तम्मनाकिंत प्रिती - १/३

सुहास..'s picture
सुहास.. in जनातलं, मनातलं
28 Jul 2010 - 7:57 pm

" आप ईतनी शराब क्यों पिते हो ? "........

तमन्नाच्या ह्या प्रश्नाने अंकितला जरा भानावर आल्यासारखा झाल.रमची क्वार्टर पोटात गेल्यानंतर, सिगरेटचा पहिला झुरका घेतला की दारूच्या धुंदीला एक जोरदार किक बसते आणी त्या रमचा कैफ पोटातुन उलट्या दिशेने थेट मेंदुत शिरतो.हा प्रश्न तिच्या दिशेने नेमका त्या उलट्या दिशेचा प्रवाह सुरु असताना आला.
गेली दोन वर्षे हे त्याच पिणं दररोजच होत.अंकितची दुपारी १२ ते रात्री १० ची शिफ्ट संपली की गाडी हिंजवडीच्या आयटी पार्कातल्या सिटीएस कंपनीच्या पार्कींग मधुन, थेट, वाकड रोडच्या "राजरानी " बारच्या पार्कींग लॉटला पार्क व्हायची.नेहमीचा वेटर,नेहमीच टेबल आणी समोर नेहमीची थम्प्स-अप आणी भरपुर आईस क्युब्स मध्ये बुडालेली रम.दारु पिताना तो कधीच सिगरेट पित नसे पण एकदा क्वार्टर संपली की वेटरच्या हातावर वीस रुपये ठेऊन,बिलाची रक्कम जमा करुन अंकित चाचाच्या टपरीवर जायचा.टपरीवर कधी चाचा तर कधी तमन्ना असायची.गप एक लाईट्स आणी एक पान बांधुन घ्यायचा आणी घरी सटकायचा.गेली दोन वर्षे,सोमवार ते शुक्रवार हा त्याचा दिनक्रम असाच चालायचा.पण त्या दिवसांत असा प्रश्न त्याला कोणीही विचारला नव्हता.घरी आईने सुध्दा !!आणी तमन्ना कडुन,जिने त्याच्या कडे कधी ढुंकनसुध्दा पाहिले नाही, तिच्याकडुन तर असा प्रश्न अजिबात अपेक्षित नव्हता.झटका ओसरल्यावर अंकित विचारात पडला..

" खरच !! आपण ईतकी दारु का पितो? " सोमवार ते शुक्रवार एक क्वार्टर आणी शनीवारी/रवीवारी तर आपला ड्रम झालेला असतो.कोणी म्हणेला का मी कधी एकेकाळी शनीवारचा उपास करायचो. तेव्हा तर आपण दारुला स्पर्शही करत नव्हतो,मग अस कशानी झाल ? आणी झटकन त्याला स्वताच्याच डोळ्यासमोर अडीज-एक वर्षापुर्वीचा 'अंकित' ऊभा राहीला.

बंगळुरातल्या एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत जॉईन झाल्यावर, त्याच्या स्वताच्या व्यक्तीमत्वाला एक प्रकारची "स्टेबेलिटी " प्राप्त झाली होती.वडिलांच्या मृत्यूनंतर आईने कष्ट घेऊन त्याला शिकवलं.दहावी-बारावी,बी.ई. आणी एम.एस. करता-करता वयाची पस्तीशी कधी आली ते त्याला स्वतालाही जाणवल नाही.सुरवातीच्या काळात आयटी क्षेत्रातला फ्रेशरला होणार्‍या त्रासाचा त्याला दांडगा अनुभव आला होता.कोणे एकेकाळी सहा आकडी पगार असण्याच त्याच स्वप्न सत्यात ऊतरलं होत.आणी त्या स्वप्नाला सत्यात ऊतरवताना तिची,त्याच्या पहिल्या-वहिल्या प्रेमाची ,प्रितीची साथ लाभली होती.अंधार्‍या काळ्याकुट्ट राती,खडबडया रस्त्यातुन चालण्याची केविलवाणी कसरत करताना,अचानक एखादा प्रकाशझोत यावा व आपल्याला दिशा सापडावी अशीच साथ प्रितीने त्याला दिली होती.प्रिती जर त्याच्या बरोबर नसती तर आपण ईथवर आलो असतो का ? असा प्रश्न त्याला अजुनही पडत असे.

प्रिती !! गारव्यातल्या पहाटे साखरझोपेत पडलेले सुंदर स्वप्न,दोन-चार दिवस पावसाची रिपरिप चालु असावी,, सगळीकडे चिक-चिक झालेली असवी,आणी अचानक कोवळ्या ऊन्हाशी स्पर्धा करणार उन पडाव,ते उन जस त्या वेळेला हवहवस वाटत तशी त्याला ती हवीहवीशी वाटायची, ती जाईची कळी,जगातल्या कवींनी,स्त्री सौंदर्याला दिलेल्या सर्व उपमा तिच्यापुढे फिक्या पडाव्या ईतपत प्रिती मोहक होती. पण त्याही पेक्षा मोहक होता तिचा आगळावेगळा स्वभाव!! कोणालाही आकृष्ट करेल असा खेळकरपणा आणी प्रगल्भता याच सुरेख मिश्रण तिच्या स्वभावात होतं.आणी त्या स्वभावामुळेच या दोघांचे एक-दोनदा "फिजीकल रिलेशन" होऊन सुध्दा अकिंतचा तिच्याबद्दल असणारा आदर,तिच्याबद्दल असणार्‍या प्रेमात तसुभरही फरक पडला नव्हता.पण तिच्या ह्याच स्वभावात एक खोटही होती.तिला यु.एस.चं,तिथल्या लाईफ-स्टाईलच सुप्त आकर्षण होतं आणी त्याच आकर्षणापायी,एक दिवस त्याची आणी तिची ताटातुट झाली.

पहिली ताटातुट होती ती केवळ तीन महिन्यांची.प्रितीला नवीन प्रोजेक्टकरिता यु.एस.ला जायला मिळण हे अंकितसाठी आनंददायी होत खरे पण थोडस काळजीच पण होत. त्याच तीन महिन्यात तिच्या आम्रगुल फरक पडला होता.त्याची अंकितला जाणीव होत असतानाही तिला दुखवण्याचा प्रश्नच नव्हता.आतापर्यंत सगळ काही ती म्हणेल तसच सर्व काही होते.तीन महिन्यांनी ती परत आली तेव्हा विमानतळावरच 'बिसलरी'ची बाटली विकत घेण्यापासुनच अंकितला,आपल्या आयुष्यात येणार्‍या वादळाची कल्पना आली होती.दोन महिने तो त्या वादळाची वाट पहात होता.तिला पुन्यांदा स्वताकडे ओढण्याच्या प्रयत्नात बराच खर्च झाला. कधी टेडी बेअर, कधी कार्डस,कधी बार्बी गर्लचा सेट,कधी ब्रिगेड रोडचे पब्स,तर कधी ला मेरिडियन ला डिनर.एक दिवस,तिच्या चेहर्‍यावर पसरलेला आनंद पाहुन त्याला वाटल की सगळ काही सुरळीत झाल असाव.म्हणुन........

" आपण लग्न करुयात का ?"
" अंकित, मला तुझ्याशी बोलायच आहे."
"मग बोल ना "
" नाही ,ईथे नाही सांगु शकत,तु आज ११ च्या सुमारास एयरपोर्टला ये."
"एयरपोर्टला?"
त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करित,ती पटदिशी ऊठली आणी रेस्टारंट मधुन निघुन गेली.

अंकितला झटका बसला, ११ च्या सुमारास एयरपोर्ट ?? तस बघायल गेल तर ओअ‍ॅसिस,टि.जी.पुरापासुन एच.ए.एल. विमानतळ काही लांब नव्हत.प्रायव्हेट आटो करुन जरी गेला १५ मिनीटापेक्षा जास्त वेळ लागणार नव्हता.पण ईतक्या रात्री विमानतळावर का भेटायच?

गढलेल्या विचारात तो रुमवर परत आला.सातवाजेपासुन ते साडेदहापर्यंत त्याची मनस्थिती कायम होती.आपण आधी तिला लग्नाचं विचारल होतं.पण..............

क्रमश...........

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

28 Jul 2010 - 8:29 pm | Dhananjay Borgaonkar

वाचतोय...

वाचतोय रे.
उत्सुकता ताणली आहे.. पुढे काय झाल?

वेताळ's picture

28 Jul 2010 - 10:09 pm | वेताळ

आता कुठे रंगात येत होतो तेव्हढ्यात क्रमशः

दिपाली पाटिल's picture

28 Jul 2010 - 10:13 pm | दिपाली पाटिल

पुढे??

रेवती's picture

28 Jul 2010 - 11:23 pm | रेवती

पुढे काय?
लवकर लिहा.

अवांतरः ही कथा सत्य आहे की काल्पनिक????

आता थोडा सविस्तर भाग टाका आनी योग्य वेळी थांबा यावेळी अचानक संपल्यासारखी वाट्ली...

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Jul 2010 - 11:32 am | llपुण्याचे पेशवेll

ओह. हे आहेत तर सीटीएस वाले. ;)

१) ३/१ ?
तुम्हला तीनपैकी पहिला भाग म्हणायचे असल्यास १-३, भाग १ असे काहीतरी म्हणा.

२) कोणालाही आकृष्ट करेल असा खेळकरपणा आणी प्रगल्भता याच सुरेख मिश्रण तिच्या स्वभावात होतं.आणी त्या स्वभावामुळेच या दोघांचे एक-दोनदा "फिजीकल रिलेशन" होऊन सुध्दा अकिंतचा तिच्याबद्दल असणारा आदर,तिच्याबद्दल असणार्‍या प्रेमात तसुभरही फरक पडला नव्हता
फरक पडायला पाहिजे का ? सर्वसाधारणपणे पडतो का ?

३) पण तिच्या ह्याच स्वभावात एक खोटही होती.तिला यु.एस.चं,तिथल्या लाईफ-स्टाईलच सुप्त आकर्षण होतं
तिला एखादे व्यसन आणि/ किंवा इतर दुर्गूण असते तर त्याला खोट म्हणत आली असती. परदेशाचे आकर्षण ही खोट नव्हे.

मेघवेडा's picture

29 Jul 2010 - 7:49 pm | मेघवेडा

आम खाओ! मजे मे रहो.. गुठलियोंके दाम जानके क्या करोगे?

मस्त रे सुहास.. पुढे?

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jul 2010 - 11:25 am | बिपिन कार्यकर्ते

आम खाओ! मजे मे रहो.. गुठलियोंके दाम जानके क्या करोगे?

मेव्या, प्रत्येकाची चवढव वेगळी रे. कोणाला आंब्यात तर कोणाला नुसती कोय चोखण्यातच मजा. असो. सगळ्यांनी ह. घ्या.

प्रसन्न केसकर's picture

29 Jul 2010 - 2:18 pm | प्रसन्न केसकर

एकदम उत्सुकता जागृत वगैरे केलीये. लवकर पुढचा भाग दे रे भाऊ!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jul 2010 - 2:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुढे?

श्रावण मोडक's picture

29 Jul 2010 - 3:28 pm | श्रावण मोडक

लिही लवकर.

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Jul 2010 - 3:33 pm | बिपिन कार्यकर्ते

पुढे?

सूहास परत लिहायला लागला हे उत्तम झाले.

प्रभो's picture

29 Jul 2010 - 7:12 pm | प्रभो

पुढे??

स्पंदना's picture

30 Jul 2010 - 7:40 am | स्पंदना

वरील सार्‍यांची 'री' ओढत 'पुढे?'

घाशीराम कोतवाल १.२'s picture

9 Aug 2010 - 4:37 pm | घाशीराम कोतवाल १.२

बर मग पुढे ?

स्वगत घाश्या आता ह्या कथे ला पण ती चे वळण लागणार काय ?

सविता's picture

1 Nov 2010 - 1:40 pm | सविता

पुढे?

मराठमोळा's picture

1 Nov 2010 - 3:24 pm | मराठमोळा

ह्म्म्म्म्म,
पुढे ती मुलगी कायमची उसाला जाते याला सोडुन अन याचा देवदास होतो. :P
लवकर येऊ दे रे पुढचा भाग.

रश्मि दाते's picture

1 Nov 2010 - 11:30 pm | रश्मि दाते

वाट पाहात आहे