कै. नारायण सुर्वे यांची "मुंबई" हि कविता मला हवी आहे.

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
30 Sep 2010 - 10:44 am

कै. नारायण सुर्वे यांची "मुंबई" हि कविता मला हवी आहे. कुणाकडे आहे का? ऑनलाईन कुठे मिळू शकेल?

कविता

प्रतिक्रिया

सागर's picture

5 Oct 2010 - 1:22 pm | सागर

विशालभौ,

नारायण सुर्वेंचं माहिती नाही. पण विंदा करंदीकर यांची मुंबई मात्र आहे माझ्याकडे
कवी नक्की नारायण सुर्वेच आहेत ना? कारण जालावर पण ही माहिती मिळाली नाही मला.

मुंबई

या उंच हवेल्या ! कां रस्त्यावर पडतां ?
हीं धान्यागारें ! कां तळतळुनी मरतां ?
हीं शीघ्र वाहणे ! रखडत मग का पायी ?
या प्रचंड गिरण्या ! वस्त्र तुम्हा का नाही ?

छे ! नगर नव्हे हें ! हिंदुभूमिच्या शरिरीं
वाटते जहाली जखम भयंकर जहरी;
शेटजी कोठले ? त्यांत किडे लवलवती,
जे शरीर शोषुनि रक्तावरतीं जगती.

जर सूख हिच्यातिल सर्वांसाठीं असते,
ही जखम न असती, भूषण मजला गमतें !

विंदा करंदीकर

विशाल कुलकर्णी's picture

5 Oct 2010 - 3:19 pm | विशाल कुलकर्णी

हि आहे माझ्याकडे.
पण सुर्वेसाहेबांची पण एक आहे. ती नाही मिळत आहे कुठेच :(

धन्यु :)

सागर's picture

15 Oct 2010 - 8:58 pm | सागर

विशाल,

मिळाली की इथेच दे ही विनंती. मलाही वाचायला आवडेल :)