मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विकांताची खादाडी : वाटाण्याच्या अक्षता..आपल हे..वाटाण्याची चटणी !!

सुहास.. · · पाककृती
टीप : भरुन ठेवा..सॉरी सॉरी...ज्यांना वाटाणे आवडतात पण मटर-पणीर किंवा आलु-मटर खाताना चपातीतुन सटकतात अशी तक्रार असणार्‍या सर्व वाटाणे लव्हर्सना आमच्यातर्फे दिस पाकृभेट !! साहित्य : अर्थातच वाटाणे,लसुण मोहरी, मिरच्या, कांदे, टमाटे, तेल, तवा, कढई, पळी ई.ई. कृती : सर्वात पहिले वाटाणे तेलकट तव्यावर भाजुन घ्या.जास्त भाजायचे नाही. त्यानंतर मिरची+मोहरी+लसुण ह्यांना एकत्र कुटा, आमच्या कडे मिक्सर नाही वगैरै बहाणे चालणार नाहीत, सरळ ग्लास घ्यायचा आणी लाटण्याने कुटायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे दुसर्‍या ग्लास मध्ये वाटाणे कुटुन घ्या.(आमच्या त्या ग्लासची काळजी करू नये,त्यासाठी आमच्या कडे पेश्शल ग्लास आहे)असो.वाटाण्याचा अगदीच भुगा करायचा नाही. step1 step2 टमाट्याचा खिमा करा,कांदे बारिक चिरुन घ्या. step 3 आता मुख्य कृती कडे राईट टर्न घेऊयात, कांदे लाल होईपर्यंत तळुन घ्या, अरे हो, नेहमीच्या जज्जमेंटपेक्षा तेल जरासे जास्त घ्या,मग टमाटे टाका नंतर मोहरी+लसुण्+मिरच्यांचा जो कुट आहे तो टाका. चांगले हलवुन मिश्रण एकजिनसी होऊ द्यात. step 4 सरतेशेवटी वाटलेले वाटाणे, 'एक्जिन्सी' होईपर्यंत हलवुन घ्या. step 5 गरमा-गरम वाटाण्याची चटणी तयार !! (वाढताना वरतुन कोंथबिंर किंवा बीटाचे काप टाका मस्त चव येते आणी छानही दिसते,नेमक फोटु काढताना आमच्याकडे ह्यापैंकी काही नव्हत.) step6

वाचने 5177 वाचनखूण प्रतिक्रिया 8

स्पंदना 23/08/2010 - 11:04
हाय !! काय ठरवलय काय? आणी ती मोहरी कुटायची आहे? की फोडणीत घालायची आहे? करुन पहायला हव . नाही कस आहे एव्हढ चवदार लिहिणारी माणस , पकवत पण चवदार्च असणार नाही का? ते काही नाही आता मी पण एक पाकृ टाकणार. जरा त्या फोटो चढवण्याच्या भानगडीन विट येतो पण काय बी होउदे आपण पाकृ टाकणार!

धमाल मुलगा 23/08/2010 - 15:35
शाब्बास गलगले! आता तु खरा पक्का आयटीमधला husband झालास रे. ;) अवांतरः कधी येऊ जेवायला? अतिअवांतरः वरच्या प्रश्नाला वाटाण्याच्या अक्षता लाऊ नका म्हणजे झालं. :D

सुहास.. 24/09/2010 - 17:26
कोण आणी का धागे ऊचकाटयत रे रोज(आज माझा नंबर लागला का ?) ओ भाऊ, धागा वाचला ना बस्स झाल की !! ...काय स्साल ईतरांना दाखवण्यासाठी धागा वर आणताय ? अवांतर : माझ्या प्रतिसादाचा 'बाकीच्या' मुद्दामुन ऊचकट्ण्यार्‍याचा काहीही संबध नाही... खिन्न (सुहास)