गाणे : पायी चालतोया पंढरीची वारी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
1 Jul 2010 - 7:04 am

पायी चालतोया पंढरीची वारी

चाल: एखाद्या अभंगाची (तेथे ऐका: http://www.youtube.com/watch?v=9wwsu4VyoPM )

पायी चालतोया पंढरीची वारी
वारी...वारी....
पायी चालतोया पंढरीची वारी
मुखी बोलतोया पांडूरंग हरी
पांडूरंग हरी हरी...पांडूरंग हरी
पायी चालतोया पंढरीची वारी ||धृ||

संत सज्जन सगळे, नाचती गाती
मेळा भरवीती सारखे चालती
कुणी छेडूनी विणा, टाळ हाती धरी
पायी चालतोया पंढरीची वारी ||१||

तुळशीचे घेतले रोप डोई माऊलीने
अनवाणी पायात केले घर काट्याने
व्यर्थ नाही चिंता मन नाही संसारी
पायी चालतोया पंढरीची वारी ||२||

टाळ मृदूंगाचा मेळ साधूनीया
पावलांचा त्याला ठेका मिळोनीया
विसरले जगा सारे नरनारी
पायी चालतोया पंढरीची वारी ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०१/०७/२०१०

शांतरसकविता

प्रतिक्रिया

मीनल's picture

2 Jul 2010 - 12:03 am | मीनल

शब्द खूप आवडले.
चाल आणि एकट्याचे गायन नाही आवडले.

दोनचार जण मिळून टाळ सोबतील घेऊन रेकॉर्डिंग करा .
म्हणजे खरोखर ते 'वारी'चे गाणे नक्की होइल.

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

पाषाणभेद's picture

2 Jul 2010 - 4:46 am | पाषाणभेद

ताई, अहो मी काही व्यावसायीक गायक नाही, अन माझा आवाज यथातथाच आहे. मी गाणे रेकॉर्ड करून टाकले ते यासाठी की वरील गाणे गाता येते अन थोडक्यात चाल कशी असावी याची ओळख व्हावी म्हणून. आता हे गाणे सार्वजनीक झालेलेच आहे. कुणी हौशी व्यावसायीक गायकाने गायचा प्रयत्न केला तर चांगलेच होईल.

आपण गाणे ऐकल्याबद्दल धन्यवाद. आषाढी एकादशी परवा आहे वाटतं. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

गणपा's picture

1 Jul 2010 - 5:15 pm | गणपा

वा वा वा मस्त जमलय वारी गीत.
पाउले चालती पंढरीची वाट (प्रल्हाद शिंदे) आठवले.

विसोबा खेचर's picture

1 Jul 2010 - 9:51 pm | विसोबा खेचर

सुंदर..

(हभप) तात्या.