धरलं तर चावतय ...

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
5 Aug 2010 - 8:39 am

दोनदा चिरपरिचीत बेल वाजली आणि मी ओळखलं सुलु आली आहे. हसत हसत दरवाजा उघडला. सुलुच होती. पण नेहेमीसारखी हसरी आणि खळकर मूड्मधे नव्हती. आज जरा फुगा होता.
मी विचारलं "काय ग? अशी काय दिसते आहेस?"
"पाणी दे मग सगळं सांगते." - सुलु
मी फ्रीजमधलं थंड पाणी दिलं.
सुलु नी घटाघटा प्याल आणि पहीलं वाक्य बोलली ते हे की " शुचि कधी तुला अनुभव आहे का गं धरलं तर चावतय अन सोडलं तर पळतय चा?"
मी हसायला लागले "अगं झालं तरी काय? परवापर्यंत तर बरी होतीस."
मला हसताना पाहून सुलुचा पारा अधिकच वर गेला पण तशी ती बॅलन्स्ड आहे , ताबा ठेवून म्हणाली - "शुचि असं बघ तुला एखादी व्यक्ती अतिशय आवडते, म्हणजे खूप म्हणजे फार आवडते. अगदी "Head over heels" तू तिच्या प्रेमात पडतेस मग तू काय करशील?"
"इश्श्य्य ! अगदीच डेस्परेट दिसणार नाही अशा रीतीने करता येईल ते करेन" ;) - अस्मादिक
" हो की नाही? मी ही तेच केलं मी अगदी रंगून गेले त्याच्या प्रेमात पण स्वारी कवितेच्या ओळींखेरीज पुढेच जाईना मग शेवटी ४ महीन्यानी हिंट देऊन देऊन देऊन शेवटी सरळ सांगीतलं माझं तुझ्यावर प्रेम आहे." - सुलु
"अय्या मग? मस्तच की." - मी सुलुला लाडवाची बशी देत देत म्हटलं.
"मग काय आता बोंबला! तो निघालाय महाडँबीस. त्यानी त्यावर मला २ नाही ४ कवितांच्या ओळी ऐकवल्या परत प्रेमाचा इजहार केला नाही तो नाहीच." :( इति सुलु
"अगं मग तू त्याला सरळ कन्फ्रंट का नाही करत?" मी विचारलं
"तेच ना शुचि , तू आणि मी भोळ्या आहोत जशा बर्‍याच बायका असतात. हे पुरुष महाडँबीस असतात. सगळे पत्ते यांच्या हातात ठेवतात. आता बघ मी जर त्याला विचारलं आणि तो जर नाही म्हणाला तर सगळं मुसळ केरात. :("
"अगं पण सुलु कशावरनं तो नाही म्हणेल तो सुद्धा तुझा फॅन असेल"
"पण शुचि तेच तर आहे ना त्याला मी विचारलं आणि तो जर हो म्हणाला तरीदेखील काय चार्म राहीला गं? इतका अट्टाहास, आटापीटा करून होकार पदरात पाडायचा त्यात सगळी गोडी निघून जाते."
"ह्म्म! खरय" - मी
"म्हणून म्हणतेय धरलं तर चावतं अन सोडलं तर पळतं असं झालय नुसतं." सुलु बशीतला लाडवाचा तुकडा मोडत मोडत म्हणाली.
_____

आम्हाला तरी या समस्येवर काही तोडगा सुचत नाही आहे तुम्हाला काही माहीत असेल तर सांगा.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

5 Aug 2010 - 9:15 am | अरुण मनोहर

आणि मला वाटत होतं की बायका ता वरून ताकभात ओळखण्यात पटाईत असतात! इथे तर >>शेवटी ४ महीन्यानी हिंट देऊन देऊन देऊन शेवटी सरळ सांगीतलं माझं तुझ्यावर प्रेम आहे.<< नंतर चे (लॅक ऑफ) रिस्पॉंसेस पाहून देखील हिंट घेतली नाही.
कठीण आहे. म्हणजे सिक्थ सेंस नसलेल्या, पुरषांसारख्या माठ बायका देखील असतात तर!

आजानुकर्ण's picture

5 Aug 2010 - 9:17 am | आजानुकर्ण

माठ बायका देखील असतात तर!??

श्री. अरुण मनोहर,
मिपावर आता जपून राहा.

बेसनलाडू's picture

5 Aug 2010 - 10:16 am | बेसनलाडू

अरुण मनोहर आणि कर्ण दोघांशी सहमत.
(सहमत)बेसनलाडू

चतुरंग's picture

5 Aug 2010 - 11:59 pm | चतुरंग

जाताना असे प्रतिसाद अडथळ्याचे ठरु शकतात मनोहरकाका! ;)

(बाब्याकार्टा*)चतुरंग
*कसं मॅग्नाकार्टा वगैरे म्हटल्यासरखं वाट्टं नै! ;)

मुक्तसुनीत's picture

6 Aug 2010 - 12:01 am | मुक्तसुनीत

ठ्ठो !!

हे पुरुष महाडँबीस असतात.
ख्या ख्या ख्या...खी खी खी , उगाच डोक्यात "पिडा" आठवले. ;)
समस्त पुरुष जातीला एकजात डँबीस ठरवल्या बद्धल निषेध !!! ;)

(प्रेमळ डँबीस)... ;)

गौरीदिल्ली's picture

5 Aug 2010 - 9:45 am | गौरीदिल्ली

म्हणतात ते असे ..

नो चान्स!
दुसरा अध्याय उघडणे.

सूर्यपुत्र's picture

5 Aug 2010 - 2:50 pm | सूर्यपुत्र

लक नेक्स्ट टैम....

परिकथेतील राजकुमार's picture

5 Aug 2010 - 2:55 pm | परिकथेतील राजकुमार

अतिशय तरल लेखन.
खरच तुमचे कौतुक वाटते. रोजरोज सातत्याने येवढे छान छान लिहिताना.

तुमचेसुद्धा फार्फार कौतिक... इतके प्रोत्साहन देणारी व्यक्ती गेल्या १०००० वर्षात झाली नाही...
(दहा हजार वर्षे अत्र्यांकडून उधार.)

आता "शेवटी सरळ सांगीतलं माझं तुझ्यावर प्रेम आहे." एवढं सांगूनसुद्धा काहीच response नाही म्हंटल्यावर सोडून द्यायचं... का सगळं स्पष्टच सांगितलं पाहिजे?

परिकथेतील राजकुमार's picture

6 Aug 2010 - 4:25 pm | परिकथेतील राजकुमार

आता "शेवटी सरळ सांगीतलं माझं तुझ्यावर प्रेम आहे." एवढं सांगूनसुद्धा काहीच response नाही म्हंटल्यावर सोडून द्यायचं... का सगळं स्पष्टच सांगितलं पाहिजे?

+१ शमत आहे.

काल ही कथा वाचुन आमचे एक काका विचारत होते की हे सगळे सुलुच्या नवर्‍याला कसे काय चालते ?

शिल्पा ब's picture

6 Aug 2010 - 10:40 pm | शिल्पा ब

<<<काका विचारत होते की हे सगळे सुलुच्या नवर्‍याला कसे काय चालते ?

=)) =)) =)) =))

ज्ञानेश...'s picture

5 Aug 2010 - 11:50 pm | ज्ञानेश...

त्यांना ग्रेसजींची "दारी उभा गे साजण" ही कविता म्हणून दाखवा आणि प्रतिक्रिया बघा !

कविता का जवाब कविता से !! ;)

कवितानागेश's picture

6 Aug 2010 - 4:13 pm | कवितानागेश

तुमच्या सुलुचे भाषाविषय कच्चे राहिलेले दिसतायत..
...... कविता कळत नाहीत का?

विजुभाऊ's picture

6 Aug 2010 - 4:36 pm | विजुभाऊ

सुलुचे भाषाविषय कच्चे राहिलेले दिसतायत..

सख्ख्या प्रियकराने "विषय सर्वथा नावडो" ही ओवी म्हणून दाखवल्यावर आणखी काय होणार ;)