ढबू मिरचीची पीठ पेरून भाजी

प्रभो's picture
प्रभो in पाककृती
30 Sep 2010 - 7:28 pm

काल घरी बसूनच काम केलं... संध्याकाळी बराच कंटाळा आला होता.... त्यात बेसन पेरून सिमला मिरची खायची इच्छा झाली.

फ्रीज उघडून बघितला तर मिरच्या होत्या.. मस्तपैकी पीठ पेरून भाजी केली. ही घ्या कृती.

साहित्यः
१. ३-४ मोठे चमचे तेल
२. १-२ हिरव्या मिरच्या तुकडे करून
३. २-३ सिमला मिरच्या चिरून
४. ३-४ मोठे चमचे चण्याचे पीठ
५. बरेच जण ह्यात कांदा घालत नाहीत. पण मला आवडतो म्हणून मी वापरला..त्यामुळे हवा असल्यास १ मोठा कांदा चिरून
६. फोडणीसाठी हिंग, मोहरी. जिरे, कडिपत्ता
७. अर्धा चमचा हळद
८. मीठ (चविनुसार)
९. लाल तिखट (चविनुसार)

कृती:

१. कढईमधे मध्यम आचेवर तेल गरम करा.
२. तेल गरम झालं की त्यात हिंग, जिरे, मोहरी,हिरव्या मिरच्या व कडिपत्त्याची फोडणी करा.
३. त्यात कांदा टाकून सोनेरी होईपर्यंत परता.. (साधारण ३-४ मिनिटे)
४. त्यात चिरलेली सिमला मिरची टाकून एक मिनिट परता.
५. आता त्यात मीठ टाकून हलवा व झाकण ठेवून मंद आचेवर ५-७ मिनिटे शिजवा.
६. सिमला मिरची शिजली की त्यात हळद,तिखट टाकून एकजीव करा.
७. त्यावर बेसन भुरभुरवा.
८. सर्व मिश्रण एकत्र करून त्यावर झाकण ठेवा. मंद आचेवर एक दणदणीत वाफ काढा. (५-७ मिनिटे) म्हणजे बेसन शिजेल.

मस्त गरमा गरम पोळीसोबत खा. तोंडी लावायला मेतकुट घ्यायला विसरू नका.. ;)

@रेवतीताई : मेतकुट संपलं आहे... पुढचा लॉट लवकर पाठव.. ;)

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

30 Sep 2010 - 7:34 pm | मेघवेडा

देश तिकडे अयोध्या निकालात गुंतलाय आणि द्येवाला खाण्याबद्दल सुचतंय! काय रे द्येवा!

बाकी फटू पाहून तोंड पाणावले!

निवेदिता-ताई's picture

30 Sep 2010 - 7:45 pm | निवेदिता-ताई

मस्त भाजी........... अशी भाजी मला फार आवडते,
आणी ते मेतकूट तर लै लै भारी...आहाहा......

रेवतीताई : मेतकुट संपलं आहे... पुढचा लॉट लवकर पाठव..........
मलाही पाठव ग.

यशवंतकुलकर्णी's picture

30 Sep 2010 - 8:59 pm | यशवंतकुलकर्णी

प्रभोशेठ,
कवा येतायसा सोलापूरात? पाणी काढ्लंत तोंडातून :)

शुचि's picture

30 Sep 2010 - 9:00 pm | शुचि

सुंदर. फोटो मस्त. लहानपणापासूनची माझी आवडीची भाजी.

मस्तानी's picture

30 Sep 2010 - 9:15 pm | मस्तानी

तुझी बायको भलतीच नशीबवान (असेल) !

शेखर's picture

30 Sep 2010 - 9:20 pm | शेखर

व आय टी वाली पण असेल

पैसा's picture

30 Sep 2010 - 9:52 pm | पैसा

ही पूर्वतयारी सुरू आहे.

निखिल देशपांडे's picture

30 Sep 2010 - 10:21 pm | निखिल देशपांडे

प्रभ्या चा पाकृ ला चान चान म्हणावेच लागते

मस्तानी's picture

30 Sep 2010 - 10:34 pm | मस्तानी

... छान छान म्हटलं की तो पाकृ-पार्सल पाठवतो का घरी ?

दुरुस्ती- चान चान म्हटलं की पाठवत असेल .

पिवळा डांबिस's picture

30 Sep 2010 - 10:58 pm | पिवळा डांबिस

पण ते तुमचं मेतकूट असं मस्टर्डसारखं (खरं सांगायचं तर लहान मुलाच्या शीसारखं!!!) का दिसतंय?
:)

बेसनलाडू's picture

30 Sep 2010 - 11:03 pm | बेसनलाडू

हहपुवा!!
भाजी छान झालेली दिसतेय बाकी!! कोबीचीही अशीच पीठ पेरून भाजी करतात आमच्याकडे (काही जण त्याला कोबीचा झुणका म्हणतात); आणि कांद्याच्या पातीची, पडवळाचीही. या सगळ्या भाज्या पीठ पेरून करून फार चवदार लागतात.
(खवय्या)बेसनलाडू

दह्यात कालवलेलं आहे म्हणून.. :)

शिल्पा ब's picture

1 Oct 2010 - 12:56 am | शिल्पा ब

आता पिडांकाकांनी दिलेल्या उपमेमुळे असं मेतकुट खाणे होणार नाही...
बाकी फोटू अन रेसिपी दोन्ही छान...

प्रभो, अरे किती जाहिरात करशील लग्नाळू असल्याची?
पूर्वी वधूवर स्वत:चे फोटो देत असत. आजकाल दिवस इतके बदललेत कि आपण केलेल्या पदार्थांचे फोटो द्यावे लागतात. स्थळं चालून यावीत अशीच अपेक्षा दिसते आहे.;) जुन्याकाळी नवर्‍यामुलीने तयार केलेले विणकाम, भरतकामाचे नमुने, वाळवणाचे पदार्थ, मुरांबे, टिकावू वड्या असे रुखवतात ठेवत असत. यापुढे नवर्‍यामुलाने 'मला कायकाय स्वयंपाक येतो' असे पाककलेचे नमुने ठेवायचे दिवस आलेत जणू!;)
या पाकृच्या शिर्षकात IT's ढब्बू मिरचीची पीठ पेरून भाजी असे असायला हवे होते.
भाजी चांगली दिसते आहे. पोळ्या तू केल्यास कि फ्रोझन आणल्यास तेही कळवणे.
बाकी ते मेतकूट वगैरे पाठवते रे!
निवेदीता ताईलाही पाठवायचे आहे ना!:)

श्रावण मोडक's picture

1 Oct 2010 - 11:33 am | श्रावण मोडक

किती हाणायचं एखाद्याला? छ्या! :)

रामदास's picture

1 Oct 2010 - 7:17 pm | रामदास

लग्ना अगोदरच !!!

चिंतामणी's picture

1 Oct 2010 - 1:26 am | चिंतामणी

प्रभो (सोबत मेघवेडा, निवेदिता-ताई, यशवंतकुलकर्णी, बेसनलाडू ईत्यादी ईत्यादी)

पाकृ छानच आहे. पण एक गोष्ट सुचवु इच्छीतो.

बेसनपीठ पचायला जड असते (विषेशतः आताच्या म्हणजे पावसाळी हवेत).

बेसनपीठा ऐवजी "भाजणी" भुरभुरा. त्याने चव तर नक्कीच बदलेल आणि पोषणमुल्ये वाढतील.

करून बघा आणी मला सांगा कशी लागते भाजी. (हाच प्रयोग कांद्याची पात, कोबी इत्यादी भाज्यांसाठी करून बघा)

बेसनलाडू's picture

1 Oct 2010 - 1:29 am | बेसनलाडू

(प्रयोगशील)बेसनलाडू

चिंतामणी's picture

1 Oct 2010 - 1:35 am | चिंतामणी

धन्यवाद नक्की कोणला??????

:-O

आणि तुम्हाला ही माहिती ज्या कोणी सांगितली त्यांना :)
(आभारी)बेसनलाडू

चिंतामणी's picture

1 Oct 2010 - 1:58 am | चिंतामणी

धन्यु.

ही कल्पना माझ्या डोक्यातुन निघाली (आमचे पोट हलके आहे हो. त्यामुळे डाळीच्या पिठाचा त्रास व्हायचा आणि पर्याय शोधला) आणि बायकोला आवडुन तीने करून बघीतली.

मग हीच कृती ज्या भाज्या पिठ पेरुन करतात तिथे अमलात आणली.

:)

अरे वा ! मस्तच दिसतेय भाजी...

चित्रा's picture

1 Oct 2010 - 1:32 am | चित्रा

एक ओळखीची जैन मुलगी अशी भाजी स्पेशल मसाला घालून इतकी कोरडी आणि झकास करायची, त्याची आठवण झाली. पण मसाल्यात नक्की काय असायचे ते आठवत नाही :(
बहुतेक जिरे, बडीशेप असे काही असावे.

बरोबर् ..पीठ पेरलेली ढबू मिरचीची भाजी कोरडीच असते.
एकदम कोरडी जमायला जरा पाककौशल्य लागते.
ही भाजी फोटोत तरी ओलसर दिसत आहे. पण बॅचलर , आय टी अशी बिरूदं असल्याने चालून जाईल.

विसोबा खेचर's picture

1 Oct 2010 - 11:24 am | विसोबा खेचर

ग्रेट..!

--
काही नगण्य अपवाद वगळता मराठी भावसंगीताची हल्ली बोंबच आहे!

यशोधरा's picture

1 Oct 2010 - 11:34 am | यशोधरा

मस्त रे प्रभ्या :)

सूड's picture

1 Oct 2010 - 1:26 pm | सूड

प्रभो, मस्तच रे !!
मला आवडते अशी भाजी, म्हणून माझी आजी मी आजोळी गेल्यावर आवर्जून करते.
पण ती डाळीचं पीठ थोडं तेलावर भाजून घेते, आणि नंतर ते बाजूला काढून भाजी शिजत आली की मग टाकते त्यात.

प्राजक्ता पवार's picture

1 Oct 2010 - 4:02 pm | प्राजक्ता पवार

पाकृ व फोटो दोन्ही छान . मीदेखील आधी पीठ भाजुन घेते व नंतर भाजी शिजत आली की त्यात घालते.

स्वैर परी's picture

1 Oct 2010 - 2:21 pm | स्वैर परी

मला पुर्वि ढोबळी मिरची ची भाजी कधीच आवडली नाही. पन आय. टी. हे क्शेत्र भल्या भल्याना नमवते, त्यात आम्हि काय चीज. असो, तुम्ही सान्गितलेली हि रेसिपी नक्कि करुन पाहिन. :)

मनि२७'s picture

1 Oct 2010 - 5:06 pm | मनि२७

मस्तच...!!
:-)

धमाल मुलगा's picture

1 Oct 2010 - 6:32 pm | धमाल मुलगा

वा वा!
प्रभ्या, छान रेशिपी हों!

बरं, परवा त्या कुलकर्ण्यांचं स्थळ तुझी चौकशी करत होतं बुवा. त्यांना म्हणालो, मुलगा अगदी गृहकृत्यदक्ष आहे, स्वयंपाक तर असा करतो.... त्यांचा होकार आलाय रे! काय कळवायचं तिकडं?

परिकथेतील राजकुमार's picture

1 Oct 2010 - 6:37 pm | परिकथेतील राजकुमार

वा वा वा प्रभ्या लै भारी रे.
फारच प्रयोगशील झालास हो तु आजकाल ;)

प्रभो's picture

1 Oct 2010 - 6:47 pm | प्रभो

सर्व वाचक-प्रतिसादक मित्र-मैत्रीण-काकवांना धन्यवाद. :)

@धम्या : हॅहॅहॅ...व्यनीतून बोलू.. ;)

गणपा's picture

1 Oct 2010 - 7:48 pm | गणपा

आता काकालोक रागावणार ;)