प्रश्न

सौरभ परांजपे's picture
सौरभ परांजपे in जे न देखे रवी...
2 Aug 2010 - 5:38 pm

जीवंतपणी जीवाला का जाळतात प्रश्न?
तिरडीवर ही मेले छळतात प्रश्न

दिवसभर उत्तरे शोधून थकलो मी
थडग्यात देखील साले डसतात प्रश्न

चितेवर सुटकेचा निश्वास घेतला मी
प्रेत जळले तरी राहतात प्रश्न

माझ्या चितेची सोय मीच केली
घट्ट नात्याची वीण उसवतात प्रश्न

पतनाचा माझ्या ’आगाज’ मीच केला
बरेचवेळा माणसाला घडवतात प्रश्न

मी न केला कधी कोणास प्रश्न
उगाच केविलवाणे करतात प्रश्न

निरंतन संघर्षाचा ’यल्गार’ मीच केला
जन्मभर पुरुन परत उरतात प्रश्न

आर्थिक, कौंटुंबिक, राजकिय, सामाजिक प्रश्न
सामान्य माणसाला फक्त नाडतात प्रश्न

एक-एक करुन सोडवायला सारे घेतले
भूमितिय पद्धतिने अचानक वाढतात प्रश्न

करुणगझल

प्रतिक्रिया

अजय जोशी's picture

2 Aug 2010 - 8:33 pm | अजय जोशी

सौरभ,
गझलेच्या उपलब्ध तंत्रात प्रत्येक ओळीतील मात्रा समान असाव्यात असे मानले जाते. बाकी नियम पाळले तरी. इथे मात्रांत गडबड दिसते आहे. जरा तपासून पहा.
प्रयत्न चांगलाच आहे.
शुभेच्छा!