(बाम लावला ग सखे बाम लावला)

अडगळ's picture
अडगळ in जे न देखे रवी...
11 Sep 2010 - 10:40 am

जे गाणं ऐकल्यावर अर्धा किलो झंडूबाम खावून जीव द्यावा असं वाटलं , त्या गाण्यावर नृत्य करणार्‍या रबरी माकडहाडवाल्या मलैका अरोरा खान यांना सादर समर्पित :

विचित्र खाज दाटली , अभद्र ही तिथी,
मंदमती हात हे रिमोट शोधती,
दोन प्रहरी का गं उगी टिव्ही लावला ?
बाम लावला ग सखे बाम लावला.

गौरांगी वस्त्र शोधी अधीर लोचने,
बुबळातुन धूर निघे मुन्नीदर्शने,
बदनामीचा जणू इव्हेंट जाहला.
बाम लावला ग सखे बाम लावला.

गच्चीवर बैल दिसे , हाती वारूणी,
हंबरते म्हैस येथ उघडी अंगणी,
सभोवार रेड्यांचा डान्स चालला
बाम लावला ग सखे बाम लावला.

मारूनिया फाट्यावर सारी वैद्यके,
आद्यवैद्य जाहलीस तुच मदनिके,
भाळीचा बाम तु नितंबी लाविला,
बाम लावला ग सखे बाम लावला.

गीतसागरात मुन्नीमेरु घुसळिला,
आडमाप खान जणु शेष जाहला,
चौदावे रत्न झंडुबाम गावला .

बाम लावला ग सखे बाम लावला.

भयानकविडंबन

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

11 Sep 2010 - 12:34 pm | राजेश घासकडवी

वा. डारलिंग तेरेलिये ची टिंगल करण्यासाठी खुद्द रामजन्माच्या गाण्याचा आधार. कल्पनाच आवडली.

सभोवार रेड्यांचा डान्स चालला

हे मनाला भिडलं.

काय एकेक उपमा दिल्यात राव, धमाल!!

चौदावे रत्न झंडुबाम गावला .

हे ब्येस!

हाहाहाहाहाहाहाहा..........

मस्त ! झकास !
आता ते गाणं ऐकावं लागेल ( की बघावं लागेल ? ) ;)

चतुरंग's picture

11 Sep 2010 - 6:21 pm | चतुरंग

बामा बामी मस्त केलीये! ;)

चतुरंग बाम

पुष्करिणी's picture

12 Sep 2010 - 3:32 am | पुष्करिणी

भारीच आहे !

सल्लूलाही आडमाप रेड्याची उपमा सह्हीच

अविनाशकुलकर्णी's picture

12 Sep 2010 - 9:24 am | अविनाशकुलकर्णी

गौरांगी वस्त्र शोधी अधीर लोचने,
बुबळातुन धूर निघे मुन्नीदर्शने,
बदनामीचा जणू इव्हेंट जाहला.
बाम लावला ग सखे बाम लावला.
मस्त

चिंतामणी's picture

12 Sep 2010 - 9:33 am | चिंतामणी

मिपावर आता "इनो" पाठोपाठ "बाम" येणार बहुतेक.

चिगो's picture

12 Sep 2010 - 10:36 am | चिगो

गाण्यामुळे होऊ शकणारा मनस्ताप लक्षात घेऊनच "बाम"चा उल्लेख्ख केला असेल..
झक्कास जमलीय कविता...