलेखनाच्या तरफदारीचा आणि वाक्यातील वर्तनाबद्दलचा प्रश्नच उरत नाही.

प्रतिसादाची सुरवात शुद्धलेखनासंबंधाने करुन समारोप प्रमाणलेखनाबद्दल करणे हे अस्वस्थ आणि चंचल मनोवृत्तीचे निदर्शक असल्याने म्हणणे पुन्हा मांडायची संधी दिली जात आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2010 - 12:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>शुद्ध आणि अशुद्ध असा भेद भाषेत अस्तित्वातच नसतो. त्यामुळे अस्तित्वात नसलेली गोष्ट मी मानत नाही असे सांगुन फार मोठा तीर मारल्याचा प्रयत्न.

धन्यवाद....! काहीतरी आपणास समजत आहे, ही गोष्ट चांगली झाली.

>>>मसंवर गेंड्याची कातडी आवश्यक असते याचे भान आपणास असावे असे वाटते.
नक्कीच आहे.

>>>प्रतिसादाची सुरवात शुद्धलेखनासंबंधाने करुन समारोप प्रमाणलेखनाबद्दल करणे हे अस्वस्थ आणि चंचल मनोवृत्तीचे निदर्शक असल्याने म्हणणे पुन्हा मांडायची संधी दिली जात आहे.

सुरुवात आपणच केली आहे. तेव्हा योग्य समारोप आपणच करावा. बाकी, अस्वस्थपणा आणि चंचल मनोवृत्तीबद्दल काळजी करु नये. अशी वृत्ती कमीअधिक फरकाने सर्वांची सारखीच असते. काहींची दिसते काहींची नाही. आपल्याला काय म्हणायचे आहे आणि आपण मला कोणते मत मांडण्याची संधी देत आहात ते अजिबात कळले नाही. शुद्धलेखन आणि शुद्धशब्द याबाबतीत आपण गडबड करत आहात असे वाटते.

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

2 Oct 2010 - 12:22 pm | अवलिया

>>>>धन्यवाद....! काहीतरी आपणास समजत आहे, ही गोष्ट चांगली झाली.

हे वाक्य वाचेपर्यंत मला काही समजत नाही असे माझे मत होते. परंतु आपल्या या वाक्याने माझा हुरुप वाढला आहे :)

>>>नक्कीच आहे.

खात्री होती.

>>>सुरुवात आपणच केली आहे. तेव्हा योग्य समारोप आपणच करावा.

ठीक आहे. यापुढील चर्चा खव मधुन करु ;)

>>>बाकी, अस्वस्थपणा आणि चंचल मनोवृत्तीबद्दल काळजी करु नये. अशी वृत्ती कमीअधिक फरकाने सर्वांची सारखीच असते. काहींची दिसते काहींची नाही. आपल्याला काय म्हणायचे आहे आणि आपण मला कोणते मत मांडण्याची संधी देत आहात ते अजिबात कळले नाही. शुद्धलेखन आणि शुद्धशब्द याबाबतीत आपण गडबड करत आहात असे वाटते.

शाब्बास ! जमलं जमलं ! असेच लिहिते रहा... मसंवरचे भावी विचारवंत म्हणुन आम्ही तुमच्याकडे आशेने पहात आहोत.

सदस्यांच्या धाग्यासंगे युद्ध आमुचे सुरु
डिलिटु आणिक मारू

पळतील लेखक, पळो प्रतिसादक
पळतील कवी , पळतील खरडक
भांडन नक्की करू, डिलिटु आणिक मारू

रोख आमुचा सत्यवचनांवर, खुन्नस काढू प्रतिसाद उडवुन
जमेल तसे हे सुरू, डिलिटु आणिक मारू

सदस्यांस देऊन उत्तर , आक्षेपांना मारुनी फाट्यावर
पुरून त्यांना उरू, डिलिटु आणिक मारू

हानी होवो कितीही भयंकर, कलिंग युद्धासम होय संगर
अंती एकटेच उरु, डिलिटु आणिक मारू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2010 - 11:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्यॅ...! मजा नै आली.

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

2 Oct 2010 - 11:39 am | अवलिया

सत्य कटु असते

परिकथेतील राजकुमार's picture

2 Oct 2010 - 11:52 am | परिकथेतील राजकुमार

जौ दे ना ए नानबा. कशाला ? ऑ ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2010 - 12:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>जौ दे ना ए नानबा. कशाला ? ऑ ?
परा, बोलू दे नानाला.........!

-दिलीप बिरुटे