हरिहरेश्वर...!!

अस्मी's picture
अस्मी in कलादालन
23 Jul 2010 - 2:27 pm

हरिहरेश्वर....कोकणातील निसर्गरम्य तीर्थस्थान
एका बाजूला हिरव्यागार वनश्रीने नटलेला डोंगर तर दुसर्या बाजूला स्वच्छ व निळा समुद्र तसेच नारळी पोफळीच्या बागा..

- अस्मिता

हे फोटो मी स्वतः काढलेले नाहीयेत...माझ्या भावाने काढलेले आहेत

कलावावरछायाचित्रण

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

23 Jul 2010 - 2:34 pm | मेघवेडा

क्लासिक!

चवथा आणि सहावा फोटो जीवघेणा आहे! मस्तच~!

फोटोंसोबत थोडं लिखाणही करा की जरा तोंडी लावायला.. ;)

बादवे, तुमच्या फोटोंवर वॉटरमार्क्स नाहीत, याचा अर्थ 'हे फोटो तुम्ही काढलेले नाहीत' असा घ्यावा काय? ;) नाही, हल्ली स्वतःचा शिक्का लगेच मारला जातो फोटोवर म्हणून विचारलं..

मराठमोळा's picture

23 Jul 2010 - 2:36 pm | मराठमोळा

मस्त फोटो आलेत. :)

हरिहरेश्वर आणी श्रीवर्धन च्या जवळ खाण्यापिण्याची चांगली सोयच कधी सापडत नाही ब्वॉ.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

jaypal's picture

23 Jul 2010 - 8:21 pm | jaypal

श्रीवर्धन मधे कुलकर्णी (शुद्ध शाकाहारी) आणि पाटील ( दोन्ही = शाकाहारी + मांसाहारी) खाणावळी आहेत. अतीशय रुचकर जेवण मिळते ट्राय करुन पहा. =P~ =P~ =P~
फोटो छानच आलेत. =D> =D> =D>
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

पांथस्थ's picture

23 Jul 2010 - 9:10 pm | पांथस्थ

आम्ही पाटील मधे गेलो होतो (मला वाटतं रस्त्यावरच आहे) जेवण मस्त होते!

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

हर्षद आनंदी's picture

23 Jul 2010 - 9:16 pm | हर्षद आनंदी

कुलकर्णी शाकाहारी खानावळ अगदी अप्रतिम!!

४-५ वर्षापुर्वी हरिहरेश्वर-श्रीवर्धन-दिवेआगर अशी समुद्र सहल केली होती, तेव्हा हरीहरेश्वर फिरुन, श्रीवर्धनला संध्याकाळी पोचलो. बीचवरच ८ वाजले, गावात आलो तर सगळे गाव शांत. एका बंगल्याच्या आऊट हाऊस मध्ये रहायाची सोय झाली. तोपर्यंत साडे नऊ झाले होते. ही खानावळ शोधायला आणि तिथे पोचायला अजुनच ऊशीर झाला. पण रात्री १०-१०.३० च्या सुमारास, गरमा गरमा फुलके आणि त्यावर तुपाची धार, अत्यंत सुखकारक अनुभव होत तो!! आख्ख्या श्रीवर्धनात स्टँड जवळचे बार सोडले तर कुठलेही हॉटेल उघडे नव्हते , पण त्या माऊलीनी आमच्यासाठी परत स्वयंपाक केला, मुलाने आग्रह कर करुन वाढले. धंद्यापेक्षा माणुसकी जास्त बघायला मिळाली तिथे..

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

टुकुल's picture

23 Jul 2010 - 3:02 pm | टुकुल

मस्त फोटो..
जरा वर्णन केले असते तर चांगल झाल असत.. मि मित्रांबरोबर लवकर कोकण दौर्‍यावर जायचा विचार करत आहे, म्हणुन बर पडल असत.

--टुकुल

प्रभो's picture

23 Jul 2010 - 6:45 pm | प्रभो

मस्त फोटू..

भारतीय's picture

23 Jul 2010 - 7:36 pm | भारतीय

फोटो सुंदरच.. पण एक्-दोन फोटो श्रीवर्धन चे आहेत काय..? हरीहरेश्वरचा समुद्र सदा खवळलेला.. उंच उंच लाटांचा.. समुद्र किनाराही खड्काळ.. तिथे वाटते जणु कही समुद्र आपल्याला कवेत घेऊ पाहतोय.. त्याउलट श्रीवर्धन... तिथला समुद्र शांत.. निश्चल.. अलगद आपल्या पायाशी येऊन काही गुजगोष्टी करू पाहणारा..आणि जाता जाता आपल्या पायांच्या तळव्यांन्ना हळूच गुदगूदल्या करून जाणारा...छान आहेत दोन्ही ठिकाणं..
http://anildaily.blogspot.com

संदीप चित्रे's picture

23 Jul 2010 - 7:37 pm | संदीप चित्रे

वेड ! बस्स अजून काय लिहिणार !
पुन्हा पुन्हा कोकणात जावंसं का वाटतं ते एकदा तिथे गेल्यावरच कळतं :)

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

श्रावण मोडक's picture

23 Jul 2010 - 8:16 pm | श्रावण मोडक

सारी प्रकाशचित्रे छानच...
त्यासोबत लिहा किंवा त्या प्रत्येक चित्रासाठी एखादी ओळ तरी द्या.

अरुंधती's picture

23 Jul 2010 - 8:49 pm | अरुंधती

मस्तच आलेत फोटो..... त्या मंदिराच्या खालच्या बाजूला असलेल्या समुद्रगुंफेजवळ समुद्राच्या लाटा जबरी उसळतात..... पावसाळ्यात त्यांचे ते रौद्र सौंदर्य बघायला मला पहायला मिळाले होते "इथे "

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

चित्रा's picture

24 Jul 2010 - 12:46 am | चित्रा

फोटो पाहून समुद्र दगडासारखा वाटावा असे काहीतरी झाले. सुरेख फोटो आले आहेत.

नगरीनिरंजन's picture

26 Jul 2010 - 8:42 am | नगरीनिरंजन

दूरून काढलेले किनार्‍याचे आणि पाण्यातल्या ढगांच्या प्रतिबिंबाचे फोटो फार छान!

स्पंदना's picture

29 Jul 2010 - 9:31 pm | स्पंदना

चौथा , पाचवा, सहावा, दहाव्वा आणी अकराव्वा जबरदस्त!!

रणजित चितळे's picture

3 Aug 2010 - 2:55 pm | रणजित चितळे

फारच मोहक चित्र आहेत.