साहित्यः २ वाट्या तान्दुळ
१ कच्चि कैरि किसुन
१/२ नारळ किसुन
४ चम्चे मोहोरि
मिट आणि साख्रर चाविनुसार
फोड्णि करिता जीरे,मोहोरि,हिन्ग प्रतेकि १ चमचा,गोड लिम्ब आणि तेल १/४ वाटि
भात मोकळा शिजौन घ्यावा,४ चम्चे मोह्ररि थोडे पाणि घालुन वाटुन घ्यावि,भात थोडा गार झाल्यावर
त्यात मोहोरि,मिथ्,साख्रर्,नारळ्,कैरि घालुन नीट काल्वुन घ्यवे वरुन फोड्णि घालावि.
टिपः १ तास भर आधि करुन मग खावा,जास्त चान्गला लागतो
१लाच प्रयत्न आहे गोड मानुन घ्या
प्रतिक्रिया
2 Aug 2010 - 2:51 pm | खादाड
प्रयत्नांती परमेश्वर हो !
वाट्लेली मोहोरी फोडणित घालायची का ?
2 Aug 2010 - 3:34 pm | रश्मि दाते
नाहि हो भाताला वाट्लेलि मोहोरि लावुन नारळ आणि कैरि सोबत मग वरुन फोडणि टाकायचि
2 Aug 2010 - 2:53 pm | अवलिया
मस्त !! फटु पण टाकला असता तर खाण्यालायक आहे की नाही हे समजले असते.
2 Aug 2010 - 3:26 pm | रश्मि दाते
आहो नविन आहोत आम्हि मिसळ पाव वर फटु कसे टाकायचे माहिति नाहि ,सागितले तर बरे
3 Aug 2010 - 5:16 am | आमोद शिंदे
फटू हवाच!!!
2 Aug 2010 - 4:11 pm | शरयुप्रितम२०१०
पाकृ आवडली....
छान आहे...
2 Aug 2010 - 4:29 pm | रश्मि दाते
:) धन्यवाद शरयु.......
2 Aug 2010 - 4:22 pm | परिकथेतील राजकुमार
रावणभात गोड कसा मानून घ्यायचा ? ;)
बाकी रावणभातात कैरी पहिल्यांदाच ऐकली / वाचली !
2 Aug 2010 - 4:27 pm | रश्मि दाते
अरे मि प्रयत्न गोड मानुन घ्या म्हणाले होते.कैरि घलुन करुन पहा आणि मग कळ्वा मला
2 Aug 2010 - 4:27 pm | रश्मि दाते
अरे मि प्रयत्न गोड मानुन घ्या म्हणाले होते.कैरि घलुन करुन पहा आणि मग कळ्वा मला
2 Aug 2010 - 4:32 pm | परिकथेतील राजकुमार
मी येवढे कष्ट घेण्यापेक्षा तुम्हीच पुढच्यावेळी रावणभात केलात की मला पार्सल करा अथवा आमंत्रण द्या. मी येईन फुकटचा गिळायला.
2 Aug 2010 - 4:35 pm | मेघवेडा
हो आणि मग तो गोडही लागेल आपोआप! ;)
बादवे मीही येणार हो. :)
3 Aug 2010 - 2:50 am | रश्मि दाते
नक्कि या,पण तुम्हि राहता तिथुन नागपुरला येण्याचा खच किति पड्तो ते पहा आधि
2 Aug 2010 - 4:58 pm | पुष्करिणी
वा, सोपा आहे की रावणी भात करायला. पण कैर्यांचा सिझन संपल्यामुळे लगेच नाही करता येणार.
या भाताला 'रावणी' असं विशेषण का आहे रश्मीतै?
3 Aug 2010 - 2:58 am | रश्मि दाते
माहित नहि बुवा,पण हेच नाव चालत आले आहे,माझि आई आजि कडुन शिकलि आणि मि तिच्या कडुन.कैरि नसल्यास लिम्बाचा रस हि वापरुन करता येइल.
2 Aug 2010 - 9:36 pm | आशिष सुर्वे
व्हय..
मला बी ह्येच इचारायचं व्हतं!
>>या भाताला 'रावणी' असं विशेषण का आहे रश्मीतै?>>