आज कुठली ही प्रस्तावना न देता लगेच कामाला सुरवात करू.. घ्या साहित्य लिहून
साहित्य:
सर्व साहित्य एका थालीपिठाला पुरेल ह्या हिशोबाने दिले आहे..
१. ५ वाटी रवा
१/२ लहान कांदा बारीक चिरून
१/४ वाटी खोवलेले ओले खोबरे
१/२ इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून
१ वाटी आंबट दही / ताक सुद्धा चालेल
२ टेबल चमचा साजूक तूप
१/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
लाल/हिरव्या मिरच्या तुमच्या ऐपती नुसार
जिरे पूड, धणे पूड, मीठ (ह्या. प्र. कि. ते मा. न. त. आ. स्व. पा. ठे. ला. ना. अ. स. )
कृती :
रवा, कांदा, ओले खोबरे, आले, दही, तूप, बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर, चवी नुसार मीठ, धणे-जिरे पूड सर्व एकत्र मिसळून हलके मळून घ्या
पॅन मध्ये नीट थापून घ्या आणि
सर्व बाजूने आणि मध्ये थोडे तूप सोडा.. मंद आचेवर झाकण ठेवून ५ मिनिटे ठेवा.
खरपूस वास आला की थालीपीठ पालटा
मंद आचेवर झाकण ठेवून ५ मिनिटे वाट बघा :W .. रव्याचे खमंग थालीपीठ तयार .. सोबतीला आंब्याचे लोणचे.. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो ह्या हून वेगळा नसावा O:)
पुढच्या १० मिनिटात काय होणार हे आता सुज्ञ वाचक जाणतातच.. :D त्यामुळे पुढचे फोटो ह्या वेळेस देत नाही.. उगाच आमच्या पोटात दुखायला नको...;)
हे थालीपीठ गोडाचे पण करता येते, रवा आंबट ताकात १५-२० मिनिटे भिजवून घ्या त्यात ओले खोबरे,लोणी आणि साखर फेटून मिसळा आणि जाड बुडाच्या तव्यावर किंवा ओव्हन
मध्ये १० मिनिटे खरपूस बेक करा ..
प्रतिक्रिया
13 Jul 2010 - 9:03 pm | रेवती
हि पाकृ बरेच दिवस शोधत होते.
बरं झालं मिळाली.
रेवती
13 Jul 2010 - 9:20 pm | गणपा
करुन पहायला हवं एकदा.
13 Jul 2010 - 10:18 pm | पक पक पक
L) छान आहे आवदले.
13 Jul 2010 - 10:28 pm | श्रावण मोडक
पीठ भिजवतांना किंवा भिजवल्यानंतर फटू कसे काढले? म्हणजे, तुम्ही तेव्हा हात धुताना जो वेळ गेला त्याने पदार्थाच्या रुचीत काही बदल संभवतो का? मला इतकेच म्हणायचे आहे. यात कुणी भलता काही अर्थ काढत असेल तर ती त्या/तिची (काय ते तुम्हाला ठाऊक आहे) वगैरे...
मुख्य - कधी येताय ते कळवा!
13 Jul 2010 - 11:01 pm | केशवसुमार
हात धुताना जो वेळ गेला त्याने पदार्थाच्या रुचीत काही बदल संभवतो का?
नाही.
(उजवा)केशवसुमार
फोटो हात न धुता काढला आहे..
(डावरा)केशवसुमार
१५ऑगस्ट २०१० ला आम्हाला ब्राझील मधून स्वातंत्र मिळणार आहे..
(भारतात परतण्यास आतूर)केशवसुमार
13 Jul 2010 - 11:10 pm | प्रियाली
तुम्ही सुटलेले दिसता? ;) (स्वतःच्याच पाककृती चापून) :)
असो. पाककृती आवडली.
13 Jul 2010 - 11:56 pm | मस्त कलंदर
झटपट पाकृ आवडली.. नक्कीच करून पाहीन....
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
14 Jul 2010 - 11:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आज रात्रीच्या जेवणाचा मेन्यू ठरला. जय हो केसुगुर्जी!
अदिती
14 Jul 2010 - 1:04 pm | विसोबा खेचर
झकास.. :)
14 Jul 2010 - 2:58 pm | जागु
मस्त.
15 Jul 2010 - 2:33 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार
16 Jul 2010 - 1:41 am | क्रान्ति
क्रान्ति
अग्निसखा
16 Jul 2010 - 2:46 am | केशवसुमार
ओ क्रांन्तितै..भाजणी किंवा ज्वारीचे पीठ इथे मिळत नाही..का त्रास देता गरीबाला असले खमंग फोटो दाखवून..
(गरीब)केशवसुमार..
16 Jul 2010 - 2:08 pm | दिपक
क्रांतीतै, फोटु असा का दिसतोय..? 8|
illusion
16 Jul 2010 - 2:15 pm | गणपा
योगासन (शिर्षासनात) करताना चे खाण्याचे थालीपीठ आणि शेंगा आहेत त्या ;)
16 Jul 2010 - 2:52 pm | श्रावण मोडक
=))
हा गणपा एक औरच आहे!!!
16 Jul 2010 - 11:42 pm | क्रान्ति
फिरवलं नाही म्हणून फोटूच फिरवला! ;)
क्रान्ति
अग्निसखा
16 Jul 2010 - 8:29 am | क्रान्ति
केसूनाना, हा तर तुमच्या पाकृचाच प्रयोग केलाय! फक्त त्यात थोडं बेसन घातलंय आणि कोथिंबीर न मिळाल्याने वजा केलीय. बाकी सेम टू सेम केलंय. :)
फोटू मोबाईलमधल्या कॅमेर्यानं काढला, म्हणून रंग जरा बदलला असेल कदाचित!
क्रान्ति
अग्निसखा
16 Jul 2010 - 12:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
क्रांतीताई आणि केसुगुरूजी तुम्हाला दोघांना प्रश्नः नारळ नाही घातला तर थालीपिठाची चव बदलेल हे मान्य पण इतर काही प्रॉब्लेम? जसं थालिपीठ तुटणं वगैरे?
पुण्यातल्या आमच्या भागात नारळ व्यवस्थित सोलून मिळत नाहीत, मग कंटाळा येतो नारळ आणायचाच.
अदिती
16 Jul 2010 - 4:03 pm | केशवसुमार
नारळ न घातल्याने चवीत येणारा खुसखुशीतपणा नक्की जाईल..पण तुटणार वगैरे नाही.. कदाचित दही/ताक किंवा मिश्रणात घातलेल्या तूप /लोणी याचे प्रमाण कमी झाल्यामुळे तुकडे पडू शकतात.. मला हा प्रॉब्लेम कधीच नाही आला..
(अंदाजपंचे) केशवसुमार
16 Jul 2010 - 11:44 pm | क्रान्ति
मी नारळ घातला होता, पण नाही घातला तरी थालिपीठ तुटणार नाही, फक्त चवीत फरक पडेल.
क्रान्ति
अग्निसखा
16 Jul 2010 - 11:31 pm | मस्त कलंदर
मी पण आजच ही थालीपीठे केली होती. पटकन झाली आणि मस्त खमंग कुरकुरीत झाली होती. मी फूडप्रोसेसरला अंमळ प्रेमाने वागवल्याने तो रूसलाय. त्यामुळे नारळ सुटी दिली. पण त्यामु़ळे वर अदितीने विचारल्याप्रमाणे थालीपीठे काही तुटली नाहीत. पुढच्या वेळी जमल्यास खोबरे घालून करून पाहाते म्हणजे चवीत काही फरक पडतो का (पक्षी: मला जाणवातो का!!!) पाहीन.
माझे निरिक्षणः वरील साहित्यात एका थालीपीठासाठी दीड वाटी रवा म्हटलंय म्हणून मी तीन वाटी रवा घेतला होता. पण थालीपीठ लावताना अर्धा भाग घेतला तर आकाराने अंमळ जास्तच मोठे किंवा जाड होईल असे वाटले. परिणामी एकूण चार थालीपीठे झाली. तुम्ही केलेले थालीपीठ नक्की दीड वाटी रव्याचे आहे की त्यातल्या अर्ध्याच साहित्याचे???
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
16 Jul 2010 - 11:33 pm | प्रभो
>>तुम्ही केलेले थालीपीठ नक्की दीड वाटी रव्याचे आहे की त्यातल्या अर्ध्याच साहित्याचे???
वाटीचा आकार किती हे विचारलं असतंस तरी चाल्लं असतं.. ;)
17 Jul 2010 - 12:13 am | मस्त कलंदर
मी सर्वसाधारण पणे सगळीकडे वापरली जाते, तीच वाटी वापरली होती. आणि मळलेले मिश्रण पण तेवढेच झाले होते. कळ्ळं का???
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
17 Jul 2010 - 12:16 am | प्रभो
आता अम्हाला कळून काय डोंबलाचा उपयोग.... =))
16 Jul 2010 - 11:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी पण करणार होते, पण रवा संपल्याचं "अंमळ लवकर" लक्षात आलं ... झालं, उद्या पुन्हा शॉपिंग ट्रीप आली! ;-)
मके, नारळाशिवाय थालिपीठांचा अनुभव सांगितल्याबद्दल एकदम ठेंकू हां! थालिपीठांचा एक फोटो डान्रावांना पाठवून दे!
अदिती
16 Jul 2010 - 11:52 pm | केशवसुमार
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!
मी हे थालीपिठ जरा नेहमी पेक्षा जाड लावातो त्यामुळे त्याला (६ इंच व्यासाचे ८ते १० मि.मी जाडीचे)..खरपूस बेक झाल्यावर येणारा स्पॉन्जी फील आणि खोबरे एक वेगळीच चव निर्माण करतो असा माझा अनुभव आहे.. वाटीच्या आकारात बदल होऊ शकतो म्हणून मी मळलेल्या मिश्रणाचा फोटो दिला होता.. ही सुचना आधी करायला हवी होती... झालेल्या गैरसोई बद्दल क्षमस्व..
16 Jul 2010 - 11:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =))
शेठ नाही, मॅडम आहेत त्या!! केसुशेठ, अभ्यास तुमचाही कमी पडतोय! ;-)
अदिती
17 Jul 2010 - 12:04 am | केशवसुमार
अदितीतै..
प्रतिसादात बदल केला आहे..
(दिलगीर)केशवसुमार
17 Jul 2010 - 12:08 am | मस्त कलंदर
१० सेमी?? म्हणजे तुम्ही चार इंच जाडीचे थालीपीठ खाता की काय? ;)
बाकी, माझे थालीपीठ १० मीमी नसेल तरी ८ मीमी इतक्या जाडीचे झालेच होते....
@ अदिती: इतकी छान थालीपीठे पाहून फोटू काढायचा धीर राहिलाच नाही.
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
17 Jul 2010 - 12:36 am | केशवसुमार
:D
17 Jul 2010 - 12:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
फर्माईश सुचली आहे, रेसिपी टाका ना! थालिपीठाच्या सामग्रीतून केक ... साधारण १० सेमी (एवढ्या ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचा) एवढ्या जाडीचा पाहिजे! ;-)
(पळा आता, नाहीतर प्रतिसाद पळेल)
अदिती
17 Jul 2010 - 10:06 pm | लिखाळ
वा.. छान :)
पाकृ आणि लेखन शैली दोन्ही मस्त :)
--(रव्याचा मित्र) लिखाळ.
देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली.
17 Jul 2010 - 10:24 pm | यशोधरा
मी शेवटपर्यंत हा धागा उघडलेला नाहीये. मुळीच नाही.
[(