पीपली लाइव - विरोध

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
16 Aug 2010 - 12:47 am

मी हा चित्रपट पाहीला नाही,पाहणारही नाही.पण ह्या चित्रपटाला विरोध होत आहे हे कळल्यावर ह्यात काहीतरी आक्षेपार्ह असणार हे नक्की.महाराष्ट्रातला शेतकरी ज्याचा विरोध करतो,त्या चित्रपटाला मराठीच लोक कुरवाळत बसले आहेत,ह्यावरुन महाराष्ट्राला तोडणे का सोपे झाले आहे हे समजले.मी 'त्या' धाग्यवर हा प्रतिसाद दीला..........

विषयांतर : ह्या चित्रपटाला महाराष्ट्रात 'शेतकरी' भागांत खुप विरोध होत असताना,त्या भिकार चित्रपटाच ईथे कौतुक का केल जातय???

आपल्याला हे माहीती असुनही आपण चित्रपट पाहीलात व हे लिहलेत असे असेल तर मी आपलाही,अगदी मनापासुन निषेध करतो........शेतक-यासाठी आपण काय करतोय हा एकच प्रश्न स्वःताला विचारुन बघा!! त्यांना कसलाच आधार सोडायचा नाही का??

आज शेतक-याला कसला आधार आहे.वीज नाही परीणामी पाणी असुनही पिकाचे नुकसान्,कर्जाचे व्याज फेडता येत नाही,घरी मुलीची लग्न व्हायला वर्षे लागतात व तिचं वय निघुन जातं,थोडंतरी हवामान बदलल तरी डागाळलेले पिक स्वतात द्याव लागत्,आणि कीतीही चांगल पिक आल तरी दलाल लुटल्याशिवाय रहात नाहीत.ह्याच दलालांमुळे 'बाजार' भरतो तेव्हा पोलिसांना मध्यस्थी करावी लागते ना,मग ह्यांचा बंदोबस्त कधी होणार?
धान्य व भाजी शेतात मिळते बाकी मीठापासुन सर्व विकत घ्याव लागत्,पिक नाही आल कींवा चांगल्या भावात विकल नाही गेल की पैसा हातात नसणार.मग एक शेतकरी कर्ज का नाही घेणार?
मागे एका मंत्र्याने 'शेतकरी फक्त आत्महत्येने मरत नाहीत्,तर दारुनेही मरतात' अस विधान केलं.पण त्या मंत्र्याने शेतकरी दारु का पितो ह्यावर काही भाष्य नाही केल.अहो तो काय खुशीत पितो का?तुम्ही नेते म्हणुन काय आधार दीलत त्यांना?? आश्वासनं??

वरुन आपण ईथे शहरात राहुन काही करता येत नाही म्हणुन हात झटकुन द्यायचेच,पण तेवढ्यावरच न थांबता निर्दयी होउन शेतक-यांवर हसायचसुद्धा!!
त्यांना पाठींबा तर नाहीच द्यायचा पण जे हीमतीने उभे आहेत त्यांचाही कणा मोडायचा.

शेतकरी चित्रपटाचा विरोध करत आहेत हे माहीती असतानाही तो 'अक्कलशुन्य' चित्रपट पाहणा-यांचा व त्याची प्रशंसा करणा-यांचा मी मनापासुन निषेध करतो.

Here,objection to the film is irrespective of whether the film has objectionable content,story,dialogue or not.

धोरणविचार

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

16 Aug 2010 - 12:50 am | शानबा५१२

लेख लिहण्यामागच्या उद्देशाबाबत,माझ्या ईतर तर्कशुन्य प्रतिसादांमुळे,काही दुषित मते तयार होणार नाहीत,अशी आशा बाळगतो.

मी-सौरभ's picture

19 Aug 2010 - 8:14 pm | मी-सौरभ

मी सगळे प्रतिसाद वाचले...
त्यावरुन तुझ मन अति(ष की श)य साफ आहे असं जाणवत.
फक्त हा धागा टाकण्याआधी थोडी माहिती मिळवली असतीस (विशेषतः ज्यानी हा पाहिलाय) तर बरं झाल असतं

बाकी अजुन ५ बाकी आहेत :)

महाराष्ट्रातुन पीपली लाईव्हला विरोध होत आहे,जो मला देखील योग्य वाटतो.
शेतकरी अनुदानातुन मिळणार्‍या पैसाच्या हव्यासापोटी आत्महत्या करतात हे या चित्रपटातुन प्रतित होते,जे पूर्णपणे चुकीचे आहे.
इतक्या लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केली ते पैसे मिळावेत म्हणुन ? ही शेतकर्‍यांची आणि त्यांच्या अवस्थेची क्रूर चेष्टा वाटते.
http://www.starmajha.com/NewDiscussionReply.aspx?ForumID=12895

ऋषिकेश's picture

16 Aug 2010 - 8:50 am | ऋषिकेश

चित्रपट पाहिलेला नाही त्यामुळे काहीच बोलु शकत नाहि. मात्र केवळ शेतकरी विरोध करताहेत म्हणून दुसरी बाजु समजून न घेता किंवा शेतकर्‍यांचा विरोध नक्की कशावर बेतलेला आहे? त्याचे कारण काय? हे ही माहीत नसताना मी निषेधही व्यक्त करू शकत नाही.

कोणी चित्रपट बघितला आहे का? तो सांगेल का का विरोध आहे? वर मदनबाण म्हणतात तसे प्रतीत होते का?

ऋषिकेश मी सुद्धा हा चित्रपण अजुन पाहिला नाही...परंतु तरी देखील मला शेतकर्‍यांचीच बाजु घ्यावीशी वाटली कारण, लाखो शेतकर्‍यांच्या आत्महत्या या पैशाच्या प्रलोभनाने झालेल्या नाहीत... बाकी ज्यांनी चित्रपट पाहिला आहे त्यांनी यावर अधिक भाष्य करावे अशी अपेक्षा आहे.

ऋषिकेश's picture

16 Aug 2010 - 9:45 am | ऋषिकेश

चित्रपटाची बाजु घेण्याचा अजिबात प्रयत्न नाही, मात्र आताच लोकसत्तात एक बातमी वाचली त्यात आमिर खानने काही दृश्ये "उपहासात्मक" दृष्टीने चित्रीत केल्याचे म्हटले आहे. आता तो खरंच उपहास आहे का? का खरंच आक्षेपार्ह काही आहे हे तो चित्रपट बघितलेल्यांपैकी कोणी सांगितले तर कळेल असे वाटते. तोपर्यंत मी ना निषेध व्यक्त करू शकत ना पाठींबा देऊ शकत.

याशिवाय एखाद्या शेतकर्‍याने हा मार्ग अवलंबला अशी "कथा" असेल तर तो सर्वसामान्य नियम होऊ शकत नाही. अपवादावरही चित्रपट बनतोच. फक्त तो अपवाद आहे हे चित्रपटातूनच प्रेक्षकांना कळलं पाहीजे ही अपेक्षा रास्त आहे.

बेसनलाडू's picture

16 Aug 2010 - 9:46 am | बेसनलाडू

ते सांगितल्यास लिहू शकेन. मी चित्रपट पाहिला आहे.
(प्रेक्षक)बेसनलाडू

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Aug 2010 - 10:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बेला, तू चित्रपट पाहिला आहेस म्हणून तुला प्रश्न. चित्रपटाच्या नावावरून वाटत आहे की चित्रपट मुळात शेतकर्‍यांची आत्महत्या हा बॅकड्रॉप वापरून मिडीयाच्या सवंग*पणावर टीका करण्यासाठी बनवला असावा. तुझं चित्रपट पाहून काय मत झालं?

*सदर विशेषण कोणीही मिपावाचक मिडीयावाल्याने व्यक्तीगत स्वतःवर ओढवून घेऊ नये ही विनंती.

आज सकाळ मध्ये आलेले परिक्षण वाचनीय आहे.
'आपल्या कोडगेपणाच्या कानाखाली काढलेला आवाज'

मृत्युन्जय's picture

16 Aug 2010 - 12:27 pm | मृत्युन्जय

बेलाला काय वाटले ते नाही माहिती पण चित्रपट त्यावरच आहे. इतर कोणाचे काही वेगळे मत झाले असल्यास त्याने ताबडतोब बिनोद अणि उपरोध समजुन घेण्यासाठी शिकवणी लावावी.

अ‍ॅड टु इट राजकारण्यांचा बेमुर्वतखोरपणा, स्थानिक राजकारण्यांचे सामान्य जनतेच्या हिताबद्दलचे औदासिन्य, सामान्य जनतेच्या प्रश्नांवरुन केले जाणारे शह- काटशाहाचे राजकारण, केंद्र आणि राज्य सरकारांचे आपापसातले हेवेदावे, शासकीय नोकरशहांचा थंड आणि चीड आणणारा आलिप्तपणा आणि केवळ बाईट साठी चाललेली धडपड. हे सगळे आहे या चित्रपटात.

बेसनलाडू's picture

16 Aug 2010 - 8:53 pm | बेसनलाडू

थोडक्यात सर्वमान्य मराठीत सांगायचे झाल्यास मिडियाची #$ली आहे :)
(संक्षिप्त)बेसनलाडू

पैशाच्या गरजेपायी आत्महत्येस प्रवृत्त होणे/केले जाणे, हा निव्वळ फार्स आहे. खरे तर चित्रपटातील मुख्यमंत्र्याच्या तोंडी असलेले "किसानों की आत्महत्या रोजमर्रा की बात है, महाराष्ट्र देखिये, आंध्र देखिये .." सारखे संवाद म्हणजे राजकारण्यांच्या कोडगेपणाचीही कमाल दाखवणारे आहेत. चित्रपटात राजकारणी, मिडिया यांच्या सवंगपणावर, निर्लज्जपणावरच टीका आहे. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते किंवा संबंधित इतर कोणीही शेतकर्‍यांच्या मूलभूत प्रश्नाबद्दल उदासीन नि संवेदनाशून्य आहेत, असे मला वाटले नाही. मुळात असे काही आमिष दाखवून आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जाणे हा फार्सच आहे, हे न कळण्याइतके आपल्यापैकी कोणीही बत्थड नसावेत, असे वाटते. पैशाच्या गरजेपायी अगदी आत्मघातकी अतिरेकी पथकांत सामील होणारी तरुणाई असताना त्यांच्याबद्दल जर आपण चुकचुकण्यापलीकडे काही करू शकत नसू, तर शेतकर्‍यांच्या समस्येवरील फार्सबद्दल अतिसंवेदनाशील असण्यात काय हशील? (असे विचारण्यात कोणतीही एक समस्या कमी/अधिक महत्त्वाची, नैतिकता-अनैतिकता हे मुद्दे विचारात घेतलेले नाहीत. दोन्ही समस्या या समस्याच आहेत, नि सारख्याच स्वरूपाच्या आहेत, इतके साधे गृहीतक आहे)
(संवेदनाशील)बेसनलाडू

चित्रपटाच्या शेवटी तर शेतकरी आणि शेतमजुरांचे आडव्यातिडव्या फोफावत चाललेल्या शहरांकडे बांधकाम मजूर म्हणून होणारे स्थलांतर दाखवून त्याही समस्येला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चित्रपट बारकाईने पाहणार्‍यांच्या नजरेतून नि डोक्यातून ही बाब सुटायला नको.
(निरीक्षक)बेसनलाडू

ऋषिकेश's picture

16 Aug 2010 - 10:14 am | ऋषिकेश

तेच तर माहीत नाही ना! सगळा हवेत गोळीबार चाललाय ;)
बाकी, जर तु चित्रपटपाहिला आहेस तर प्रश्न असा की "असं कोणत तरी दृश्य आहे का जे शेतकर्‍यांच्या सत्य परिस्थितीशी फारकत घेणारं किंवा शेतकर्‍यांची प्रतिमा मलीन करणारं आहे?"

सहज's picture

16 Aug 2010 - 10:22 am | सहज

आता हिंदी सिनेमात भ्रष्ट पोलीस, जज्ज, सैनिकी अधिकारी दाखवतात तर सगळे (पोलीस, जज्ज, सैनिकी अधिकारी ) तसेच असतात अशी टिका करुन ते सिनेमे बंद पाडण्यात आले आहेत का? असल्यास प्रथेप्रमाणे शानबांचे ठीक वाटते.

नसल्यास भले पैशासाठी जीवही देणारे लाचार (बिचारे मजबूर?? अश्या अर्थाने) शेतकरी अश्या काही व्यक्तिरेखा कथेच्या दृष्टिने दाखवल्या गेल्या असतील तर नेमके काय चुकीचे?

का आजकाल मेडीयासमोर आपल्या संघटनेचे प्रदर्शन करायला कुठल्या न कुठल्या सिनेमातील एक शब्द, दृश्य वापरायचा पायंडा पडला आहे?

आणि हो, पीपली लाइव्ह बघीतला नाही आहे. सेन्सॉर बोर्डचे सर्टीफिकेट पास होउनच चित्रपट प्रदर्शीत झाला आहे ना?

मी ऋचा's picture

16 Aug 2010 - 3:45 pm | मी ऋचा

प्र.का.टा.आ

अनुराग's picture

16 Aug 2010 - 10:27 am | अनुराग

चित्रपट पाहिला नाहि.

गंगाधर मुटे's picture

16 Aug 2010 - 10:28 am | गंगाधर मुटे

पैशाच्या मोहापायी शेतकरी आत्महत्या करतो, असा आभास निर्माण करणारा चित्रपट, त्यावर टाळ्या वाजवणारे प्रेक्षक आणि यात गैर काय असे वाटून घेणारा समाज..........!!

काय बोलणार.....................?????????????????????????????

( विकृत,बधिर, नपुसंक,षंढ वगैरे शब्द जुने झालेत. नविन परीणामकारक शब्दांची निर्मिती होऊन योग्य शब्द मिळेपर्यंत न बोललेच बरे......... हम्म्म.)

ऋषिकेश's picture

16 Aug 2010 - 10:31 am | ऋषिकेश

तुम्ही चित्रपट बघितला आहे का? असी दृश्य, संवाद किंवा मांडणी खरंच आहे का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Aug 2010 - 10:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मलाही हाच प्रश्न पडला आहे. शब्द उगाच जुने होतात का योग्य वापराने तसेच धारदार रहातात हाही विचार करण्यायोग्य.

मृत्युन्जय's picture

16 Aug 2010 - 12:02 pm | मृत्युन्जय

तुम्ही बोलु नये हेच खरे. समाजात एक असंतुष्ट वर्ग असतो जो सतत कशा ना कशावर टीका करत असतो. एकुण दृष्टीकोन नैराश्यावादी असतो. आपण तसे असाल तर ठीकच आहे. अन्यथा चित्रपट पाहिलेला नसतान असली जहरी टीका करण्याचा आपला अधिकार आहे असे वाटत नाही.

आणि आपण चित्रपट बघितला असेल तर आपल्याला कलेची जाण नाही किंवा विनोद, उपरोध आणि उपहास आपल्याला कळतच नाही असे नाइलाजाने म्हणावे लागेल.

बेसनलाडू's picture

16 Aug 2010 - 8:58 pm | बेसनलाडू

गरजेपायी!
(गरजू)बेसनलाडू

कोणत्याही गंभीर स्वरूपाच्या प्रश्नावर आपले विचार, भावना मांडण्यासाठी तितकाच किंवा त्यापेक्षा गंभीर मार्ग अवलंबायचा की काहीशा उपहासात्मक शैलीत ते व्यक्त करायचे, याचा विचार कलाकारावर सोडायला नको काय?
(कलाकार)बेसनलाडू

टाळ्या वाजवणार्‍या प्रेक्षकांकडून मिळणारी दाद ही या समस्येला वाचा फोडण्याच्या प्रयत्नाला मिळालेली पावती का समजू नये? यात काय गैर आहे, हे जाणून घ्यायची इच्छा आहे.
(जिज्ञासू)बेसनलाडू

भारतीय's picture

16 Aug 2010 - 10:56 am | भारतीय

चित्रपट बघितल्याशिवाय प्रतिक्रिया कशी देणार ? शानबा ५१२, तुमच्या या धाग्याने चित्रपटाची नकरात्मक का होईना पण प्रसिद्धि होईलच ना? ( नव्हे, ती झालीच आहे, मला हा चित्रपट पहाण्याची फार अशी ईच्छा नव्हती, पण आता वाटतेय कि काय आक्षेपार्ह आहे हे शोधण्यासाठी हा चित्रपट पहावा)
सध्या ऋषीकेश यांच्याशी सहमत! ना पाठींबा देऊ शकत, ना विरोध करू शकत. (कुणी पाहू नये असे वाटतच असेल तर चित्रपटात काय आक्षेपार्ह आहे ते कृपया सांगावे)

विसुनाना's picture

16 Aug 2010 - 11:23 am | विसुनाना

'अती झालं अन हसू आलं' अशी मराठीत जुनी म्हण आहे.
भारतातील शेतकर्‍याची (आणि इतर अनेक हातावर पोटे असलेल्या व्यक्तीसमूहांची) परिस्थिती 'अशी' कारुण्यमय हास्यास्पद झालेली आहे हे तर दिग्दर्शकाला दाखवायचे नसेल?
पहायला हवा एकदा.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Aug 2010 - 11:33 am | परिकथेतील राजकुमार

मी हा चित्रपट पाहीला नाही,पाहणारही नाही.पण ह्या चित्रपटाला विरोध होत आहे हे कळल्यावर ह्यात काहीतरी आक्षेपार्ह असणार हे नक्की.

श्री. शानबा, मागच्यावेळी देखील आपण शिवाजीराजांवरील पुस्तक न वाचताच त्या नावाने खडे फोडणारा एक धागा चालु केला होतात. (त्यावेळी देखील त्याच विषयावरचा एक धागा चालु होताच)
तुम्ही जर हा चित्रपट बघितला नाहियेत तर त्या विषयी चांगले अथवा वाईट मत तुम्ही नोंदवुच कसे शकता ? आणि लोकांच्या बोलण्यावरुन तुम्ही स्वतःचे मत बनवलेले असेल तर ते अगदी अधिकारवाणीने धागा काढुन इथे सांगत बसायची गरजच काय ?

संपादक याची योग्य ती दखल घेतील काय ?

अप्पा जोगळेकर's picture

18 Aug 2010 - 10:00 am | अप्पा जोगळेकर

तुम्ही जर हा चित्रपट बघितला नाहियेत तर त्या विषयी चांगले अथवा वाईट मत तुम्ही नोंदवुच कसे शकता ?
हेच म्हणतो.

मृत्युन्जय's picture

16 Aug 2010 - 11:57 am | मृत्युन्जय

मला खरेच खुप हसु येते आहे. एकानेही चित्रपट बघितलेला नाही आहे आणि सगळेजण टीका करत आहेत. मुळात हा चित्रपट हपापलेल्या आणि स्वार्थी शेतकर्‍यांवर नाही. मीडियाच्या सवंगपणावर आणि राजकारण्यांच्या संधीसाधूपणावर या चित्रपटामध्ये खुशखुशीत टीका केली आहे. आणि या सर्वाला पार्श्वभुमी आहे गळ्यापर्यंत कर्जात बुडलेल्या एका शेतकरी कुटुंबाची.

यातील शेतकरी अनुदान मिळणार म्हणुन आत्महत्या करायला तयार होतो. संपुर्ण चित्रपट विनोदी अंगाने जातो तरी या संपुर्ण प्रकाराला राजकारण्यांचे शेतकर्‍यांच्या हिताबद्दल असलेले कमालीचे औदासिन्य, आपापसातील राजकारण, ब्युरोक्रॅट्सचा आलिप्तपणा, शेतकर्‍याची दारूण विफलता आणि दारिद्रयातुन आलेले नैराश्य आणि यातुन आत्महत्येचा टोकाचा निर्णय (तोसुद्धा स्थानिक राजकारण्यांच्या निर्लज्ज सल्ल्यातुन उद्भवलेला) या सगळ्या गोष्टी दारूण छेद देऊन जातात.

आमीर खानने हा संपुर्ण विषय कमालेच्या संयततेने हाताळला आहे. मस्करीची त्याने कुस्करी होऊ दिलेली नाही आहे. आणि मुळात शेतकरी पैसे कमावण्यासाठी आत्महत्या करतो असा सुरच नाही आहे चित्रपटात. सूर असा आहे की शेतकर्‍यांना असे वाटत असते की असे जिणे जगण्यापेक्षा आत्महत्या बरी किमान अनुदान मिळाले तर बायकामुलांचे आयुष्य सुखात जाइल.

टीका करण्यापुर्वी लोकांनी किमान चित्रपट बघणे अपेक्षित होते

सूर असा आहे की शेतकर्‍यांना असे वाटत असते की असे जिणे जगण्यापेक्षा आत्महत्या बरी किमान अनुदान मिळाले तर बायकामुलांचे आयुष्य सुखात जाइल. <<
दुर्दैव आणि दैन्यापोटी आलेल्या कमालीच्या निराशेतून येणारा हा सूर गाभ्रीचा पाऊसमधेही होताच की.

चित्रपट न बघता निषेध करत रहाणारे आणि नाटक न बघता केवळ नाटकाच्या नावात देवाचं नाव आहे म्हणून येऊन काळे बिळे फासणारे एकाच धर्तीचे.

बाकी पब्लिसिटी व्हावी म्हणून हा घडवून आणलेला स्टंटही असू शकतो.

शिल्पा ब's picture

16 Aug 2010 - 12:18 pm | शिल्पा ब

+१ आणि पर्‍याशीही सहमत.
पिच्चर ब्लॅक कॉमेडी आहे (ट्रेलर वरुन)...म्हणजेच उपहासात्मक...मिडिया अन राजकारण्यांवर टीका..

प्रमोद्_पुणे's picture

16 Aug 2010 - 12:49 pm | प्रमोद्_पुणे

१००% सहमत. चित्रपट न पाहता लोक त्यावर टीका का करत आहेत? आणि पाहिल्यावरसुद्धा टीका करत असतील तर त्यांनी तू म्हणत आहेस त्याप्रमाणे विनोद आणि उपरोध ह्यातील फरक शिकण्यासाठी शिकवणी लावावी. काहीही न वाचता न पाहता त्यावर टीका करणे ही फॅशन झाली आहे आणि ही मानसिकता वाईट आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

16 Aug 2010 - 12:08 pm | अविनाशकुलकर्णी

विदर्भाचा शेतकरी आळशी आहे असे श्री विलास राव म्हणाल्यावर हि संतापाची लाट उसळली होति....
असहाय्य वेदनेवर हसणे सुसंस्कृत पणाचे लक्षण नाहि....खानाचा कोथळा बाहेर काढा...

अनाम's picture

16 Aug 2010 - 12:57 pm | अनाम

....खानाचा कोथळा बाहेर काढा...

वा वा वा कसले जाज्वल्य विचार आहेत हो तुमचे. जरा तुमच्या चरणकमलांचा फोटु पाठवा राव.

चित्रपटा बद्दल नो कमेंट कारण तो अजुन पाहिला नाही. १-२ महिन्यात बरी प्रिंट येईलच नेटावर तोवर धीर धरु.
कारण फुकट ते पौष्टीक अस भाईकाकांनी सांगुन ठेवलेल आहेच.

राजेश घासकडवी's picture

16 Aug 2010 - 11:01 pm | राजेश घासकडवी

वा वा वा कसले जाज्वल्य विचार आहेत हो तुमचे. जरा तुमच्या चरणकमलांचा फोटु पाठवा राव.

अनामभाऊ,

उपरोध सर्व लोकांना कळतोच असं नाही. तेव्हा खानाचा कोथळा काढा या विधानाला तुमचा खरंच पाठिंबा आहे असं काहींना वाटू शकेल. :)

मी त्या विधानाचा स्पष्ट निषेध करतो...

गुर्जी तुमच्या सारख्या समजदार लोकांसाठीच ते वाक्य आहे.
ज्यांना त्यातली 'खोच' कळली नाही त्यांची पर्वा आहे कुणाला. :)

घाटावरचे भट's picture

16 Aug 2010 - 1:15 pm | घाटावरचे भट

नो कामेंट्स... शिनेमा पाह्यला नाय अजून.

शानबा५१२'s picture

16 Aug 2010 - 6:48 pm | शानबा५१२

now no मस्करी!

मी आधीच लिहल आहे,
मी हा चित्रपट पाहीला नाही,पाहणारही नाही.पण ह्या चित्रपटाला विरोध होत आहे हे कळल्यावर ह्यात काहीतरी आक्षेपार्ह असणार हे नक्की.
Here,objection to the film is irrespective of whether the film has objectionable content,story,dialogue or not.

म्हणजे माझा विरोध आहे कारण शेतक-यांना त्या चित्रपटात काहीतरी चुकीचे वाटत आहे.मी चित्रपट जरी पाहीला व मला आक्षेपार्ह अस काहीच नाही वाटल्,तरी मी शेतक-यांनाच पाठींबा देईन.जर त्यांना वाटल की आपल्या भावना दुखावल्या गेल्यात तर तसच आहे अस म्हणेन.

आता वरच्या प्रतिसादांना काही श्रेणी पाडुन उत्तरे देतो.

१) ज्यांनी चित्रपट पाहीला आहे व त्यांना आक्षेप घेण्यासारख काहीच वाटल नाही ते.

आपण आपले मत बनवलत,पण जर शेतकरी जो विरोध करत तो चुकीचा आहे अस आपल मत आहे का? हो तर मग तुम्ही काय म्हणता त्यांनी हा विरोध करु नये?
जर शेतक-यांना आक्षेप आहे तर मलाही शेतक-यांना पाठींबा दर्शवायला आवडेल अस वाटत का?
२) चित्रपट पाहीला आहे व आक्षेपही आहे?
फक्त आणि फक्त शेतक-यांना पाठींबा मिळावा म्हणुन तरी आपण आक्षेप घेउया.

३) चित्रपट पाहीला नाही म्हणुन ना विरोध करणारे ना पाठींबा दर्शवणारे.
अहो केलात विरोध,पोहचला शेतक-यांबद्दल आपला विचार(though not possible practically) तर त्यांना नाही का बरं वाटणार?

४) आमच्यासारखे ज्यांनी चित्रपट पाहीली नाही पण आपली अक्कल गहाण ठेउन शेतक-यांना पाठींबा देणारे.
अहो गरज आहे त्या हतबल झालेल्या लोकांना!

विषयांतर :
हा माणुस(?) काय लिहतोय्,उगाच टाईमपास करायचा म्हणु लिहतोय.अस जर तुम्हाला वाटत असेल तर हे चुक आहे.मला काहीतरी वाटतच.
#%#%#% #$%#$% #$%^ $# (*&^* अस कायतरी बोलतात ना,म्हणजे 'करत काही नाही नुसता ओरडत असतो' हे मला लागु होत नाही.माझी स्वःताची ऐपत नाही म्हणुन मी आज फक्त बोलुच शकतो.जे आहे ते सर्व बापाचं.घर,पैसा,बिजनेस,माझा मार्केटमधला पैसा सर्व बापाचं.पण जेव्हा स्वःताच्या पायावर उभा राहीन(आताही आहे,पण पैसा जमवतोय) तेव्हा कमीतकमी एकतरी शेतक-याच्या घरतलं लग्न व एखाद्या मुलाचा खर्च करीन हे निश्चित!
फक्त तोंडातुन हवा सोडत नाहीये.एका गरीबाच्या मुलीला शिक्षणासाठी दत्तक घेणार होतो पण माझी वर सांगितल्याप्रमाणे ऐपत नाही,वरुन लग्नही झाल नाही.पण जेव्हाही त्या मुलीला,तिच्या वडीलांना भेटतो तेव्हा एखादी निळी कींवा हीरवी नोट हातावर टेकावतोच.तेवढीच खर्चाला मदत व्हावी तिच्या घराला ही भावना."पढाई करना हां बेटा!" अस सांगतो.ती पोरही कधीकधी शाळेत काय शिकवल ते उस्तुकतेने सांगते,तेव्हा बरं वाटत.
सांगायचा उद्देश हाच की मदत करा.रडणा-याला हसवा.काम करायच,पैसा कमवायचा,थोडा खर्चायचा, थोडा बँकेत टाकायचा,आणि एखादे दीवशी मरुन जायच अस जीवन जंतुही जगतो. मुलं पण आपलचं अनुकरण करणार.

शेतक-यांना काहीच मदत करु शकत नाही पण 'भले त्या चित्रपटाला फायदा मिळाला' तरी मी विरोध दर्शवणारच.माझी विचार करायची शक्ती मला त्यात गैर आहे की नाही ह्याचा विचार करायला नाही वापरायची.आपण वापरा आणि आपले जीवन जगत रहा,तुम्हाला तुमच्या १००% स्वार्थी जीवनात सर्व काही मिळो ह्यासाठी हार्दीक शुभेच्छा!

UPDATE : नोकरी मिळाली उद्यापासुन नवीन काम सुरु!......मी आज ह्याबद्दल पोटाला हात लावुन "भुक लगी है" म्हणणा-याला ३० रुपये काढुन दीले.मी स्वःता हाताने विकत घेउन देतो,पण आज गाडीत होतो म्हणुन नाही देउ शकलो..................................हो मोठेपण सांगतोय्,आपण 'तो मुलगा खरचं भुकेला होता का?" ह्या विषयावर चर्चा करा.

जय हींद!

धमाल मुलगा's picture

16 Aug 2010 - 6:57 pm | धमाल मुलगा

शानबा,
बाकीची दुनयादारी गेली तिच्यायला बारा गडगड्याच्या विहिरीत!

तुझा दिल साफ आहे, तुला मनापासुन काहीतरी करण्याची प्रचंड इच्छा आहे, तुला जसं जमेल तसं तू करतोही आहेस, हे पाहुन खरंच फार बरं वाटलं.
नोटा जमवायचं मशीन बनुन आणि खाज भागवायला कळफळकावरुन मोठी मोठी युध्दं करणार्‍या आणि जगाला अक्कल शिकवण्याच्या आविर्भावात हिंडणार्‍यांच्या समोर आज मला तू हिमालयाएव्हढा मोठा दिसलास.

भिड भावा...आवडलं आपल्याला.

एक मनापासुन सुचना: तुला खरंच काही असं काम करायचं असेल तर नक्की प्रभूमास्तरांशी संपर्क कर. तुझ्या ह्या भावनांना चॅनलाईझ फार योग्य रित्या करतील ते. :)

(माझ्या ह्या प्रतिसादाचा अर्थ, तुझ्या ह्या कामांबद्दल माझ्या भावना व्यक्त करणे हा आहे. इतर प्रतिसादांबद्दल्/धाग्यांबद्दल कोणतेही प्रोत्साहन नाही.)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Aug 2010 - 7:03 pm | परिकथेतील राजकुमार

धमाल बुश हा कितवा लादेन आता ? =)) =))

(आता धम्या खरड करुन सिरीयस होउन लै घाण घाण शिव्या घालणार हे नक्की !)

धमाल मुलगा's picture

16 Aug 2010 - 7:07 pm | धमाल मुलगा

हो क्का परा(डिक) चेनी?

मदनबाण's picture

16 Aug 2010 - 8:11 pm | मदनबाण

चांगली चर्चा चालू आहे... ;)
एव्हढा मोठा बिग बजेट चित्रपट बनवणार्‍यांनी त्या गायकांचा खुप लवकर विचार केला...विचार कसला विचार ? ह्म्म्म.
सध्या जे गाणं गाजतय... मेहेंगाई डायन खाये जात है...या गाण्याच्या मूळ गायकांना १,१०० रुपये दिले, एकुण गायक आहेत ११ म्हणजे प्रत्येकाला १०० रुं प्रत्येकी.
जेव्ह्या या गरीब गायकानी बंड करुन असेच दुसरे टिका करणारे गाणे बनवले...मिडियामधे बोंबाबोंब झाल्यावर या गरीब गायकांना ६ लाख देण्यात आले.
http://movies.rediff.com/report/2010/jul/13/peepli-live-singers-upset.htm

आता दुसर्‍या गाण्यावरुन वाद चालु झाला आहे...

sachhidanand maharaj's picture

16 Aug 2010 - 9:16 pm | sachhidanand maharaj

चित्रपट छान आहे .

मिसळभोक्ता's picture

17 Aug 2010 - 3:01 am | मिसळभोक्ता

चित्रपट पाहिल्याशिवाय लिहू इच्छित नाही. पाहिल्यानंतर विरोध करण्याचे एक शस्त्र (म्हणजे बहिष्कार) ताबडतोब गळून पडलेले असेल. त्यामुळे विरोध करावासा वाटला, तर कसा करावा ? इतरांना पाहू नका म्हणून सांगायला आम्हाला अधिकार नाहीत.

आम्ही लेनचेही पुस्तक वाचले. विद्वत्तापूर्ण आहे. महाराजांविषयी ३५० वर्षांनंतर मराठी जनतेला काय वाटते, ह्याबद्दल मेहनत घेतलेली स्पष्टच दिसते.

राजेश घासकडवी's picture

17 Aug 2010 - 3:25 am | राजेश घासकडवी

मी हा लेख वाचला नाही,वाचणारही नाही.पण ह्या लेखाला विरोध होत आहे हे कळल्यावर ह्यात काहीतरी आक्षेपार्ह असणार हे नक्की.

Here,objection to the article is irrespective of whether the article has objectionable content,stupidity,lack of logic or not.

नगरीनिरंजन's picture

17 Aug 2010 - 2:00 pm | नगरीनिरंजन

खल्लास! विषय संपलेला आहे.

शानबा५१२'s picture

17 Aug 2010 - 11:01 pm | शानबा५१२

Here,objection to the article is irrespective of whether the article has objectionable content,stupidity,lack of logic or not

Now you think that you ANSWERED me,right?

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2010 - 9:36 am | राजेश घासकडवी

Now you think that you ANSWERED me,right?

मी केवळ एक विधान केलं. ते तुम्हाला कसलं उत्तर वाटलं ते कळलं नाही. मुळात प्रश्न काय होता ते सांगाल का? कारण मी आधी लिहिल्याप्रमाणेच लेख वाचलेला नाही. पण तो लोकांनी वाचू नये यासाठी धागा काढावा का विचार करतो आहे.

लाडुरावांचे प्रतिसाद आवडले...