स्वातंत्र्य सुर्या आता तरी प्रसन्न हो

राजे साहेब's picture
राजे साहेब in जनातलं, मनातलं
24 Jul 2010 - 5:50 pm

*नमस्कार ..** ** *

* *
* .....जरूर करा.....हीच काळाची गरज आहे.........*
* *
लक्ष द्या हिंदूंनो,
*( **हिंदू** - "सिंधु नदीच्या सभोवताली वसलेले..."हिंदू"......यात धर्म भेद
नाहीच नाही". ) *

गुढीपाडवा म्हणजेच छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी.

पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद'
मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना
- काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्‍या राजाच्या मस्तकाचीच गुढी -
भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू.

बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती.
एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले
होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे
चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ
उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती.
दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये
सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे
'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात
बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी
निशाणे चितारलेली होती.
अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे
वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत
होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते, कर्णे थरारत
होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा, महाराजांचा व जीजाआऊचा
शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.

पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर
त्याला "हिंदू राजास" हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले
काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द
सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी
होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची
लकेरही उमटली नाही.. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही
डोळे काढण्यात आले.

बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय
उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची
मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख
रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली.
एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या
तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही जीव्हा अशीच छाटली गेली.
पहाणार्‍यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने आवघी छावणी गर्जत होती.

कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्‍या अत्याचारांची
रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले
होते. स्वाभीमानाने तळपत झळकणार्‍या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने
शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात
अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे.

दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्‍याने
समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर
चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता.
"दीन दीन" "अल्लाहो अकबर" च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी
सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता
मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे
पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक
करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले.
व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे 'हलाल' करीत शिर चिरत धडावेगळे केले !!!

स्वातंत्र्य सुर्या आता तरी प्रसन्न हो. हिंदु धर्माच्या रक्षणार्थ एक तेजस्वी
राजा आज स्वातंत्र्य देवतेच्या वेदीवर आपली आहूती देत आहे. आता तरी प्रसन्न
हो......!!!

(संदर्भ:- संभाजी कादंबरीतून)

शंभूराजे आम्हाला माफ करा. ज्या धर्माच्या रक्षणार्थ तुम्ही स्वतःचे प्राण
वेचलेत त्याच धर्मातील अभागे आम्ही, तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास जात नाही.
तिथे तुमचे स्मरण करून साधी दोन फुलही वाहात नाही.

पण, मात्र त्या हलकट, नराधम "औरंगजेबाची" कबर आम्ही ईंमाने-इतबार जतन करतोय.
त्याच्या कबरेला कुण्या "हिंदू-द्रष्ट्यांने" कलंकित करू नये म्हणून खासे
आसणारे आमचे "पोलिस बळ" आम्ही तैनात करतो.

ज्या "स्वातंत्र्यवीर सावरकरांनी" या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण केले,
त्यांचेच तैलचित्र आज आमच्याच सरकारी-कारभारी कचेर्‍यात लावण्यास मज्जाव होतो.

ज्या "हिंदूह्रुद्यसम्राट शिवाजी राजांनी" या औरंगजेबाचा अटकेपार बिमोड केला.
आज त्याच "शिवाजी राजांच्या" पराक्रमाची गाथा ईतिहासाच्या पुस्तकात आक्षेपहार्य
वाटू लागली आहे आमच्या शिक्षण श्रेष्ठींना.

इतकेच काय, भारतात संसदेवर हल्ला होतो, मुंबईत अमानुष बॉम्बस्फोट घडतात, अगदी
आमने-सामने चकमकी होतात. यात आमचे लाख-मोलाचे खंदे वीर आम्ही
गमावले....सर्वांचे पुरावे-आरावे मिळाले....लोकांनी आँखो-देखी कबुली दिली.

अफझल गुरूला फाशीची शिक्षा होऊन वर्षे उलटली, पण तो आजही साजूक तुपातली
बिर्यानी अगदी मख्खन मारके......पाची बोट चाटीत पुन्हा कारवायांची नांदी
खेळतोयच....

कसाब जिवंत पकडला, त्याला अनेकांनी आँखो-देखे पाहिले. पत्रकारांनी
बातम्यांमध्ये, दूरदर्शनवर तमाम जनतेस त्याचे काळेकृत्य दाखवले...आम्ही मिटक्या
मारीत पाहिलेही ...तरी सूद्धा आम्ही कोर्टात दावेच चालवतोय......,

आणि फार-फार तर काय आमच्या काही सच्च्या, निर्भिड, उज्वल वकिलांमार्फत फाशीची
शिक्षा झालीच तर हा सुद्धा आमच्या "हिजडया- राजकर्त्यांच्या" कुशीत बसून त्या
आदम अफझल गुरू सोबत बिर्यानीची लज्जत घेणार.....

आणि फाशीच्या शिक्षेनंतरही आमचीच जनता आमच्याच कायद्याला ताठ मानेन आव्हान
करतात.

"फाशीची शिक्षा देणार्‍या न्यायाधीशांचे खून पडतील"
- फारूक अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर.

"भगवान बुद्ध, महावीर आणि महात्मा गांधींसारख्या शांति दुताच्या देशात फाशीची
शिक्षा असावी यापेक्षा दुर्भाग्य ते कोणते.......?
त्याना फाशी ऐवजी, हवी तर जन्मठेप द्या....." ........हवी
तर......?.......म्हणजे नक्की काय.......?
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस, तारिक आन्वर.

यांसारखे अनेक धर्ममिंधे आज आमच्याच घरचे वासे मोजतायत्....आपल्याच
मातृभुमीच्या कलेजाची लक्तर तोडतायत्....
.

समाजलेख

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

24 Jul 2010 - 6:24 pm | शानबा५१२

परत 'तसा' स्फोट जास्त दुर नाही.
मालेगाव्,राजस्थान येथे कालपरवा झालेल्या घटना म्हणुन दाबण्यात आल्या.

___________________________________________________
ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!

परिकथेतील राजकुमार's picture

24 Jul 2010 - 6:28 pm | परिकथेतील राजकुमार

दाबलेल्य घटना जाणुन घ्यायला आवडतील. (येथे देणे प्रशस्त वाटत नसल्यास कृपया व्यनी कराव्यात)

मिपाकरहृदयसम्राट
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अवलिया's picture

24 Jul 2010 - 6:33 pm | अवलिया

हेच म्हणतो.

(पाध्येहृदयसम्राट )अवलिया

शानबा५१२'s picture

24 Jul 2010 - 6:34 pm | शानबा५१२

http://timesofindia.indiatimes.com/india/Tension-grips-Malegaon-as-six-c...

ह्या बातमीत राजस्थानचा उल्लेख नाही पण एका पेपरमधे वाचल होत.
हे मुद्दाम सुरवात करण्यासाठी होत हे नक्की.

___________________________________________________
ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!

परिकथेतील राजकुमार's picture

24 Jul 2010 - 6:45 pm | परिकथेतील राजकुमार

कदाचीत हा प्रतिसाद अवांतर ठरु शकेल, पण माझे इंग्रजी थोडे (खरेतर पुर्ण) कच्चे असल्याने तुम्ही मला एखादा मराठी दुवा देऊ शकाल का ? अथवा तुम्हाला शक्य असल्यास-त्रास होणार नसल्यास-तुमच्याकडे वेळ असल्यास ह्याचे मराठीत भाषांतर करुन देउ शकाल काय ? आपला उपकृत होईन.

मिपाकरहृदयसम्राट
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

शानबा५१२'s picture

24 Jul 2010 - 6:55 pm | शानबा५१२
परिकथेतील राजकुमार's picture

24 Jul 2010 - 7:01 pm | परिकथेतील राजकुमार

मराठी दुव्यांबद्दल धन्यवाद श्री. शानबाजी. आपल्या सारख्या मदतोत्सुक लोकांमुळे आजुबाजुच्या जगात काय घडत आहे हे कळण्यास मदत मिळते.

च्यायला तरी मी इंग्रजी बातमी वाचुन विचार करत होतो की ६ कावळे मेलेले सापडल्यामुळे दंगल घडायचे कारणच काय ? साला काउ-चिउ मुळे गोंधळ उडाला होता.

मिपाहृदयसम्राट
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

शानबा५१२'s picture

24 Jul 2010 - 6:56 pm | शानबा५१२

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%...
__________________________________________________
ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!

Manoj Katwe's picture

24 Jul 2010 - 7:01 pm | Manoj Katwe

आम्ही मित्र-मित्र गेलो होतो तुळापुरला, तेव्हा सुद्धा ऐकले होते ह्यातले बरेचसे.
रक्त खरतर उसळून येत, पण काय करणार ?
खूप त्रास होतो.

"हिजडया- राजकर्त्यांच्या" ह्या शब्दांतच सगळं आल

बाकी आता बघा गांधीवाद्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडेल.

क्लिंटन's picture

27 Jul 2010 - 8:16 am | क्लिंटन

बाकी आता बघा गांधीवाद्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडेल

मी स्वत: गांधीवादी अजिबात नाही. गांधीवादाच्या मर्यादा मला पूर्णपणे माहित आहेत. एखादा कसाब जर बेछूट गोळीबार करत असेल तर तिथे गांधीवादाचा अजिबात उपयोग होणार नाही. आणि असा गांधीवाद अनाठायी कुठेतरी घुसडला तर ते योग्य नाही असे माझे मत आहे. मागे २६/११ नंतर गांधीवादाने दहशतवादाचे निर्मूलन कसे करता येईल या मिसळपाववरील लेखमालेवर माझ्या ’तळपायाची आग मस्तकात गेली होती’. शिवाजी आणि संभाजी महाराजांचे कर्तृत्वापुढे हिमालयही फिका पडेल हे वेगळे सांगायची गरज नाही. तरीही या चर्चेत गांधीवाद घुसडायचे कारण काय समजले नाही.

गांधीवादाच्या मर्यादा पूर्णपणे मान्य करूनही वैयक्तिक आयुष्यात (दहशतवाद्यांविरूध्द नव्हे) ती तत्वे अत्यंत उच्च दर्जाची आहेत हे कसे अमान्य करता येईल?कोणाही ऐतिहासिक व्यक्तीचा/तत्वांचा वस्तुनिष्ठ अभ्यास करून त्याचे मूल्यमापन करण्यापेक्षा आंधळी भक्ती किंवा आंधळा द्वेष करण्यातच आपण धन्यता मानतो ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.

गांधींजींच्या आवडत्या वैष्णव जनतो भजनात खऱ्या वैष्णवाची लक्षणे सांगितली आहेत. ती पुढीलप्रमाणे---

" इतरांचे दु:ख आपले दु:ख मानणे, इतरांना पाहिजे तेव्हा मदत करायला सदैव तयार असणे, खोटा अहंकार न बाळगणे, इतरांना मानाने वागवणे आणि कोणाचीही उणीदुणी न काढणे, विचार, वाणी आणि कृत्यांनी शुध्द आचरण ठेवणे, सर्वांना समदृष्टीने वागविणे, वासनांचा त्याग करून परस्त्रीला मातेसमान वागविणे, कधीही असत्य न बोलणे, दुसऱ्याच्या पैशावर डोळा न ठेवणे, Renunciation मध्ये स्वत:चे मन गुंतविणे, सदैव रामनाम जपणे आणि षड्रिपूंचा त्याग करणे"

गांधीजी वैष्णवाच्या या व्याख्येच्या आपण कोणीही आहोत त्यापेक्षा कितीतरी जास्त जवळ होते हे कोण अमान्य करू शकेल?आणि ही तत्वे वैयक्तिक आयुष्यात अत्यंत उच्च दर्जाची आहेत हे तरी नाकारता येईल का? तेव्हा गांधीवाद ज्या क्षेत्रात प्रभावी आहे त्याला तिथेच राहू दे आणि त्याला इतरत्र घुसडू नये.

क्लिंटन

स्पंदना's picture

24 Jul 2010 - 9:46 pm | स्पंदना

X( X(
प्रचंड संताप होतो, तळतळाट होतो.
प्रतापगडाखालील रयत लुटणार्‍या, धर्म बाटवणार्‍या त्या नराधमाच्या कबरीवर ज्या हल्ली चादरी चढवल्या जातात त्यान तर आग आग होते. प्रुथ्विराज चौहान्च स्मारक जस त्याच्या गडावर न बांधता खाली बांधल तस होणार आहे प्रताप गडाच अशी भिती वाटते.
राजे पाणी गळल डोळ्यातुन आज, जस 'छावा' वाचताना गळल होत.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

जो शिवाजीराजा, संपूर्ण जगात जिथे जिथे परकीय जुलमी शासनांविरुद्ध लढे दिले गेलेत/जातील तिथे तिथे आदर्श म्हणुन गौरविला जावा, त्याच शिवाजीच्या नावावर, त्याच्याच महाराष्ट्रात अत्यंत क्षूद्र पातळीवर जातीपातींमधे भेदभाव उत्पन्न करुन हीन राजकारण केले जाते, तीथे स्वातंत्र्यसूर्य का म्हणुन प्रसन्न व्हावा? आत्मपरीक्षण करुन बघितल्यास आज आपण खरच शिवप्रभू स्थापीत स्वराज्याचे वारस म्हणवुन घेण्याच्या लायकीचे आहोत का?

(नालायक) अर्धवटराव
-रेडि टु थिंक

शानबा५१२'s picture

25 Jul 2010 - 12:24 am | शानबा५१२

अत्यंत क्षूद्र पातळीवर जातीपातींमधे भेदभाव उत्पन्न करुन हीन राजकारण केले जाते,

इथे पण चालत हे.
च्यायला सुशिक्षित हे असले असतील तर नको असले सुशिक्षित महाराष्ट्राला, भरा त्यांना तुरुगांत!!!

आत्मपरीक्षण करुन बघितल्यास आज आपण खरच शिवप्रभू स्थापीत स्वराज्याचे वारस म्हणवुन घेण्याच्या लायकीचे आहोत का?

एकदम बरोबर सर.

- ५०% लायक

_________________________________________________
ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!

शिल्पा ब's picture

25 Jul 2010 - 1:31 am | शिल्पा ब

प्रतिक्रिया दिली असती पण कोण्या एका समाजाच्या भावना आणि काय काय दुखते म्हणून आमच्या या विषयावरच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध होत नाहीत...कुठेच

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

अप्पा जोगळेकर's picture

25 Jul 2010 - 1:48 pm | अप्पा जोगळेकर

आहे रे आणि नाही रे गटातली दरी अधिकाधिक वाढवणे आणि धार्मिक किंवा इतर अस्मिता सातत्याने जिवंत ठेवून त्यावर राजकीय स्वार्थाच्या पोळ्या भाजून घेणे हे कार्य राजकारणी इमाने इतबारे पार पाडतात. आणि आपण सामान्य माणसे 'रक्त की काय म्हणताय' ते उसळवून घेउन तिखट प्रतिक्रिया देण्याचे काम इमानदारीत पार पाडतो.

इथे खर्‍या अर्थाने काड्या करणारी माणसं आहेत ती म्हणजे अभारतीय नागरिक . इथल्या भावनिक मुद्द्यांबाबत प्रतिक्रिया द्यायच्या आणि मग बिअरचे घुटके घेत घेत रक्त वगैरे खवळलेल्या भारतीय माणसांची मजा बघत बसायची.

खरोखरंच सळसळणारं रक्त असणारे आणि भेकड नसणारे जर कोणी असतील तर ती अण्णा हजारे, मेधा पाटकर, आमटे फॅमिली, सुरेश शेट्टी , नरेंद्र मोदी किंवा निखिल वागळे यांच्यासारखी माणसे होय.

शिवाजी काळाच्या पुढचं पाहात होता, स्वतःच्या ध्येयासाठी अखंड झुंजत होता, अहोरात्र कष्ट उपशीत होता, प्राण पणाला लावत होता.
आपण काळाच्या मागे पाहातो, सन ६३७ की ६३०, जयंती फेब्रुवारी महिन्यात की मार्च महिन्यात. चाळीस कोटींपेक्षाही अधिक माणसं उपाशी आहेत, भुकेकंगाल आहेत, दरिद्री आहेत, लाचार आहेत. त्यांची पर्वा आपल्याला नाही . तरी म्हणे आमचं रक्त उसळतं. (बर्‍याचदा परदेशात राहून)

मलाही भरुन येतं बरं का अधून मधून. काय शौर्याने लढा दिला होता अब्राहम लिंकनने. डोळे पाणावतात बरं.

नगरीनिरंजन's picture

26 Jul 2010 - 11:52 am | नगरीनिरंजन

वांझोट्या संतापाला कृतीची फळं कधीच येणार नाहीत आणि मध्ययुगीन अन्यायाने पेटणार्‍यांना वर्तमानातला अन्याय दिसतच नाही.

शिल्पा ब's picture

27 Jul 2010 - 9:25 am | शिल्पा ब

<<इथे खर्‍या अर्थाने काड्या करणारी माणसं आहेत ती म्हणजे अभारतीय नागरिक . इथल्या भावनिक मुद्द्यांबाबत प्रतिक्रिया द्यायच्या आणि मग बिअरचे घुटके घेत घेत रक्त वगैरे खवळलेल्या भारतीय माणसांची मजा बघत बसायची.

अरे वा वा!!! छानच हो!! आम्हाला माहितीच नव्हते कि भारतात राहणे सोडून दिले कि भारताची वाट कशी लागेल हेच एक कर्तव्य पार पडायचे असते....बाकी तिथेच राहून लोक काय उजेड पडताहेत ते दिसतंय...उगाचच स्वतःला परदेशात राहायला मिळत नसल्याची जळफळ अशी दाखवायचा हा विषय आहे का?

अप्पा जोगळेकर's picture

28 Jul 2010 - 9:20 am | अप्पा जोगळेकर

बाकी तिथेच राहून लोक काय उजेड पडताहेत ते दिसतंय
+१.

स्वतःच्या मूळ देशाबद्दलचे बेगडी प्रेम व्यक्त करण्याचा तरी हा विषय आहे का? याला फारतर मळमळ म्हणता येईल. खूप खाल्ल्यावर होतं ना? तसंच काहीसं.

उगाचच स्वतःला परदेशात राहायला मिळत नसल्याची जळफळ अशी दाखवायचा हा विषय आहे का?

आँ? तिथं सगळे मजेत असतात म्हणता की काय ?

शिल्पा ब's picture

28 Jul 2010 - 9:50 pm | शिल्पा ब

तिथ मजेत असो व नसो तुमच्या बेगडी नसलेल्या प्रेमाला का भुरळ पडलीये ? आणि आमचा खरं का खोटं कसलंही प्रेम आम्ही दाखवायचं का नाही त्याचा निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत.

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Jul 2010 - 2:04 pm | बिपिन कार्यकर्ते

छत्रपती संभाजी महाराज नेहमीच आदराचा आणि कृतज्ञतेचा विषय ठरलेले आहेत. त्यांना मुजराच.

पण लेखन अगदीच शब्दबंबाळ वाटले. थोडेसे प्रचारकी थाटाचेही. मला मूळात अशा लेखनाचा कंटाळा असल्याने फारसे भावले नाही.

बिपिन कार्यकर्ते

हर्षद आनंदी's picture

28 Jul 2010 - 2:51 am | हर्षद आनंदी

ऊडत नाही तोवरच टंकतो काही.. (ईथे कारण न देता संपादन करण्याची परंपरा आहे, आणि असे लेखन फारकाळ टिकत नाही, स्वानुभव!!!)

कादंबरीतले उतारे अर्धेच आहेत..फारसा परिणाम साधत नाहीत. :( :(

भारतीय संविधान आधीच अपुर्ण आणि त्यात अडाणचोट लोकांच्या हातात आहे. माकडाच्या हातात कोलीत, तशी गत होऊन हा देश जाळण्यात येत आहे.

फक्त मुस्लिम द्वेष करुन ही घाण संपणार नाही कारण प्रत्येक गोष्टीत ईच्छा-अनिच्छा काहीही कारण असले तरी इतर धर्मातील लोकांच्या सहकार्याशिवाय (बॉम्बस्फोट, माहीती पुरवणे, आश्रय देणे) ह्या गोष्टी होणे शक्य नाही.

महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन तांदळातुन खडे वेचल्याप्रमाणे ह्या बांडगुळांना ठेचणे हेच कार्य अजुन किमान ३ पिढ्या करावे लागेल.. तशी तडफ आजच्या समाजात दिसत नाही, हे भारतीय संस्कृतीचे दुर्दैव!!

>> पण, मात्र त्या हलकट, नराधम "औरंगजेबाची" कबर आम्ही ईंमाने-इतबार जतन करतोय.
त्याच्या कबरेला कुण्या "हिंदू-द्रष्ट्यांने" कलंकित करू नये म्हणून खासे
आसणारे आमचे "पोलिस बळ" आम्ही तैनात करतो.

त्याला मतपेटीचे चे साहाय्य आहे. पण ह्या आमच्या बाजीरावाला कोणाचे साहाय्य हो ?
त्यांच्याच राज्यात त्याची हि अवहेलना.
त्यांच्याच धर्तीवर त्यांचेच स्मरण ठेवण्याची गरज वाटू लागत आहे.
थोरल्या बाजीराव पेशव्यांचे स्मरण ठेवणे आवश्‍यक

त्रिवार धिक्कार असो असल्या हिंदूंचा...................
कोण कुठला लांड्या शहाजान, येतो काय , अल्ला अल्ला करतो काय ,
आणि आपण इथले पांढरपेशी त्यांचीच बाजू घेऊन लिहितात काय, लाज वाटते अक्षरशः.
अरे इतकी कळकळ येते तर व्हा ना त्यांच्यातच सामील. सोडून द्या आमचा हिंदू धर्म.
पण इथे राहून त्यांची गुण नका गात जाऊ.

तो नेहरू सुद्धा त्यांच्यातलाच होता.
>> To talk of Hindu culture would injure India's interests. By education
I am an Englishman, by views an internationalist, by culture a Muslim,
and I am a Hindu only by accident of birth. The ideology of Hindu
Dharma is completely out of tune with the present times and if it took
root in India, it would smash the country to pieces. - Prime Minister
Jawaharlal Nehru

नितिन थत्ते's picture

19 Aug 2010 - 9:44 am | नितिन थत्ते

सदर आयडीला टकलाचा विग आणि चष्मा फेकून देण्याची वेळ फार लवकर आली याचे दु:ख होत आहे.

नंदू's picture

19 Aug 2010 - 9:30 am | नंदू

To talk of Hindu culture would injure India's interests. By education
I am an Englishman, by views an internationalist, by culture a Muslim,
and I am a Hindu only by accident of birth. The ideology of Hindu
Dharma is completely out of tune with the present times and if it took
root in India, it would smash the country to pieces. - Prime Minister
Jawaharlal Nehru

आणि हे म्हणे आमचे लाडके, पहिले पंतप्रधान.

आहेत का कोणि विचारजंत, हे उद्गार डिफेंड करायला?

नंदू