अपेक्षा!!!!, समज्-गैरसमज
काका(मनातल्या मनात): माझ्या ओळखीमुळे त्याला नोकरी मिळाली, मग मला दोन चार वेळा गिफ्ट घेऊन भेटायला नको यायला त्याने?
पुतण्या: किती वेळ/वर्ष उपकाराचे ओझे वाहु? आणि अपेक्षा तरी किती ठेवावी त्याने?
मित्र १: चायला, ह्याचं लोन पास होत नव्हतं, मी शब्द टाकला तेव्हा पास झालं. आधी चार वेळा यायचा, फोन करायचा आता नाव काढत नाही.... हरामखोर साला..........
मित्र २: आता माझं काय चाल्लय मलाच नाहित, उपकार म्हणुन आता काय पाय धुवुन तिर्थ घेऊ का? काय कळत नाही ब्वॉ..
मित्र१: "चॅट" वर हॅलो...
मित्र२: "ऑफलाईन"
मित्र१: माजला साला, चार पैसे मिळाले, नोकरी मिळाली तर लगेच ऑफलाईन, गरज पडु दे.. मग बघतो.
मित्र१: फोनवर - अरे कुठे आहेस लेका..
मित्र२: अरे मीटींग मधे आहे, नंतर फोन करतो... कॉल ड्रॉप... परत फोन येत नाही..
मित्र१: याचा फोन परत आला तरी उचलणार नाही.. अगदी पक्कं.. साला समजतो काय स्वतःला?
भाऊ१: अरे, बहिणिला घेऊन येशील का? मी जरा बिझी आहे.
भाऊ२: पैसे वाचवतोय, आता एवढा पण वेळ नाही का, आणि ही महामाया काय १ किमी चालत नाही येऊ शकत?
मॅनेजरः हा साला कधीच काम करत नाही, काय करावं ह्याचं?...
नोकरदारः मी राब राब राबतो, पण माझं काम कधीच ऊठुन दिसत नाही, हा मॅनजर बायसड् आहे पक्का..
प्रेषक१: माझ्या धाग्यावर ठराविक लोकं कधीच प्रतिसाद देत नाहीत. का?
प्रतिसादक: हा धागा जर माझ्या मित्राने टाकला असता तर कदाचित शंभरी नक्कीच गाठली असती, जाऊ देत. असे अनेक धागे निघतात, जातात, हा पण तोच एक.. ;)
=)) =)) =))
आपला,
(प्रामाणिक)मराठमोळा.
वाचने
3479
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
घ्या बघा
In reply to घ्या बघा by सहज
+१
In reply to घ्या बघा by सहज
तृष्णा
In reply to तृष्णा by राजेश घासकडवी
बोला घासकडवी बाबा की जय! बोला
In reply to बोला घासकडवी बाबा की जय! बोला by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to +१ by श्रावण मोडक
+२
In reply to तृष्णा by राजेश घासकडवी
जर का आजतागायत सगळ्यांनीच बेताच्या अपेक्षा ठेवल्या असत्या तर ?
In reply to तृष्णा by राजेश घासकडवी
तृष्णा हेच सर्व दुःखाचं मूळ
In reply to तृष्णा हेच सर्व दुःखाचं मूळ by परिकथेतील राजकुमार
विजय असो...
हा हा मस्त!!!! मनातलं =))
प्रतिसाद दिला न्हाई. हा ममो
मस्त
मामोला सध्या बराच रिकामा वेळ
In reply to मामोला सध्या बराच रिकामा वेळ by शिल्पा ब
सध्या???
मुल्य
स्वगतं आवडली.. माझ्या
In reply to स्वगतं आवडली.. माझ्या by विसोबा खेचर
गंमत वाटते
अपेक्षा
गेम ईज ऑन !! नेमक ज्याला