खोटे सर्व,खरे तुझे रुप!

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
12 Sep 2010 - 12:17 am

लेख नकळत थोडा लांबला आहे,पण कोणी वाचलात तर संपुर्ण वाचावा,अस मनापासुन वाटत.
नकस्कार,नमस्कार.........

न समजणारे मराठी शब्द मी ह्यापुढे कधीच वापरणार नाही.मी सर्व मिपाकरांची माफी मागतो,पण मला वेगळ्या,चांगल्या शब्दात सांगता आले असते,असो.

आपण जीवनात विनोदी असाल तर त्याचे कारण कदाचित तुम्हाला विनोद करायची संधी मिळत असेल कींवा वातावरण तसे असेल.पण माझ्याबाबतीत बोलाल तर मी रीयल लाईफमधे विनोदी तर सोडा एकदम अबोल आहे,मग "जामच भाव खातोय","स्वःताला हुशार समजतो वाटत" वगैरे बोलणा-या नजरांना सामोरे जावे लगते.
माझ्या कामाच्या ठीकाणावरुन स्टेशनला कार येत असताना मी त्या ४५-६० मिनिटांच्या प्रवासात एक शब्दही बोलत नाही.
"हा काही बोलत नाही का?" कारमधली एक उनाड कार्टी म्हणाली.
माझ्याशी एवढ्या हक्काने कोण बोलतोय्,म्हणुन मी तिच्याकडे पाहु लागलो.ती उगाच नको तेवढे गाल पसरुन हसली.
"तु स्वःताला काहीही समजत असशील.तु तुझी आपुलकी तुझ्याकडे ठेव" अर्थात मी हे मनात म्हणालो.
कारमधे नंतर तिच आगाउ कार्टी सीटवर ठेवलेल्या एका बॉक्सवर बसली.माझ्याबाजुला बसलेला एक माणुस "हे बघा,xyzची हाईट वाढली" अस म्हणत आयुष्यातला सर्वात मोठा जोक मारल्याच्या भावात हसला.त्याला हसण्यात साथ देणारे दुसरे दोघे व एक ती होती.मी हसु की रडु काही समजत नव्हत."ह्या माणसांना अस का,कस हसता येते?जोक मला समजला नाही का? काय खात असावेत हे लोक जेवणामधे?sexual satisfaction मिळाल्यावर की अपुर्ण राहील्यावर हे अस कोणत्याही गोष्टीवर हसता येते? नाही हे लोक कसल्याच बाबतीत असमाधनी असतील अस मला वाटत नाही".पण जेव्हा मला तो शेवटचा प्रश्न पडला तेव्हा एक लग्न झालेली बया अचानक झटका लागल्यासारखी मागे वळुन माझ्याकडे बघु लागली व लगेच मान वळवली.मी माझा हात तर तिला लागला नाही ना,म्हणुन हात मागे घेतला.
असे अनंत विचार मला घेरी आणतील ह्या संशयाने मी एक मोठा श्वास घेतला.आता लिहताना मला तो जोक व त्या लोकांचे हसणे आठवले की कीळस वाटते.मी कधी खोटे वागलो नाही,हसलो नाही कारण मला ते येत नाही,असो.

मला लिहायच होत काही वेगळे पण आता काही वेगळेच लिहतो

मी कधीकधी अजाणपणे खोटे बोलतो,ह्याला कारण lack of concentration caused due to dreaming.आज प्रत्येक व्यक्ती कपड्यापासुन बोलण्यापर्यंत सर्व छान कसे असेल ह्याची काळजी घेतो because they want to get admired.
आता वरच्या दोन ओळींना धरुन एक अनुभव सांगतो.

त्यादीवशी मी सफेद रंगाच शर्ट घातल होत,एस्टीत कपड्यांना डाग पडणारच असे ग्रुहीत धरुन मी बसतो.एस्टी प्रदुषण वाढवत ठाण्याला निघाली.सकाळची वेळ असल्याने खिडकी भेटली(?) होती व गाडी रीकामीच होती.
तीस एक मिनीटे झाली,झाडेझुडपे जाउन खिडकीतुन आता इमारती दीसु लागल्या होत्या.एस्टीच्या धुराच्या नळकाड्यांनी शिव्या देत मी सफेद शर्टाची व माझ्या थोबड्याचा रंगाची काळजी घेण्यासाठी खिडकी उघडी व बंद करत होतो.धुर दीसला,लांब गाडी दीसली की कर खिडकी बंद असे उद्योग चालु होते.बाजुला कोणी बसले नव्हते म्हणुन कुणाची काही हरकत नव्हती.
गाडी 'बाटलीपाडा' अशा पाडा व बाटली ह्या दोन भिन्न शब्दांमधे ऐकी निर्माण व्हावी ह्या हेतुने दील्या गेलेल्या नावाच्या थांब्यावर थांबत होती.मी कुणी सहकारणी दीसते का म्हणुन डोळे गोल गोल फीरवत शोध घेउ लागलो.कुणीच डोक्यात बसली नाही.
मी वर दरवाजा बंद व्हायची वाट पाहु लागलो,कारण थांबा आला म्हणुन बंद केलेली खिडकी उष्णता वाढवत होती.दरवाज धाड्कन आपटल्याने बंद झाला.
"नाश्ता जास्त झाला का रे" अस पुटपुटत मी दरवाजात बघितल.एक गडद निळ्या रंगाची साडी घातलेली आकृती दरवाजा बंद केल्यावर वाकडे झालेले तोंड सरळ करत आत आली.
कंड़क्टर आपले एस्टीतले हक्क दाखवुन फुशारक्या मारायच्या हेतुने लगेच करंट लागल्यासारखा उठला व हीला " मॅडम ,तिकीट देउ ना?" अस म्हणाला.
"अरे मेल्या गाडीत कमीतकमी दहाबाराजण चढले तुला हीच दीसली का?" मी मनात म्हणालो,कारण त्याने अस काही तोंड करुन तिला विचारल की मला खुप राग आला.आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला हीला तोंड मागे वळवाव लागल म्हणुन माझ्या साधनेत व्यत्यय आला होता.
साडीबरोबर गळ्यात मंगळसुत्र नाहीये हे कळल्यावर मी आनंदीत झालो.तिला पर्समधुन ति़कीटाचे पैसे काढण्यासाठी बसाव लागणार होत.ती माझ्यापासुन दोन सीट लांब उभी होती.पहील्या सीटवर दोघे बसले होते व त्या मागच्या सीटवर गायीम्हशीच्या वजनाचा माणुस बसला होता.घाईत असल्याने हीला माझ्या बाजुला बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.ती माझ्याबाजुला येउन बसली.मी खिडकीबाहेर बघत सर्व देवांचे मनापासुन आभार मानले.
Frankly speaking,तिला माझ्याबाजुला बसाव लागल्याचे बिल्कुल आवडले नाही हे तिच्या बसल्यानंतर झालेल्या तोंडावरुन समजले.तिने तिकीटाचे पैसे दीले.मी बाजुला नाहीच आहे,ह्या भावत ती खिडकीबाहेर पहात होती.मी मधेमधे चोरुन तिला पाहात होतो.खिशातुन रुमाल काढायचे निमित्त.;)
कपडेच काय,चेह-यातही मी तिला साजेसा नव्हतो.त्या मघाशच्याच देवांकडे बघत "क्यु,क्यु??" अस ओरडावस वाटल.फक्त रंगात मी वरचढ असेन.असे शुद्र विचार झाडुन देत मी बाहेर पाहु लागलो
चेहरा उभट व उठावदार होता.डोळ्यात एक राग व करारीपणा होता.स्थीर ठेवलेली नजर कुठल्याही गोष्टीवर ठाम रहायचा स्वभाव असल्याचे दाखवुन देत होती.मी अगदीच 'पाणीकम चाय' वाटत नसलो तरी तिच्या तेजासमोर थोडा फीका पडत होतो.ती एवढी आकर्षक होती की कुणालाही तिचा हेवा वाटावा.'Model' ह्या शब्दाच्या सर्व व्याख्या सांगणारी होती.
गळ्यात घातलेला सोन्याचा हार १००% टक्के शोभत होता.लग्नाला जात असावी.
"मी कधीच एस्टीतुन प्रवास करत नाही" अस तिला कृतीतुन म्हणायचे होते.माझ्याही मनात हेच आहे हे दाखवायचे मी सर्व प्रयत्न केले.
एका फोनला उत्तर देतानाचे तिचे संभाषणः
"मी सांगितले तसे नको करुस.मी फक्त सांगायचे कर्तव्य केले.सल्ला म्हणुन घेउ शकतेस.नंतर सर्व दोष ओढवुन घ्यायला मी तयार नसेन.काम करताना १००% लक्ष देता येत नसेल तर मी जॉब सोडला असता"
हे शेवटचे वाक्य तिचा समोरच्या व्यक्तीबद्दलचा राग दाखवत होते.फोन ठेवताना,"I am sorry I speak straightaway" बोलली.........कुठलाच दीखावा नाही.
पण हीच्या नादात धुराकडे दुर्लक्ष करुन चालणार नव्हत.मी खिडकी उघडीबंद करायच्या कामाला लागलो.हीला माझे उद्योग आवडत नाहीयेत हे ती तोंड वाकडे करत शिटी वाजवल्यासारख्या आवाजातुन सांगत होती.
पण माझ्यासाठी प्रश्न गंभीर होता.मी वेगाने खिडकीची हालचाल करु लागलो.
"Will you please stop doing this?"ती.
"what?"मी
"please,open the window"
"ok" म्हणत मी खिडकी थोडीशीच उघडली.ती वैतागली होती.
मी समोर ट्रक पाहीला व घाईने खिडकी बंद केली.
"what are you doing?"
"oh.....Its because there is lots of smoke outside and...............................I have asthma!" मी म्हणालो.
"oh....Its ok then"
मला वाटलेल्या आश्चर्याला सीमा नव्हती,मला आणि अस्थमा?? नाही कधीच नाही................मग मी असे का म्हणालो???
मला स्वःताचा राग आला.मी तिच्यासाठी माझ्या कपड्यांची आहुती देत अर्धी खिडकी उघडली.
"please,close it if you have problem" ती हे बोलताना ना आपुलकीचा सुर,ना हसु.
"no its ok,I am feeling better now" मी म्हणालो.तिचा भावनाशुन्य वाटणारा चेहरा तिच्या स्वभावाच प्रतिकच आहे,अस काहीस माझ्या मनात चटकन येउन गेले.
कुठलासा थांबा आला ती उतरायच्या हेतुने बॅग हातात धरत उठली.
"take care of yourself,ok?" ती म्हणाली.मघापासुन गंभीर असलेला चेहरा हसरा झाल्यावर कीती विलक्षण दीसु शकतो ह्याचे आश्चर्य वाटल्याने मी काहीच प्रतिसाद देउ शकलो नाही.तिच्या हसण्यात निर्मळता होती,एक खरेपणा होता.उगाच दुस-या स्त्रीयांप्रमाणे 'मी हसल्यावर चांगली दीसते" असे गैरसमज झाल्याने सारखे गाल पसरुन हसणारी ती नव्हती.मला तिच्याबद्दल एक प्रकारचा आदर वाटु लागला.मी खोटे बोललो होतो,माझी पुन्हा तिच्याकडे पाहण्याची हींमत झाली नाही.

आपली तत्वे,आपले विचार हेच "as you think so you become"ह्या नियमानुसार आपले व्यक्तीमत्व घडवत असतात.तिचे व्यक्तीमत्व तसे होते कारण तिचे विचार व तिची मनाला सवय लावुन घेतलेली तत्वे तशी होती..............होय होतीच,नक्कीच.
माझ्या ऑफीसमधल्या त्या मुल्यांची(values,principles) भिक लागलेल्या मुलींचे व्यक्तीमत्व असे बहरण्यासाठी अजुन दहा जन्मही अपुरे पडतील अस मला मनापासुन वाटले.

त्यादीवसापासुन मी प्रत्येक स्त्रीमधे तिला शोधतो.काहींमधे थोडेफार अंश दीसतात्,पण तिच्यासारखी कोणीच भासत नाही.

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

सुनील's picture

12 Sep 2010 - 12:34 am | सुनील

कथा तशी आवडली. नक्की काय बोध घ्यायचा त्याचा शोध घेतोय. तोवर लिहीत रहा!

बाकी, "त्या" स्टॉपचे नाव "बाटलीपाडा" नसून "पातलीपाडा" असावे, असा माझा अंदाज!

शानबा५१२'s picture

12 Sep 2010 - 12:41 am | शानबा५१२

नाही,'बाटलीपाडा' असे आहे.

मी एकदा कंडक्टरला हे नाव का ठेवले म्हणुन विचारले "दारुची दुकाने जास्त आहेत का?" हा माझा प्रश्न.
"होय्,तरी आता कमी आहेत" हे कंडक्टरचे उत्तर.

कोणत्याही गोष्टीचे उत्तर माहीती करताना "का?" ह्याचेही उत्तर शोधा.मग आपण एखादा शब्द विसरत नाही,आपली स्मरणशक्ती वाढते.

'काय घ्यायचे?' असा प्रश्न असेल तर "'व्यक्तीमत्व विकास' कशाने करता येईल" ह्याचा विचार करावा हे मला अपेक्षित आहे.

good night!

शुचि's picture

12 Sep 2010 - 3:28 am | शुचि

कथा आवडली. मस्त!!!