टीप : भरुन ठेवा..सॉरी सॉरी...ज्यांना वाटाणे आवडतात पण मटर-पणीर किंवा आलु-मटर खाताना चपातीतुन सटकतात अशी तक्रार असणार्या सर्व वाटाणे लव्हर्सना आमच्यातर्फे दिस पाकृभेट !!
साहित्य :
अर्थातच वाटाणे,लसुण
मोहरी,
मिरच्या,
कांदे,
टमाटे,
तेल,
तवा,
कढई, पळी ई.ई.
कृती :
सर्वात पहिले वाटाणे तेलकट तव्यावर भाजुन घ्या.जास्त भाजायचे नाही.
त्यानंतर मिरची+मोहरी+लसुण ह्यांना एकत्र कुटा, आमच्या कडे मिक्सर नाही वगैरै बहाणे चालणार नाहीत, सरळ ग्लास घ्यायचा आणी लाटण्याने कुटायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे दुसर्या ग्लास मध्ये वाटाणे कुटुन घ्या.(आमच्या त्या ग्लासची काळजी करू नये,त्यासाठी आमच्या कडे पेश्शल ग्लास आहे)असो.वाटाण्याचा अगदीच भुगा करायचा नाही.
टमाट्याचा खिमा करा,कांदे बारिक चिरुन घ्या.
आता मुख्य कृती कडे राईट टर्न घेऊयात,
कांदे लाल होईपर्यंत तळुन घ्या, अरे हो, नेहमीच्या जज्जमेंटपेक्षा तेल जरासे जास्त घ्या,मग टमाटे टाका नंतर मोहरी+लसुण्+मिरच्यांचा जो कुट आहे तो टाका. चांगले हलवुन मिश्रण एकजिनसी होऊ द्यात.
सरतेशेवटी वाटलेले वाटाणे, 'एक्जिन्सी' होईपर्यंत हलवुन घ्या.
गरमा-गरम वाटाण्याची चटणी तयार !! (वाढताना वरतुन कोंथबिंर किंवा बीटाचे काप टाका मस्त चव येते आणी छानही दिसते,नेमक फोटु काढताना आमच्याकडे ह्यापैंकी काही नव्हत.)
प्रतिक्रिया
23 Aug 2010 - 9:17 am | सहज
मटर भुर्जी / वाटाणा खिमा सहीच!
23 Aug 2010 - 11:04 am | स्पंदना
हाय !!
काय ठरवलय काय? आणी ती मोहरी कुटायची आहे? की फोडणीत घालायची आहे?
करुन पहायला हव .
नाही कस आहे एव्हढ चवदार लिहिणारी माणस , पकवत पण चवदार्च असणार नाही का?
ते काही नाही आता मी पण एक पाकृ टाकणार. जरा त्या फोटो चढवण्याच्या भानगडीन विट येतो पण काय बी होउदे आपण पाकृ टाकणार!
23 Aug 2010 - 3:17 pm | खादाड
वाटाणे भिजवलेले की ताजे मटर सोलुन घ्यायचे तशे दोन्हि चालतिल पण चवित फरक पडेल !! तुम्हि कुठ्ले घेतले आहे ?
23 Aug 2010 - 3:35 pm | धमाल मुलगा
शाब्बास गलगले!
आता तु खरा पक्का आयटीमधला husband झालास रे. ;)
अवांतरः कधी येऊ जेवायला?
अतिअवांतरः वरच्या प्रश्नाला वाटाण्याच्या अक्षता लाऊ नका म्हणजे झालं. :D
25 Aug 2010 - 4:07 pm | इंटरनेटस्नेही
माउथ वोटरिंग! :)
25 Aug 2010 - 4:48 pm | जागु
वा वा मस्तच.
24 Sep 2010 - 1:20 pm | काजुकतली
मस्तच..
ही भाजी वापरुन पॅटिस वगैरे मस्त जमतील...
24 Sep 2010 - 5:26 pm | सुहास..
कोण आणी का धागे ऊचकाटयत रे रोज(आज माझा नंबर लागला का ?)
ओ भाऊ, धागा वाचला ना बस्स झाल की !! ...काय स्साल ईतरांना दाखवण्यासाठी धागा वर आणताय ?
अवांतर : माझ्या प्रतिसादाचा 'बाकीच्या' मुद्दामुन ऊचकट्ण्यार्याचा काहीही संबध नाही...
खिन्न
(सुहास)