भटकंती झाली सफल

सुनिल पाटकर's picture
सुनिल पाटकर in जनातलं, मनातलं
19 Aug 2010 - 3:29 pm

या लेखातून आंबिवली गणी आदिवासी वाडीचे दर्शन मी तुम्हाला घडवलं पाणी, रस्ता, वीज अशा मूलभूत सुविधांपासून दूर असलेल्या महाड तालुक्‍यातील आंबिवली येथील गणी आदिवासी वाडीला अखेर प्रकाशाचा किरण दिसला, तो शेअर संस्थेच्या माध्यमातून. 1स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच या गावाला विकासाचा प्रकाश दिसला. सरकारी अधिकाऱ्यांचे पाय या वाडीला लागले. सौरकंदीलाच्या उजेडात ही आदिवासी वाडी उजळून निघाली आणि आदिवासींचे चेहरे आनंदाने फुलून गेले.
आंबिवली गणी आदिवासी वाडीच्या प्रवासानंतर याबाबत वृत्तपत्रातून आदिवास्यांच्ता व्यथा मी मांडल्या .माझ्या या प्रयत्नाला यशही आले.या वृत्ताची दखल घेत गोरेगाव( जि.रायगड) येथील शेअर संस्थेने तातडीने या वाडीची माहिती घेतली. शेअरचे महाड विभागाचे कार्यकर्ते विजय रानमाळे, गणेश मुरगुडे व अमोल शिरगावकर यांनी या वाडीला भेट दिली. प्रकल्प अधिकारी तुषार इनामदार व शेअरच्या संचालिका निकोला मॅन्टेरो यांनी वाडीवर विजेची समस्या सोडविण्यासाठी 17 कुटुंबांना सौरकंदील प्रकल्प मंजूर केला. महाडचे नवनियुक्त तहसीलदार सुरेंद्र नवले यांच्या हस्ते या आदिवासींना सौरकंदीलांचे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच या वाडीवर एक सरकारी अधिकारी पोहोचला. आदिवासींनी या वेळी तहसीलदारांना आपल्या अडचणी सांगितल्या. तुषार इनामदार यांनी सौरकंदील वापरण्याची माहिती आदिवासींना दिली. या कार्यक्रमाला सरपंच प्रतिमा गायकवाड, उपसरपंच रमेश पवार, शेअरचे कार्यकर्ते व आदिवासी बांधव उपस्थित होते.पाणीटंचाईबाबत शेअर प्रयत्न करणार आहे. गणी आदिवासीवाडीवर जाण्यासाठी आजही पायपीट करावी लागते.मीही अशी डोंगरावरून पायपीट करत गणीच्या व्यथा मांडल्या .माझी पायपीट व्यर्थ गेली नाही याचा आनंद मला वाटतो.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

अभिनंदन... असेच यश आपल्या सगळ्या कष्टांना येवो.

सुनिल पाटकर's picture

19 Aug 2010 - 3:36 pm | सुनिल पाटकर

सुनिल पाटकर's picture

19 Aug 2010 - 3:39 pm | सुनिल पाटकर

अभिरत भिरभि-या's picture

19 Aug 2010 - 3:49 pm | अभिरत भिरभि-या

अभिनंदन... असेच यश आपल्या सगळ्या कष्टांना येवो.

स्वाती२'s picture

19 Aug 2010 - 4:07 pm | स्वाती२

अभिनंदन!

मदनबाण's picture

19 Aug 2010 - 4:19 pm | मदनबाण

अभिनंदन... :)

परिकथेतील राजकुमार's picture

19 Aug 2010 - 5:01 pm | परिकथेतील राजकुमार

अभिनंदन.
आपल्या कष्टांना फळ मिळाले.

प्रभो's picture

19 Aug 2010 - 6:55 pm | प्रभो

सहमत आहे.

सुकामेवा's picture

19 Aug 2010 - 5:26 pm | सुकामेवा

आपल्या कष्टांना फळ मिळाले हे पाहुन बरे वाटले

फ्रॅक्चर बंड्या's picture

19 Aug 2010 - 6:58 pm | फ्रॅक्चर बंड्या

अभिनंदन....

तुमची पायपीट वाया गेली नाही हे खरेच. त्यांना प्रकाश दिसलाय आता जीवन सुद्धा मिळू दे!

(अंतर्मुख)चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Aug 2010 - 8:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन........!

>>> स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच या वाडीवर एक सरकारी अधिकारी पोहोचला.
अशी अनेक गावे, वस्ती, तांडे, अदिवासी विभाग असतील जिथे अजून सरकारी माणसं आणि सरकारी योजना पोहचल्या नसतील. आपल्या प्रयत्नाचा अभिमान वाटला. आपले अभिनंदन.....!

मी आज असेच एक दृष्य पाहिले. गावातील लोक नदी ओलांडून येण्यासाठी लहानशा नावेची वाट पाहात बसले होते. लहानशी नाव आणि कितीतरी माणसे. त्यांची ने आण कितीतरी वेळ पाहात बसलो. कधी होईल यांना रस्ता ओलांडण्यासाठी पूल कोणास ठाऊक ?

19082010736

-दिलीप बिरुटे

मृत्युन्जय's picture

19 Aug 2010 - 9:22 pm | मृत्युन्जय

अभिनंदन. आज स्वातंत्र्य मिळुन ६० वर्षे उलटुन गेली तरीही ही परिस्थिती आहे हे बघुन खरेच वाईट वाटते. पण त्याचबरोबर अशी उदाहरणे बघुन देश अजुन वार्‍यावर सोडला गेलेला नाही याचा आनंद्ही होतो.

स्वप्निल..'s picture

19 Aug 2010 - 11:32 pm | स्वप्निल..

अभिनंदन!!

बहुगुणी's picture

19 Aug 2010 - 9:55 pm | बहुगुणी

सुनील पाटकरः

आधीच्या लेखाचा दुवा दिसला नाही म्हणून जालावर शोधून तो लेख वाचला. तो लेख (त्याच्या नंतरचे इतरत्र आपण वृत्तपत्रात लिहिले असावेत असे इतर लेख) आणि हा अत्यंत आशादायक पाठपुरावा हे आपल्या यशाचं लक्षण आहे.

'शेअर' संस्थेच्या कामाविषयी आणि त्या सौर ऊर्जेवर चालणार्‍या दिव्यांविषयी (कार्य, किंमत इत्यादि) आधिक माहिती मिळाली तर आवडेल.

आज स्वातंत्र्यानंतर ६३ वर्षांनंतरही देशात त्रुटी आहेत हे मान्यच, पण तरीही हार न मानता प्रगति करू पाहणार्‍या तुमच्या आणि 'शेअर' सारख्या संस्थांच्या कामगिरीचा एक भारतीय म्हणून मला अभिमान वाटतो. मला वैयक्तिक रीत्या काय सहभाग घेता येईल तेही (हवं तर व्य नि तून) कळवा.

इन्द्र्राज पवार's picture

20 Aug 2010 - 12:12 am | इन्द्र्राज पवार

"स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच एक सरकारी अधिकारी वाडीवर पोहोचला" ...
हे वाक्य मनाला चरका पाडणारे आहे. काय आत्मियता असणार आहे या आदिवासी लोकांना की कोण या देशाचे राज्यकर्ते आहेत आणि का असावी? आणि काय आमच्यासारखे सो-कॉल्ड सुशिक्षित सांगणार यांना देशाची महती? वेळप्रसंगी उंदीर मारून खावून जगणारे हे जीव. २०१० सालीदेखील या भागात वीजपाण्याची व्यवस्था नाही आणि आम्ही मारे 'महाराष्ट्र राज्याने सर्व क्षेत्रात मारलेली उंच भरारी' यावर "लोकराज्य" मधील लेखमाला वाचत बसणार.

श्री.सुनिल पाटकर यांच्यासारखे धडपडणारे युवक या भागात आहेत ही त्यातल्यात्यात समाधानाची गोष्ट. मु.पो.तारा, ता.पनवेल, जि.रायगड येथील सुरेखा दळवी या अशाच एका आदिवासी वस्तीत कायम राहून खूप कार्य करणार्‍या स्त्रीची श्री.अनिल अवचट यांनी करून दिलेल्या ओळखीची आठवण या निमित्ताने झाली.

स्पंदना's picture

20 Aug 2010 - 10:25 am | स्पंदना

तुमच्या चिकाटीला यश आलेले पाहुन फार बरे वाटले.
चला शेवटी रॉकेल च्या भकभक धुरा शिवाय उजेड मिळाला तर!
आम्ही कश्याप्रकारे मदत करु शकु ते ही सांगत जा, कधी कधी भावना असते पण मार्ग नाही सापडत.

समंजस's picture

20 Aug 2010 - 10:31 am | समंजस

अभिनंदन! तुमचे आणि त्या वस्तीतील नागरीकांचे सुद्धा!