डॉक्टर जगो..

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
30 Jun 2010 - 3:14 pm

डॉक्टरलोक पेशंटला नेहमीच कापतात, पैशांत मापतात किंवा टाळूवरचं लोणी चापतात... असे अनेक गैरसमज जनमाणसांत पसरलेले असतील. परंतु डॉक्टरांची कथा अन् व्यथा निराळीच आहे.
मूळात हा व्यवसाय/ पेशा रांत्रंदिन युद्धाचा प्रसंग असा असतो. डोळ्यात तेल घालून रुग्ण तपासणे, योग्य निदान करणे, उपचार पुरवणे हे काही सोपे काम नाहीये मित्रांनो.
पेशंटचा आजार वा पिडा कशी दूर करता येईल याच विचारांत डॉक्टर गढलेले असतात. रुग्ण बरा झाल्याशिवाय बिल घेतले जात नाही किंबहुना तसे उद्दिष्ट त्यांच्यापुढे मुळीच नसते.
समाजसेवा अन् सेवाभाव डॉक्टरकीत दडलेला असला तरी मेवा लाटणारे लुटारू डॉक्टरही आढळतात. वस्तुतः कुठलीही सेवा मेव्यासाठीच योजिली असल्याचा आभास लुटारूंच्या अंतरी वास करून असतो. म्हणूनच तिथे भ्रष्टाचाराशी सहवास सुरु होतो.
पूर्वीपेक्षा वैद्यकिय क्षेत्र फार प्रगत झालेय. नव नव्या संशोधनांनी परिपूर्ण होऊ लागलेय. नाविण्याची नवी चिकित्सा साधने उपलब्ध झाल्यामुळे आजाराच्या मूळापर्यँतचा प्रवास स्क्रिनवर सहजपणे पाहता येऊ लागलाय. अर्थात 'आमच्या अद्ययावत ज्ञानाचा उपयोग खर्चिक असल्याने तो तुम्ही पेलवलाच पाहिजे' अशी लालसा डॉक्टरीपेशात मूळ धरतांना आढळते.
कितीही किस काढला तरी मोरपिस हाती न लागता खराटाच अंगावरून फिरेल अशी परिस्थिती आहे. चांगल्या सेवाभावी व्रतस्थांना विसरायचं अन् वाईट वागणाऱ्‍यांची खुलेआम चर्चासत्रे भरवायची ही तर समाजाची वृत्ती.
चांगलं सोडून देऊन वाईटाला कुरवाळायचं अशी ही प्रवृत्ती. वृत्ती काय किंवा प्रवृत्ती काय एकदा का बोकाळली की चित्ती समाधान उरत नाही. म्हणूनच कोणत्याही पेशाकडे, व्यक्तिकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो त्यावर सर्व काही अवलंबून आहे.
वैद्यकीय व्यवसाय अगोदर सेवेचं व्रत असतं मागाहून अर्थार्जनाचा पेशा ठरतो. हे लक्षात घेऊन अगणितांचे प्राण कंठाबाहेर पडू न देणाऱ्‍या डॉक्टरांना आदरार्थी शुभेच्छा द्यायलाच हव्यात. नाही का?

जीवनमानशुभेच्छा

प्रतिक्रिया

टारझन's picture

30 Jun 2010 - 3:22 pm | टारझन

किती लेख एकत्र लिहीले आहेत नक्की ? मांडणी , फ्लो , मुद्दे आणि वाक्यरचना ... सगळीच खिचडी झाल्यासारखे वाटले ;)
विषय चांगला आहे , पोटँशियल असलेला आहे. प्रत्येक गोष्टीला दोन बाजु असतात. डॉक्टर बनता बनता बिचार्‍यांची तिशी ओलांडुन जाते ... स्टेबल होईतो चाळीशी :) फार पेशन्स चं काम आहे डॉक्टरकी :)

असो ... लोकसंख्या जबाबदार आहे, आहे ह्या परिस्थितीला ;)

II विकास II's picture

30 Jun 2010 - 3:32 pm | II विकास II

तुम्हीही डॉक्टर म्हणजे डॉक्टरचीच बाजु घेणार.
असो. एक न्हावी दुसर्‍या न्हाव्याचे पैसे घेत नाही म्हणतात. तुमचे आहेका तसे काही.

की कट प्रॅक्टीस????

योगी९००'s picture

30 Jun 2010 - 4:08 pm | योगी९००

माझी पत्नी डॉ. आहे. तसेच माझे काही मित्र/मैत्रीणी ही डॉ. आहेत.
त्यांचे काही अनुभव..

१) एकतर डॉ. होण्यासाठी भरपुर कष्ट, पैसा घालावा लागतो.
२) नंतर settle होण्यासाठी आणखीनच कष्ट. मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःचे भाड्याचे क्लिनीक जरी टाकायचे झाले तर सुरवातीचा खर्च निदान १.५-२.० लाख, आणि दर महिना भाडे व इतर १०,०००रु. (बोरीवली सारख्या ठिकाणी), दरवर्षी contract review चे वेगळेच पैसे.
३) एवढे करून सुद्धा निदान पहिले २-३ महिने कोणच येत नाही. आलेतर फक्त MRs, इतर hospitals चे representatives, किंवा देणगी,वर्गणी मागायला येणारे लोकं.
४) नंतर paitients जरी आले तरी त्यात आजूबाजूच्या दुकानदार, फेरीवाले असेच लोकं जास्त. त्यांच्याकडून पैशाच्या बदल्यात डॉ.ला काही वस्तू जबरदस्ती घ्यावा लागतात.
५) लेडी डॉ. असेल तर उगाच काहीतरी होतेय म्हणून त्रास द्यायला येणारे विक्रूतच जास्त..(हा विषय वेगळा आहे). अशा लोकांकडून पैसा न मिळालेलाच बरा..
६) अतिशय कठीण स्पर्धा...जरी म्हातारा डॉ. झाला तरी तो retire होत नाही. त्याच्याकडे असणार्‍या अनुभवामुळे लोकांची पहिली पसंदी अशाच डॉ. ला असते.

म्हणजे साधारणपणे पहिली २ -३ वर्ष अशीच जातात. डॉ.कडे जर paitence असेल (एकाच जागी थांबून हा त्रास घ्यायचा) तर साधारणपणे ५-७ वर्षाने त्याचे थोडेफार नाव होते आणि मग त्याचे हळूहळू career सुरू होते.

एवढ्या काळात एका IT engineer चे घर्, कार, २ परदेश वार्‍या, लग्न आणि एखादे पोरं पण होते. मी बरेच नवशिके डॉ. आपली डॉक्टरकी सोडून medical transcription किंवा यासारख्या fields कडे वळताना पाहिले आहेत. माझ्या काही डॉ. मित्रांची लग्ने पण या कारणामुळे उशीरा झालीत.

आता बोला....

खादाडमाऊ

टारझन's picture

30 Jun 2010 - 4:17 pm | टारझन

५) लेडी डॉ. असेल तर उगाच काहीतरी होतेय म्हणून त्रास द्यायला येणारे विक्रूतच जास्त..(हा विषय वेगळा आहे). अशा लोकांकडून पैसा न मिळालेलाच बरा..

म्हशीचं किंवा घोड्याचं इण्धिक्शान ठेवायचं ना !! भले पाणी भरुन टोचायचं न दोनेकशे ला कापायचं .. हाय काय नाय काय :)

-(गुरांचा डॉक्टर) प्रा.डॉ. खुडूक करुदे

योगी९००'s picture

30 Jun 2010 - 4:36 pm | योगी९००

म्हशीचं किंवा घोड्याचं इण्धिक्शान ठेवायचं ना !! भले पाणी भरुन टोचायचं न दोनेकशे ला कापायचं .. हाय काय नाय काय
चांगला उपाय आहे पण अशा गोष्टी फक्त बोलण्यासाठी किंवा चित्रपटातच शक्य आहेत...!!!

खादाडमाऊ

जागु's picture

30 Jun 2010 - 4:08 pm | जागु

तुम्ही वैद्यकीय डॉ. आहात का ?

वरील व खालील सर्वांशी सहमत.
दुरुन डोंगर साजरे.......
वेताळ

नरेश_'s picture

1 Jul 2010 - 8:43 pm | नरेश_

सगळ्या डॉक्टरांना एकाच मापाने मापणे चुकीचे ठरेल.एका डॉ. कडे आलेला बरा /वाईट अनुभव दुसरीकडे तसाच येईल असं नव्हे! शेवटी तोही एक माणूस असतो.कामाचा पुरेपूर मोबदला मिळवणे हा त्यांचाच नव्हे तर प्रत्येकाचा अधिकार असतो. कामाचे अनियमित तास, दररोजचे जागरण एकदा तरी अनुभवा तेव्हा समजेल. साधा दहावी नापासनंतर टीव्ही मॅकॅनिकचा ६ महिन्यांचा डिप्लोमा केलेला माणूस जर टीव्ही दुरुस्तीचे हजार-बाराशे रुपये आकारत असेल तर डॉक्टरांनी काय घोडे मारलेय? कामाचे तास,स्वरुप पाहता सरकारी वा अगदी खाजगी डॉक्टरांना मिळणारा मेहनताना अगदी अल्पच म्हणावा लागेल.भूकंप, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नोकरशाहीव्यतिरिक्त फक्त डॉ.च धावून जातात विचारवंत नाही.

जाता जाता.. एक विनोद, पण त्याला हसायचे का नाही ते तुम्हीच ठरवा.
एका अतिशय बिझी डॉ.ची पाच वर्षाची चिमुरडी आपल्या आईला विचारते, " मम्मी,मम्मी, एक विचारु?"
"विचार." - इति मम्मी.
"अगं, काल रात्री तुझ्याशेजारी कोण गं झोपलं होतं?"
".........."

भारतीय रेल्वे हागणदारीमुक्त कधी होणार देव जाणे !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jun 2010 - 5:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपण स्वतःसाठी निवडलेला करियरचा मार्ग असताना "लोकं असं बोलतात", "केवढे कष्ट होतात" ही तक्रार किंचित अवाजवी वाटते. डॉक्टर्सची कट प्रॅक्टीस, काळे धंदे इ.इ. गोष्टीही आता जुन्या झाल्या. त्याचबरोबर "मी अमुक डॉक्टर सोडून इतर कोणाकडेही जाणार नाही", "आमचे डॉक्टर फार चांगले आणि प्रेमळ आहेत" वगैरे वगैरेही!

चांगल्या सेवाभावी व्रतस्थांना विसरायचं अन् वाईट वागणाऱ्‍यांची खुलेआम चर्चासत्रे भरवायची ही तर समाजाची वृत्ती.

हे व्रतस्थ सर्व प्रकारचा व्यवसाय करतात. मुद्दाम डॉक्टरांनाच वाईट ठरवलं जातंय असं मलातरी दिसत नाही. सगळेच सरकारी नोकर, पोलिस थोडेच वाईट असतात. त्यांनाही आपण सरसकट वाईटच ठरवतो ना!!

कोणताही व्यवसाय म्हटला की त्यात चांगल्या वाईट गोष्टी येणारच! हा व्यवसाय निवडताना या गोष्टींची माहिती करून मगच निवडलेला बरा! आयटीच्या लोकांना मिळणारे पगार सगळ्यांनाच आवडतात, पण वेळी-अवेळी काम, अधूनमधून माथी मारलेला लांबचा प्रवास, स्वातंत्र्य आणि स्पेस खूपच कमी मिळणं, अनाठायी स्पर्धा, ताण इ गोष्टी बाहेरून दिसत नाहीत. फक्त डॉक्टर लोकांचीच लग्नं उशीरा होतात असं नाही, शिवाय ही गोष्ट बारावीनंतरही माहित असते (किमान मलातरी माहित होती ... शिक्षण संपायलाच दहाएक वर्ष लागतील!)!

एकाच रोगाच्या सगळ्याच पेशंटांना एकच औषध लागू पडेलच याची खात्री नाही, तसंच सगळ्याच डॉक्टरांना एकाच लेखात न्याय देणंही शक्य नाही!

पुलंच्या शब्दात "दुसरी चांगली दिसते म्हणून पहिली सोडण्यात काहीही अर्थ नसतो."

अदिती

उपाशी बोका's picture

1 Jul 2010 - 1:36 am | उपाशी बोका

सहमत.

मन's picture

1 Jul 2010 - 11:34 am | मन

सहमत आहे.

बाकी डोक्टरकी ह्या विषयाबद्दल मिपा वरच डॉ दाढे ह्यांचे काही लेख आणि प्रतिक्रिया बरच काही सांगुन गेल्यात्.त्याचीही आठवण झाली.

आपलाच,
पेशंट मनोबा

कानडाऊ योगेशु's picture

30 Jun 2010 - 5:43 pm | कानडाऊ योगेशु

रुग्ण बरा झाल्याशिवाय बिल घेतले जात नाही

असहमत.कन्सल्टेशन फीच तगडी असते हो आणि ती प्रत्येकवेळी द्यावीच लागते.हॉस्पिटलमध्येही चांगली रक्कम आधी अ‍ॅडव्हान्स म्हणुन ठेवावी लागते मगच रुग्णाला अ‍ॅडमिट केले जाते.
बाकी आधी डॉक्टरला देव समजले जाते (आजही काही प्रमाणात समजले जाते )पण आज त्याला मात्र व्यावसायिकच समजले जाते.
पण तरीदेखील डॉ. मंडळींना आदरार्थी शुभेच्छा!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

चिरोटा's picture

30 Jun 2010 - 6:15 pm | चिरोटा

समाजसेवा अन् सेवाभाव डॉक्टरकीत दडलेला असला तरी मेवा लाटणारे लुटारू डॉक्टरही आढळतात

हल्ली मेवा लुटणार्‍यांची संख्या जास्त आहे.सेवाभावी संस्थांमध्ये अगदी कमी किंमतीत शस्त्रक्रिया करणारेही डॉक्टर्स आहेत हे मान्य. पण उगाच औषधे खायला लावून पेशंट्ची आर्थिक परिस्थिती बघून लुटणार्‍यांची संख्या बरीच आहे.शिवाय सर्व डॉक्टर्स बुद्धिमान/हुशार असतात असाही एक गैरसमज आपल्या समाजात असतो.जास्त अओषधे दिली/निदान चुकले की प्रॅक्टिस आपटते.
P = NP

शिल्पा ब's picture

30 Jun 2010 - 10:20 pm | शिल्पा ब

<<<पेशंटचा आजार वा पिडा कशी दूर करता येईल याच विचारांत डॉक्टर गढलेले असतात. रुग्ण बरा झाल्याशिवाय बिल घेतले जात नाही किंबहुना तसे उद्दिष्ट त्यांच्यापुढे मुळीच नसते.

काय दणादणा फेकता राव!!! पैशे भरल्याशिवाय खाटेवर आडवं होऊ देत नाहीत हॉस्पिटलात.... आणि डोळ्यात तेल घालून नाही पाहिलं तर इकडं पेशंटचा डोळा वरती जायचा... तुम्हाला माहिती नव्हतं का इतकी कटकट असते डॉक्टर झाल्यावर? माझा हा लेख वाचा... कसली सेवा अन कसलं काय...सरळ म्हणावं कि धंदा आहे उगाच कशाला सेवा बिवा म्हणायचा... म्हणजे आजकालच्या साधुन्सार्ख झालं - मुहमे राम आन बगलमे रामपुरी...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

रामदास's picture

30 Jun 2010 - 10:56 pm | रामदास

उद्या एक जुलाई. डॉक्टर डे च्या लेखकाला शुभेच्छा देऊ या.!!!

भडकमकर मास्तर's picture

1 Jul 2010 - 12:59 am | भडकमकर मास्तर

पेशंटचा आजार वा पिडा कशी दूर करता येईल याच विचारांत डॉक्टर गढलेले असतात. रुग्ण बरा झाल्याशिवाय बिल घेतले जात नाही किंबहुना तसे उद्दिष्ट त्यांच्यापुढे मुळीच नसते..

अशा डॉक्टरांच्या आठवणीने डोळे पाणावले

गहिवरलो...

सर्व डॉक्टरांना (वाढ)दिवसाच्या शुभेच्छा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jul 2010 - 10:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा हा हा हा!

कोणता डॉक्टर रुग्ण बरा झाल्याशिवाय बिल घेत नाही नाव तरी सांगा. जमल्यास त्यालाच फॅमीली डॉक्टर करुन टाकतो.

मी तरी अजुन असा डॉक्टर पाहीला नाही.

अमोल केळकर's picture

1 Jul 2010 - 10:06 am | अमोल केळकर

१ जुलै डॉ़क्टर डे निमित्य तमाम डॉ़क्टरांना शुभेच्छा !!

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

महेश हतोळकर's picture

1 Jul 2010 - 11:49 am | महेश हतोळकर

डॉक्टरसाहेब,     अचाट विधानांनी तुम्ही एका चांगल्या विषयावरच्या लेखाला हास्यास्पद बनवले आहे. डॉक्टरांच्या समस्या, कार्ये आम्हालाही माहीती आहेत. उदा : स्थानीक लोकांचा त्रास, रुग्णाच्या अतीउत्तेजीत नातेवाईकांचा त्रास, वेळी अवेळी केव्हाही इमर्जन्सी ड्युटी लागण्याचा त्रास, अतिप्रचंड सुरुवातीची गुंतवणूक, सावकाश परतावा इ.इ.     पण तुम्ही जी काही विधाने केली आहेत ती खूपच अचाट आहेत.
पेशंटचा आजार वा पिडा कशी दूर करता येईल याच विचारांत डॉक्टर गढलेले असतात. रुग्ण बरा झाल्याशिवाय बिल घेतले जात नाही किंबहुना तसे उद्दिष्ट त्यांच्यापुढे मुळीच नसते.हे म्हणजे एखाद्या बिल्डरने लोकांच्या निवार्‍याच्या समस्येचाच विचार करतो किंवा शिक्षण सम्राटाने "लोकांना शिकवून शहाणे करण्याचे व्रत घेतले आहे" असे म्हणण्यासारखे आहे. एक किस्सा सांगतो. माझ्या पत्नीला बाळंतपणासाठी दवाखान्यात ठेवले होते. मुख्य डॉक्टरांनी सांगीतले होते की दर ३ तासांनी रक्तदाब तपासून त्याची नोंद ठेवा. प्रत्यक्षात इतर डॉक्टरांनी एकदाच तपासून बाकीच्या नोंदी तश्याच भरण्याचा उद्योग केला, कारण फक्त आळस.
"रुग्ण बरा झाल्याशिवाय बिल घेतले जात नाही" हे काय आहे हो? मान्य करा की "व्यवसाय करतो". लोकांचीही तीच अपेक्षा आहे. आता हे सांगू नका की कट् प्रॅक्टीस, MLM ची औषधे(!?) गळ्यात मारणे या गोष्टी माहीत नाहीत.
वैद्यकीय व्यवसाय अगोदर सेवेचं व्रत असतं मागाहून अर्थार्जनाचा पेशा ठरतो. तुम्ही स्वतः तरी हे पाळता का?
    डॉक्टरांच्या समस्या, व्यवसायाचे इतर परीणाम, याविषयी लिहीले असते तर अपेक्षीत परीणाम साधला गेला असता. (जे खादाडमाऊंच्या प्रतीसादात हे सगळं आलच आहे.)

JAGOMOHANPYARE's picture

1 Jul 2010 - 8:27 pm | JAGOMOHANPYARE

डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा..

( या सगळ्याला कंटाळून प्रॅक्टिस सोडलेला,
डॉ. जागोमोहनप्यारे)

रेवती's picture

1 Jul 2010 - 9:08 pm | रेवती

सर्वप्रथम डॉ. दिनाच्या शुभेछा!
'आमच्या अद्ययावत ज्ञानाचा उपयोग खर्चिक असल्याने तो तुम्ही पेलवलाच पाहिजे' अशी लालसा डॉक्टरीपेशात मूळ धरतांना आढळते.
होय, होय, त्रिवार होय!
शिल्पा म्हणते तसं आधी पैसे भरल्याशिवाय खाटेवर आडवं होवू देत नाहीत.
आणि पेशंटकडे लक्षही नातेवाईकांनीच ठेवायचं. सहा महिन्यांपूर्वी माझी मावसबहिण गेली. त्या हास्पीटलात जर आवश्यक त्या सोयी नव्हत्या तर साम्गण्याचं काम डॉ.चच होतं. स्वत:चे ७० ,८० ह्.चे बील होइपर्यंत त्यांनी ते साम्गितलं नाही आणि जेंव्हा सांगितलं तेंव्हा फारच थोडावेळ हातात होता. दुसर्या हास्पीटलात नेले आणि ती गेली. व्यवसाय करताय ना, करा! पण दुसर्‍याच्या जिवाशी खेळ नकोत. या प्रसंगात अजूनही बरेच दिरंगाईचे प्रसंग सांगितलेले नाहीत.
माझ्या बाबांचे ऑपरेशन झाल्यावरही असेच अनुभव आहेत्.....पण आता जाउ देत, ते सांगण्याची इच्छाही नाही. आणि हे चांगल्या समजल्या जाणार्‍या हॉस्पिटलमधलेच अनुभव आहेत.

रेवती

Manoj Katwe's picture

2 Jul 2010 - 9:20 am | Manoj Katwe

दिवटे साहेब, तुम्हि कधि ससुन होस्पितल्ला गेलेले दिसत नाहि. तिथे काय, तुमच्या लेखावरुन तुम्हि कोन्त्याच होस्पितल्चि पायरि चढलेलि दिसत नहि

माझि एक विनति,
एकाद तरि ससुन होस्पितल मधे सामान्य मानुस बनुन जाउन या आनि हा लेख पुन्हा लिहा.

टारझन's picture

2 Jul 2010 - 9:29 am | टारझन

कवटे साहेब, तुम्हि कधि ससुन होस्पितल्ला डॉक्टर म्हणुन काम केलेले दिसत नाहि. तिथे काय,तुमच्या प्रतिसादावरुन तुम्हि कोन्त्याच होस्पितल्मधी काम केलेले दिसत नाहि

माझि एक विनति,
एकाद तरि ससुन होस्पितल मधे डॉक्टर बनुन जाउन या आनि हा प्रतिसाद पुन्हा लिहा.

Manoj Katwe's picture

2 Jul 2010 - 10:57 am | Manoj Katwe

टारझन भाउ,
मी जरि कुठे डॉक्टर बनु शकलो नाहि तरि मी आनि माझे मित्र बरेच होस्पिटले पेशन्ट बनुन फिरुन आलेलो आहे.
हा माझा अनुभव आहे कि होस्पितल मध्ये जे डॉक्टर काम करतात ते खरच लोकसेवे साठि आलेले नसतात , ते फक्त पैसे कमवायाला आलेले असतात.

तुमच्या माहितित जर असे एखादे होस्पितल असेल, जिथे रुग्नाचि सेवा हे प्रथम कर्तव्य आहे, तर नक्कि कळवा. माझ्या सारर्ख्या हाजारो गरिबान्चे पुन्य लागेल हो तुम्हाला.

पैसे दिल्याशिवाय विसा चे काम न करणे, (ससून हॉस्पिटल, Mr बोराडे ), हवं तर अनुभव घेऊन बघा
अतिरिक्त औषधे आणावयास सांगणे , का तर medical वाल्याचे बिल जास्त होईल म्हणून आणि उरलेली औषधे स्वताच्या घशात घालणे
उगाचच / विनाकारण चाचण्या करून घ्याला सांगणे
पेशंट वर हाथ साफ करायला नवीन डॉक्टर कडे त्याच्या practise साठी सोपविणे.
एक अजून घाणेरडा प्रकार, normal delivery करायचे टाळून sigerian करायला लावणे. का तर पैसे/बिल जास्त होईल म्हणून.

टारझन's picture

2 Jul 2010 - 3:00 pm | टारझन

कवटे साहेब, ससुन मधल्या डॉक्टरला लै ग्रेट पैसे वगैरे मिळतात असं नाही. तिकडे बरेच इंटर्नशीप करणारे आणि रेसिडंट डॉक्टर्स असतात. माझे ५ मित्र बिजे मेडिकल मधुन शिकले. या काळात धड ३-४ तासही झोप मिळत नाही त्यांना ... जो बाक रिकामा दिसेल तेंव्हा वेळ मिळेल तसे ते झोपतात. १६--१७०० रुपये इंटर्न चा तर १६००० की काहीतरी रेसिडेंट डॉक्टरचा पगार असतो. पेशंटचा महापुर एवढा मोठा असतो की साला काय सांगायचं .. बर्‍याचदा शक्य असेल तेंव्हा कुतुहल म्हणुन मी त्यांच्याबरोबर वार्डात जायचो.. अक्षरशः गुदमरुन येतो जीव. बरं ह्यातलं डॉक्टर ला काय मिळतं ? तर घंटा !!
बरं एम्बीबीएस होऊन चालंत नाही .. .लोकालाजे पिजी करा ... त्यात आपलं भिकारी सरकार सिटं कमी करत चाललंय .. शिवाय बोकांडी कास्ट रिझर्वेशन चं ओझं . .. तो डॉक्टर घरी बसुन २-३ वर्ष ट्राय मारत बसतो ... असो ...पेशंटला ह्या न दिसणार्‍या बाबी आहेत ;) डॉक्टर्स ने ह्या पेशंसची तयारी ठेवलेली असतेच आणि त्यानंतर त्याच्या मोबदल्याचीही :)

असो , हा फक्त ससुन लिमिटेड किस्सा आहे. खाजगी हॉस्पिटल वाल्यांवर चर्चा नाही. कोणी म्हणतो डॉक्टर एका एमारायस्क्यान चे एवढे पैसे कसे होतात ? आर्रे ? त्या मशिनची कॉस्ट करोडांत असते राव .. .तो काय च्यारिटी बिजनेस करायला बसलाय का ? :) असो .. पुन्हा एकदा नमुद करतो ... प्रत्येक णाण्याला दोन बाजु असतात . . . .
जसे तुम्ही पेशंट साईडचे अनुभव घेतलेत तसे मी डॉक्टरांचे हाल बघतो ... बाकी खाली , महेशरावांनी मुद्दे लिहीलेत .. तेही बरोबरंच आहेत ;)
शेवटी "भारत भिकारी देश " जो तो लुटायचा ट्राय करणार ... :) कोणा एकाला दोष देऊन काय फायदा ? :)

महेश हतोळकर's picture

2 Jul 2010 - 10:48 am | महेश हतोळकर

एकाद तरि ससुन होस्पितल मधे डॉक्टर बनुन जाउन या आनि हा प्रतिसाद पुन्हा लिहा.
पेशंटच्या नातेवाईकांच्या हातचा मार खाणे, खोट्या प्रमाणपत्रासाठीचा दबाव, कामाचा अतीरेकी ताण इ.इ.
हा केवळ नमुना आहे. डॉक्टरांच्या अश्या अनेक समस्या आहेत.

Manoj Katwe's picture

2 Jul 2010 - 11:08 am | Manoj Katwe

पेशंटच्या नातेवाईकांच्या हातचा मार खाणे,
किती डॉक्टर असा मार खातात, एखाद दुसरा ? पण किती पेशंट डॉक्टरच्या नजरा चुकीमुळे दगावतात,काही गिनती आहे ?
किती पेशंटना डॉक्टरच्या भ्रष्ट कामकाजामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. काही गिनती आहे ?

खोट्या प्रमाणपत्रासाठीचा दबाव,
किती ठिकाणी आणि किती वेळा असा दबाव आणला जातो ?
आणि हे काय त्यांच्या कसेही वागण्याचे समर्थन झाले कि काय ?

कामाचा अतीरेकी ताण इ.इ.
कोणाला नाही ? आम्ही सुद्धा मर मर मरतोच कि.
कामाची वेळ संपली कि घरी जायला निघालेले डॉक्टर मी स्वतः पाहिलेले आहेत. पेशंट जगो किंवा मरो
जर असे डॉक्टर पहावाचे असतील तर कळवा. मी सांगेन कुठे असतात ते ?

महेश हतोळकर's picture

2 Jul 2010 - 11:44 am | महेश हतोळकर

किती डॉक्टर असा मार खातात, एखाद दुसरा ?
रेसिडेंट डॉक्टर्सच्या संपाबद्दल माहिती आहे ना? नसेल तर थांबा ८-१५ दिवसात एखादा होईलच. माझाच किस्सा सांगतो. माझ्या मुलीला जन्मा नंतर लगेच NICU मध्ये ठेवावे लागले. पण काही उपयोग झाला नाही. नंतर डॉक्टरला भेटायला गेलो होतो; एकटाच, बर्‍यापैकी सभ्य अवतारात. तरीसुद्धा डॉक्टर माझ्याशी बोलायला भीत होते. मीच त्यांना शांत केले. म्हणालो "फक्त कारण जाणून घ्यायला आलो आहे. बाकी काही नाही". तेव्हा कुठे माझ्याशी बोलायला तयार झाले.

किती ठिकाणी आणि किती वेळा असा दबाव आणला जातो ?
प्रमाणपत्र म्हणजे फक्त कागद नव्हे."बाकी राहु द्या डॉक्टर, फक्त मंडे फ्रायडे करा."

कोणाला नाही ? आम्ही सुद्धा मर मर मरतोच कि.
सुट्टीच्या दिवशी / काम संपल्यावर साहेबाचे बोलावणे आले तर काहीही कारण सांगून न येण्याची सोय आहे. पण एखादी अपेंडिक्स/अ‍ॅक्सिडेंट ची केस आली तर हातातला चहा टाकून सुद्धा पळावे लागते.

मी डॉक्टरांच्या गैरवर्तनाचे समर्थन करत नाहिये. मी सुद्धा हेच म्हणतोय की "सेवाभावी वृत्ती वगैरे सोडून द्या. व्यवसाय करताय, व्यवसाईक नितीमत्ता पाळा". डॉक्टरांनाही स्वतःचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. समाजाचा एक घटक म्हणून माझेही कर्तव्य आहे की मी त्यांची जाण ठेवावी.