कॉर्पोरेट / कॉलेज पार्ट्या, ग्रामस्थ आणि तारतम्य : ऊत्तरायण -भाग १

सुहास..'s picture
सुहास.. in जनातलं, मनातलं
4 Aug 2010 - 4:23 pm

व्हाट ईज ए फेंडशिप डे !!!

सर्वात महत्वाचे : मला एक सांगा " व्हाट ईज ए फेंडशिप डे ? मुला-मुलांमधली ,मुली-मुलीमधील मैत्री आणी मुला-मुली मधील मैत्री यातला नेमका फरक काय आहे ? बर मग आपण हा विचार करुयात की हा मैत्रीचा दिवस साजरा करण्याची डी-जे,कॉकटेल डिनर, ओपन नेकचा आणी अजुन सेक्सी दिसण्याकरता बॅकलेस,मायक्रो-स्क्रर्टचा ड्रेस-कोड,एखाद गावाबाहेरचं फार्म हाऊस,सिम्बी सारख्या वसती गृहात,ऊद्याचे मॅनेजर्स बनुन,भक्कम पगाराच्या दिशेने वाटचाल करण्यार्‍या मुला-मुलींना कशाला लागतो ब्वा ? दुसरा महत्वाचा भाग असा आहे की ५०० पैंकी ५०० मुल-मुली तिथे निख्खळ मैत्रीच सेलिब्रेशन करण्यासाठीच असे आडबाजुच्या फार्म-हाऊसवर गेले असतील नाही का ?.अमीर खाननी एक पिक्चर काय काढल की आला ह्यांना स्टडी-स्ट्रेस !!! मग स्टडी स्ट्रेस घालवायला, चला,थोडीशी घेऊयात ? काय ऊच्चतम विचार आहेत.कोणे-एके काळी दारुला समाजमान्यता नव्हती. आता ती मुला-मुलींना आवश्यक वाटते आणी त्याला आपल्या पिढीन समर्थन देण ह्यात मला विषेश वाटत नाही,त्याच हेच कारण आहे की आमच्या मागच्या पिढीने संस्कार संभाळले नाहीत.पण आता आजचा तरुण संभाळण्याचा प्रयत्न करतो.तर लगेच " नडगी फोड कार्पोरेटर" म्हणुन ठणाणा करतात.

मला ह्या धाग्याच्या प्रवर्तकाला, डॉन्याला, थोडासा वैयक्तीक का असेना , प्रश्न विचारायचा आहे ..बाबा रे !! दहावीला बोर्डात येण्यासाठी ,स्ट्डी स्ट्रेस झालाच असेल नाही का ? मग तो घालविण्यासाठी अश्या किती पार्ट्या केल्या होत्यास तु ??

थेऊर आणी थेऊर ग्रामस्थ :::

थेऊरचा गणपती अष्टविनायकांपैकी एक,दहा एक वर्षापुर्वी थेऊरला साखर-कारखाना झाला आणी ग्रामस्थांची परिस्थिती थोडीशी का असेना बदलली, तत्पुर्वी जी ग्रामस्थ मंडळी पुर्णता नाही पण अशंता का असेना टुरिस्ट बिझनेसवर चालायची.त्यातलेच अष्टेकर महाराज एक ? पंधरा एक वर्षापुर्वी साधे शेतकरीच होते ते ..पैसा हातात खेळायला लागल्यावर छानसा फार्म-हाऊस वगैरै बाधुन घेतला,त्यांच्याच घरातली ही तरूणाई . तर आता ईथे येणारे टुरिस्ट कोण ? अर्थात श्री च देवस्थान म्हणजे "कपल स्पॉट" नाही. तिथे येण्यार्‍या फॅमीलीज असतात.लक्षात घ्या फॅमिलीज !! अश्या पार्ट्यांच समर्थन करणार्‍यांनी एकदा मिपाच्या कट्ट्यावर,टेबलावर दिसणार्या दारुचे फोटो,त्यांच्या फॅमीलीमधल्या मेंम्बरला दिसतील म्हणुन " कट्टा वृतांत" लिहायला नकार दिला होता.असो..तर विषय हा आहे की तिथे व्हिजीट करणारे मोस्टली फॅमीलीसकट येतात ..आज सिंहगडावर किती जण फॅमीलीसकट न घाबरता जातात?आज किती जण लोणावळ्याला न घाबरता फॅमीलीसकट जातात.थेऊर मध्ये दारु मिळत नाही असे मी म्हणणार नाही. मिळते की !! त्यात किती जण रात्रभर डीजे लावुन नाचतात ?? ऊद्या जर थेऊरचा सिहंगड झाला तर ? पन्हाळ्याचा तर झालाच आहे .(ईन्द्रजदा तिथे म्हणे सन २००४ ला पार्टी ला गेले होते, त्याच सुमारास एक बारबाला सापडली होती ना तिथे मेलेली !! हो आठवल तोच काळ, मला त्या बारबालेशी ईन्द्रजदा संबध जोडायचा नाही ,पण परिस्थिती बघा ,ज्या परिसरात कधी एकेकाळी अस्मितेसाठी मरेपर्यंत खिंड लढवुन पावन केली गेली,त्याच परिसरात अस्मितेची धिंड काढायाला काही लोक्स जातात आणी त्याच समर्थनही करतात. कलयुगात नग्न-सत्य म्हणजे हेच काय ते )मग थेऊरचही सिहंगड,पन्हाळा होऊ नये असा विचार करण्यात ग्रामस्थांच काय चुकल हे मला कोणीतरी मला समजवा बॉस ?

दहा व्होल्वो भरून ऊघड्या-पाघड्या पोरी येतात काय ? त्याच्यां त्या व्होल्व्होमुळे गणपती मंदीरात जाण्याचा रस्ता अडतो काय ? टेम्पो भरुन आणलेली दारु पुरत नाही म्हणुन अजुन दोन रिक्षा भरून थेऊरच्या बार मधुन दारु आणली काय जाते ? रात्री अकरा नंतर डीजे चा कर्णकर्कश आवाज , ग्रामस्थांची घरे ओलांडुन, थेट हाय-वे पर्यंत पोहोचतो काय ? आणी ग्रामस्थांनी तक्रार ही करायची नाही बर का ? का तर कार्पोरेट/स्टुंडटला फ्रेंडशिप डेची ओली पार्टी करायची आहे म्हणुन ? बर ग्रामस्थांनी काही कायदा हातात घेतला नाही. रितसर पोलीसांना कळविले. मग त्यात त्यांचे काय चुकले ??मी तर उलट म्हणेन चांगल झाल ..बर ग्रामस्थांची हाणामारी झाली नाही तिथे...शिवाय कुठल्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता
जेव्हा असल काहीतरी होत तेव्हा पब्लीक पेटलय ते चांगल झालय अस समजायला काय हरकत आहे ? एक प्रकारच जनमत होत नाही का ते ?

पत्रकारिता .....

मला एक कळत नाही दरवेळी पत्रकारांची कशी काय चुक असते !! ..मिडीया आहे..मिडीयाला वाचक आहेत..जसा वाचक-वर्गाची मागणी तशीच मिडीया पुरविणार ना !!..नाहीतर मिडीया कसा खपायचा... रियालिटी शोजला (आणी त्यावरच्या धाग्यालाही) टीआरपी काही ऊगाच मिळत नाही. आता त्यातले सर्वच पत्रकार तसे नसतात, पण जे असतात,त्यांच्यावर,जनरलाईज्ड विधाने करून,थेट बोट ठेवणे हे कितपत योग्य आहे ह्याचा आपण विचार करावा.कोठल्याही वर्तमानपत्रात कुठल्याही मुला-मुलीच नाव आलेलं नाही्.याचा सरळ अर्थ असा होतो की बातमी देण हे महत्वाच होत सर्वांसाठी ..माझ्या माहीतीतली एक पत्रकार बिचारी , पार्टीच्या कारवाईच्या दुसर्‍या दिवशी पहाटे पाच ला तिथे पोचलेली ..रात्री बारा वाजेपर्यंत उपाशी राहीली...हे जर आपण असे म्हणाल की केवळ सनसनाटी निर्माण करायसाठी...तर ते चुकीच नाही का होणार ? ..बघा कशी गल्लत आहे समाजमनाची...एक स्त्री-पत्रकार उपाशीपोटी बातमी कव्हर करते आणी त्याच बातमीतल्या नंग्या-पुंग्या स्त्रिया बियर पित नाचतात...

काय फायदा झाला तिच्या त्या उपाशी रहाण्याचा !! पण पत्रकारांना नेहमीच अशा प्रकारच्या क्रिटीक्सला सामोरे जावे लागते , असो ...पण पत्रकारांना नावे ठेवण्याएवजी जरा परिस्थितीचा विचार करा...बातमी आपल्यापर्यंत कुठल्या खाच-खळग्यांतुन पोहोचते त्याचा.. सर्वप्रथम एखादा कार्यकर्ता किंवा एखादा सोर्स बातमी देतो..क्राईमच्या बातम्यांसाठी बर्‍याच अंशी पोलीसांवर अवलबुंन रहाव लागते ...त्या बातमीला पुरावे जोडावे लागतात ..कुठला क्राईम-अ‍ॅक्ट खाली हा गुन्हा घडला आहे त्याचा अभ्यास लागतो....असो ..प्रोसेस सांगत बसलो तर अजुन एक डायरी लिहावी लागेल ..त्यात पुण्यात कोठे-कोठे आणी किती पार्ट्या होतात माहीत आहे मला...कसल्या-कसल्या होतात...त्याच्या बातम्या आपल्यापर्यत पोचत देखील नाही. कारण माहीत आहे ..ती म्हणजे तिथली राजकारण्यांशी संबधित असणारी काही ग्रामस्थ काही अंशी का व्हायना त्यात सामील असतात, पार्टीत नाही, पार्टीत मिळणार्‍या ऊत्पनात आणी कधी कधी पार्टीतही..स्वताची लाल करायची म्हणुन नाही पण थर्टी -फर्स्ट नाईट नंतर लोहगाव परिसरात मी हे प्रकार (जेन्युअन आहेत की नाहीत ह्याची तमा न बाळगता) बंद केले आहेत ...(वाघोलीला एकदा पार्टी झाली होती,पण ते आपल्या अखत्यारीत नाही.) तर साम्गायचा मुद्दा ईतकाच जर त्या तिथला ग्रामस्थ पेटला तर बर्‍याच अंशी सत्य माहीत व्हायला आपल्याला मदत होईल ..अन्यथा ...दुसरा मार्ग नाही...मी हे नाही म्हणत की पोलीस त्या सामील नसतात ..काही अंशी हे सत्य देखील असु शकत...सगळेच नाही... बॉस त्यांनाही त्याबद्दल माहीती असायला हवी ना !! राऊंडच्या गाडीला सगळेच्या सगळे फार्म हाऊस चेक करणे शक्य आहे का ? का त्यासाठीपण आर्मी बोलवायची...राज्यात पोलीसांची कुमक आणी स्थिती ह्याचा अभ्यास करा एकदा ....

क्रमश !!

समाजप्रतिसाद

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

4 Aug 2010 - 4:54 pm | घाशीराम कोतवाल १.२

सही है भिडु लगे रहो शब्दशः सहमत

ज्या परिसरात कधी एकेकाळी अस्मितेसाठी मरेपर्यंत खिंड लढवुन पावन केली गेली,त्याच परिसरात अस्मितेची धिंड काढायाला काही लोक्स जातात आणी त्याच समर्थनही करतात. कलयुगात नग्न-सत्य म्हणजे हेच काय ते

हे वाक्य खरच विचार करायला लावणारे आहे

अमरेन्द्र कुलकर्नी's picture

4 Aug 2010 - 5:01 pm | अमरेन्द्र कुलकर्नी

साहेब, पन्हाळ्यावर जाल चुकुन दारु घेउन, पन्हाळयावर दारु बन्दी आहे.
नाहितर नाहि सांगितले म्हणाल आणि नंतर, "कोल्हापुर का मग बरोबर आहे", म्हणाल.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

4 Aug 2010 - 5:20 pm | घाशीराम कोतवाल १.२

कधी पासुन झाली दारु बंदी पन्हाळ्यावर?
इंद्रराज पवार म्हणतात तो पर्यंत म्हणजेच २००४ पर्यंत तर तिथे दारुबंदी नव्हती ना....

गणपा's picture

4 Aug 2010 - 5:03 pm | गणपा

सुहाश्या मुद्देसुद बाजु मांडली आहेस.
अभिनंदन.

वा सुहास राव
अतिशय चांगला मुद्दा १०० टक्के मान्य
स्वातंत्र्या बरोबर जबाबदारी येते हे हे आमच्या महान लोकशाहीतील फारच कमी जणांना माहिती असते !!!

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Aug 2010 - 5:16 pm | llपुण्याचे पेशवेll

सुहाशा तुझ्या सर्व मुद्द्यांशी सहमत आहेच.
थेऊरच्या ग्रामस्थांना त्यांच्या गावाचं पावित्र जपावसं वाटलं तर ते योग्यच आहे. प्रत्यक्ष सापडलेल्या मुलांमधेही परप्रांतीय अधिक होते हे सत्य आहे मग ते छापलं तर इतर वेळेला मिडीयाच्या विश्वासार्हतेच्या नावनं बोंबा मारणार्‍याना का झोंबावं. असो.

मराठमोळा's picture

4 Aug 2010 - 5:41 pm | मराठमोळा

ग्रामस्थांची आणी मिडीयाची बाजु मुद्देसुदपणे मांडली आहे आणी विचार करण्याजोगीही.
या लेखाशी कुणी असहमत होईल असे वाटत नाही, काही अपवाद सोडुन. ;)

या गोष्टी मिडीयामधे येणं गरजेचं आहेच कारण तिथे असलेल्या मुला-मुलींना आणी भविष्यात असे करु पाहणार्‍यांना शिकवण यातुन मिळेल. थेऊर सारख्या ठिकाणी हे प्रकार करण्यापेक्षा शहरी भागात एखादं लॉन किंवा मोठा क्लब बुक केला असता तरी चाललं असतं. मुंबईमधे/लोणावळ्यात चार भिंतीच्या आत चालणारे प्रकार असंख्य आहेत (पुण्यातलं माहीत नाही), साऊंड प्रुफ सिस्टीमसहीत. कुणालाही त्रास न देता पाहिजे तसा धिंगाणा घाला म्हणावं. ;)

ग्रामस्थांचे अश्यासाठी की सगळीकडे बेबंदशाही माजत असताना, अगदी बुद्धीवंत सुद्धा कायद्याचे अधिराज्य ही संकल्पना अन त्यामधली आपली स्वतःची भूमिका विसरत असताना, त्यांनी कायद्याचे स्वतः पालन तर केलेच पण कायदेभंग करणार्‍यांना कायद्याच्याच माध्यमातुन धडा शिकवला. सहा-सात तास आख्खे गांव वेठीस धरुन, गावाच्या प्रतिमेस तडा जाईल असे वर्तन करुन, धार्मिक पर्यटकांच्या जीवावर जगणार्‍या ग्रामस्थांच्या पोटावर लाथ मारणार्‍या अन वर आम्ही काय गुन्हेगार आहोत का असा मग्रुर प्रश्न विचारणार्‍यांना स्वतः कायदा हातात घेऊन धडा नाही शिकवला.

पोलिसांचे अश्यासाठी की कारवाई करताना त्यांनी तरतम भाव बाळगला. वस्तुतः या सगळ्या मुला-मुलींवर अत्यंत कडक कलमांखाली गुन्हे दाखल करुन त्यांना जामीन मिळवणेही अशक्य करता आले असते. गुन्हेगाराप्रमाणे त्यांना तालुक्याच्या गावी आधी दवाखान्यात, त्यानंतर लॉकअपमधे, त्यानंतर कोर्टात अन शेवटी तुरुंगात पाठवु शकले असते पोलिस. त्या मुली तश्याही बर्‍याचशा उघड्या होत्याच, त्यांची `तश्या' अवस्थेतली दृष्ये माध्यमांकडे पोहोचवुन प्रसिद्ध पण करवु शकले असते. नावांची यादी देखील पुरवु शकले असते माध्यमांना. पण त्यांनी तसे नाही केले. लोक चुकतात पण त्यांना सुधारण्याची संधी मिळावी हे भारताच्या कायद्याचे मुलभूत तत्व पोलिसांनी पाळले. एका चुकीकरता त्या मुला-मुलींवर आयुष्यभरासाठी शिक्का नाही मारुन ठेवला.

मीडीयाचे अभिनंदन नाही केले तरी चालेल. केलेच कुणी तरी अनाठाई ठरणार नाही कारण मीडीयाने पण हे प्रकरण जबाबदारीने हाताळले. मीडीयाकडे असलेली काही दृष्ये जर सार्वजनिक झाली असती तर केवळ त्याकरता आंबट्शौकिनांच्या उड्या पडल्या असत्या माध्यमांवर. बक्कळ धंदा झाला असता. त्या मुला मुलींना अन त्यांच्या आईबापांना शरमेने जगणे कदाचित अवघड झाले असते. पण मीडीयाने नाही केले तसे. अगदी नावं पण नाही छापली त्यांची. उगीच छोट्याश्या चुकीकरता आयुष्ये बरबाद नाही होऊ दिली. मीडीयाच्या काही घटकांनी पार्टीला उपस्थित लोकांमधे मुलींचे आणि परप्रांतियांचे प्रमाण, त्यांनी घातलेले कपडे (पार्टीला ड्रेस कोड होता. खरं तर तसा तो डोणज्याच्या रेव्ह पार्टीला देखील नव्हता. पण डोणज्यात लोक जमले होते ते संगीत आणि ड्रग्ज साठी तर इथं लोक जमले होते ते दारु आणि सेक्स साठी.) असे संदर्भ जाता जाता दिले. परंतु शेवटी मीडीयाची धाटणी, भाषा, शैली आणि विचारसरणी शेवटी तो ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठीच असते. अश्या प्रकारचा फरक शेवटी मिसळपाव अन मिसळपावच्या जिवावर चालणार्‍या ब्लॉग्जमधेही दिसतोच ना?
पण हे झाले सकारात्मक चित्र. अर्ध्या भरलेल्या ग्लासाचा विचार. अर्धा रिकामा ग्लास, चित्रातल्या काळ्या रंगाचे काय?
या विधानाला संदर्भ आहे तो या प्रकारानंतर लगेचच हे सगळे झाल्यावर बुद्धीवंतांचा, विषेशतः उत्तर भारतीय राज्यातल्या अनेक बड्या धेंडांचा अन काही स्वातंत्र्यवादी (की स्वैराचारवादी) अनिवासींचा वेगळाच तमाशा वेगवेगळ्या माध्यमांमार्फत त्यातल्या कुणालाच नक्की काय झाले हे समजुन घेण्यात रस नव्हता. रस होता तो फक्त त्या चुकलेल्या मुला-मुलींची पाठराखण करण्यात. मग ती निष्पाप, निर्दोष अमराठी मुले कशी कारस्थानी मराठी लोकांच्या कटाला बळी पडली अशी बोंबाबोंब मारायला काही बुद्धीवंत सरसावले. ग्रामस्थ, पोलिसांवर देखील आरोप सुरु झाले. त्यांची आळिमिळी गुपचिळी फक्त त्या मुलांनी बरेच कायदे मोडले, एक आख्खे गाव सहा तास वेठीस धरले त्यासंदर्भात.
माझ्या मते बुद्धीवंतांचा समाजातला सर्वात मोठा रोल म्हणजे त्यांनी कायद्याचे अधिराज्य या संकल्पनेचाच सतत पुरस्कार केला पाहिले. अंमलात असलेल्या सर्व कायद्यांचे पालन झालेच पाहिजे असा आग्रह धरला पाहिजे. जर एखादा कायदा कालबाह्य, जुलुमी असेल तर तो घटनात्मक मार्गाने बदलुन घेण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. परंतु अश्या वेळेस हे बुद्धीवंत ते करत तर नाहीतच पण उलट कायदा मोडणार्‍या गुन्हेगारांना पाठीशी घालण्यास धावुन येतात. अगदीच ते अशक्य असेल तर मौन पाळले जाते. बुद्धीवाद्यांनी समाजाचे नेतृत्व करणे अपेक्षित असते परंतु त्यांची स्वतःची समाजाबाबतची समज अनेकदा खूपच कमी असते. शेवटी बुद्धीवंत समाजासाठी असतात, समाज त्यांच्यासाठी नसतो.
खुद्द थेऊरमधे दोन्-तीन बार आहेत. तेथे वेश्याव्यवसाय होत नाही हा भाग अलाहिदा.पण तेथे झालेली अश्या प्रकारची ही पहिलीच पार्टी. पुण्याच्या परिसरात अन्यत्र अश्या पार्ट्या नेहमी होतात. अगदी शहरात फ्लॅट शेअर करुन रहाणारे काही तरुण अश्या पार्ट्या करतात. अश्या पार्ट्यांचा गेल्या वीस वर्षांच्या इतिहासाचा मी साक्षीदार आहे. लोकांनी मजा करणे, पैसे खर्चणे याबाबत कुणालाच आक्षेप असु नये. परंतु कायद्याचे उल्लंघन होत असेल तर?
अश्या पार्ट्यांमधील बेकायदेशीर गोष्टींना माझा सातत्याने सक्रिय विरोध होता, अजुनही आहे आणि रहाणार आहे. १९९५ मधे पोलिसांनी राज्यभर पब्-डिस्कोथेंवर केलेल्या सार्वत्रिक कारवाईला मी विरोध केला होता परंतु कायद्याचे उघड उघड उल्लंघन करणार्‍या अश्या गुन्हेगारी स्वरुपाच्या पार्ट्या बंद व्हायलाच हव्यात हा माझा आग्रह आहे.
पुण्यामधे दहा वर्षे अश्या पार्ट्यांना माझ्या व माझ्या काही सहकार्‍यांच्या जीवतोड प्रयत्नांमुळे आळा बसला याचा मला सार्थ अभिमान आहे. खंत आहे ती पुण्यातले हे प्रकार आम्ही बंद केले तेव्हा अश्या `धंदेवाईक' पार्ट्या महाराष्ट्रात अन्यत्र ग्रामीण भागात सुरु झाल्या याची. अन त्याहुनही खंत आहे ती बुद्धीवंतांमधे येत असलेल्या बुद्धीमांद्याची!

अवलिया's picture

4 Aug 2010 - 6:00 pm | अवलिया

भलत्या अपेक्षा तुमच्या बुद्धीवाद्यांकडुन.. ते फक्त काय चुकले हे सांगणार. कृतीची वेळ आली की फरार.

अवलिया's picture

4 Aug 2010 - 5:58 pm | अवलिया

तथाकथित विचारवंतांच्या, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा कैवार घेवुन ढोल बजावणा-या उच्चभ्रुंचे विचार यावर वाचायला आवडतील. पण ते काय लिहिणार म्हणा.. बसले असतील कुठल्यातरी फार्मवर टुण्ण होउन.

बाकी सुहासच्या मागच्या ३१ डिसेंबरचा धाग्यावर अनेक असले कैवारी शेपुट घालुन गप्प बसले होते ते स्मरले

स्वप्निल..'s picture

4 Aug 2010 - 6:16 pm | स्वप्निल..

सुहास, एकदम मस्त! सहमत आहे!!

बाकी, पुनेरींचा प्रतिसाद पण मस्त!

कोदरकर's picture

4 Aug 2010 - 6:16 pm | कोदरकर

नेमक्या कालच्या रविवारीच एकवीरा आई ला जाण्याचा योग आम्हा तीन मित्रांच्या कुटुंबाला आला..
तिथे तर इतके किळसवाणे वातावरण होते...उघड्यावर दारू.. फक्त चड्ड्या घालुन नाच... रास्ता रोको...जोरात संगीत.. बेशर्म पणाचा कळस....

इन्द्र्राज पवार's picture

4 Aug 2010 - 6:29 pm | इन्द्र्राज पवार

श्री.सुहासराव यांच्या या लेखातील काही व्यक्तिगत वाक्यांमुळे आणि काही प्रमाणात श्री.पुनेरी यांच्या प्रतिसादातील प्रक्षोभित भाषेमुळे काही सदस्यांची वा पाहुणे या नात्याने मिपावर येणार्‍या वाचकांची (कदाचित) अशी समजूत होण्याची शक्यता आहे की कोल्हापूरचे 'इन्द्रराज पवार' अशा प्रकारच्या पार्ट्यांचे समर्थक आहेत. नाही, बंधुनो, कृपया असा विचार चुकूनदेखील मनात आणु नका. मी "दारुबाजीच्या धिंगाण्याचे" कधीही समर्थन केलेले नाही. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी वर्ग जिमखाना आणि एक्स्ट्रा-क्युरिक्युलर अ‍ॅक्टिव्हीटीजमध्ये भाग घेत असतात, त्यातील "सहल" हा एक प्रकार (जो इथल्या प्रत्येक सदस्याने अनुभविला असणार); अशा सहलीचे आयोजन माझ्याकडे असायचे आणि मी ते पाळत असताना कायद्याचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेत होतो. (पन्हाळ्यावर "बाईने बाटली आडवी केली" ही घटना खरी पण ती अलिकडील. आता तिथे बाहेर उघड्यावर मद्यप्राशनाला बंदी आहे. २००४ मध्ये शंभरातील जे कुणी २०-३० बीअर घेणारे माझ्या सहलीत होते त्यांनी विद्यार्थिनीपासून दूर जाऊन घेतली पाहिजे अशी माझी कडक सूचना होती, जी त्यानी पुरेपूर पाळली, आणि उघड्यावर पार्टी असल्याने पोलिसांची अर्थातच परवानगी घेतली होती. त्यावेळी हा प्रघात होता व पोलिस फक्त "दंगा करू नका रे" असा दम देऊन परवानगी देतही असत.)

थेऊर घटना व त्या बहुरंगा-बहुढंगी श्रीमंत बापांच्या पोरापोरींचे ढंग संतापजनक आहेत हे मान्यच आहे; पण मी "त्या" धाग्यात वारंवार हे सांगत होतो की, यातून अखेरीस काही निष्पन्न होत नाही व पोलिस हात धुवून घेतात (आजचा "सकाळ" ~ ऑनलाईन वाचा, अन पहा पोलिसांचा पराक्रम. हे मी श्री.पुनेरी यांना व्य.नि.ने कळविले तर तेही सुन्न झाले. असो.)

"सिम्बॉयॉसिस" देखील चौकशीचे नाटक एक दिवस करणार आणि "विद्यार्थ्यांचा भवितव्याचा विचार" करून त्यांना "ताकीद" देणार. मोठमोठ्या शैक्षणिक संस्थातून हे सर्रास चालते, त्याला कारण त्यांच्या बापांनी डोनेशन्सच्या नावाखाली मॅनेजमेंटला बोटाखाली ठेवणे.

राहता राहिली "ग्रामस्थां"ची भूमिका. तर या मुद्यावर मी इतकेच म्हणेन की, थेऊरच काय पण आता "फार्म हाऊस" बांधून घेऊन अशा प्रकारे शहरातून येणार्‍या अमिर खान आणि प्रिती झिंटा जमातीच्या प्रोफेशनल कॉलेजच्या मुलामुलीना (मी मुद्दाम 'प्रोफेशनल' म्हणतोय.... पदवी महाविद्यालयात अजुनतरी हे खूळ पसरलेले नाही) भरपूर मोबदला घेऊन ते पार्टीसाठी द्यायचे ही प्रवृती ग्रामीण भागात सुरू झाली आहे. शेतकर्‍यांना आणि ग्रामस्थांना एक जोड धंदा म्हणून ही बाब स्वीकारण्यायोग्य वाटत आहे. त्यामुळे तसे पाहिले तर खरी जबाबदारी आहे ती या फार्म हाऊसच्या मालकांची. थेऊरचे जे कोणी महाराज आहेत त्यांनी ४०० मुलांच्या "धिंगाण्या"स आपला फार्म हाऊस पुरा पडेल का याची काळजी घेतलेली दिसत नाही, त्यामुळे खरे तर पोलिसांनी त्यांच्यावरदेखील कठोर कार्यवाही करणे गरजेचे आहे, ज्यामुळे अशा मालकांनादेखील जरब बसेल.

असो. हा विषय "सदस्य-कटुते' कडे जाऊ नये हीच इच्छा.

(श्री.सुहास यांनी "क्रमश:" असे म्हटले आहे... खरं तर "त्या" धाग्याने १०० गाठल्यानंतर हा विषय तिथेच संपुष्टात यायला हवा होता. पण हा धागा...परत पुढील...! एकाच विषयासाठी किती धागे काढायचे यावर आता संपादक मंडळानेच विचार करावा कारण अशा गंभीर विषयाला विनोदी वळण लागू नये असे वाटते.)

इन्द्रराज

प्रत्येकजण प्रत्येक धाग्यावर, प्रतिसादावर आपापली मते मांडतो. कधी ती जुळतात तर कधी नाही. कधी कुणी वेगळे मत समजुन घेण्याचा प्रयत्नच करत नाही. ते सगळे त्या धाग्यापुरते किंवा त्या प्रतिसादापुरते. माझी भाषा तुम्हाला प्रक्षोभित वाटली तसे वाटण्याचे स्वातंत्र्य नक्कीच तुम्हाला आहे. माझ्या मते माझा प्रतिसाद मुद्देसुद आहे. आपले मत मुद्देसुद रित्या, जबाबदारीने माहिती घेऊन, लिखाण व त्याच्या परिणामांची सर्व जबाबदारी स्वतः घेऊन ठामपणे म्हणण्याला काही लोक प्रक्षोभित भाषा म्हणतात हे नव्यानेच कळले.

थेऊर घटना व त्या बहुरंगा-बहुढंगी श्रीमंत बापांच्या पोरापोरींचे ढंग संतापजनक आहेत हे मान्यच आहे; पण मी "त्या" धाग्यात वारंवार हे सांगत होतो की, यातून अखेरीस काही निष्पन्न होत नाही व पोलिस हात धुवून घेतात (आजचा "सकाळ" ~ ऑनलाईन वाचा, अन पहा पोलिसांचा पराक्रम. हे मी श्री.पुनेरी यांना व्य.नि.ने कळविले तर तेही सुन्न झाले. असो.)

सुन्न वगैरे झालेलो नव्हतो, अजुनही झालेलो नाही. खरेतर व्यनिमनिच्या गोष्टी उघड करु नयेत असे माझे मत आहे परंतु इथे तुम्ही स्वतःचा मुद्दा रेटत संदर्भ दिलाच आहे म्हणुन आपल्या व्यनिसंभाषणाचा भाग येथे देतो. सर्वच स्पष्ट असु द्यावे हे उत्तम.

तुम्ही लिहिलेतः
या धाग्याच्या पहिल्याच दिवशी, सुरुवातीला मी लिहिले होते की, अशा धाडीतून "पोलिस हात धुवून घेतात". त्यावर तुम्ही अन काही अन्य सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. पण आजच्या सकाळमधील ही बातमी काय दर्शविते?

लोणी काळभोर - थेऊर (ता. हवेली) येथील फार्म हाऊसमध्ये "फ्रेशर्स पार्टी'च्या नावाखाली सुरू असलेला धांगडधिंगा लोणी काळभोर पोलिसांनी रविवारी थांबविला खरा, पण पोलिसांनाही मान खाली घालायला लावणारी बाब या छाप्याच्या वेळी घडली. दोन पोलिसांनी तीन महागडे मोबाईल दूरध्वनी संच आणि उंची मद्याच्या बाटल्या चोरल्याची चर्चा दबक्‍या आवाजात सुरू आहे.

याबाबत एका कर्मचाऱ्याने वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा देताच दोन मोबाईल संच परत दिल्याचे सांगण्यात आले. एक मोबाईल दूरध्वनी अद्याप "चोर' पोलिसांकडेच आहे.

याबाबत बोलताना पोलिस निरीक्षक सुहास गरुड म्हणाले, 'चोरीची चर्चा माझ्या कानावर आली आहे. ही बाब वरिष्ठांना समजेल म्हणून त्यांनी संच परत दिल्याचेही कळाले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे मोबाईल संच गेले असतील त्यांनी थेट तक्रार दाखल करावी म्हणजे दोषी पोलिसांवर कारवाई करणे सोपे होईल. याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होताच संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होईल.''

ही तर उघडकीला आलेली एक बाब. (मेडिकल टेस्ट ज्या ठिकाणी घेतल्या गेल्या तिथला रिपोर्ट कधीतरी येईल व तोदेखील वरच्या आरशासारखाच असणार.) आपण पत्रकारिता क्षेत्रात आहात त्यामुळे अशारितीच्या "पोलिस कारवाई"ची कल्पना असेलच. मी स्वतः कित्येक प्रसंगी डोळ्यांनी या चीड येण्यार्‍या गोष्टी पाहिल्या आहेत.

असो.
इन्द्र

त्यावर मी उत्तर दिले:
असे झाले असेल तर ते नक्कीच निंदनीय आहे. संबंधित पोलिसांवर अर्थातच चौकशीअंती कडक कारवाई (उदा. सेवेतुन काढुन टाकणे, गुन्हा दाखल करुन व शाबीत करुन तुरुंगात धाडणे) व्हायलाच हवी. पण त्याने मुला-मुलींनी केले ते समर्थनिय ठरत नाही किंवा ग्रामस्थ-पोलिस सर्वथा दोषी ठरत नाहीत.
असे प्रकार किरकोळ वाटावेत असे बरेच काही घडत असते अश्या पार्ट्यांमधे - पुण्यात, मुंबईत, महाड, पेण, पनवेल, अलिबाग, अन अगदी कोल्हापुरच्या पन्हाळा-आंबोलीला देखील.

तुम्ही लिहिले त्यामधे सुन्न व्हावे असे काही आहे असे मला वाटत नाही तसेच मी दिलेल्या उत्तरात देखील कोठेही सुन्नपणा दिसत नाही.
ग्रामस्थांच्या भुमिकेबद्दल तर मी माझ्या प्रतिसादात लिहिले आहेच.
माझा प्रतिसाद तुम्ही नीट वाचलेला दिसत नाही अन्यथा मी "दारुबाजीच्या धिंगाण्याचे" कधीही समर्थन केलेले नाही असा निर्वाळा देण्याची गरजच पडली नसती. मी सर्व माध्यमांमार्फत सुरु झालेल्या बुद्धिवंतांच्या तमाशाबद्दल लिहिले होते अन त्यांचे आक्षेप देखील स्पष्ट लिहिले होते.
असो!
चालायचेच!

इन्द्र्राज पवार's picture

4 Aug 2010 - 7:03 pm | इन्द्र्राज पवार

"खरेतर व्यनिमनिच्या गोष्टी उघड करु नयेत असे माझे मत आहे..."

होय, हे मलाही मान्य आहे. पण इथे श्री.सुहासरावांना प्रतिसाद देताना लिखाणाच्या वा भावनेच्या भरात त्या संकेताचे माझ्याकडून उल्लंघन झाले. असो, अर्थात त्या व्य.नि.त व्यक्तीगत काही नव्हते, होता तो त्या बातमीचा मजकूर.

तरीही क्षमस्व ! ("प्रक्षोभक" असा शब्द वापरल्याबद्दलही.... संपादित करता येत असेल तर काढून टाकतो)

इन्द्र

चिरोटा's picture

4 Aug 2010 - 6:38 pm | चिरोटा

ग्रामस्थांना त्रास झाला असेल तर कारवाई योग्यच आहे. अशीच तत्परता पोलिस बड्या धेंडांच्या(राजकारणी पुत्र/बॉलिवूड हिरो) बाबतीतही दाखवतील अशी यापुढे आशा बाळगुया.

त्यामुळे तसे पाहिले तर खरी जबाबदारी आहे ती या फार्म हाऊसच्या मालकांची

अगदी बरोबर्.प्रथम फार्म हाऊसच्या मालकाला धरला पाहिजे.पण फार्म हाऊसचा मालक पुण्यातला कोणीतरी मोठा जवाहिर्‍यांचा व्यापारी असल्याचे वाचले. पण तो 'मोठा माणूस' असल्याने त्याचे बातमीत नाव दिसत नाही आहे. कुठल्या बातमीत असल्यास इथे दुवा द्यावा.
--

प्रसन्न केसकर's picture

4 Aug 2010 - 7:01 pm | प्रसन्न केसकर

बड्या धेंडांचीच पोरेबाळे (पोरीबाळी) होती. एकजण गुजरातमधील विरोधी पक्षनेत्याचा नातेवाईक होता. ज्या ठिकाणी ती मुले-मुली शिकतात ती एकदा पहा मग आपोआप लक्षात येईल तिथे कोण असेल ते.

प्रथम फार्म हाऊसच्या मालकाला धरला पाहिजे.
फार्म हाऊसच्या मालकांना धरले होतेच. फक्त त्यांचीच नावे आलीत बातम्यांमधे, इतर कोणाचीच नाहीत. एकुण सात जणांना पार्टी आयोजित केल्याबद्दल धरले त्यात हे दोघे होते.

चिरोटा's picture

4 Aug 2010 - 7:04 pm | चिरोटा

धन्यवाद. मग आपला कारवाईला पाठिंबा आहे.

भाऊ पाटील's picture

4 Aug 2010 - 7:17 pm | भाऊ पाटील

सुहास ह्यांनी नाण्याची दुसरी बाजू अतिशय संयतरित्या मांड्ली आहे.

भारी समर्थ's picture

4 Aug 2010 - 8:13 pm | भारी समर्थ

१) बदलत्या संस्कृतीप्रमाणे संपूर्ण समाजाने किंवा काही समाज घटकांनी काय स्विकारावे आणि काय स्विकारू नये याला काही नियम नाहीयेत. शेवटी ही लोकशाही अशीच आहे. त्यामुळे कोणीही कोणत्याही कारणास्तव मौज-मजा करावी आणि त्याबद्दल कुणाचीच आडकाठी असण्याचे काही कारण नाही (त्याच्या कारणाबद्दल). पण अशावेळी कायद्याचं पालन होतय याची दक्षता सर्वांनीच घ्यायला हवी.

२) जर अशा मौजमजेचा (किंवा तत्सम धिंगाण्याचा) त्रास झाल्यामूळे ग्रामस्थांनी तक्रार केल्याबद्दल त्यांचे कौतुक आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईबद्दल त्यांचे आभार!

३) कोणी कितीही प्यावी, पण वर उल्लेखल्याप्रमाणे पिणार्‍याने एका गोष्टीचे भान बाळगावे की दुसर्‍याला झेपेल एवढीच मौजमजा (धिंगाणा) करावी.

४) "मिडीया आहे..मिडीयाला वाचक आहेत..जसा वाचक-वर्गाची मागणी तशीच मिडीया पुरविणार ना !!..नाहीतर मिडीया कसा खपायचा"

वाक्य कोणत्याही परिस्थीतीत अमान्य. जे आहे ते दाखवा, कोणाला काय हवय ते नाही. अशाच मानसिकतेमुळे कोडगेपणा वाढतो हो. बाकी, पत्रकारांबद्दल अतिव आदरयुक्त भिती काही दाढीवाल्यांमूळे आहेच.
(भावना दुखावल्या असल्यास क्षमस्व! पण आमच्याही भावना समजून घ्या.)

रितसर परवानगी घेऊन, कायद्याची बंधने पाळून आणि आपला गोंधळ आपल्यापुरताच ठेवून जर 'मैत्री दिवस' साजरा केला असता तर बरे झाले असते.

असो, या ठेचेतून मागचे शहाणे झाले तर या सर्व ऊहापोहाचा काहीतरी फायदा! नाहीतरी, आपल्याकडे 'ये रे माझ्या मागल्या'चीच जास्त उदाहरणे आहेत.

भारी समर्थ

छान चर्चा...
१)महाराष्ट्रात धान्यापासुन दारु बनवली जाणार आहे !!! तर मग अशा नवतरुणांनी दारु पिण्याऐवजी कोणते पेय प्यावे ? ;)हा कसला दुट्टपीपणा ? ;) म्हणजे इथे राज्यात दारुचा महापुर येतोय त्याला गिर्‍हाईक नको ? ;) तरुण रक्तांनी राज्याचा महसुल वाढवण्यास सहकार्यच केल आहे असं तुम्हाला नाही वाटत का ? ;)
२) मुलांना पकडले पण मुलींना सोडुन देण्यात आले... का ? कायदा सर्वांना समान असतो ना ? ;) (स्त्री-मुक्ती वाल्यांचे काय विचार असतील यावर ? ;) )
३)परप्रांतियांची मुले जास्त असली म्हणुन काय झाले...पैसे देउन दारु आणली होती...आता दारु विकणार्‍यांनी त्यांच्याकडे परवाना आहे का असे विचारले होते काय ? विचारले नसेल तर दारुचा इतका स्टॉक कसा जमवता आला ? ;)
४) इतक्या पार्ट्या होतात पुण्यात मग त्यांच्यावर भविष्यात धाड टाकली जाईल का ? ;)
५) पार्टी करणे म्हनजे दारु पिणे किंवा दारु शिवाय पार्टी होउच शकत नाही काय ? ;)

*मिडीयाने ज्या पद्धतीने मुलांचे चित्रण केले ते मला योग्य वाटले नाही;कारण काही झाल तरी हे विद्यार्थी आहेत...चुकले असतील पण त्यांचे चेहेरे असे टिव्हीवर दाखवणे मला योग्य वाटले नाही,विशेषतः मुलींचे ...हे कोणी नामचीन गुंड अथवा बारबाला नाहीत !!! तेव्हा मिडीयाने बातम्या देताना तारतम्य बाळगायला हवे.

पंगा's picture

4 Aug 2010 - 11:59 pm | पंगा

महाराष्ट्रात धान्यापासुन दारु बनवली जाणार आहे !!!

धान्यापासून दारू बनवणारे परप्रांतीय असणार आहेत काय?

नसल्यास, आपल्या आक्षेपाचे कारण कळत नाही.

इथे सरकार दारु बनवण्यासाठी धान्याचा वापर देखील करण्यास मागे पुढे पाहत नाहीत; त्या राज्यात विद्यार्थ्यांनी दारु प्यायली तर विशेष काय असे मला दर्शवायचे होते.

मिसळभोक्ता's picture

5 Aug 2010 - 1:06 am | मिसळभोक्ता

अर्थात श्री च देवस्थान म्हणजे "कपल स्पॉट" नाही.

असं कसं म्हणता ? आम्ही लग्न झाल्यावर जोडीनेच दर्शनाला गेलो होतो. म्हणजे तो झाला की नाही कपल स्पॉट ?

राजेश घासकडवी's picture

5 Aug 2010 - 6:25 am | राजेश घासकडवी

कोणाला माहीत आहे का? १८ च्या वर, २१ च्या वर? तसं असेल तर मग सज्ञान लोक काही गमती करण्यासाठी गेले आणि बहुधा त्यांनी कायद्याविरुद्ध काही तरी केलं असावं. परमिट नसताना दारू पिणं, गोंगाट करणं वगैरे वगैरे. म्हणून पोलिस कारवाई चालू आहे.

श्रीमंत पोरांनी दारू पिऊन गोंधळ करण्यापेक्षा कितीतरी वाईट गोष्टी आपल्या देशात चालतात. मग यात देश बुडला, संस्कृती बुडली वगैरे म्हणण्यासारखं काय आहे काही कळत नाही. एवढ्या चुल्लूभर पाण्यात अस्मिता बुडेल इतका छोटा तिचा जीव आहे का? एवढी तावातावाने चर्चा व्हावी, विचारवंतांना आव्हान द्यावं असं मला तरी काही दिसत नाही.

असो, मी काही विचारवंत नाही. तुम्ही आणि ते बघून घ्या.

आमोद शिंदे's picture

5 Aug 2010 - 9:29 am | आमोद शिंदे

<<कोणे-एके काळी दारुला समाजमान्यता नव्हती. आता ती मुला-मुलींना आवश्यक वाटते आणी त्याला आपल्या पिढीन समर्थन देण ह्यात मला विषेश वाटत नाही,त्याच हेच कारण आहे की आमच्या मागच्या पिढीने संस्कार संभाळले नाहीत.पण आता आजचा तरुण संभाळण्याचा प्रयत्न करतो.तर लगेच " नडगी फोड कार्पोरेटर" म्हणुन ठणाणा करतात.>>

अरे बापरे! मध्यंतरी ते मिपाच्या कट्ट्याचे (संपादकांसकट) काही सदस्य दारुच्या बाटल्यांच्या खचात लोळणारे फोटो काढले गेले ते तुमच्याच आदेशावरुन काय?

इंटरनेटस्नेही's picture

17 Aug 2010 - 5:04 pm | इंटरनेटस्नेही

मझ्या बलोबल प्यार्टी करनार कं?

मझ्या बलोबल प्यार्टी करनार कं? >>>

=))=))=))
अगगगगग !!

कसला घाण पंच मारलाय !!

तुमच्याकडं फ्यॅर्म हौस स अहे क ?

मझ्या बलोबल प्यार्टी करनार कं? >>>

=))=))=))
अगगगगग !!

कसला घाण पंच मारलाय !!

तुमच्याकडं फ्यॅर्म हौस स अहे क ?

इंटरनेटस्नेही's picture

17 Aug 2010 - 5:37 pm | इंटरनेटस्नेही

आमच्याकले की नैइ १ बी एच के आहे! आपन मझी पलिक्सा जाल्यावल भेतु हा...