कॉफी केक

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
1 Sep 2010 - 12:44 pm

साहित्य-
२५० ग्राम बटर/मार्गारिन
२०० ग्राम साखर
४ अंडी
१५० ग्राम मैदा + १५० ग्राम स्पाइझं स्टेर्क/ आरारुट
३ चमचे बेकिंग पावडर
१ चमचा वॅनिला अर्क
४ चहाचे चमचे कॉफी
२ चहाचे चमचे कोको
२ चमचे रम (ऑप्शनल)
२ मोठे चमचे दूध
गार्निशिंगसाठी २ चमचे किसलेले व्हाइट चॉकलेट
हँडमिक्सी, केकमोल्ड व अवन

कृती-
बटर फेटून घेणे, साखर घालून भरपूर फेटणे. अंडी घालून भरपूर फेटणे. मैदा+ आरारुट+ बेकिंग पावडर घालणे व फेटणे.दूध घालून थोडेसे फेटून मिश्रण एकजीव होईल असे पाहणे.
ह्या मिश्रणाचे १/३ आणि २/३ असे दोन भाग करुन वेगवेगळ्या भांड्यात काढून घेणे.
१/३ भागात वॅनिला अर्क घालणे व ढवळणे . दुसर्‍या भागात म्हणजे २/३ भागात कोको+कॉफी +रम घालणे आणि ढवळणे .
केक मोल्डला बटर लावून घेणे. दोन-तीन चमचे वॅनिला घातलेले केकचे मिश्रण ,दोन-तीन चमचे कोकोवाले मिश्रण असे करत सर्व मिश्रण घालणे.
१८० अंश से ला ३० ते ३५ मिनिटे बेक करणे.केक झाला की नाही ते विणायची सुई किवा सुरी त्याच्या पोटात खुपसून पाहणे.
मिश्रण न चिकटता सुरी बाहेर आली म्हणजे केक झाला.साधारण ५ मिनिटे अवनमध्येच राहू देणे.
नंतर केक मोल्डमधून काढून जाळीवर घालणे. गार झाल्यावर गार्निशिंगसाठी व्हाईट चॉकलेट किसून घालणे.
कॉफीबरोबर आस्वाद घेणे.:)

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2010 - 12:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तोंडाला पाणी सुटलं!

हा तीन टोकंवाला काटा स्पेशल केक खाण्याचा आहे का? मी मसल्स खाताना असला काटा दिल्याचं पाहिलेलं होतं.

(कॉफी आणि केकप्रेमी) अदिती

निवेदिता-ताई's picture

2 Sep 2010 - 10:42 am | निवेदिता-ताई

हा हा हा .........लय भारी

परिकथेतील राजकुमार's picture

1 Sep 2010 - 1:58 pm | परिकथेतील राजकुमार

लालच आहां लप लप.......

पूना क्लबवरच्या 'रम बॉल्स'ची आठवण झाली.

आहाहा. मस्तच. ह्या रवीवरी करायला पाहीजे.

ऋषिकेश's picture

1 Sep 2010 - 5:10 pm | ऋषिकेश

मस्तच! एकदा करून बघता येईल
(देवदयेने) हाफीसात फोटो ब्यान केला आहे.. त्यामुळे मी फोटो पाहिला नाहि व कॉफीच्या वेळी नुसती कॉफी पिऊन येताना वाईट वाटले नाही :P

श्रावण मोडक's picture

1 Sep 2010 - 5:29 pm | श्रावण मोडक

हे काय आहे? :)

विलासराव's picture

1 Sep 2010 - 5:54 pm | विलासराव

का त्रास देता असे फोटो टाकून?
मला तरी फोटो नसलेल्या पाकॄच आवडतात.
कुणीतरी आमच्यासारख्यांना ( बनवता न येणार्या ) खायला आमंत्रण द्यायचाही जरा विचार व्हावा.

अवांतरः अहो दोन टाईम चपाती-भाजीची मारामार अन त्यात हे नुसते फोटो बघावे लागतात.

करीन पन श्रावन महीना सम्पल्या नन्तर

कॉफीसकट केकेचा फोटू दिल्यावर म्या पामराच्या तों. पा. सु.

स्वाती२'s picture

1 Sep 2010 - 7:05 pm | स्वाती२

मस्त!

प्रभो's picture

1 Sep 2010 - 7:15 pm | प्रभो

क ह र!!!!!

विसोबा खेचर's picture

1 Sep 2010 - 7:30 pm | विसोबा खेचर

सुंदर..!

पैसा's picture

1 Sep 2010 - 7:31 pm | पैसा

पण तो बाकीचा केक कुणी खाल्लय? बाकी ती कॉफी पण दिसतेय एकदम खल्लास! फिल्टर्ड आहे का?

स्वातीताई तुलाच टुकटूक! मला हापिसात फोटोच दिसत नैत! आता तू कशी जळवणार?? सांग, सांग की! :D

पोटात दुखेल ना तुमच्या असे फोटो टाकाल तर ..... आमची भूक खवळते. :(

खल्लास्स्स्स्स्... :)
या वेळी हिंदूस्थानात आलीस तर केक खायला जरुर बोलव. :) मागच्यावेळी फक्त लेमन टी वर समाधान झालं होत माझं. ;)

(खादाड)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Sep 2010 - 2:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डॉईशल्यांडात गेल्यामुळे मला तर बुवा जेवण, खाण, कॉफी, केक, भ्रमण आणि सगळ्यात मुख्य स्वातीताईबरोबर गॉसिप या सगळ्याचा लुफ्त उठवता आला ...

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Sep 2010 - 2:35 pm | बिपिन कार्यकर्ते

+१

आम्ही तर फोनवरच लुत्फ घेतला... आणि प्रत्यक्ष तिथे यायचं तर आग्रहाचं आमंत्रण आहेच.

स्वाती दिनेश's picture

2 Sep 2010 - 3:19 pm | स्वाती दिनेश

बाणा,
केक मी जर्मनीत करते, भारतात नाही. खायचे असेल तर फ्रांकफुर्टात स्वागत आहे.:)
अधिक माहितीसाठी अदितीशी संपर्क साध.
स्वाती

केक मी जर्मनीत करते, भारतात नाही. खायचे असेल तर फ्रांकफुर्टात स्वागत आहे
हे बरं आहे...म्हणजे केक खायला आता युरोप टुर मारावी लागेल तर !!! ;)

अधिक माहितीसाठी अदितीशी संपर्क साध.
नको !!! इतकी माहिती पुरेशी झाली. ;)

> ४ चहाचे चमचे कॉफी

केक मध्ये फिल्टर कॉफीची पावडर वापरली की इंस्टंट कॉफी (नेस्कॅफे)?

केक झकासच झालाय.....

स्वाती दिनेश's picture

2 Sep 2010 - 3:22 pm | स्वाती दिनेश

इंन्स्टंट कॉफी- मी 'नेस्कॅफे क्लासिक' घालते.
स्वाती

नेत्रेश's picture

3 Sep 2010 - 5:44 am | नेत्रेश

आता श्रावण संपल्यावर पहील्याच रवीवारी बेत ठरवतो.

सहज's picture

2 Sep 2010 - 11:51 am | सहज

ठरवून उशीरा प्रतिसाद द्यायला आलो की जेणे करुन लोकांनी केक व कॉफी फस्त केले असेल त्यामुळे ते मला न दिसल्याने फारसे वाईट वाटणार नाही व वाटलेही नाही.

नंदनशी सहमत! (आता पदार्थ दिसतच नसल्याने) नेमकी विशेषणे कोणती वापरायची हे समजत नाही. :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Sep 2010 - 2:33 pm | बिपिन कार्यकर्ते

आम्हाला तर काय ब्वॉ दिसलंच नाही... आम्ही काही पाहिलंच नाही... आम्ही काय जळलोच नाही...

छोटा डॉन's picture

2 Sep 2010 - 3:56 pm | छोटा डॉन

>>आम्हाला तर काय ब्वॉ दिसलंच नाही... आम्ही काही पाहिलंच नाही... आम्ही काय जळलोच नाही...
अगदी हेच म्हणतो.
काय लिहले आहे नक्की ? काही काही दिसत आणि कळत नाही.

फोटोचा काय प्रॉब्लेम आहे ? फोटो का दिसत नाहीयेत ?
नीलकांता, बघ रे बाबा काय इश्श्यु आहे ते ;)

- छोटा डॉन

केशवसुमार's picture

3 Sep 2010 - 8:40 am | केशवसुमार

आम्हालातरी फोटो दिसला आणि यादीत अजून एक नोंद झाली..महिन्याभराचातर प्रश्न आहे. नंतर पाकृच्या फोटोमध्ये एका खा.पी. तृप्त झालेल्या माणसाचा फोटो येईल.. तुला आणि बिकाला तो तर अजीबात दिसणार नाही ह्याची खात्री आहे..
(अदृश्य)केशवसुमार
स्वातीताई.. अजून येउदे..तेव्हढ्याच यादीत नोंदी वाढतील.. ;)
(हवरट)केशवसुमार

सुनील's picture

2 Sep 2010 - 6:05 pm | सुनील

मस्तच! (रमला तेवढे ऑप्शनलला नका टाकू!)

मस्त कलंदर's picture

2 Sep 2010 - 7:28 pm | मस्त कलंदर

लेख पुन्हा पुन्हा वाचायचा आणि सगळे फोटो पुन्हा पुन्हा पाहायचे म्हणून मुद्दाम आतापर्यंत प्रतिसाद दिला नव्हता.
केक मस्तच दिसतोय. अगदी लुसलुशीत. पटकन तो काटा घेऊन खायला सुरूवात करावा असा.. आणि त्यासोबत वाफाळता कॉफीचा (आयता) कप!!!!! आहाहा.. शब्दच नाहीत.. :)

राजेश घासकडवी's picture

2 Sep 2010 - 7:34 pm | राजेश घासकडवी

केक छान दिसतो आहे. केकच्या तळाला एक अगदी पातळ थर दिसतो आहे. तो आपोआप तयार होतो की काही बेस वापरला होता?

पुष्करिणी's picture

2 Sep 2010 - 8:07 pm | पुष्करिणी

आहाहा..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2010 - 8:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या लेखनाला आणि पाकृत्यांना दाद द्यायला शब्दच राहिलेले नाही. म्हणजे काय लिहिले म्हणजे आमची दाद पोहचेल ते कळायला मार्ग नाही.

व्वा, छान,मस्त,लै भारी,आवडले,जब्रा, या शब्दांचा आपल्या लेखनाला दाद देऊन, लिहून त्या शब्दांचा पार चोथा झालाय. म्हणजे वरील सर्व शब्द पार निर्जीव झाले आहेत. काही जर्मनी शब्द तरी द्या उधार...! :)

-दिलीप बिरुटे

चित्रा's picture

3 Sep 2010 - 8:27 am | चित्रा

हिवाळ्याच्या सुरवातीला जेव्हा बर्फ पडायला लागते, तसे दिसणारा हा केक आवडला.

स्वाती दिनेश's picture

4 Sep 2010 - 11:08 am | स्वाती दिनेश

काल धन्यवाद दिले, प्रतिसाद सुपूर्त केला आणि मिपाने डुलकी काढली. असो.
खवय्यानो, सर्वांना धन्यवाद.
अदिती, तो केक,पेस्ट्रीसाठीचा स्पेशल काटा आहे.
पैसा, ती कॉफी कापुचिनो आहे.(घरी केलेली )
विलासराव, पुढची ब्राझिल ट्रीप व्हाया फ्रांकफुर्ट करा म्हणजे केक खाता येईल,:)
केसु, वाट पाहत आहोत.
सर्वांना पुनश्च धन्यवाद.
स्वाती

विलासराव's picture

4 Sep 2010 - 9:38 pm | विलासराव

नक्कीच विचार करु स्वाती ताई.

धन्यवाद.

भानस's picture

9 Sep 2010 - 9:18 pm | भानस

गोड पदार्थ माझ्या डाएटची हमखास वाट लावतात. काय करणार राहवतच नाही. सहीच दिसतोय गं केक.

प्राजु's picture

10 Sep 2010 - 12:30 am | प्राजु

आई ग!!
कहर आहेस तू!

नंदन's picture

10 Sep 2010 - 2:46 am | नंदन

काफे उंड कुकन mit काफे कुकन :)

काजुकतली's picture

24 Sep 2010 - 1:00 pm | काजुकतली

गेल्या आठवड्यात मी करुन पाहिला हा केक. घरी लगेच फस्तही झाला, पण माझा हा प्रयत्न मला तितकासा आवडला नाही. मला केक बराच कोरडा वाटला. घरच्यांनी गरमा गरम खाल्ला शिवाय त्यांची पोटेही खाण्याआधी रिकामी होती त्यामुळे त्यांनी काय खातोय यापेक्षा पोटात काहीतरी भरतेय इकडे जास्त लक्ष दिले असे मला वाटते.

मी केलेला शानपणा -
१. रम घातली नाही, कारण घरात नव्हती आणि उगीच दोन चमच्यांसाठी कशाला विकत घ्या असा विचार केला.
२. मैदा आणि आरारुट वापरले. अपना बाजारमधुन आरारुट आणले. पॅकवर आरारुट लिहिले होते, मी आरारुट याआधी कधी पाहिले नसल्याने ते खरेच आरु होते का ते देव जाणे. पण कोर्न स्टार्च्सारखे दिसत होते, म्हणजे असावे बहुतेक.
३. नेहमी केक करताना एक चहाचा चमचा बेकिंग पावडर+१ चहाचा चमचा बे. सोडा घ्यायची सवय झालीय कारण मी मैद्याच्या जागी कणीक वापरते. त्याच सवयीने इथेही बे.पा+बे.सो. वापरला.

मला वाटते वरच्या शानपणातला बे.सो. मला नडला. केक अगदी फसफसल्यासारखा फुगला आणि बहुतेक त्यामुळेच कोरडा झाला. फक्त मैदा असेल तर बे.सो. नको हे मला सुचलेच नाही आयत्या वेळी...

३०० ग्रॅ. एकुण पिठाला २०० ग्रॅ साखर कमी पडली. खाणा-यांना पोट भरत आल्यावर केक गोडीला बराच कमी आहे याची जाणिव झाली. कदाचित साखरच गोडीला कमी असेल.

अजुन एक मार्गदर्शन हवेय - माझ्या अवनला वर आणि खाली अशा दोन कॉइल्स आहेत. केक करताना मी दोन्ही चालु ठेवते, पण केक थोड्या वेळाने वरुन काळा पडायला लागतो, आत मात्र जरा कच्चा असतो. तपमान थोडे जास्त ठेऊन खालचीच कॉइल फक्त चालु ठेवली तर केक व्यवस्थित भाजला जाईल काय??

मिसळभोक्ता's picture

20 Oct 2010 - 12:40 am | मिसळभोक्ता

रम घातली नाही, कारण घरात नव्हती आणि उगीच दोन चमच्यांसाठी कशाला विकत घ्या असा विचार केला.

का कोण जाणे, पण ह्या वाक्याने हृदयाला हात घातला. डोळे पाणावले.

चिंतातुर जंतू's picture

24 Sep 2010 - 2:00 pm | चिंतातुर जंतू

३०० ग्रॅ. एकुण पिठाला २०० ग्रॅ साखर कमी पडली. खाणा-यांना पोट भरत आल्यावर केक गोडीला बराच कमी आहे याची जाणिव झाली. कदाचित साखरच गोडीला कमी असेल.

कॉफीकेकसाठी मला हे साखरेचं प्रमाण योग्य वाटतं. पण माझ्या अनुभवात भारतीय लोकांना पाश्चिमात्य गोड पदार्थ जास्त साखर घालून आवडतात (कारण भारतीय गोड पदार्थांमध्ये साखर जास्त असते?) त्यामुळे आपण आपल्या अंदाजानुसार पाककृतीतली साखर कमी जास्त करावी.

अजुन एक मार्गदर्शन हवेय - माझ्या अवनला वर आणि खाली अशा दोन कॉइल्स आहेत. केक करताना मी दोन्ही चालु ठेवते, पण केक थोड्या वेळाने वरुन काळा पडायला लागतो, आत मात्र जरा कच्चा असतो. तपमान थोडे जास्त ठेऊन खालचीच कॉइल फक्त चालु ठेवली तर केक व्यवस्थित भाजला जाईल काय??

अगदी साधा उपाय म्हणजे सुरुवातीला केकचा पृष्ठभाग फॉइल किंवा ताटलीनं झाकून ठेवायचा. नंतर झाकण काढून घ्यायचं. नाहीतरः आत ठेवलेलं भांडं थोडं वर-खाली ठेवता येईल अशी काही सोय आहे का? अनेक ओव्हनना तळाशी आणि मध्यभागी अशा दोन ठिकाणी खाचा असतात. तिथं जाळी/पत्रा ठेवून त्यावर भांडं ठेवता येतं. अशी सोय असली तर सुरुवातीला केक खाली ठेवावा. थोड्या वेळानं वर ठेवावा.

दुसरा उपायः पाककृतीत दिलेल्या तापमानापर्यंत ओव्हन गरम करून (प्री-हीट) मग त्यात भांडं ठेवताना तापमान थोडं कमी करावं (२५-३० अंशांनी). थोड्या वेळानं तापमान पुन्हा वाढवावं.

तिसरा उपायः मोठ्या व्यासाचं भांडं वापरावं. त्यामुळे केकचं मिश्रण मोठ्या पृष्ठभागावर पसरतं. जेव्हा केकचा पृष्ठभाग खरपूस होऊ लागतो तेव्हाच आतला भागही शिजून तयार होतो.

हे शक्य नसलं तर मिश्रण दोन भागांत भिजवून दोन छोटे केक करावेत. पण मग दुसरं मिश्रण आयत्या वेळी भिजवताना पहिला केक तयार होण्याची वेळ सांभाळावी लागते आणि दोनदा मिश्रण बनवावं लागतं त्यामुळे हा कटकटीचा उपाय आहे.

ऋषिकेश's picture

25 Sep 2010 - 5:27 pm | ऋषिकेश

अगदी आता (१० मिनिटं झाली असतील) या पाककृतीनुसार (नेहमीच्या अवनऐवजी मायक्रोवेव्हमधे) केक बनवला. तो ही मी एकट्याने!!. उत्तम झाला आहे.. धन्यवाद स्वातीतै!!

बटर+साखरेत चार अंडी
मिश्रण फेटताना
फेटलेले मिश्रण
केक बेक करण्यापूर्वी
तयार कॉफी केक
(जमल्यास व टिकल्यास कॉफीकेकच्या स्लाईसचा फोटो टाकेन) :)

मस्त कलंदर's picture

25 Sep 2010 - 6:21 pm | मस्त कलंदर

स्वातीताईचा केक तर आवडलाच होता.. पण तुझाही केक मस्त दिसतोय.. स्लाईसचा फोटू टाकच रे ऋ.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Sep 2010 - 6:25 pm | परिकथेतील राजकुमार

अर्रे वा हा पोट्टा पण तयार झाला की ;)

मला फोटु न दाखवता प्रत्यक्ष दाखवलास तरी चालेल हो केक. घेउ का शटर खाली ?

स्वाती दिनेश's picture

13 Oct 2010 - 12:45 pm | स्वाती दिनेश

आत्ताच ऋ ने केलेला केक पाहिला, छान झाला आहे, काजुकतलीच्या प्रश्नांची उत्तरे चिंतामणींनी दिली आहेतच.
केकच्या तळाचा पातळ थर आपोआप तयार झालेला आहे.कोणताही वेगळा बेस वापरला नव्हता.
सर्वांना परत एकदा धन्यवाद.
(आता ह्या धन्यवादांना पर्‍याच्या 'त्या' लेखातल्यासारखे कुणी धागा वर आणण्याचा क्षीण प्रयत्न म्हणू नये.. आम्ही आंजावर गेले काही दिवस नसल्याने व आजच आंजावर परत रुजू झाल्याने ह्या धाग्याचे अपडेट आजच पाहत असल्याने आभार मानत आहोत.)
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2010 - 12:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मधल्या काळात केकची लाच देऊन आमचे तोंड बिझी केल्यामुळे आम्ही या प्रयत्नांची वाखाणणीच करू शकतो. बरं तो ठाण्यात दिलास त्या केकची रेसिपी टाक ना! काय झक्कास लागत होता तो केक!!

परिकथेतील राजकुमार's picture

19 Oct 2010 - 4:48 pm | परिकथेतील राजकुमार

ठाण्यात भेट झाल्याचे व पुन्हा एकदा फुकटचा केक खायला मिळाल्याचे ऐकवण्यासाठी दिलेला प्रतिसाद.

असो...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Oct 2010 - 4:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"फुकटचा" हा शब्द वाचून डोळ्यात पाणी आले. आमच्या मैत्रीणप्रेमाची साक्ष असणार्‍या गप्पांना काहीतरी चव असावी म्हणून तो केक होता! त्यावर असे हे शब्दांचे आसूड का ओढतो आहेस?

परिकथेतील राजकुमार's picture

19 Oct 2010 - 4:52 pm | परिकथेतील राजकुमार

मैत्रीणप्रेमाची साक्ष असणार्‍या गप्पांना

तुला गॉसिप म्हणायचे आहे का ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Oct 2010 - 5:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही. गप्पाच!!

शाल्मली's picture

19 Oct 2010 - 5:14 pm | शाल्मली

बरं तो ठाण्यात दिलास त्या केकची रेसिपी टाक ना!

ठाण्यात 'आपण' खाल्लेला केक हा मार्बल केक होता..ज्याची कृती आधीच दिलेली आहे..
यदाकदाचित तू केलासच हा केक तर खायला बोलवायला विसरू नकोस... ;)

स्वातीताई, काफे कुखेन सुंदरच..

--शाल्मली.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Oct 2010 - 5:17 pm | परिकथेतील राजकुमार

घ्या अजुन एक 'तसलाच' प्रतिसाद !

नक्की कोण कोण गँग होती ?

मस्त कलंदर's picture

19 Oct 2010 - 6:30 pm | मस्त कलंदर

आम्हांला गँग म्हणतोस???? जळजळ पोचली हो सदाशिवपेठेतले उपाशीकुमार!!!
स्वातीतै... केक तर मस्त होताच.. वर तो पुणेकरांसारखी अर्धी-एक स्लाईस न देता पोटभर खाऊ घातलास म्हणून तर आणखीच छान वाटलं... आणि त्यानंतरचा ती गरमागरम... वाफाळती कॉफी!!!! आठवूनच मन पुन्हा एकदा तृप्त झाले!!!!

छोटा डॉन's picture

19 Oct 2010 - 6:39 pm | छोटा डॉन

ओ ऽऽऽ, आवरा आता जरा !!!
म्हणे पोटभरं केकं आणि त्यानंतर वाफाळती कॉफी, ह्या ह्या ह्या !!!

लै उंच पतंग नका उडवु, आम्हाला बघवत नाही.

- ( संतप्त ) छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Oct 2010 - 7:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लै उंच पतंग नका उडवु, आम्हाला बघवत नाही.

आम्ही पतंग नाही टर उडवतो; जसे तुम्ही प्रतिसाद आणि खाती उडवता!

बादवे, केकची लाच एका संपादकांनाही मिळाली आहे!!

परिकथेतील राजकुमार's picture

19 Oct 2010 - 6:46 pm | परिकथेतील राजकुमार

वर तो पुणेकरांसारखी अर्धी-एक स्लाईस न देता पोटभर खाऊ घातलास म्हणून तर आणखीच छान वाटलं...

तुझा आणि अदितीचा सध्याचा झिरो फिगर आकार बघता एक किलोचा केक देखील तुमच्या हातात स्लाईस सारखाच दिसेल.

हि आणि ही पाराचा इजय असो.

मस्त कलंदर's picture

19 Oct 2010 - 7:15 pm | मस्त कलंदर

तुझा आणि अदितीचा सध्याचा झिरो फिगर आकार बघता

आधी स्वत:चा आकार पहा हो जळजळकुमार!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Oct 2010 - 7:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुझा आणि अदितीचा सध्याचा झिरो फिगर आकार बघता

सदाशिवपेठेतल्या लोकांना गणित आणि भूमिती कळत नाहीत हे पुन्हा सिद्ध झालं आहे.

लिखाळ's picture

19 Oct 2010 - 10:56 pm | लिखाळ

वर तो पुणेकरांसारखी अर्धी-एक स्लाईस न देता पोटभर खाऊ घातलास म्हणून तर आणखीच छान वाटलं...

बळंच !! वाक्याचा निषेध.

केक तर मस्त होताच, छोट्या करंज्या आणि सामोसे सुद्धा मजेदार होते :)

आचारी's picture

19 Oct 2010 - 3:40 pm | आचारी

पा क्रु मस्तच !! पण अन्डि न खाणार्यानी काय करावे ते सान्गा ना !!