अपेक्षा!!!!, समज्-गैरसमज

मराठमोळा's picture
मराठमोळा in काथ्याकूट
4 Sep 2010 - 4:34 pm
गाभा: 

काका(मनातल्या मनात): माझ्या ओळखीमुळे त्याला नोकरी मिळाली, मग मला दोन चार वेळा गिफ्ट घेऊन भेटायला नको यायला त्याने?
पुतण्या: किती वेळ/वर्ष उपकाराचे ओझे वाहु? आणि अपेक्षा तरी किती ठेवावी त्याने?

मित्र १: चायला, ह्याचं लोन पास होत नव्हतं, मी शब्द टाकला तेव्हा पास झालं. आधी चार वेळा यायचा, फोन करायचा आता नाव काढत नाही.... हरामखोर साला..........
मित्र २: आता माझं काय चाल्लय मलाच नाहित, उपकार म्हणुन आता काय पाय धुवुन तिर्थ घेऊ का? काय कळत नाही ब्वॉ..

मित्र१: "चॅट" वर हॅलो...
मित्र२: "ऑफलाईन"
मित्र१: माजला साला, चार पैसे मिळाले, नोकरी मिळाली तर लगेच ऑफलाईन, गरज पडु दे.. मग बघतो.

मित्र१: फोनवर - अरे कुठे आहेस लेका..
मित्र२: अरे मीटींग मधे आहे, नंतर फोन करतो... कॉल ड्रॉप... परत फोन येत नाही..
मित्र१: याचा फोन परत आला तरी उचलणार नाही.. अगदी पक्कं.. साला समजतो काय स्वतःला?

भाऊ१: अरे, बहिणिला घेऊन येशील का? मी जरा बिझी आहे.
भाऊ२: पैसे वाचवतोय, आता एवढा पण वेळ नाही का, आणि ही महामाया काय १ किमी चालत नाही येऊ शकत?

मॅनेजरः हा साला कधीच काम करत नाही, काय करावं ह्याचं?...
नोकरदारः मी राब राब राबतो, पण माझं काम कधीच ऊठुन दिसत नाही, हा मॅनजर बायसड् आहे पक्का..

प्रेषक१: माझ्या धाग्यावर ठराविक लोकं कधीच प्रतिसाद देत नाहीत. का?
प्रतिसादक: हा धागा जर माझ्या मित्राने टाकला असता तर कदाचित शंभरी नक्कीच गाठली असती, जाऊ देत. असे अनेक धागे निघतात, जातात, हा पण तोच एक.. ;)

=)) =)) =))

आपला,
(प्रामाणिक)मराठमोळा.

प्रतिक्रिया

सहज's picture

4 Sep 2010 - 4:55 pm | सहज

तुमच्या मागच्या धाग्यात गुर्जींनी दिलेला प्रतिसाद असलेले आयुष्य असले तर यातल्या बर्‍याचश्या घटना टाळू शकता.

:-)

परिकथेतील राजकुमार's picture

4 Sep 2010 - 5:07 pm | परिकथेतील राजकुमार

शमत आहे.

इकडे आता घासुगुर्जी चित्रमालीकेतुन मोकळे झाल्यावर काय प्रतिसाद देतात बघु.

हलकट

राजेश घासकडवी's picture

5 Sep 2010 - 5:52 am | राजेश घासकडवी

तृष्णा हेच सर्व दुःखाचं मूळ आहे असं कोणीसं म्हणून गेलेला आहे. जर अपेक्षाच बेताच्या ठेवल्या तर भंग देखील होत नाहीत...

कॅल्व्हिन अॅंड हॉब्ज च्या व्यंगचित्रांमध्ये एक विनोद आहे...
ते दोघे सॅंडविच बनवत असतात

कॅल्व्हिन - आत्ता जर देव तुझ्यापुढे प्रगट झाला आणि तुला जर कुठचीही इच्छा पुरी होण्याचा वर दिला तर तू काय मागशील?
हॉब्ज - कुठचीही इच्छा?
कॅल्व्हिन - हो, अगदी कुठचीही इच्छा...
हॉब्ज - (विचारात पडलेला)
कॅल्व्हिन - सांग नं, काय मागशील?
हॉब्ज - मी ट्यूना सॅंडविच मागेन.
कॅल्व्हिन - काय? ट्यूना सॅंडविच? देवाकडे मागून मागून ट्यूना सॅंडविच मागणार? कसला कर्मदरिद्री आहेस तू! मी देवाकडे हजारो अब्ज कोटी डॉलर्स मागेन. जगातला सर्वात मोठा सत्ताधीश कर म्हणून सांगेन. राहायला एक आख्खा देश मागेन. आणि तू असलं फुटकळ काही तरी मागतोस? हें! ट्यूना सॅंडविच म्हणे!
हॉब्ज - (शांतपणे सॅंडविच खाता खाता) पण माझी इच्छा पुरी झालीसुद्धा.

तेव्हा परा, त्या चित्रमालिकेच्या इच्छेबाबत एकच म्हणतो - तृष्णा (पर्यायी शब्द वासना) हेच सर्व दुःखाचं मूळ आहे :) कशाला तुला दुःखी करू?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Sep 2010 - 6:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बोला घासकडवी बाबा की जय!
बोला ममो महाराज की जय!!

श्रावण मोडक's picture

5 Sep 2010 - 10:01 pm | श्रावण मोडक

+१

शाहरुख's picture

5 Sep 2010 - 10:19 pm | शाहरुख

ह्यो घासकडवी लईच हुशार हाय !

>>अपेक्षाच बेताच्या ठेवल्या तर भंग देखील होत नाहीत...
कमी, बेताची, योग्य, जास्त, अवाजवी ह्यातील सीमारेषा निश्चित करण्याची माझी कुवत नाही. तरीसुद्धा 'बेताच्या' ह्या ऐवजी 'योग्य' हा शब्द जास्त योग्य वाटला असता. पण कदाचित बेताचीच अपेक्षा योग्य असेल, ( राजेश साहेबांना नक्कीच माझ्यापेक्षा आयुष्याचा जास्त अनुभव असेल मानून)

तरीसुद्धा माझ्या अल्पबुद्धीची एक शंका,
जर का आजतागायत सगळ्यांनीच बेताच्या अपेक्षा ठेवल्या असत्या तर ?

बाकी मुळ लेखाशी काही प्रमाणात सहमत,
कित्येक वेळा गैरसमज चे कारण हे अपेक्षा नसून समोरचा आपले म्हणणे मांडण्यात कुठे तरी कमी पडतो. मनातल्या चांगल्या भावना देखील बर्यान्चदा बोलून दाखविता येत नाही.

एक अनुभव : एकदा मी एके ठिकाणी (महाराष्ट्राच्या बाहेर) पंगतीत जेवायला बसलो होतो. मला जेवण अळणी लागले असल्याने मी मीठ मागितले, तर तिथल्या लोकांना meat वाटले. सगळे लागले तावातावाने बडबड करायला. नशीब मी नवरे मुलाकडून होतो, त्यामुळे लोकांनी जरा आवरते घेतले. नंतर सगळे शांत झाल्यावर त्यांना समजून सागितले कि मीठ म्हणजे नमक. तेव्हा त्यांनी कपाळावर हाथ मारून घेतला.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Sep 2010 - 12:29 pm | परिकथेतील राजकुमार

तृष्णा हेच सर्व दुःखाचं मूळ आहे असं कोणीसं म्हणून गेलेला आहे. जर अपेक्षाच बेताच्या ठेवल्या तर भंग देखील होत नाहीत...

गुर्जी त्यामुळेच आम्ही ती लगोलग शांत करतो.

बाकी तुमच्या व्यंगचित्रावरुन एक विनोद आम्हाला देखील आठवला.

एका माणसाला देव प्रसन्न होतो आणि म्हणतो "वत्सा काय हवे ते माग, अगदी काहीही माग."

भक्त म्हणतो "देवा मला जगातले सर्वात उत्तम पेय आणि सर्वात उत्तम स्त्री दे !'

दुसर्‍याच क्षणी त्याच्या हातात मिनरल वॉटरची बाटली आणि शेजारी मदर तेरेसा प्रकट होतात.

मतितार्थ :- ज्याने त्याने आपली 'जाण-समज' वगैरे नुसार काढावा ;)

राजेश घासकडवी's picture

6 Sep 2010 - 12:48 pm | राजेश घासकडवी

फादर परेसा यांचा विजय असो

घोषणेचे स्पॉन्सर : परीएर मिनरल वॉटर - सर्वोत्कृष्ट पेय जे तृष्णा शांत करतं. आणि शांत करणं जमलं नाही तर तिला ओलाव्याने व थंडाव्याने मिटवून टाकतं. गरम फुफाट्यात टेस्ट (चाचणी) केलेलं....

शुचि's picture

4 Sep 2010 - 7:12 pm | शुचि

हा हा मस्त!!!! मनातलं =)) =)) =))
ह ह पु वा!!!!!!
ममो द सायकॉलॉजीस्ट यांचा अफलातून धागा.
मला हा धागा खूप आवडला.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Sep 2010 - 8:17 pm | llपुण्याचे पेशवेll

प्रतिसाद दिला न्हाई. हा ममो हामेरिकेत जाऊन विसरला साला आपल्याला.

मी-सौरभ's picture

4 Sep 2010 - 10:55 pm | मी-सौरभ

(आता हा धागा शंभरी गाठतो का?
बघूया... )

मामोला सध्या बराच रिकामा वेळ दिसतोय.
;)

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Sep 2010 - 6:26 am | llपुण्याचे पेशवेll

सध्या???

प्रकाश घाटपांडे's picture

5 Sep 2010 - 1:49 pm | प्रकाश घाटपांडे

तुमच्या जगण्याचे / अस्तित्वाचे मूल्य हे इतरांना ते किती उपयुक्त वा उपद्रवी आहे यावर अवलंबुन आहे. समजा ते दोन्ही नसेल तर तुम्हाला *कोणी विचारणार नाही. त्याच्या लेखी तुमचे मुल्य शुन्य वा अदखलपात्र.
वानगी दाखल एखाद्या धाग्याचेच उदाहरण पहा ना! खालीलप्रकारे पहाता येईल
धागा कोणास किती उपयुक्त आहे?
धागा कोणास किती उपद्रवकारक आहे?
धागाप्रवर्तक कोणास किती उपयुक्त आहे?
धागाप्रवर्तक कोणास किती उपद्रवकारक आहे?
प्रतिसाद कोणास किती उपयुक्त आहे?
प्रतिसाद कोणास किती उपद्रवकारक आहे
प्रतिसादकर्ता कोणास किती उपयुक्त आहे?
प्रतिसादकर्ता कोणास किती उपद्रवकारक आहे
ही यादी वाचनसंख्या, प्रतिसादसंख्या इत्यादी संख्याबळाने उपद्रवी वा उपयुक्त झाली तरच ती वाचक लेखक प्रतिसाद कर्ते / नाकर्ते यांच्याकडुन दखल/अदखलपात्र ठरते.
( आता ह्याच्यात ते अपेक्षा समज गैरसमज कुठबी बसवा!)
आपुन कंपुबाजीच काय बी बोल्लो नाय हा आदुगरच सांगुन ठुतो

विसोबा खेचर's picture

5 Sep 2010 - 3:13 pm | विसोबा खेचर

स्वगतं आवडली..

माझ्या धाग्यावर ठराविक लोकं कधीच प्रतिसाद देत नाहीत. का?

हा हा हा.. माझा अनुभव वेगळा आहे.. माझ्या धाग्यावर किंवा लेखावर ठराविक लोकं ठराविकच विरोधी सूर अथवा टीकात्मक सूर असलेले प्रतिसाद देतात याची गंमत वाटते.. :)

तात्या.

मिसळभोक्ता's picture

5 Sep 2010 - 10:17 pm | मिसळभोक्ता

प्रतिसाद देतात याची गंमत वाटते..

घ्या. अजूनही गंमतच वाटते.

म्हणजे अजून काहीच कळलेले नाही का ?

माझा सल्ला ऐक. सगळ्यांचे पैसे परत केल्याशिवाय कुठेच काहीही लिहिणार नाही, असे म्हण, आणि करून दाखव.

नंतर लिहायला चिकार आयुष्य पडलं आहे.

हवा's picture

6 Sep 2010 - 12:21 pm | हवा

ही अपेक्षा घोळ घालतेय. (पहिला प्रतिसाद सक्सेसफुल)

सुहास..'s picture

6 Sep 2010 - 2:21 pm | सुहास..

गेम ईज ऑन !!

नेमक ज्याला ज्याची गरज असत ते मिळण्याची'अपेक्षा' ,,गरज नसुन मिळण्याची अपेक्षा असल्यास 'तृष्णा' !!