मिश्र डाळींची इडली.

रेवती's picture
रेवती in पाककृती
19 Sep 2010 - 8:01 am

साहित्य: उडीद डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ, मीठ, मिक्सर, इडलीपात्र.

कृती: वरील तीनही डाळी प्रत्येकी अर्धा कप घ्याव्यात. स्वच्छ धुवून एकत्र भिजवाव्यात.
चार ते सहा तासांनी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्याव्यात. मीठ घालून पीठ आंबवण्यास ठेवावे.
सहा ते आठ तासांनी इडल्या कराव्या. त्यासाठी इडलीपात्राला तेलाचा हात लावून पीठ घालावे.
पंधरा मिनिटे वाफवून चटणीबरोबर इडल्यांचा आस्वाद घ्या!

या इडल्या फक्त डाळींपासून केलेल्या असल्याने प्रथिनयुक्त आहेत व पचनास जड आहेत.
याबरोबर चटणी जास्त चांगली लागते. सांबार नसलेले बरे.
रात्रभर पीठ आंबवण्यास ठेवू नका.
हा पदार्थ माझी मैत्रिण डॉ. गौरी हिने शिकवला आहे.

रेवती

प्रतिक्रिया

स्मिता_१३'s picture

19 Sep 2010 - 9:40 am | स्मिता_१३

इडल्या सुरेखच गं रेवती ताई.

एक शंका, नुसत्या डाळींमुळे इडल्या जड होत नाहित का.

मी एकदा केल्या तर दगड झाल्या होत्या. आता मी तांदुळात उडीद डाळी बरोबर इतर पण डाळी घालते पण अगदी थोड्या !

मदनबाण's picture

19 Sep 2010 - 9:45 am | मदनबाण

इडली हलकी फुलकी झालेली दिसतेय... :)

दिपाली पाटिल's picture

22 Sep 2010 - 2:12 am | दिपाली पाटिल

अगदी हेच म्हणते, एकदम सही दिसतायत इडल्या...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2010 - 9:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त पाकृ!

(चुकीच्या विषयावर धागा काढून एका सोप्या पाकृ आणि चविष्ट पदार्थाची ओळख काढून दिल्यामुळे धाग्याला टॉप २५ मधे आणणं मला जमणार नाही. समक्श्व.)

चिंतामणी's picture

19 Sep 2010 - 10:13 am | चिंतामणी

स्मिताप्रमाणे मला सुध्दा शंका आहे की या इडल्या हलक्या होतील की नाही.

पण ह्या इडल्या हलक्या झाल्या अवाव्यात असे दिसते. असो.

करून बघीतल्या पाहीजेत.

ह्या नाष्ट्याला खाता येणार नाहीत. रात्रीच्या जेवणा ऐवजी खाल्या पाहीजेत असे वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2010 - 1:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ह्या नाष्ट्याला खाता येणार नाहीत. रात्रीच्या जेवणा ऐवजी खाल्या पाहीजेत असे वाटते.

का बुवा?

चिंतामणी's picture

19 Sep 2010 - 3:26 pm | चिंतामणी

रेवतीने कृती देताना लिहीलेली दोन वाक्ये पुन्हा वाच.

स्वच्छ धुवून एकत्र भिजवाव्यात.
चार ते सहा तासांनी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्याव्यात. मीठ घालून पीठ आंबवण्यास ठेवावे.

रात्रभर पीठ आंबवण्यास ठेवू नका.

पर्नल नेने मराठे's picture

19 Sep 2010 - 4:08 pm | पर्नल नेने मराठे

पाहुणे आले कि ह्या इडल्या कराव्यात... जड असतिल तर कमी कराव्या लागतिल ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2010 - 5:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

१. फ्रीज वापरून आंबवणं थांबवून सकाळी मोठ्ठी न्याहरी करण्यासाठी या इडल्या करता येतील.
२. निशाचर लोकांना काय फरक पडतो?

पैसा's picture

19 Sep 2010 - 3:03 pm | पैसा

जसे मेदूवडे हलके होतात तशा इडल्या पण होतील. त्यातही फक्त डाळ असते.

कवितानागेश's picture

19 Sep 2010 - 1:54 pm | कवितानागेश

थोडे पोहे भिजवून टाकले तर 'इडलीपात्रातले अप्पे' तयार होतील.

मराठमोळा's picture

19 Sep 2010 - 2:17 pm | मराठमोळा

फोटो एकदम सुरेख!!!! :)

बाकी (सुक्या )खोबर्‍याच्या चटणीशिवाय ईडलीला मजा नाही ब्वॉ.
चटणीची पण पाकृ द्यावी. :)

कुंदन's picture

19 Sep 2010 - 2:33 pm | कुंदन

छानच दिसतायत इडल्या.....

अवलिया's picture

19 Sep 2010 - 2:40 pm | अवलिया

छानच दिसत आहेत इडल्या !!

अवलिया's picture

19 Sep 2010 - 2:40 pm | अवलिया

छानच दिसत आहेत इडल्या !!

अवलिया's picture

19 Sep 2010 - 2:40 pm | अवलिया

छानच दिसत आहेत इडल्या !!

अवलिया's picture

19 Sep 2010 - 2:40 pm | अवलिया

छानच दिसत आहेत इडल्या !!

अवलिया's picture

19 Sep 2010 - 2:40 pm | अवलिया

छानच दिसत आहेत इडल्या !!

अवलिया's picture

19 Sep 2010 - 2:41 pm | अवलिया

छानच दिसत आहेत इडल्या !!

अवलिया's picture

19 Sep 2010 - 2:41 pm | अवलिया

छानच दिसत आहेत इडल्या !!

पर्नल नेने मराठे's picture

19 Sep 2010 - 4:05 pm | पर्नल नेने मराठे

पुरे आता किति ते छान छान्...इडल्या चालत घरी येणार नाहियेत खुश होउन ;)

प्रीत-मोहर's picture

19 Sep 2010 - 2:52 pm | प्रीत-मोहर

नाना अरे किती ते प्रतिसाद?

बाकी इडल्या मस्तच........

चिंतामणी's picture

19 Sep 2010 - 3:30 pm | चिंतामणी

जितके प्रतिसाद तितक्या इडल्या असे नानांबरोबर कॉन्ट्रॅक्ट केले असेल.

अवलिया's picture

19 Sep 2010 - 3:39 pm | अवलिया

हा हा

ही एक चांगली कल्पना आहे.. पन्नास इडल्या द्या हो पाठवुन.. पोचल्या की उरलेले प्रतिसाद देतो.

कुंदन's picture

19 Sep 2010 - 6:04 pm | कुंदन

नान्या,
पचतिल का तुला ह्या वयात पन्नास इडल्या ?

खारकेच्या बिया चघळतोस ना , पन्नास इडल्या काय विकणार आहेस का?

प्रीत-मोहर's picture

19 Sep 2010 - 6:46 pm | प्रीत-मोहर

सहमत........नान्बाचे वयही सांगुन टाका की जाता जाता....आता मी पळाले ,,,,....

पैसा's picture

19 Sep 2010 - 6:55 pm | पैसा

पळपुटी कुठची

प्रीत-मोहर's picture

19 Sep 2010 - 7:02 pm | प्रीत-मोहर

मग काय ग....अग जीव सलाम्त तर प्रतिसाद पचास.....

आणि तसही लोक म्हणे काविळीने मारताहेत......म्हणे अस ऐकल होत काल......

छान !!

सोपी आणि चवदार पाककृती ...

इंटरनेटस्नेही's picture

19 Sep 2010 - 3:15 pm | इंटरनेटस्नेही

मस्त! टोण्डाला पाणी सुटलं!

शुचि's picture

19 Sep 2010 - 4:16 pm | शुचि

खल्लास फोटो!!!

रेवती's picture

19 Sep 2010 - 6:27 pm | रेवती

सर्व प्रतिसादकांचे आभार!
नाना, तुमचे सात वेळा आभार!;)
स्मिता_१३, वर लिहिले आहे कि या इडल्या पचनास जड असतात म्हणूनच पुन्हा डाळीचे सांबार नको.
सर्वसाधारणपणे दोन ते तीन इडल्या खाल्ल्यानंतर पोट भरते.
हे पीठ लवकर आंबते म्हणूनच लक्ष ठेवून पटकन इडल्या करून टाकाव्यात.
अदिती, तुझा प्रतिसाद देण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. टेंपररी निशाचरांनी कधीही इडल्या केल्यास चालते.;)
चिंतमाणराव, या इडल्या जाळीदार व हलक्या होतात. ऋतुमानानुसार आंबण्यास वेळ कमीजास्त लागू शकतो पण पीठ लवकर आंबते हे नक्की. मिक्सरमध्ये पीठ वाटले असता आंबण्यास जरा वेळ तरी मिळतो. इडली ग्राईंडरमध्ये एरिएशनच झटपट होते, लग्गेच इडल्या कराव्या लागतात.
लीमाउजेट, मागे एकदा आप्प्यांची कृती मी दिली होती. याचे आप्पेही चांगले लागतील.
पर्नल, आम्ही पाहुणे म्हणून गेल्यावर मैत्रिणीने केल्या होत्या या इडल्या. संध्याकाळी पाच वा. दोन इडल्या खाऊन झाल्यावर रात्री सगळ्यांनी घास घास तूप मेतकूट भात खाल्ला फक्त!;)
मराठमोळे साहेब, चटणी ओल्या खोबर्‍याची आहे. तीत फुटाण्याचं डाळं, किंचित आलं, एक छोटी पाकळी लसूण, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर एवढेच आहे.
मदनबाण, पैसाताई, कुंदन, प्रीत्-मोहर, मनीषा, इंटरनेटस्नेही, शुचितै सर्वांचे परत एकदा आभार! :)

अनामिक's picture

19 Sep 2010 - 9:09 pm | अनामिक

छ्या रेवती तै! तू प्रत्येकाला आभाराचा वेगवेगळा प्रतिसाद दिला असतास तर तूच तुझा धागा पहिल्या पंचविसात नेला नसतास का?

असो, इडल्या छान झालेल्या दिसताहेत. नक्की करायला पाहिजे.

रविवारी धागा टाकु नये , कारण रविवारी ट्रॅफिक कमी असते परिणामी प्रतिसाद कमी मिळतात.
संपादक रेवती वैनींना याची कल्पना असायला हवी.

प्रत्येकाला आभाराचा वेगवेगळा प्रतिसाद
मागे एकदा तसेच केले. नंतर लक्षात आले कि सदस्यांपेक्षा माझेच माझ्या धाग्याला आलेले प्रतिसाद जास्त आहेत. नंतर नंतर गडबडीत मीच माझ्या प्रतिसादास चुकून उपप्रतिसाद दिले होते. त्यावेळी संपादक घरचेच असल्याने लगोलग दुरुस्ती करून माझे 'हसे' होणे टळले होते. अतिप्रसिद्धीचा हव्यास असा नडला. ;)

कुंदन's picture

19 Sep 2010 - 6:41 pm | कुंदन

मग रंगासेठ नी किती दिवस तूप मेतकूट भात खाल्ला?

स्वाती२'s picture

19 Sep 2010 - 6:56 pm | स्वाती२

व्वा! मस्त आहे पाकृ.

स्पंदना's picture

19 Sep 2010 - 8:51 pm | स्पंदना

रेवती खुप छान दिसताहेत इडल्या, करुन मग चांगला प्रतिसाद देइन.
आम्हाला सांबार फार फार आवडत.

शिल्पा ब's picture

19 Sep 2010 - 8:57 pm | शिल्पा ब

छानंच दिसताहेत इडल्या...चटणीची पाकृ देखिल द्यायची.

रेवती's picture

20 Sep 2010 - 4:52 am | रेवती

प्रतिसादकांचे आभार!
कुंदनसाहेब, रंगाला तूप मेतकूट भात खाण्यासाठी निमित्त लागते, ते या इडल्यांमुळे मिळते म्हणून हा पदार्थ आवडीचा आहे. खरं तर जास्त प्रतिसाद येण्यासाठी सोमवार ते गुरुवारमध्येच पाकृ टाकायला हवी, अनामिकसाहेब म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येकास वेगळा आभाराचा प्रतिसाद लिहायला हवा. पुढच्या पाकृस तसेच करते.
अपर्णा, या प्रकाराबरोबर सांबारापेक्षा चटणी जास्त चवदार लागते.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद स्वाती२!
शिल्पा, चटणीची पाकृ अशी फारशी ग्रेट नाही तरी वरच्या माझ्या (आभारप्रदर्शन क्र. १ च्या) प्रतिसादात दिलेली आहे.
मुलांच्या आहारात प्रथिने योग्य प्रमाणात असावीत हे आईने ठरवले तरी आपले ती ऐकतीलच असे नाही त्यासाठी सगळ्या आया ज्या युक्त्या करत असतात त्यातलाच हा प्रकार आहे. याबरोबर चटणी अगदी चविष्ट व पातळसर असावी म्हणजे इडली कोरडी वाटत नाही. गरम इडलीवर तूप घातल्याने लुसलिशीत होते व युक्ती मुलांच्या लक्षात येत नाही.;)

स्पंदना's picture

20 Sep 2010 - 8:47 am | स्पंदना

>>>>गरम इडलीवर तूप घातल्याने लुसलिशीत होते व युक्ती मुलांच्या लक्षात येत नाही>>>
फंटास्टीक!!

चिंतामणी's picture

20 Sep 2010 - 9:22 am | चिंतामणी

गरम इडलीवर तूप घातल्याने लुसलिशीत होते व युक्ती मुलांच्या लक्षात येत नाही

गरम इडलीवर लोणी अथवा बटर (पक्षी अमुल अथवा ब्रिटानीया इत्यादी) घालुनसुध्दा लुसलिशीत होइल आणी चवीला जास्त छान लागतील. साधी इडली आणी आप्प्यांबरोबर हा प्रयोग करून झाला आहे.

प्रभो's picture

20 Sep 2010 - 9:33 am | प्रभो

च्यामारी, आता बॉस्टन, नायजेरिया नायतर फ्रांफु ला बदली करून घ्यायलाच हवी.... :)

नंदन's picture

20 Sep 2010 - 10:15 am | नंदन

पाकृ आणि फोटो दोन्ही झकास!

गणपा's picture

20 Sep 2010 - 12:38 pm | गणपा

पाकृ आणि फोटो आणि टिप्स तिन्ही झकास!!!

मस्त कलंदर's picture

20 Sep 2010 - 11:38 am | मस्त कलंदर

सही आहे पाकृ... आणि सोबतचे प्रतिसादही!!!
कधी ना कधी तुम्हीही याल हो मिपा टॉप २५ मध्ये.. तेवढे जरा विषय आणि वेळ साधा म्हणजे झाले!!!! ;)

यशोधरा's picture

20 Sep 2010 - 12:43 pm | यशोधरा

पाकृ मस्त! कधी करुन घालतेस?

अवांतरः PPTA तर्फे हा प्रतिसाद. नंतर पुन्हा वैयक्तिक प्रतिसाद देईनच. ;)

विनायक प्रभू's picture

20 Sep 2010 - 12:56 pm | विनायक प्रभू

ह्या इडल्यांबरोबर सांबाराऐवजी रसम घ्यावा.
स्वर्गसुखाचा अनुभव.

विनायक प्रभू's picture

20 Sep 2010 - 12:56 pm | विनायक प्रभू

ह्या इडल्यांबरोबर सांबाराऐवजी रसम घ्यावा.
स्वर्गसुखाचा अनुभव.

रेवती's picture

20 Sep 2010 - 5:35 pm | रेवती

धन्यवाद!
प्रभो, यशो, घरी येण्याचे आमंत्रण आहे.
प्रभूसरांची रसम् ची युक्ती आवडली.
मस्तमॅडम, वेळ साधणे सोपे हो पण विषय शोधायला अंमळ अवघड आहे.
लवकरच तसा धागा येइल.
गणपा आणि नंदन धन्यवाद!

मेघवेडा's picture

20 Sep 2010 - 5:40 pm | मेघवेडा

अरे वा! मस्त आलाय फोटु! आणि आमंत्रण सर्वांनाच द्या की हो काकू. पाचपन्नास जणांनी येतो/नाही हे कळवले तरी टॉप ५ नक्की! ;)

यशोधरा's picture

20 Sep 2010 - 6:12 pm | यशोधरा

आलेच बघ! :D

गणपा's picture

20 Sep 2010 - 6:27 pm | गणपा

ये हुईना बात झाली १/२ शेंचुरी. रेवती तै हाबिणंदन.
:)
(चला आपल्याला पण चार इडल्या लागु)

आमंत्रण सगळ्यांनाच आहे.
तसा स्पष्ट उल्लेख न केल्याबद्दल एकडाव माफी द्या!;)
या वेळेस चक्क अर्धशतक पार केलं याचा अपार आनंद आहे.:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Sep 2010 - 11:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी येणार म्हणजे येणार आणि इडल्या खाऊनच तुझ्या घरून बाहेर पडणार!

नक्कीच! आग्रहाचे आमंत्रण आहे.

प्राजु's picture

20 Sep 2010 - 11:17 pm | प्राजु

जहबर्‍या!!!!
काय सोल्लीड दिसताहेत..

आभार (रेवतीच आभार मानत आहे)

विषेशतः नानांचे (एकच पोस्ट ७ वेळा + २ इतर) ९ पोस्टस्

अदिती ४

पर्णल २

पैसा २

प्रीत मनोहर ३

कुंदन २

ग़णपा २

चिंतामणी ४ (च्यायला एव्हढे झाले. ओढणार आता )

आणी मी (रेवती स्वतः) ६

चित्रा's picture

21 Sep 2010 - 1:42 am | चित्रा

छान आहे पाककृती. नक्की करून बघणार.

निवेदिता-ताई's picture

21 Sep 2010 - 4:22 pm | निवेदिता-ताई

अरे...नुसती ईडली आणी त्यावर साजूक तुप लावून खा...मस्त...खातच रहाल ईडल्या...

धमाल मुलगा's picture

21 Sep 2010 - 7:41 pm | धमाल मुलगा

कधी येऊ इडल्या खायला? :)

रेवती's picture

21 Sep 2010 - 7:44 pm | रेवती

कधीही ये. आमंत्रण आहे.

धमाल मुलगा's picture

21 Sep 2010 - 7:48 pm | धमाल मुलगा

तुम्ही माहेरच्या देशस्थ का हो? =))

(खातंय मार आता..पळाऽऽऽ)

हा हा हा!
आता सवय झाली हो या प्रश्नाची!;)

धमाल मुलगा's picture

21 Sep 2010 - 7:55 pm | धमाल मुलगा

वाचलोऽऽऽ

ही देशस्थांची एकी कोकणस्थात नाही बॉ.

सांगा जरा त्या रंगाला!
ह्या!! सगळे मिळून साडेतीन नातेवाईक!
आमच्याकडे म्हणजे जवळचे म्हणवणारे ७० जण!;)

धमाल मुलगा's picture

21 Sep 2010 - 9:39 pm | धमाल मुलगा

साडेतीन??? =)) =)) =))

>>आमच्याकडे म्हणजे जवळचे म्हणवणारे ७० जण!
है शाब्बास! आमच्याकडंही तेच..कुण्णाला नाही बोलवायचं कुण्णाला नाही बोलवायचं करत काटछाट केली की फक्त घरचे हां फक्त घरचे हां...असं म्हणत ८०-१०० डोकी होतातच :)

अवांतरः रामदासकाकाऽऽऽ...मला नृसिंहजयंतीच्या प्रसादाच्या जेवणाची आठवण येतेय होऽऽऽ :)

अशावेळी मला माझ्या मित्राकडे घडलेला जोक नेहेमी आठवतो -
मराठे नावाचा माझा मित्र त्याची बायको कुलकर्णी ह्यांचं लवम्यारेज बरं का!
कोब्रा - देब्रा अशा टवाळकीत एकदिवस हा तिला म्हणतो "माझ्या लेखी दोनच जाती आहेत एक कोकणस्थ आणि दुसरे इतर!!" खल्लास!!! ती इतकी उखडली की ३ दिवस दोघे बोलले नाहीत!!!!! =)) =)) =))

बाकी सूज्ञास सांगणे न लगे!

अवांतर - कधी ही ये रे धम्या!! उभं आमंत्रण आहे, आपण साला कोकणस्थ लोकांना बट्टा आहोत ह्या बाबतीत!! ;)

(कोब्रा असूनही 'इतरां'सारखा वागणारा)रंगा

एक वेगळा धागा काढा की को.ब्रा वि. देब्रा बद्दल

अजून किस्से येतील तेथे.

पण आता इडली बद्दल बोला.

धमाल मुलगा's picture

21 Sep 2010 - 10:39 pm | धमाल मुलगा

>>ती इतकी उखडली की ३ दिवस दोघे बोलले नाहीत!!!!!
गोची झाली ती कोणाची? ;)

>>बाकी सूज्ञास सांगणे न लगे!
हे हे हे ;)

>>कधी ही ये रे धम्या!! उभं आमंत्रण आहे,
ठेंकु ठेंकु :)

>>आपण साला कोकणस्थ लोकांना बट्टा आहोत ह्या बाबतीत!!
हा हा हा! आणि मला लोकांना येतो त्याच्या नेमका उलटा अनुभव येतो कोकणस्थांचा. :)

@चिंतामणी:
अहो इडलीबद्दलच चाललंय की हो. ;) इडली देशस्थ की कोकणस्थ ह्यावरुन चाललंय. =))

रामदास's picture

22 Sep 2010 - 7:09 pm | रामदास

कोब्रा म्हणजे ब्राह्मण क्लास आणि ओबिसी म्हणजे अदर ब्राह्मण क्लास असे का ?
अवांतर :आमचा चतुरंग काही वेळा एकटा पडतो हे बरीक खरं.

रामदास's picture

22 Sep 2010 - 7:11 pm | रामदास

हा किस्सा सांगून अडचणीत येऊ नये.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2010 - 10:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

साडेतीन? अर्धा नातेवाईक हे काय प्रकरण आहे?

(तर्‍हेवाईक) अदिती

पैसा's picture

21 Sep 2010 - 10:40 pm | पैसा

म्हणजे हाफ टिकट असणार.
(रत्नांग्रीचा कोकणस्थी खवचटपणा असलेली)

स्वाती दिनेश's picture

22 Sep 2010 - 9:15 am | स्वाती दिनेश

इडल्या टॉप आहेत रेवती..
जरा उशिराच बघितल्या गेल्या, तोवर इतरांनी खाऊन नुसते क्रम्स ठेवलेत माझ्यासाठी...:)
स्वाती

निखिल देशपांडे's picture

22 Sep 2010 - 10:20 am | निखिल देशपांडे

असेच म्हणतो.

अगं रेवती, काल केल्या होत्या इडल्या. मस्त झाल्या. धन्यु!