मिर्ची चे लोणचे

नेहमी आनंदी's picture
नेहमी आनंदी in पाककृती
8 Jul 2010 - 12:05 pm

लाल किंवा हिरव्या मिर्च्या १ किलो
मीठ १५० ग्रम
चिंच ३०० ग्रम
तेल अर्धा किलो
भाजुन कुटलेले तीळ १५० ग्रम
मोहरीची पावडर ४० ग्रम
जिरा पावडर २० ग्रम
मेथी पावडर १० ग्रम
शोप पावडर १५ ग्रम
हळद १५ ग्रम
हिंग आवडी नुसार

कृती:-
मिर्च्या उभ्या चिरुन घ्या.चिंचेचा कोळ तयार करुन घ्या.थोड्या तेलात मिर्च्या थोड्या पांढर्^या होई पर्यंत तळून घ्या. आणि वेगळ्या ठेवा.
बाकी तेल गरम करून त्यात कोळ घाला आणि तेल वेगळे होईपर्यंत गरम करा. बाकीचे सगळे मसाले मिळवा. व्यवस्थीत मिक्स करा. आणि त्यात मिर्च्या मिळावुन शेगडी वरुन खाली उतरवा..

टीपः- हिरव्या मिर्च्या करायच्या असतील तर मिरचीचे छोटे छोटे तुकडे केले तर जास्त छान होतील...

प्रतिक्रिया

जागु's picture

8 Jul 2010 - 3:50 pm | जागु

फोटो आणि रेसिपी दोन्ही झक्कास.
अगदी फोटोतल लोणच खावस वाटतय.

टारझन's picture

8 Jul 2010 - 4:03 pm | टारझन

पावसाळा चालु आहे .... जपुन हो ;)

बाकी मला कैरी सोडलं तर कसलंच लोणचं आवडत नाही :)

- चिल्लाळ लोणची

गणपा's picture

8 Jul 2010 - 7:15 pm | गणपा

एकदम झँट्यॅमॅटिक

सहज's picture

8 Jul 2010 - 7:21 pm | सहज

युज्वली हिरव्या मिरच्यांचे लोणचे किंवा भरल्या मिर्च्या बघायची/ खायची सवय. लाल मिर्च्याचे लोणचे हटके दिसत आहे :-)

आशिष सुर्वे's picture

8 Jul 2010 - 8:30 pm | आशिष सुर्वे

मिरची म्हंज आम्चा कच्चा बिंदू बर्र का!

एकदम सट्टाक लोन्चं हाय बगा!!

======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

सुनील's picture

8 Jul 2010 - 9:25 pm | सुनील

हिरव्या मिरचीचे लोणचे म्हणजे आमचा जीव की प्राण! तसं फोटोतील लाल मिरचीचेही जबराटच दिसतय. करून बघायला हवं.

टीप - शीर्षक मिर्ची चे लोणचे हे बदलून मिर्चीचे लोणचे असे करावे. कारण मराठीत लिहिताना मिर्ची आणि चे हे दोन वेगळे शब्द लिहिले जात नाहीत तर, मिर्चीचे असा एकच शब्द लिहिला जातो.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

8 Jul 2010 - 9:34 pm | विसोबा खेचर

फोटो मस्तच.. :)

अशोक पतिल's picture

10 Jul 2010 - 10:32 pm | अशोक पतिल

यकदम झणझणित हाय बरका ! मिरची गावराणी ह्याये वाट्त ?

sur_nair's picture

13 Jul 2010 - 9:27 am | sur_nair

तोंडाला पाणीच सुटलं फोटो बघून. नेहमी आनंदी म्हणताय स्वताला पण हे खाऊन दुसर्या दिवशी सकाळी सुद्धा आनंदी असता का हो =P~

नेहमी आनंदी's picture

13 Jul 2010 - 1:15 pm | नेहमी आनंदी

:P

येकदम थोडीच खायच हाय..

पुरवुन पुरवुन खायच तोंडी लावन हाय ते..

पण खर तर जास्त तिखट होत नाहीत त्या मिर्च्या.. चिंचेचा कोळ असतो त्यात म्हणुन आंबट तिखट चव खुप छान लागते.. :P :P