विशालभौ,
नारायण सुर्वेंचं माहिती नाही. पण विंदा करंदीकर यांची मुंबई मात्र आहे माझ्याकडे
कवी नक्की नारायण सुर्वेच आहेत ना? कारण जालावर पण ही माहिती मिळाली नाही मला.
मुंबई
या उंच हवेल्या ! कां रस्त्यावर पडतां ?
हीं धान्यागारें ! कां तळतळुनी मरतां ?
हीं शीघ्र वाहणे ! रखडत मग का पायी ?
या प्रचंड गिरण्या ! वस्त्र तुम्हा का नाही ?
छे ! नगर नव्हे हें ! हिंदुभूमिच्या शरिरीं
वाटते जहाली जखम भयंकर जहरी;
शेटजी कोठले ? त्यांत किडे लवलवती,
जे शरीर शोषुनि रक्तावरतीं जगती.
जर सूख हिच्यातिल सर्वांसाठीं असते,
ही जखम न असती, भूषण मजला गमतें !
विंदा करंदीकर
विंदांची मिळाली
हि आहे माझ्याकडे. पण
In reply to हि आहे माझ्याकडे. पण by विशाल कुलकर्णी
इथेपण दे