देखावे..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जे न देखे रवी...
29 Jun 2010 - 7:01 pm

ओळखीचे होते सारे तिथे
देखावेच होते न्यारे तिथे!

गाईन गीत आता खुशीने
वाहतील मोकळे वारे तिथे!

लाभेल शांती तिच्या जिवाला
आनंदे वाहीन भारे तिथे!

फेसाळेल मद्य प्याल्यात आता
कोंडाळतील हावरे सारे तिथे!

मी आस्तिक, मी नास्तिक
उघडीन सारी दारे तिथे!

-- तात्या अभ्यंकर.

गझल

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

29 Jun 2010 - 7:08 pm | प्रियाली

तात्या तुम्ही चक्क कवी झालात. ;) कवी होण्यासाठी हृदयात काहीतरी पिळवटणारे निर्माण व्हावे लागते असे भक्कम वाक्य कधीतरी-कुठेतरी वाचले होते. (म्हणूनच आम्हाला कविता सुचत नाहीत हा निष्कर्षही काढला होता.)

असो. टेक इट इझी.

कविता आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jun 2010 - 7:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>तात्या तुम्ही चक्क कवी झालात.
असेच प्रतिसादात लिहायचे होते....! :)

तात्या कविता कशाविषयी आहे, कवितेतला भावार्थ काय आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे, जमले तर सांगा ना राव ! :W

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

29 Jun 2010 - 7:37 pm | विसोबा खेचर

तात्या कविता कशाविषयी आहे, कवितेतला भावार्थ काय आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे, जमले तर सांगा ना राव !

ते शिक्रेट आहे! ;) =))

विसोबा खेचर's picture

29 Jun 2010 - 7:13 pm | विसोबा खेचर

तात्या तुम्ही चक्क कवी झालात.

तुझाच आशीर्वाद होता ना? तो फळला! :)

तात्या.

अवलिया's picture

29 Jun 2010 - 7:15 pm | अवलिया

छान ! मस्त रे ... :)

च्यामारी या पद्धतीने विडंबन, कविता करणारे बनायला लागले तर आम्हा पामरांवर मराठीच्या प्राध्यापकांची कविता, विडंबन वाचायची पाळी येणार तर.. देवा सोडव रे ... अरे आम्हाला नाही.. प्राध्यापकांना !!!

--अवलिया

चतुरंग's picture

29 Jun 2010 - 7:17 pm | चतुरंग

कविता चांगली झाली आहे. अजून येऊदेत.

चतुरंग

राजेश घासकडवी's picture

30 Jun 2010 - 5:18 pm | राजेश घासकडवी

कविता चांगली झाली आहे.

ही गजल की ही कवीता,
लेबले ही खाक येथे..

अजून येऊदेत.

वाहीदा's picture

30 Jun 2010 - 6:55 pm | वाहीदा

सहमत !
कविता मनस्वी वाटली अन म्हणूनच आवडली :-)
~ वाहीदा

पाषाणभेद's picture

29 Jun 2010 - 7:19 pm | पाषाणभेद

तात्या आमच्या बैठकीत आलात शेवटी.

The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

विसोबा खेचर's picture

29 Jun 2010 - 7:42 pm | विसोबा खेचर

सगळी मंडळी याला 'कविता' असे का संबोधताहेत? मी तर गझल म्हणून लिहिली होती! :(

गझलेच्या नियमात हे लेखन बसत नाही काय? तज्ञांनी कृपया मार्गदर्शन करावे..

(नव-गझलकार) तात्या.

प्रियाली's picture

29 Jun 2010 - 7:48 pm | प्रियाली

सगळी मंडळी याला 'कविता' असे का संबोधताहेत? मी तर गझल म्हणून लिहिली होती!

आमच्यासारखे कविता-अशिक्षित प्रतिसाद देऊ लागले की असे होते. ;)

पाषाणभेद's picture

29 Jun 2010 - 8:26 pm | पाषाणभेद

तात्या, गझल म्हणजे प्रियकरांचे विचार काव्यात/ गझलेच्या नियमात बसवणे. गझल ही प्रेमीकांचीच असली पाहीजे असा काही गझल नवाजांचा रिवाज आहे. (अन मलाही तेच वाटते.)
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

टारझन's picture

29 Jun 2010 - 9:56 pm | टारझन

आधी गझलेत आणि कवितेत फरक काय त्यो सपष्ट करा बॉ !!

विसोबा खेचर's picture

29 Jun 2010 - 9:57 pm | विसोबा खेचर

ते तर आपल्याला पण माहीत नाय! :)

सुरेश भटांच्या रचनेची झलक जाणवते एवढेच म्हणतो. आणखी येउद्या.

पंगा's picture

29 Jun 2010 - 11:13 pm | पंगा

...अगोदरच दिवंगत आहेत असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

- पंडित गागाभट्ट.

पंगा's picture

29 Jun 2010 - 11:38 pm | पंगा

प्रस्तुत कविता आशयाच्या दृष्टीने बरी वाटते. पण वृत्तबद्धता, गेयता, तेच वृत्त कायम पाळणे वगैरे गझलेचे जे काही बेसिक इन्ग्रीडियंट्स असावेत असे मला (गझलेची बाराखडी वरवर वाचून) वाटते, ते गायब आहेत.

(बाकी पुढच्या त्या रदीफ, काफिया वगैरे भानगडी जरी बर्‍यापैकी सांभाळल्या असल्या तरीसुद्धा या मुख्य गोचीमुळे चव बिघडते. मला वाटते मला जे म्हणायचे आहे ते खाली संदीप चित्रे यांनी त्यांच्या प्रतिसादात नेमके मांडले आहे.)

त्यामुळे, आशयाच्या दृष्टीने ही कविता वाखाणण्याइतपत असली तरी, सुरेश भटांशी दूरान्वयानेही तुलना अनाठायी आणि अतिशयोक्त वाटली. सुरेश भटांनी इतक्या बेसिक गडबडी केल्या असत्या असे वाटत नाही.

सबब, श्री. सुरेश भट अगोदरच दिवंगत आहेत असे वाटते; कशाशीही तुलना करून त्यांना पुन्हापुन्हा मारण्याची आवश्यकता वाटत नाही.

(प्रस्तुत प्रतिसादांमागील माझा रोख सदर कवितेकडे नसून त्यावरील सदर अभिप्रायाकडे आहे, हे कृपया विशेष करून लक्षात घ्यावे. प्रस्तुत रचना काही अंगांनी - खास करून आशयाच्या दृष्टीने - मला बरी वाटली. पण तिच्यावर अजून काही काम केलेले चालू शकेल, असेही वाटले. गझलतज्ज्ञ आवश्यक वाटल्यास योग्य तो खुलासा करतीलच. चूभूद्याघ्या, इ.इ.)

- (गझल-अनाडी) पंडित गागाभट्ट.

sur_nair's picture

30 Jun 2010 - 10:00 am | sur_nair

चटकन वाचल्यावर जे जाणवले ते लिहिले. तुम्हाला कीस काढायचा तर खुशाल घाला. 'झलक' वाटते याचा अर्थ त्या पातळीवरची रचना आहे असे नाही, पण नवीन लेखकाच्या दृष्टीने ठीक आहे. लिहिण्याचे तन्त्र सवयीने शिकता येते पण आशय खोल मनातून यावा लागतो, तो शिकून येत नाही.

सन्जोप राव's picture

2 Jul 2010 - 5:54 am | सन्जोप राव

सप्रेम नमस्कार.
सदर कविता आपणांस भटांची आठवण करुन देत नाही, हे वाचून वाईट वाटले. किमान 'अंदाज अपना अपना' हा चित्रपट आपल्याला 'जाने भी दो यारो' किंवा 'अंगूर' ची आठवण तरी करुन देतो का?
कळावे, लोभ असावा.
आपला नम्र
सन्जोप राव
ठोकर ना लगाना हम खुद है
गिरती हुई दीवारों की तरह

संदीप चित्रे's picture

29 Jun 2010 - 11:12 pm | संदीप चित्रे

गझल आणि कवितेतला मुख्य फरक --
-- कविता हा एक सलग आकृतिबंध असतो पण एकाच कवितेत वेगवेगळे भाव सांगितले जाऊ शकतात
-- गझलेमधे एकच भाव पूर्ण गझलभर असतो पण प्रत्येक शेर हाच जणू एक स्वतंत्र कविता असतो.. शिवाय शेराची दुसरी ओळ पहिल्या ओळीशी अशी निगडीत हवी की त्या दोन ओळी वाचूनच त्या शेराचा अर्थ समजला पाहिजे...पूर्ण गझल वाचायची गरज नाही.

व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर कवितेला वृत्त असायलाच पाहिजे असा काही नियम नाही पण गझलेच्या पहिल्या शेरातल्या पहिल्या ओळीत जे वृत्त वापरले जाईल तेच पुढे संपूर्ण गझलभर असायला हवे.
उदा. तात्या, तू केलेल्या रचनेतील पहिल्या ओळीतील लघु/गुरू अक्षरांचा क्रम आणि दुसर्‍या ओळीतील लघु/गुरू अक्षरांचा क्रम ह्यात फरक आहे. (पहिल्या ओळीत 'गालगागा गागा गागा लगा' आणि दुसर्‍या ओळीत 'गागागाल गागा गागा लगा' त्यामुळे पहिल्या ओळीतील वृत्त पुढे सांभाळले गेले नाहीये असं मला वाटतंय.
(वृत्तभंग केलेला चालतं असं वाचलंय/ऐकलंय पण माझं ज्ञान अजून तिथपर्यंत पोचलं नाहीये !)

शिवाय मग त्या काफिया, रदीफ, अलामत वगैरे भानगडी आहेतच.
(माझ्या माहितीप्रमाणे ह्या रचनेत ते सांभाळले गेले आहे)

बाकी माहिती 'गझलेची बाराखडी' आणि आपले केसु देतीलच.

अवांतरः व्हेन यू कॅन नॉट कन्व्हिन्स, कन्फ्यूज !

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

टारझन's picture

29 Jun 2010 - 11:27 pm | टारझन

वा वा वा !! आज ण्याणात लै मौलिक भर पडली .. आजपासुन आम्ही तुम्हाला "गुर्जी" म्हणनार बॉ :)
काय गुर्जी काय म्हणता ?

-(चित्रे गुर्जींच्या वर्गातला ब्याकबेंचर) टारेश गाझगझली

नंदन's picture

29 Jun 2010 - 11:37 pm | नंदन
टुकुल's picture

30 Jun 2010 - 10:07 am | टुकुल

व्वा तात्या ... आजपासुन मिपा तुमच

--टुकुल

विसोबा खेचर's picture

30 Jun 2010 - 4:31 pm | विसोबा खेचर

व्वा तात्या ... आजपासुन मिपा तुमच

माझंच आहे.. मालक येतील अन् जातील परंतु संस्थापक तेच राहतील! :)

असो..

प्रतिसादकर्त्या सार्‍या रसिकवरांचे अभार..

जागु's picture

30 Jun 2010 - 3:08 pm | जागु

तात्या छानच.

केशवसुमार's picture

30 Jun 2010 - 3:46 pm | केशवसुमार

प्रयत्न तात्याशेठ..
गझल लिहिण्या पुर्वी भटसाहेबांची गझलेची बाराखडी वाचावी असे वाटते..
ज्या पद्धतीने तुमच्या राग दारीत सात सुरांचा क्रम, आवरतने (जे काही असेल ते) नियम असतात तसे गझलेचे काही नियम असतात..
लिहीत रहा.. प्रकाशना आधी चित्त, मिलिंद फणसे, वैभव जोशी, धोडोंपंत, अनंत ढवळे या काही मान्यवर गझलकारांकडून त्या तपासून घ्या, मार्गदर्शन घ्या.. सवयीने, सरावाने हळू हळू जमेल..

एक विनंती : मराठीत समजवून नाही सांगता येणार म्हणून ज्या भाषेत समजवून सांगता येत आहे त्यात ते सांगते
क्रुपया समजून घ्यावे

1) Geet & Kavita :
Ancient Indian Poetry (indo-Aryan languages)

Geet is a word in several Indo-Aryan languages, deriving from the Sanskrit word gita, which means a song or a poem. It is a genre of poetry in most contemporary Indo-Aryan languages like Hindi, Punjabi, Guajarati, etc. It is commonly used as song or hymn.

Kavita: Kavi(poet) +ta(imagination) = Creation/imagination of a poet, the whole poetic work of a poet(KAVI) may be called a kavita. It is just like Nazm. (But Nazm basically consist of urdu words, but Kavita basically consist of Indo-Aryan words. ) Just like the difference between a Shayar and a kavi...Nazm & kavita is almost same...

2) Nazm, Ghazal, Beher :
Urdu poetry (Arabic and Persian languages)


Urdu poetry (Urdu Shayari) is one of the greatest and finest poetries of the world. It has many different colours & types and some those unique traditions which are nowhere in any poetry. It has generated its root from Arabic and mainly from Persian. Urdu Poetry has two main types i.e. Ghazal and Nazm

Nazm :

Here is only the rule of Khayaal, rhyme, & somewhere behr too.
ii) The entire poetical work is called as Nazm.
iii) The complete poetical work is a centralization of a thought; we cannot write a part Nazm. It will be just like an incomplete story.
iv) The Nazm exemplifies the objective kind, often reserved for narrative, descriptive, didactic or satirical purposes.

Ghazal: In poetry (and as the lyrics in songs), the Ghazal is a poetic form consisting of couplets which share a rhyme and a refrain.

A Ghazal, in short, is a collection of couplets (called sher) which follow the rules of Matla, Maqta, Beher, Qaafiyaa, Radif, Khayaal and Wazan. The traditional complete Ghazal has a matla, a maqta, and atleast three other shers in between. The first two shers of a Ghazal can have the form of a qatha (a specific variation of which is a ruba'ee; most familiar to modern readers from Khayym's Rubayyat).

Ghazal: Details of the Form

* The second line of each couplet in a Ghazal ends with the repetition of a refrain of one or a few words, known as a Radif, preceded by a rhyme (though in a less strict Ghazal the rhyme does not need to precede the refrain immediately), known as a Kaafiyaa. In the first couplet, this introduces the theme, both lines end in the rhyme and refrain. I.e. AA BA CA etc

* There can be no enjambment across the couplets in a strict Ghazal; each couplet must be a complete sentence (or several sentences) in itself.

* All the couplets, and each line of each couplet, must share the same meter.

* Some Ghazals do not have any Radif. This is, however, rare. Such Ghazals are called "gair-muraddaf" Ghazal.

* Although every Sher, should be an independent poem in itself, it is possible for all the Shers to be on the same theme. Alternatively, even have continuity of thought. This is called a musalsal Ghazal, or "continuous Ghazal". The Ghazal "Chupke chupke raat din aasun bahaanaa yaad hai" is a famous example of this.

* In modern Urdu poetry, there are many Ghazals, which do not follow the restriction of same Beher on both the lines of Sher. However, even in these Ghazals, Kaafiyaa and Radif are present.

* The restriction of Maqta has become rather loose in modern times. The Maqta was used historically as a way for the poet to secure credit for his or her work and poets often make elegant use of their takhallus in the maqta. However, many modern Ghazals do not have a Maqta or, many Ghazals have a Maqta just for the sake of conforming to the structure or tradition. The name of the Shayar is sometimes placed unnaturally in the last Sher of the Ghazal.

Ghazal Followed the rule of matla/maqta, raadiif, qaafiye, Khayaal, wazn , rhyme etc.
ii) Every couplet of a Ghazal may be called as Nazm coz; every couplet is complete in itself.
iii) Every couplets is complete in it’s self. Ghazal may not be a centralization of a thought,
iv) The Ghazal in Urdu represents the most popular form of subjective poetry

Beher:

behar in Urdu poetry is the meter of a sher (a form of poetry in Urdu, essentially a couplet). It may be considered as the length of the sher. Both the lines in the sher, the couplet, must be of same beher. Moreover, all the shers in one Ghazal (a poetic form consisting of couplets, which share a rhyme and a refrain) must be of the same beher. There are 19 kinds of beher. However, generally beher is categorized in three classes:
Short, medium, long, depending upon the length of the misra (first line of the sher)

For a Ghazal, all the shers in the Ghazal should be of the same of beher.

So, this is the differences between Behar, Nazm, kavita, rachna, Ghazal. Except, Behr all others are the either expressive or poetic creation by a person. Behr is pattern in which we arrange words of Ghazal/Nazm/Kavita/ geet etc etc in a musical way.

उफ्फ कसमसे बहोत लिखा ! I) Hope you people understand :-)

बाकी तात्या ,
तुमची कविता कम गझल आवडली :-)
~ वाहीदा

टिउ's picture

1 Jul 2010 - 11:28 pm | टिउ

चांगली माहिती आहे...पण जिथुन उचलली त्यांना त्याचं श्रेय तरी द्यायचं.

besides, we would have understood if you had written 'उफ्फ कसमसे बहोत कॉपी पेस्टा'

बळंच 'बहोत लिखा', 'मराठीत समजवून नाही सांगता येणार म्हणून ज्या भाषेत समजवून सांगता येत आहे त्यात ते सांगते' वगैरे काय?

असो! तात्या, गझल भारी आहे... :)

मला फक्त समजवून सांगायचे होते,
माझ्याच एका मित्राने ते मला मेल केले होते,
त्याने जे सांगीतले ते मी येथे लिहले
माहीती महत्वाची होती जर ती माझी असती किंवा मला जर स्वतःला श्रेय घ्यायचे असते तर मी वेगळा धागा काढ्ला असता पण ती माझी माहीती नव्हती, अन कोणाची होती ते ही माहीत नव्हते. मग मी काय करणार ??
हां हे बाकी खरे की त्याने जे काही दिले ते मी लिहले . उसने जो कहां मैने लिखा और सचमें बहोत लिखा. जबरद्स्ती अपना नाम रौशन करने के हिसाब से नहीं लिखा जनाब ! बळेच काही नाही. मला फक्त फरक समजावून सांगायचा होता ते महत्वाचे
तुम्हाला जर त्याचे भाषांतर मराठी करता येत असेल तर जरुर करावे, मला ही वाचायला आवडेल :-)
गैरसमज नसावा . अन, हो लिंक दिल्याबद्ध् ल धन्यवाद, तुमच्या खवचट पणामुळे मला ती लिंक मिळाली नाहीतर शोधुनही सापडली नसती हो, तेथील सगळ्याच शेरो शायरी लाजवाब आहेत.
अप्रतिम लिंक ..मस्तच ! :-)
तेथील सगळे शेर,गजल वाचता वाचता बहुतेक सकाळ होणार I)
~ वाहीदा

टिउ's picture

2 Jul 2010 - 2:01 am | टिउ

माझ्याच एका मित्राने ते मला मेल केले होते,
त्याने जे सांगीतले ते मी येथे लिहले

'मेल' की 'ईमेल'? की प्रत्यक्ष/फोनवर 'सांगितली'?
काय एक ते ठरवा...

ईमेल केली असेल तर तुम्ही फक्त कॉपी पेस्ट केली. त्यामुळे 'बहोत लिखा' बाद...

मेल केली असेल किंवा प्रत्यक्ष/फोनवर सांगितलं असेल तर 'बहोत लिखा' ठीक...माझे 'कॉपी पेस्ट' चे शब्द मागे घ्यायला तयार आहे. पण श्रेय न देण्याचा मुद्दा राहतोच. मुळस्त्रोत माहीत नसेल तर तसं लिहायला हवं होतं. तुमच्या प्रतिसादावरुन असं वाटतं की तुम्हीच अभ्यास करुन प्रतिसाद दिलाय आणी इतकी मेहनत करुन आता थकलाय (उफ्फ बहोत लिखा, मराठीत समजावता येत नाही वगैरे)...

लिंक दिल्याबद्ध् ल धन्यवाद

:) np!
आता पुढच्या वेळी तुम्हाला मेलची गरज नाही! :)

देशपांडे१'s picture

2 Jul 2010 - 3:14 am | देशपांडे१

व्वा!! जोरदार प्रतिसाद हो.. प्रतिसादात मिभो मित्र शंकरराव जाणवले.

बाकी गज़ल वा गझ़ल चा अभ्यास चालू ठेवा
कविता चांगली झाली आहे. असेच म्हणेन.

श्री टिऊ,
मी काय लिहावे ,काय नाही लिहावे अन कसे लिहावे हे तुम्ही सांगणारे कोण??
कोणी मला काय सांगितले याचे स्पष्टीकरण तुम्हाला देण्यास मी बांधील नाही. तुम्हाला काय वाटते हा तुमचा प्रश्न आहे माझा नाही.
अन मला नेहमीच गझ़ल या विषयांवर प्रचंड मेल येतात अन फोनाफोनीही होते कारण गज़ल चा अभ्यास फक्त तुम्ही दिलेल्या लिंक वर थांबत नाही.
तुम्हाला मराठीत समजवता येत असेल तर लिहा ना कोणी थांबविले आहे ?
तुम्ही ज्याला श्रेय द्यायचे आहे त्याला दिले आहेतच ना मग मुद्दा उरतोच कुठे ?
मुद्दा तुम्हाला जुनी भांडणे उकरुन माझ्याशी खोडसाळ पणा साधायचा आहे हे इतरांच्या ही लक्षात आले. मला मात्र फक्त गझ़ल चा अभ्यास करायचा आहे तुमच्या मुर्ख खोडसाळ प्रतिसादांचा नव्हे :-)

मेरे खयाल में तुम्हें सिर्फ लोगोंको गिराने में मजा आता है, और तुम सोचते हो के दुसरोंको गिराने में तुम उंचें उठ जाओगे ? तो यह तुम्हारी गलतफहमी है :-) शंकरराव जैसे लोग नजरोंसे भी गिर जाने के बाद ऐसी हरकतें करते दिखाई देते है.
तुम्हास हा माझा शेवटचा प्रतिसाद. गझ़ल / कविता या विषयावर लिहायचे असेल तर जरूर लिहा, वाचायला आवडेल .
~ वाहीदा
गमजदहीयोंको मेरे ई-मेल का पता देते हैं,
यह मिपा के लोग मुझे कैसी सजा देते है ?
हर तरजुमेंको मेरे छु के नुजुमोंकी तरह
आंखों - आंखोंमें लकीरोंको मिटा देते है :-(

टिउ's picture

2 Jul 2010 - 10:48 pm | टिउ

तुमच्या प्रतिसादात जुने सदस्य शंकरराव जाणविले.
तुम्हाला जुनी भांडणे उकरुन माझ्याशी खोडसाळ पणा साधायचा आहे हे इतरांच्या ही लक्षात आले.

कोण शंकरराव? इतरांच्या म्हणजे कोणाच्या?
मुळ मुद्दा सोडुन फाटे फोडण्याचा प्रयत्न आवडला.

मुद्दा असा आहे की तुम्ही प्रतिसाद देतांना लबाडी केलीत. गैरसमज होइल असा प्रतिसाद दिला. ती मी दाखवुन दिल्यावर तुम्ही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तोही फसल्यावर चिडुन तुम्ही हमरीतुमरीवर आलात आणि माझ्यावर बिनबुडाचे आरोप करायला सुरुवात केली... असो!

तुम्हास हा माझा शेवटचा प्रतिसाद.

पहीलाच प्रतिसाद प्रामाणिकपणे दिला असता तर दुसरा, तिसरा, शेवटचा प्रतिसाद लिहावा लागला नसता.

प्रकाश घाटपांडे's picture

2 Jul 2010 - 4:23 pm | प्रकाश घाटपांडे

पण श्रेय न देण्याचा मुद्दा राहतोच.

केवळ जालावर नव्हेतर इतरही छापील मजकुरात अशा बाबी दिसुन येतात

मुळस्त्रोत माहीत नसेल तर तसं लिहायला हवं होतं.

सौजन्य- अनामिक असे वा संकलित असे लिहुन अन्य माहित नसलेला स्त्रोत सांगता येतो

तुमच्या प्रतिसादावरुन असं वाटतं की तुम्हीच अभ्यास करुन प्रतिसाद दिलाय आणी इतकी मेहनत करुन आता थकलाय

त्रयस्थ वाचकाचा असा समज होतो खरा. एकदा अंनिस वार्तापत्रात सुद्धा संपाद्कांनी लिहिलेला लेख हा जयंत नारळीकरांचा अनुवादित होता. त्याचा कुठेही उल्लेख झाला नव्हता. तेव्हा मी त्यांना जाणीव करुन दिली होती. पुढच्या अंकात अनावधानाने चुक झाल्याचा खुलासा आला
मूळ स्त्रोताला श्रेय न देण्याकडे कल बर्‍याचदा दिसून येतो. हेतु चांगला असेल तर बेनिफिट ऑफ डाउट देता येतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

घाटपांडे काका,
मला हे कोणाचे होते /आहे हेच माहीत नव्हते. माझा तो मित्र ही अमराठी त्याचे नाव दिले असते तर हे ही माहीत नव्हते की ते त्याचे आहे कि आणखिन कोणाचे. खरे सांगायचे तर मला कोणाची माहीती आहे यापेक्षा काय माहिती आहे यातच अधिक रस होता त्यामुळे मी ही विचारले नाही.
अन ही माहितीतर उर्दु महाविध्यालयिन अभ्यासक्रमिक पुस्तकात उपलब्ध आहे.
मी आता पंछी ला ही विचारले असते तर त्याने ही मला हेच सांगीतले असते. (अवांतर : पंछी जलोनवी हे शायर आहेत अन हिंदी चित्रपटांसाठी गझ़ल लिहतात. चित्रपट 'दस' ची सगळी गाणी त्यांनीच लिहीली आहेत). अब्बुजान हयात असते तर त्यांनी ही मला हेच सांगितले असते. जे लिहीले आहे ते उर्दु काव्याचे Common Structure आहे. 'भाषेतील काव्याचे व्याकरण माझेच' असे कोणी श्रेय घेईल का काका ??

कोणाचा काय समज-गैरसमज होईल याकडे मी कधीही लक्ष दिले नाही .

मी कोणाची ही गझ़ल चोरली नाही काका, फक्त माहीती मला स्वतःला interest असल्यामुळे गोळा केली आहे. टिऊ हे या आधीही मला त्रास देत असत त्यांचा एक प्रतिसाद श्री टारझन सोबत असलेल्या प्रतिसादांसह २-३ आठविड्यांपुर्वी असाच उडविला गेला होता त्याचाच तो उट्टा काढत आहेत हे नक्क्की.
~ वाहीदा

टारझन's picture

2 Jul 2010 - 11:32 pm | टारझन

श्री. टिऊ , श्री. घाटपांडे आणि वाहिदा-जी , ह्यांना कडक कडक ताकिद देण्यात येत आहे की हा प्रकार इथेच थांबवावा. (आमचं ऐका राव प्लिज) :)

-(हंगामी संपादक) मधीमधीच लुडबुडकर्ता

रेवती's picture

3 Jul 2010 - 12:00 am | रेवती

टारझनसाहेब यांस,
आपण संपादकांची मदत करीत आहात. असे असले तरी संपादकांचे काम त्यांनाच करू द्यावे ही विनंती.

रेवती

शिल्पा ब's picture

3 Jul 2010 - 12:30 am | शिल्पा ब

टार्‍यास समज देण्याचे काम करून संपादकांचे काम आपण हलके करत असाल तरी संपादकांचे काम त्यांनाच करू द्यावे हि विनंती.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

टारझन's picture

3 Jul 2010 - 12:39 am | टारझन

रेवती तै संपादकंच आहेत ! :) रेवती तैंच्या विनंतीस मान दिला आहे ;)

पक्या's picture

2 Jul 2010 - 11:55 pm | पक्या

वाहिदाजी, तुम्हाला मित्राच्या मेल मधून ही माहिती मिळाली ना ..(जरी कॉमन स्ट्र्क्चर असले तरी ) मग तसा उल्लेख केला असता तर कोणीच वाद घातला नसता. कारण तुम्ही टाईप केलेली माहिती जशीच्या तशी टिऊ यांनी दिलेल्या दुव्यावर आहे. कॉमन स्ट्रक्चर असले तरी माहिती देण्यासाठी शब्द तरी स्वतःचे योजावे लागतात ना. ते तुम्ही न केल्याने इतरांस श्रेय देण्याचा टिउ यांचा मुद्दा बरोबर आहे. तो तुम्ही मान्य न करता माझंच खरं या आविर्भावात वाद वाढवला.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

असु दे हो वाहिदाजी ज्यादा त्रास नका करुन घेवु. माहिती दिलीत तीच पुरे आहे.
तात्याच्या गझलेचा आनंद लुटा फक्त लुफ्त. :D

वेताळ