मैत्र जीवाचे

जिप्सी's picture
जिप्सी in जनातलं, मनातलं
5 Aug 2010 - 2:29 pm

लहानपणीच शिवचरित्र वाचून भारावून वगैरे गेलो होतो. त्यानंतरच्या काळात शिकारकथा,जंगलकथा ई. प्रकार वाचून तर जंगल,डोंगर दर्यांची जास्तच ओढ वाटायला लागली. कोल्हापुरात राहत असल्यामूळ पन्हाळा भरपूरदा बघितलेला होता,इतर पण डोंगर चढून उतरून झाले होते. पण यालाच ट्रेक म्हणतात हे माहित नव्हतं.
पुढ पुण्यात आल्यावर 'ट्रेक' या विषयाची थोडीफार माहिती कळायला लागली,आजूबाजूच्या पोरातली काही पोर शनिवार,नारायण,सदाशिव म्हणावं तसं तोरणा,राजगड,सिंहगड म्हणत होती. मग ह्यांच्यात घूस,त्यांच्या बरोबर जा करत ट्रेकिंगची गोडी लागून गेली.
मग हळूहळू कळत गेल कि ट्रेकिंग म्हणजे नुसता टाईमपास नाही,यात गच्च भरलेली सेक घेऊन उन्हातान्हात हिंडण आहे. थंडीचा अंदाज चुकल्यावर कुडकुडून काढलेल्या रात्री आहेत. कधी रस्ता चुकला म्हणून मारलेला संपूर्ण उलटा फेरा आहे.,एकाच वाटेला २-३ फाटे फुटलेले दिसल्यावर कुणीकड जायचं म्हणून मित्रांशी घातलेला वाद आहे,आणि सगळ्यात शेवटी एक आव्हान आहे.
सुरुवातीला प्रश्न पडायचा कि हे सगळ का करायचं? होस्टेलवरचे मित्र सुट्टीदिवशी झोपणे,कपडे धुणे,सिनेमा बघणे अशा लोकमान्य कार्यक्रमात असताना आपणच हे का करतो? मग हळुहळु लक्षात यायला लागल्,कि आता या डोन्गर वाटांची आवड लागायला लागली आहे. मग इतर छंद आपोआपच कमी व्हायला लागले. भोवती ट्रेकप्रेमी लोकांचा ग्रुप जमला. छोटे छोटे 'प्लान' करून ट्रेक व्हायला लागले,आणि ४-५ जणांचा नेहमीचा ग्रुपच तयार होउन गेला. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या जबाबदार्‍या कळून पार पडायला लागल्या.
त्यानंतरची पुढची पायरी म्हणजे डोंगर ओळखता यायला लागले. कोल्हापूर ते पुणे प्रवासात रस्त्यात दिसणारे सगळे किल्ले ओळखता येऊ लागले. एखाद्या किल्ल्यावरून दुसरा ओळखीचा किल्ला दिसल्यावर एखादा मित्र भेटल्याचा आनंद व्हायला लागला. किल्ल्यावर जाताना ईतिहास,भुगोल ई. विषयांचा अभ्यास चालू झाला. ईतिहासाच्या अभ्यासाची मग गोडीच लागून गेली. किल्याचा ईतिहास तिथं पोचायच्या आधीच पाठ होउन जायचा. मग गडावर जाताना किंवा गेल्यावर 'त्या' खुणा 'ती ' ठी़काणं शोधणं चालू झालं.
गडावरची बांधकामं ओळखता यायला लागली. नविन दिसण्यार्‍या गोष्टींबद्दल चर्चा व्हायची आणि पुण्यात आल्यावर जाणकार लोंकांकडून अधिक माहिती मिळायची.
सतत जाउन राजगड्,तोरणा ,राजमाची,कमळगड,जीवधन अशा गडांच्या पायथ्याशी आपली हक्काची घरं,माणसं तयार झाली. हक्कानं त्यांच्या घरच्या कार्यांची आमंत्रणं यायला लागली.
आज मागं वळून बघताना असं वाटतं की , की किती किती दिलं या भटकंतीनं मला ?असंख्य आनंदाचे क्षणं दिले, मारलेल्या हाकेला "ओ" देणारी ,काहीही अपेक्षा न ठेवता घासातला घास काढून देणारी माणंसं दिली,भरपूर फी मोजूनसुद्धा मिळ्णार नाही अशी बरीच शिकवण या सगळ्यातून मिळाली. हीच माझी 'ईस्टेट' आहे ...जीवनभरासाठी !

प्रवासविचार

प्रतिक्रिया

शेखर's picture

5 Aug 2010 - 2:59 pm | शेखर

सुंदर लेखन

मुक्तसुनीत's picture

6 Aug 2010 - 12:17 am | मुक्तसुनीत

लिखाण अतिशय आवडले.

विशेषतः त्यातला शेवटचा भाग. गड-किल्ले फिरताना त्याच्या कुशीत राहाणार्‍या माणसांशी नकळत नाते प्रस्थापित झाले. क्या बात है. या माणसांबद्दल, त्यांच्या राहाणीबद्दल , त्यांच्या सुखदु:खांबद्दल लिहा.

कुतुहल म्हणून विचारतो : "राजमाची" घडली का कधी ? "माचीवरला बुधा" भेटला का ? (मी त्या माणसाचे खरे नाव विसरलो. )

परिकथेतील राजकुमार's picture

5 Aug 2010 - 3:05 pm | परिकथेतील राजकुमार

ट्रेकचे ४/५ फोटु टाकले असते तर अजुन मजा आली असती.

आम्ही पडलो आळशी, तुमच्या सारख्यांनी लेख लिहुन ४/५ फोटु डकवले की आमचेपण मिपामुळे फुकटात ट्रेकींग होउन जाते हो.

विलासराव's picture

5 Aug 2010 - 3:06 pm | विलासराव

मस्तच, तुमची 'ईस्टेट' लई आवडली बघा.
पण एक विनंती आहे.पुढ्च्या ट्रेकला आम्हालाही न्या जमलं तर......

यशोधरा's picture

5 Aug 2010 - 3:09 pm | यशोधरा

लेख आवडला, पण आटपता घेतल्यासारखे शेवटी शेवटी वाटले..

निखिल देशपांडे's picture

5 Aug 2010 - 5:01 pm | निखिल देशपांडे

लेख आवडला, पण आटपता घेतल्यासारखे शेवटी शेवटी वाटले..
+१ सहमत

जिप्सी's picture

5 Aug 2010 - 3:18 pm | जिप्सी

ट्रेकचे ४/५ फोटु टाकले असते तर अजुन मजा आली असती. ----- प.रा. भाऊ आम्ही फूकट चंबू बाबुराव असल्यामुळं हाफिसात मि.पा. मि.पा. खेळ्तो त्यामुळं इथ अ‍ॅक्सेस इल्ले.

लेख आवरता घेतला :- अहो हात दुखायला लागले लिहून लिहून(विलासराव :- मानलं तुम्हाला!). पण परत काहितरी असंच पण मोठ लिहितो.

नाना बेरके's picture

5 Aug 2010 - 6:53 pm | नाना बेरके

गड, किल्ले फिरण्यातली मजा अनुभवली नाही. कुणाचे ट्रेक्सवरचे लेख वाचले कि वाटायचे लोक कश्याला उगाच उन्हातान्हात फिरतात. पण ट्रेक्स करायला हवे होते ह्याची जाणीव आता होते.

संदीप चित्रे's picture

5 Aug 2010 - 7:00 pm | संदीप चित्रे

>> सतत जाउन राजगड्,तोरणा ,राजमाची,कमळगड,जीवधन अशा गडांच्या पायथ्याशी आपली हक्काची घरं,माणसं तयार झाली. हक्कानं त्यांच्या घरच्या कार्यांची आमंत्रणं यायला लागली.
हे तर खूपच आवडलं.

एकंदर भटकंतीचा दांङगा अनुभव असलेले तुम्ही दुसरे 'विमुक्त' दिसताय :)
तुमच्या काही ट्रेक्सचे अनुभव, फोटो वगैरे जरूर द्या इथे.

स्पंदना's picture

5 Aug 2010 - 7:09 pm | स्पंदना

सुन्दर लेख!
भारतातले दिवस आठवले. मला ही नशिबान फिरस्ता नवरा मिळाला, त्यामुळे शुक्रवार रात्र ते रविवार दुपार असे खुप ट्रेक केले. गुहेत राहिलो. मे बी तिथले साप अन वट वाघळ आम्हाला ओळखत असतील. माणस काय जमली नाहित बा तुमच्या सारखी.

जिप्सी's picture

5 Aug 2010 - 7:23 pm | जिप्सी

धन्यवाद अपर्णाताई !

विनोद :-
मळा शिंपता आणि ट्रेकर हिंड्ता बरा !
बसला कि त्याला कुटाणे सूचतात.

शुचि's picture

5 Aug 2010 - 7:30 pm | शुचि

श्रीमंत आहात.

प्रभो's picture

5 Aug 2010 - 7:52 pm | प्रभो

मस्त!!

अर्धवट's picture

5 Aug 2010 - 7:59 pm | अर्धवट

आवडलं लेखन..

पुलेशु

कानडाऊ योगेशु's picture

6 Aug 2010 - 12:05 am | कानडाऊ योगेशु

मानले बुवा तुम्हा ट्रेकर्सना.
मला तर सुट्टीच्या दिवशी पलंगावरुनही खाली उतरायला जाम जीवावर येते.(त्यातुन उठावेच लागले तर जिना चढ-उतर करणे जाम दगदगीचे काम वाटते.)
खरे तर निसर्ग वाचनाची गोडी लागल्यानंतर हे काम नेहेमी नेहेमी करण्याचा जाम उत्साह येत असला पाहीजे.एखाद्या नशेसारखा..
एखाद्या ट्रेकचे फोटोसहीत डिट्टेल वर्णन येऊ द्यात.!

(इथे टारझनभाऊंची नक्कल करण्याचा मोह आवरत नाहीये.)
(टारोबा ट्रेकर.)योगेश

पुष्करिणी's picture

6 Aug 2010 - 12:17 am | पुष्करिणी

छान लेख, पण वर बर्‍याच जणांनी म्हटल्याप्रमाणे पुढचा लेख जरा विस्तृत आणि फोटोंसहित टाकला तर अजून मजा येइल.

चित्रा's picture

6 Aug 2010 - 12:53 am | चित्रा

पण लेख आवडला. स्फुट (का स्वगत?) असल्याप्रमाणे वाटले.

छान - भटकंतीचेही फोटो येऊ द्यात.

सहज's picture

6 Aug 2010 - 8:33 am | सहज

ट्रेकिंग ह्या क्षेत्रात करियरदेखील करता येईल असा विचार छान मांडलात अगदी तसे न लिहताही!

तुमच्या भटकंतीचे सचित्र लेख येउ द्यात आता!

दोन्ही आवडले. भारतात नि त्यापेक्षाही जास्त ट्रेक्स आणि हाइक्स अमेरिकेत केल्याने लेखातील विचारांशी जवळीक साधता आली.
(अनुभवी)बेसनलाडू

जिप्सी's picture

6 Aug 2010 - 11:54 am | जिप्सी

ट्रेकिंग ह्या क्षेत्रात करियरदेखील करता येईल असा विचार छान मांडलात अगदी तसे न लिहताही! -----
सहजराव करियर ट्रेकिंग ह्या क्षेत्रात कराव अस अजून तरी मल वाटलेलं नाहि कधी,कारण छंदाचा धंदा करू नये असं माझ मत आहे. आणि हौस म्हणून मी काही वेळा ट्रेक अ‍ॅरेंज केले पण कार्पोरेटससाठी पण अनुभव विशेष चांगले नाहित. पैसे देतो म्हणून लोक काहिहि अपेक्षा करतात. त्यामुळं हे सगळं करायचंस्वान्त सुखाय

बेसनभौ :- भारतात आणि अमेरिकेत पण ट्रेक्स आणि हाइक्स :- मज्जा आहे राव डबल धमाका !

कानडाऊ योगेशु :- खरे तर निसर्ग वाचनाची गोडी लागल्यानंतर हे काम नेहेमी नेहेमी करण्याचा जाम उत्साह येत असला पाहीजे.एखाद्या नशेसारखा.. :- एक वेळ अनुभव हिच खात्री. बघताय काय सामिल व्हा.

बाकी सर्व :- लौकरच फोटोसकट एक लेख सोडतो.

अवांतर :- ट्रेक्कर लोकांना पोट नावाचा अवयव उगीचच असतो.

अर्चि's picture

6 Aug 2010 - 4:28 pm | अर्चि

लेख अतिशय सुरेख ! आवडला.