उपांत्य फेरीचे दावेदार....

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in विशेष
29 Jun 2010 - 6:35 pm
फिफा२०१०

श्वास रोखले गेले आहेत... धडधड वाढली आहे... डिफेंडर्सची भिंत उभी आहे... गोलकीपर शेवटच्या क्षणापर्यंत आपले मोहरे योग्य जागी लावतोय... रेफरीची शिट्टी.... आणि संघाचा सर्वोत्तम स्ट्रायकर फ्री किक घेतो... उड्या मारणार्‍या डिफेंडर्सना चुकवून तो जाबुलानी चेंडू एक बाकदार वळण घेत नेटच्या एका कोपर्‍याचा वेध घेत हवा कापत चाललाय.... गोलकीपरनी जिवाच्या आकांतानी तो चेंडू अडवण्यासाठी झेप घेतली आहे.... आणि...

..... आणि???? आणि काय घडणार पुढे?? जिथे एक गोल लाखो लोकांच्या चेहर्‍यावर हसू आणू शकतो आणि लाखोंना निराशेच्या गर्तेत लोटतो.... तिथे फुटबॉल जगतातलं सर्वांत मोठं पारितोषिक "फुटबॉलचा विश्वचषक" मिळवण्यासाठी आता १० (आणि काही तासांतच शेवटचे ८) संघ झुंजतील. उरुग्वे वि. घाना, जर्मनी वि. आर्जेंटीना आणि नेदरलँड्स वि. ब्राझील अश्या लढती अगोदरच मुक्रर झाल्या आहेत. आज स्पेन, पॅराग्वे किंवा जपान पोर्तुगाल ह्यांपैकी दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत पोचतील.

उपांत्य फेरी नंतर संघाच्या बळापेक्षा त्यांचा त्या दिवशीचा खेळच जास्त महत्त्वाचा ठरतो. आणि अश्या दमदार संघांमधून अंतिम फेरीसाठी "आकडा" लावताना ब्रह्मदेव सुद्धा आपल्या चारही डोक्यांनी विचार करेल. तेव्हा आपण सध्या तरी उपांत्य फेरीचा विचार करू. कोण पोहोचेल उपांत्य फेरीत? तुमचे उपांत्य चार फेरीतले संघ कोणते?
उरुग्वे की घाना?
ब्राझील की नेदरलँड्स?
जर्मनी की आर्जेंटीना?
पोर्तुगल / स्पेन की पॅराग्वे / जपान?

येऊद्या तुमचे अंदाज ! बघुया कोण "गोल" मारतंय !!!

जे पी

प्रतिक्रिया

वेताळ's picture

29 Jun 2010 - 6:41 pm | वेताळ

मस्त खेळत आहेत.
वेताळ

वेताळ's picture

29 Jun 2010 - 6:41 pm | वेताळ

वेताळ

धमाल मुलगा's picture

29 Jun 2010 - 6:51 pm | धमाल मुलगा

काय लिहितो भावा तु. जबरान एकदम.

चल माझी थुक्केबाजी :
उरुग्वे
ब्राझील
अर्जेंटिना
स्पेन
:D

टारझन's picture

29 Jun 2010 - 9:43 pm | टारझन

ब्राझिल - आर्जेंटिणा - पोर्तुगाल ... ह्ये तिघं येणारंच ... बाकीचे म्हाईत नाय .. आणि त्यांनी रिटन टिकीट बुक केल्यास आमची हारकंत नाय ( जसं कोणी घेणारंच होतं =)) )

असो .. डॉन मनमोहक लिहीलंस भावा .. अगदी सुर्रर्रर्रर्र कन काटा उभाराहीला.

- काटेरी

धमाल मुलगा's picture

29 Jun 2010 - 9:46 pm | धमाल मुलगा

अंमळ गल्ली चुकलं काय वो हे?
लेख जे.पी. नं लिहिलाय रे भाऊ :)

बाकी प्रतिसादाशी सहमत! :D

टारझन's picture

29 Jun 2010 - 10:31 pm | टारझन

उप्स ... च्यामारी .. हे च्यार पाच टॅब्ज उघडले की आसं व्हतं ..
त्यात ती इएसपीएन वरची अँकर कशी जिवघेणी दिसत्ये, तिच्याकडे बघता बघता प्रतिसाद लिव्हला अन चुक झाली मालक ... कोणी नाव सांगा रे तिचं :) आपण फुटबॉल बघण्यामागे ती सुद्धा एक कारण आहे , प्रेरणा आहे :)

- (अँकर प्रेमी) टारोबा टँकर

मेघवेडा's picture

29 Jun 2010 - 6:53 pm | मेघवेडा

उरुग्वे
नेदरलँड्स
जर्मनी
स्पेन

ब्राझील => L)

जे.पी.मॉर्गन's picture

29 Jun 2010 - 7:16 pm | जे.पी.मॉर्गन

का रं बाबा??? आपला तर "सॉफ्ट कॉर्नर" आहे ब्राझील म्हणजे! फायनल नक्की !

जे पी

मेघवेडा's picture

29 Jun 2010 - 8:25 pm | मेघवेडा

बिग्गेस्ट अपसेट ऑफ धिस कप. :)

तसं बघायचं तर घानाला मत देईन म्हणत होतो पण फोर्लान मुळे उरुग्वेच! साला तो एकटाच पेटला तर काय सांगता येत नाय बाबा..

सागर's picture

2 Jul 2010 - 11:04 pm | सागर

फोरलॅन मुळेच माझे पण मत उरुग्वे ला ...
कारण घाना पण त्यांच्या एकमेव स्टार स्ट्रायकरमुळे फॉर्मात आहे. त्याला उरुग्वेने ब्लॉक केला की झाले :)

Nile's picture

29 Jun 2010 - 10:20 pm | Nile

ब्राझिलला घाबरुन दिलेला प्रतिसाद पाहुन कीबोर्ड गदगदला! =))

-Nile

मेघवेडा's picture

29 Jun 2010 - 10:44 pm | मेघवेडा

घाबरून? च्यायला अंमळ गंडलंय का हे नायलं? ;)

मेघवेडा's picture

2 Jul 2010 - 9:34 pm | मेघवेडा

काय मग नायल्या.. तब्येतपाणी वगैरे ठीक ना? आता तोंड दाखवणार का आम्ही नुस्तंच हसून घेऊ तुझ्यावर? :P

Nile's picture

3 Jul 2010 - 12:48 am | Nile

हॅ हॅ हॅ, एकदम टका टक. तोंड काय अजुन बरंच काही दाखवु शकतो, पहायचं काय? ;)

-Nile

उपास's picture

29 Jun 2010 - 7:22 pm | उपास

उरुग्वे
जर्मनी
ब्राझील
स्पेन

उपास मार आणि उपासमार

ब्रिटिश टिंग्या's picture

30 Jun 2010 - 2:27 pm | ब्रिटिश टिंग्या

सहमत आहोत!

छोटा डॉन's picture

29 Jun 2010 - 7:00 pm | छोटा डॉन

एक नंबर धागा रे ...

आमचे चार (???) :
घाना
ब्राझिल
अर्जेंटिना / जर्मनी ( नक्की सांगणे अवघड आहे, जोरात फाईट होणार )
स्पेन

अवांतर :
थोड्याच वेळात 'स्पेन वि. पोर्तुगाल' सामन्याच्या प्रिव्ह्युव्ह आणि त्यावरील चर्चेसाठी धागा टाकतो. :)

------
छोटा डॉन

प्रभो's picture

29 Jun 2010 - 7:10 pm | प्रभो

लै भारी रे...............

१.ब्राझील
२.घाना (डार्क हॉर्स)
३.अर्जेंटीना
४.स्पेन

जे.पी.मॉर्गन's picture

29 Jun 2010 - 7:18 pm | जे.पी.मॉर्गन

मला पण वाटतंय घाना काहीतरी राडा करेल... आपले पण हेच चार घोडे !

जे पी

निखिल देशपांडे's picture

29 Jun 2010 - 7:12 pm | निखिल देशपांडे

आमचे चार
घाना
ब्राझिल
अर्जंटीना*
पोर्तुगाल*
* ईथे स्पेन आणि जर्मनी मुद्दाम लिहिलेले नाहीत

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

स्वप्निल..'s picture

29 Jun 2010 - 8:21 pm | स्वप्निल..

ब्राझिल
घाना
स्पेन
जर्मनी
:D

संजय अभ्यंकर's picture

29 Jun 2010 - 8:24 pm | संजय अभ्यंकर

"उपांत्य फेरी नंतर संघाच्या बळापेक्षा त्यांचा त्या दिवशीचा खेळच जास्त महत्त्वाचा ठरतो. आणि अश्या दमदार संघांमधून अंतिम फेरीसाठी "आकडा" लावताना ब्रह्मदेव सुद्धा आपल्या चारही डोक्यांनी विचार करेल."

सहमत!

ब्राझील, अर्जेंटिना, पोर्तुगाल, घाना

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

ऋषिकेश's picture

29 Jun 2010 - 8:29 pm | ऋषिकेश

उरुग्वे
नेदरलँड्स ;)
अर्जेंटिना
स्पेन

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

सागर's picture

2 Jul 2010 - 2:10 pm | सागर

ऋष्या ... अगदी बरोब्बर बोललास.
सगळ्यात खाली माझा अंदाज बघ. मी आधी टंकले मग म्हटले कोणाशी जुळतोय का अंदाज पाहू ... तर तुझाच अंदाज फक्त जुळला माझ्याशी....

बाकीचे काय होते माहित नाही... पण उद्या अर्जेंटीना व जर्मनीच्या युद्धाची तुफान मज्जा लुटणार आहे :)

Nile's picture

2 Jul 2010 - 7:46 pm | Nile

नेदरलंड!!! =)) =)) =)) =))

-Nile

छोटा डॉन's picture

2 Jul 2010 - 7:50 pm | छोटा डॉन

ए निळ्या, काय दारु खावन आलस काय ?
तिकडे बघ ब्राझिल ऑलरेडी लीडमध्ये आहे १-० ने.

आता बोल !

------
छोटा डॉन

Nile's picture

2 Jul 2010 - 7:56 pm | Nile

अरे ए भांग खाउन आलास काय??

इथे ह्या लोकांवर हसतो मी, नेदरलंड जिंकणार म्हणे.. =)) =))

माझी सही विसरलास काय शिंच्या?

-निले पेले

-Nile

छोटा डॉन's picture

2 Jul 2010 - 7:57 pm | छोटा डॉन

अच्छा, लोकांवर हासतोयस व्हयं.
मंग ठिक आहे.
अ‍ॅक्च्युअली ह्यांचे दावेच हास्यास्पद आहेत.
=)) =)) =))

------
छोटा डॉन

मेघवेडा's picture

2 Jul 2010 - 9:37 pm | मेघवेडा

काय ते? कुणाचे दावे? हास्यास्पद काय बरं? काही कळलं नाही. जरा समजावता का डान्राव? :P

सागर's picture

2 Jul 2010 - 10:35 pm | सागर

सामना संपलेला आहे आणि ब्राझील वर्ल्ड कप मधून बाहेर झाली आहे
आता बोला. :)
शेवटच्या मिनिटाला हॉलंडच्या खेळाडूंनी ढिलाई दाखवली नाहीतर तिसरा गोल पण ठोकला होता जवळ जवळ

ब्राझील ...ब्राझील करणारे आत्ता बोला.
फक्त ऋष्या आणि मीच हॉलंडच्या बाजूने बोललो होतो :D

माझ्यामते ब्राझील ला फायनल मधे गृहीत धरणार्‍या लोकांनी प्रतिसाद देण्याचा मोठेपणा दाखवावा आता :)

(१ अंदाज बरोबर ठरलेला कधी काळचा फुटबॉलपटू) सागर

मेघवेडा's picture

2 Jul 2010 - 10:38 pm | मेघवेडा

काय राव. आमाला विसरला काय? या धाग्यावरचा वरून सातवा प्रतिसाद बघा जरा! :)

सागर's picture

2 Jul 2010 - 10:43 pm | सागर

अरे मेघ्या,

फक्त ऋष्याने काढलेल्या ४ टिमा माझ्या ४ टिमांशी जुळल्या असे म्हणायचे होते मला :D

काही म्हणा,,, मी सामना पाहिला... हॉलंडने मस्त घुमवला ब्राझील ला =))

सर्व हॉलंडभक्तांचे अभिनंदन....
मला आतापासुनच फायनल ला हॉलंड आणि अर्जेंटिनाची स्वप्ने पडायला लागली आहेत
देवा उद्या फक्त अर्जेंटीनाला जर्मनीपासून वाचव मग वर्ल्डकप अर्जेंटीनाचाच :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jul 2010 - 10:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फक्त ऋष्या आणि मीच हॉलंडच्या बाजूने बोललो होतो

ओये, माझी भगवी टोपी का रे चोरतोस?

अगदीच अवांतरः आमच्याइथे एक डच माणूस कामासाठी गेली बरीच वर्षं येतो आहे. रालोआ, विशेषतः भाजप सत्तेत आल्यावर त्यालाच बहुदा सगळ्यात जास्त आनंद झाला होता, भगव्या रंगासाठी!

अदिती

सागर's picture

2 Jul 2010 - 10:41 pm | सागर

फक्त ऋष्याने काढलेल्या ४ टिमा माझ्या ४ टिमांशी जुळल्या असे म्हणायचे होते मला :D

काही म्हणा,,, मी सामना पाहिला... हॉलंडने मस्त घुमवला ब्राझील ला =))

सागर's picture

2 Jul 2010 - 10:45 pm | सागर

ओये, माझी भगवी टोपी का रे चोरतोस?

आदितीतै... रागावू नकोस.. वाटून घेऊ ऑरेंज कॅप (आपलं भगवी टोपी)

अवांतर : भगवी काय किंवा दुसरी.... टोपी घालणे महत्त्वाचे ;)

छोटा डॉन's picture

2 Jul 2010 - 11:17 pm | छोटा डॉन

आम्ही स्पेनला फुल्ल्टु सपोर्ट करतो.
मान्य !!!
जर्मनीही आमचा सॉफ्ट कॉर्नर आहे.
मान्य !!!

अहो पण जिथे ब्राझिल नाही तो कसला फुटबॉल.
जरी स्पेन हा कप जिंकावा म्हणुन आम्ही देव पाण्यात घालुन बसलो असलो तरी फायनल स्पेन वि. ब्राझिल व्हावी अशीच आमची इच्छा होती.
ब्राझिल म्हणजेच फुटबॉल!

असो, आम्ही भयंकर निराश झालो आहोत आणि धक्क्यात आहोत.

>>माझ्यामते ब्राझील ला फायनल मधे गृहीत धरणार्‍या लोकांनी प्रतिसाद देण्याचा मोठेपणा दाखवावा आता.
आमचे मौन हे आमची कमजोरी समजु नये म्हणुन हा प्रतिसाद ...

बाकी चालु द्यात !

अवांतर :
जर फुटबॉल हा धर्म असेल तर ब्राझिल हीच त्याची 'काशी, मक्का-मदिना आणि व्हॅटिकन' असेल ह्यात काहीच शंका नाही !

------
( अपसेट )छोटा डॉन

Nile's picture

2 Jul 2010 - 11:25 pm | Nile

ज्यांना ब्राझिल म्हणजे काय माहित नाही त्यांना फुटबॉल कळलाच नाही!त्यांना काय उत्तर द्यायचं सांगा बरं??

अहो पण जिथे ब्राझिल नाही तो कसला फुटबॉल.

इतकं साधं सोपं कळत नाही आणि आलेत मोठे फुटबॉल बघणारे!

-भुंगा

-Nile

छोटा डॉन's picture

2 Jul 2010 - 11:29 pm | छोटा डॉन

मी काय म्हणतो, तुम्ही नेदरलँडचा विजय जरुर सेलिब्रेट करा, अगदी १००% सेलिब्रेट करा.
पण ब्राझिलच्या पराभवाचा आनंद मानणे हे कसले फुटबॉलप्रेम ?

उद्या समजा नेदरलँड्स, जर्मनी, अर्जेंटिना, स्पेन आदी सगळ्यांना हरवुन समजा पॅराग्वे किंवा उरुग्वे समजा 'विश्वविजेते' बनले तर तो फुटबॉलच आम्हाला मान्य नाही.
ते जरुर 'विश्वविजेते' होऊ शकतात पण आम्ही ज्यावर प्रेम करतो तो हा फुटबॉल नक्कीच नव्हे.
एका सामन्यातील यशापयशावर कुणी एखाद्या टीमची किंमत करु नये.

ब्राझिल म्हणजेच फुटबॉल होते , आहे आणि निरंतर असणार ...

अर्थात प्रत्येकाची मते वेगळी असु शकतात हे मान्य.
बाकी निळोबाशी सहमत ...

------
छोटा डॉन

सागर's picture

2 Jul 2010 - 11:40 pm | सागर

पण जो जीता वही सिकंदर हेच खरे... किमान वर्ल्ड कप च्या बाबतीत
आणि डॉन्या ब्राझीलच्या पराभवाचे खूप दु़:ख तुला झाले आहे हे समजू शकतो.
तुझ्याच २ विधानात केवढा विरोधाभास आहे

१. पण ब्राझिलच्या पराभवाचा आनंद मानणे हे कसले फुटबॉलप्रेम ?
आणि
२. पॅराग्वे किंवा उरुग्वे समजा 'विश्वविजेते' बनले तर तो फुटबॉलच आम्हाला मान्य नाही.

हे कसले फुटबॉल प्रेम... कोणीही जिंकले तरी फुटबॉलचाच विजय नाही का?
आज तुला हळहळ वाटते आहे
हीच हळहळ कितीतरी पटींने मला उद्या होणार आहे
अर्जेंटीना की जर्मनी... कोणीही बाहेर गेले तरी दु:ख अपार होणार आहे. :(

छोटा डॉन's picture

2 Jul 2010 - 11:49 pm | छोटा डॉन

अहो मालक, खेळ म्हटले की हार-जीत ही आलीच.
पण एक सामना जिंकला म्हणुन काय कोणी सिंकदर होत नाही आणि तो हरला म्हणुन काय तो संघ *त्यात निघत नाही.

>>पण जो जीता वही सिकंदर हेच खरे... किमान वर्ल्ड कप च्या बाबतीत
असेल बाबा.
वर्ल्ड कप जिंकणे म्हणजेच लोकांची मने जिंकणे असेल तर हे आम्हाला मान्य नाही. उद्या उरुग्वे तो कप घेऊन गेले तरी आम्ही ह्या जन्मात आम्ही उरुग्वेला सपोर्ट करु असे वाटत नाही.
पण ब्राझिल, जर्मनी, अर्जेंटिना, इंग्लंड आणि स्पेन ह्या आमच्या टीमा, आम्ही ओळखत असलेला फुटबॉल त्या खेळतात. त्या जिंकु अगर हरु पण त्या आमच्या मनावर नेहमीच राज्य करतील.

बाकी पराभवाचे दु:ख झाले हे १००% मान्य, त्यात लपवायसारखे काय आहे.
करतो स्पेनला सपोर्ट, अगदी फुल्ल्टु सपोर्ट करतो, अहो पण म्हणुन मला ब्राझिलच्या पराभवाचा अजिबात आनंद झाला नाही.

कोणी येते आणि कोणी जाते, खेळ चालुच राहतो, पण त्यात आपल्याला भावणारे आणि आवडणारे काही असते, ते गेले की आपला रस संपतो.
------
छोटा डॉन

>> ब्राझिल म्हणजेच फुटबॉल!
जुना झाला आता तो काळ. कुणीही सार्वकालिक चॅम्पियन नसतो! :) 'लॉ ऑफ अ‍ॅव्हरेजेस' च्या बाबतीत ऐकलं असेलच! बदल हा होतच राहणार.. :) क्रिकेटमध्ये एकेकाळी भलेभले ज्यांना टरकायचे त्या वेस्ट इंडियन्सची सद्दी सुद्धा तिसर्‍या वर्ल्ड कप मध्ये संपलीच की! ऑस्ट्रेलियानं लायनीत तीन घेतलेत. पण सध्या त्यांची हालत काय आहे ते सारी दुनिया बघतेच आहे! वैयक्तिक खेळाचं उदाहरण द्यायचं तर परवा फेडररचं काय झालं? तिथं एफ-वन मध्ये शूमाकरचं काय चाललंय? तेच ब्राझीलचं झालं आज! सलग सातवेळा विम्बल्डन फायनल गाठून त्यातील सहा वेळा ती स्पर्धा जिंकणारा फेडररसुद्धा ग्रासवरच पराभूत होऊ शकतो ही गोष्ट इतर खेळाडूंसाठी किती आशादायी आहे! खरंतर जेव्हा एखादा संघ किंवा खेळाडू त्या त्या खेळावर निर्विवाद वर्चस्व गाजवत असतो तेव्हाच खरंतर तो खेळ रटाळ ठरण्याची शक्यता असते. २००४ सालाचं एफ-वन चं उदाहरण घे. रेसेस बघायला कंटाळा यायचा, कारण? कारण एकच, माहिती असायचं फेरारीच्या दोन्ही कार्स पहिल्या तीनात असणारच. (शूमाकर-बॅरिकेलो होते तेव्हा त्यांचे ड्रायव्हर्स. एकूण १८ रेसेस पैकी शूमाकरने १३ आणि बॅरिकेलोने २ अशा १५ रेसेस फेरारीने जिंकल्या होत्या. :) ) अशा सम्राटांचं वर्चस्व असलेलं वातावरण मोनोटोनिक ठरू शकतं. पण असे सम्राटच पुन्हा नवं साम्राज्य उभं करण्याची ताकद बाळगून असतात हेही तितकंच खरं! :) असो.

हा प्रतिसाद तुझ्या वरच्या प्रतिसादाला उत्तर म्हणून दिलेला नाही. तुझं ते 'ब्राझील नाही तर फुटबॉलला अर्थ नाही' वगैरे विधान अगदीच उथळ वाटलं म्हणून हा प्रतिसाद. बाकी चालू द्या! :)

छोटा डॉन's picture

3 Jul 2010 - 12:28 am | छोटा डॉन

तुमच्या असहमतीला आमची सहमती.
आंतरजालावर प्रत्येक बाबतीत सर्व सहमत असावे किंवा प्रत्येकालाच प्रत्येकाच्या भावना समजाव्यात असा आमचा कधीही आग्रह नव्हता, नसेलही.

बाकी जो फुटबॉल आम्ही गेल्या १२-१५ वर्षात पाहिला व जेष्ठांकडुन ऐकला त्यात उरुग्वे कुठेच नव्हती.
आमचे वडिल म्हणतात अर्जेंटिना ... कारण, मॅराडोना !
मोठ्ठे भाऊ, काका वगैरे म्हणतात ब्राझिल ... कारण रोनाल्डो, रिवाल्डो, रॉबर्टो कार्लोस वगैरे ( ते आम्हीही पाहिले हा भाग वेगळा )
मी म्हणतो स्पेन ... कारण, इनियेस्टा व्हिला ओलेन्सो पुयॉल रॅमॉस वगैरे मी स्वतःच्या डोळ्याने ऑसम खेळताना आणि वेगवेगळ्या लीगा गाजवताना पाहिले...

आम्ही जे पाहिले किंवा समोरच्याने ज्यावर जीव ओतताना पाहिले तेवढीच आमची समज आणि तेच आमचे "वैयक्तिक" मत !

एकच सांगतो, जरी 'सी.के. नायडु आणि गावस्कर लै भारी क्रिकेटर होते हे खरे असले तरी आम्ही ज्या क्रिकेटला ओळखतो ते क्रिकेट सच्या आणि गांगुलीचे, ते जर नसतील तर क्रिकेट आमच्यासाठी संपले'. हे आमचे वैयक्तिक मत, कुणाला हा 'मुर्खपणा' आहे असे म्हणायचे असले तरी आमची हरकत नाही.
त्याबाबतील आम्हाला खरोखरच समज अत्यंत मर्यादित आहे.

उरुग्वे आम्ही पाहिला नाही त्यामुळे त्याच्याविषयी ममत्व नाही.
क्षमस्व !

------
छोटा डॉन

मेघवेडा's picture

3 Jul 2010 - 12:35 am | मेघवेडा

उत्तर खरडवहीत दिलेले आहे. तू टार्‍याला उद्देशून एका धाग्यात/प्रतिसादात लिहिलेलं तुझंच एक वाक्य तुलाच लागू होतंय डान्या. सुअसांनल!:)
असो. इतंच थांबू. :)

अप्पा जोगळेकर's picture

3 Jul 2010 - 9:19 am | अप्पा जोगळेकर

खरंतर जेव्हा एखादा संघ किंवा खेळाडू त्या त्या खेळावर निर्विवाद वर्चस्व गाजवत असतो तेव्हाच खरंतर तो खेळ रटाळ ठरण्याची शक्यता असते
+१

अशा सम्राटांचं वर्चस्व असलेलं वातावरण मोनोटोनिक ठरू शकतं. पण असे सम्राटच पुन्हा नवं साम्राज्य उभं करण्याची ताकद बाळगून असतात हेही तितकंच खरं!
+१००

चतुरंग's picture

2 Jul 2010 - 11:52 pm | चतुरंग

जी टीम जिंकेल त्याला मुक्त प्रशंसा मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे.
ब्राझील आवडती टीम होती असे म्हणावे लागेल हेच खरे. आता जुनी टीम राहिली नाही. गतवैभवावर दिवस काढणे काही खरे नसते!
कोणे एकेकाळी भारत हॉकीचा जगज्जेता होता म्हणून आजची हॉकी ही हॉकी नव्हेच असे म्हणून आपण स्वतःशी आणि खेळाशी प्रतारणा करतो!

उद्याच्या सामन्यात का कोण जाणे मला तरी अर्जेंटीनाबद्दल आपलेपणा वाटतोय! ते जिंकतील असे वाटते आहे. पण जर्मनी बाहेर जातील ह्या कल्पनेने वाईटही वाटते आहे. व्दिधा..द्विधा..:(
चतुरंग

सागर's picture

3 Jul 2010 - 12:10 am | सागर

खरे आहे चतुरंगराव

गतवैभवावर दिवस काढणे काही खरे नसते!

पूर्ण सहमत.. म्हणूनच यावेळी आपण पहिल्यापासून ब्राझीलच्या बाजूने नव्हतो :(

मेघवेडा's picture

3 Jul 2010 - 12:19 am | मेघवेडा

>> कोणे एकेकाळी भारत हॉकीचा जगज्जेता होता म्हणून आजची हॉकी ही हॉकी नव्हेच असे म्हणून आपण स्वतःशी आणि खेळाशी प्रतारणा करतो!

=D>

सहमत आहे.

प्रभो's picture

3 Jul 2010 - 12:09 am | प्रभो

डॉन्राव, इतिहास थोडा कच्चा पडतोय का हो??.....उरुग्वे आतापर्यंत २ वेळा विश्वविजेते बनलेले आहेत...यावेळेस ते बनतील तर ते तिसर्‍यांदा असतील.......... आपण कोणी त्यांचा फुटबॉल बघत नसू ...म्हणून त्यांच्या फुटबॉलच आम्हाला मान्य नाही. हे म्हणणे मला मान्य नाही...

याबाबतीत तुमच्या मताशी फरकत आहे....

आलेत मोठे फुटबॉल बघणारे!

फुटबॉल खेळणारे पण म्हणा निळोजी राव ;)

ब्राझीलचा साखळी सामन्यात खेळ पाहिला तवाच कळालं व्हतं की सेमीफायनलच्या टिमांत ह्या टीम चा पत्ता कट होणार. ब्राझीलने ह्यावेळी तंत्रापेक्षा धसमुसळ्या खेळावर जास्त भर दिला होता तेव्हा रेड कार्ड मिळणारच होतं... खरे तर आधीच मिळाले असते पण रेफ्रीने दया दाखवली होती.

आम्ही मनस्वी फुटबॉलवर प्रेम करतो. जो चांगला खेळतो त्यांच्यावर प्रेम करतो...
ब्राझीलप्रेमी आम्ही पण होतो एके काळी ... पण तो काळ गेला आता. रोनाल्डो ने स्वतःच्या बळावर ब्राझीलला वर्ल्डकप मिळवून दिला होता. तो चार्म रोबिन्हो व फॅबियानोत कधीच वाटला नाही.
काकाने त्याच्या किर्तीस साजेसा खेळ केला नाही. काका टीममधे असतानाही आधी ब्राझील हरली होती क्वालिफाईंगला

ब्राझील हरणार हे आम्ही मॅच च्या आधीच ओळखले होते त्याचे महत्वाचे एक कारण म्हणजे एलानो ची इंजुरी. हॉलंडविरुद्ध एलानो असता तर चित्र वेगळं दिसलं असतं हे माझंही मत होतं. पण एलानोच्या नसण्याची किंमत ब्राझीलला हरुन चुकवावी लागली ...

Nile's picture

2 Jul 2010 - 11:51 pm | Nile

असहमत आहे. ब्राझिल थोडासा वेगळा खेळत असला (आणि त्यासाठी डूंगावर टिकाही होत असली) तरी ब्राझिल उपात्यं फेरीतच बाहेर जाणार असे म्हणण्यासारखे काही नव्हते.
तसे पाहता, स्पेन, जर्मनी एक गेम हारली आहेच की ह्या कपात. आणि ब्राझिल नुकतेच कोपा आणि फेडरेशन कप जिंकुन आली होती. सद्ध्याच्या फिफा रँकिग्नज नुसारही ब्राझिल १ नं होतीच. शिवाय चीली विरुद्धच्या मॅचमध्ये ब्राझिल चांगले खेळले होतेच. ते असो.

असे खात्रीने सांगता येत असते तर फुटबॉलमध्ये अपसेट झालेच नसते. :)

त्यामुळे आज ते हगले इथे विषय संपला, विना ब्राझिल फुटबॉल म्हणजे निम्मी मजा कमी हे सांगावे लागावे हीच गंमत.

-Nile

छोटा डॉन's picture

3 Jul 2010 - 12:00 am | छोटा डॉन

>>त्यामुळे आज ते हगले इथे विषय संपला, विना ब्राझिल फुटबॉल म्हणजे निम्मी मजा कमी हे सांगावे लागावे हीच गंमत.
+१
निळ्या अगदी मनातले बोलला.
कट टु कट सहमत.

बाकी वेस्ली स्नायडरची इंटरला चॅम्पियन्स लीग मिळवुन देण्याची कामगिरी आणि आयन रॉबेनचा दरारा ह्यावरही आम्ही फिदा आहोतच की.
पण साला ब्राझिल हरला, लै लै लै वाईट वाटले.
हवे तर जर्मनीप्रेमी बिपिन कार्यकर्त्यांना विचारा, ह्या माणसाचा दुसर्‍या मिनिटाला फोन आला ' हे असे कसे झाले?' हे विचारायला.

------
छोटा डॉन

विना ब्राझिल फुटबॉल म्हणजे निम्मी मजा कमी हे सांगावे लागावे हीच गंमत

आम्ही कुठे असे म्हटले की ब्राझील गेली तर अजून मज्जा आली???
असे नका करु निळोजी राव...
ब्राझील हरल्याचे दु:ख मलाही झाले आहे... पण डॉन्याला खरड्ल्याप्रमाणे
फक्त दु:ख झाले आहे..हळहळ नाही वाटली...
ती उद्या होणार आहे...

उद्या अर्जेंटीना व जर्मनी यापैकी कोण हरावे असे विचारणे म्हणजे चाकूने कापलेले आवडेल की कोयत्याने कापलेले आवडेल हे विचारण्यासारखे आहे

त्यामुळे मी आताच रजा घेतो आहे.. उद्या काही मी ऑनलाईन येणार नाय...

कोणासाठी ह़ळहळू तेच कळत नाहीये :(

बाकी तुमचे व डॉन्याचे चालू द्या...
आम्ही कधीतरी धूमकेतूसारखे अवतरणारे खेळाडू

कधीकाळी प्रोफेशनल फुटबॉल खेळाडू होतो म्हणून नको तेवढे समजते यातले ;)

Nile's picture

3 Jul 2010 - 12:15 am | Nile

असहमतीचे कारण.

जेव्हा स्पेन हरली किंवा जर्मनी हरली पहिल्या फेरीत तेव्हा आम्ही त्यांना शिव्या दिल्याच. कारण ते हरणे म्हणजेच हगणे होते. तसेच आज झाले.

उद्या जर्मनी-अर्जेंटीना ह्या तुल्यबळ संघात लढत होउन सामना मजेदार होणार कुणी तरी हरेल म्हणुन मलातरी दु:ख होणार नाही. पण एक टीम जर सुमार खेळुन हरली तर मात्र वाईट वाटेलच.

बाकी प्रोफेशनल फुटबॉल मीही खेळलो आहे, ६ वर्ष. पण त्याचा इथे काही संबंध नाही.

-Nile

प्रभो's picture

3 Jul 2010 - 12:19 am | प्रभो

नायल्याशी बर्‍याच दिवसांनी सहमत......

कोणीही हारा कोणीही जिंका, पण चांगला खेळ करून..हागून नाही.....

>>माझ्यामते ब्राझील ला फायनल मधे गृहीत धरणार्‍या लोकांनी प्रतिसाद देण्याचा मोठेपणा दाखवावा आता.
आमचे मौन हे आमची कमजोरी समजु नये म्हणुन हा प्रतिसाद ...

असे मुद्दाम लिहिले रे डॉन्या... नाहीतर तू आपला दु:खात बुडून गेला असतास..एकटाच...

असे लिहिले नसते तर लगेच पेटून उत्तर दिले असते का?

मित्राला असे दु:खात वार्‍यावर कोण सोडते होय?... अरे एका टेबलावर पेय घेतलेले मित्र आपण... तुझे दु:ख मोकळे व्हावे म्हणून बत्ती दिली होती... मित्राच्या मोठ्या मनाने क्षमा कर....

ब्राझील हरल्याचे दु:ख मलाही आहे. पण हळहळ मात्र अजिबात नाही.
ती उद्या होणार आहे...

अर्जेंटीना की जर्मनी... दोन्ही फुल्ल फेवरीट टिमा आहेत.
यातली कोणती टीम हरावी असे विचारणे म्हणजे सुरीने कापू का कोयत्याने कापू असे विचारण्यासारखे आहे.. उद्या मी काही ऑनलाईन येणार नाही...
अर्जेंटीना माझी जास्त फेवरीट आहे ती मेस्सी आणि ह्ग्युएन मुळे ... मेस्सीने गोल नाही केला अजून पण अर्जेंटीनाच्या प्रत्येक गोलमधे त्याचा मोठा वाटा होता...

उद्या कोणासाठी रडावे हेच कळत नाही

(उद्विग्न) सागर

टारझन's picture

4 Jul 2010 - 12:10 am | टारझन

सागरा ... प्राण तळमळला ... तलमळला ... प्राण तळमळला

- तळमळकर मास्तर

शेवटी ज्याची भिती होती तेच झाले.. जर्मनीने खच्चून मारली अर्जेंटीनाची
टार्‍या प्राण तळमळेन नाही तर काय? ... आपल्या आवडीच्या दोन टीमा भिडल्या अन् एक बाहेर गेली तो मजा क्या? अर्जेंटीना जास्त आवडीची होती पण जर्मनीच्या तगड्या डिफेन्स ची पण खात्री होती.. अर्जेंटीनाकडून गोल मारायचा दम फक्त एकट्या मेस्सीत होता पण जर्मनांनी त्याला फिरू सुद्धा दिले नाही जवळ. :(

ऋषिकेश's picture

3 Jul 2010 - 9:42 am | ऋषिकेश

हास्यास्पद म्हणवल्या जाणार्‍या दाव्यांनी योग्य ते उत्तर दिलं ;)
असो.. स्पेनला सपोर्ट होता आणि आहे..

सागर,
तुझा फायनलला सपोर्ट कुणाला आहे?

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

सागर's picture

3 Jul 2010 - 10:21 pm | सागर

एवढेच बोलतो. अर्जेंटीनाच्या एकतर्फी पराभवाने निराश झालोय :(

गणपा's picture

29 Jun 2010 - 8:33 pm | गणपा

आपुन दोन पावलं पुढे जाऊन बोल्तो

ब्राझील
------->ब्राझील
घाना
-------------------->जर्मनी
स्पेन
-------> जर्मनी
जर्मनी

मेघवेडा's picture

29 Jun 2010 - 8:37 pm | मेघवेडा

आपुन चार पावलं पुढे..

हॉलंड
--(२-०)------>हॉलंड
घाना
-------------(२-१)------>जर्मनी
स्पेन
--(पेनल्टी)--> जर्मनी
जर्मनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jun 2010 - 10:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ए, तू जर्मनीला सपोर्ट करत होतास ना? मग माझी भगवी टोपी का पळवतोस?

उगाच थुक्कापट्टी करायची तर माझीपणः
हॉलंड
पोर्तुगाल
जर्मनी
....

अदिती

मेघवेडा's picture

29 Jun 2010 - 10:43 pm | मेघवेडा

ओ बै, आधी प्रतिसाद नीट वाचा मग उत्तर द्या.. मी काही भगवी टोपी पळवत नाहीये. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jun 2010 - 10:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सगळ्यात वर नाव कोणाचंय?

अदिती

मेघवेडा's picture

29 Jun 2010 - 10:52 pm | मेघवेडा

:T

जाऊ दे तुला काय समजावू आता.. ~X(

Nile's picture

29 Jun 2010 - 10:53 pm | Nile

हॅ हॅ हॅ, हॅपी बड्डे! ;)

-Nile

मेघवेडा's picture

29 Jun 2010 - 10:54 pm | मेघवेडा

खरंच थ्यांक्यू! :D

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jun 2010 - 11:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझं पण ह्याप्पी बड्डे हा! ;-)

अदिती

मेघवेडा's picture

29 Jun 2010 - 11:16 pm | मेघवेडा

=)) =))
याहून मोठ्ठा इनोद कधी बघितला नव्हता ब्वॉ मी.. आता काय हसवून हसवून जीव घेणारेयस का अदिती? ;)

Nile's picture

29 Jun 2010 - 11:24 pm | Nile

अय्या, किती छान छान प्रतिसाद सुचताग गं अदिती तुला! ;)

-Nile

धमाल मुलगा's picture

30 Jun 2010 - 1:39 am | धमाल मुलगा

जाऊ द्या राव...
बाई हाय ती! काय यवढं मनावर घ्येताय? ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jul 2010 - 2:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इथे एक वाईट कमेंट सुचली होती, पण नको!

धम्या, तुला नाही ना काही कळत फुटबॉलमधलं.... तर मग गप्राऽऽऽव!

अदिती

सागर's picture

2 Jul 2010 - 2:20 pm | सागर

धम्याला फुटबॉलमधलं चांगलंच कळतं
बायको चांगला फुटबॉल करत असते त्याचा :D
कधी कधी अंदाज चुकतात त्याचे

म्हणूनच त्याला हॉलंडच्या ऐवजी ब्राझील चे स्वप्न पडते चुकुन ;)
बाकीच्या ३ टीमा बरोब्बर आहेत

Nile's picture

29 Jun 2010 - 10:45 pm | Nile

हॉलंड
पोर्तुगाल
जर्मनी
....

अदिती <== च्यामारी बिस्किट!! ही कोणती नवी टीम बे!!!

-Nile

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jun 2010 - 10:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मोठा हो, मग कळेल हो तुला बाळ!!! :p

अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jun 2010 - 10:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रकाटाआ

Nile's picture

2 Jul 2010 - 7:47 pm | Nile

नेदरलंड!!! =)) =)) =)) =))

-Nile

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jul 2010 - 9:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हस, आता हस, मेल्या निल्या!

अदिती

चिन्मना's picture

29 Jun 2010 - 8:45 pm | चिन्मना

उरुग्वे
ब्राझील
जर्मनी
स्पेन

पहिले ३ नक्की. स्पेन हे खरं म्हणजे उगीचंच वाटतंय - कागदी वाघ लेकाचे... आत्ताही उडाले तर मला आश्चर्य वाटणार नाही.

भडकमकर मास्तर's picture

30 Jun 2010 - 12:16 am | भडकमकर मास्तर

फिजी
ग्वाटेमाला
तैवान
श्रीलंका

काय सारखीसारखी तीच्तीच नावं लिहायची राव..

आंबोळी's picture

30 Jun 2010 - 2:51 pm | आंबोळी

काय सारखीसारखी तीच्तीच नावं लिहायची राव..
सहमत आहे.

भारत
पाकिस्तान
बांगलादेश
नेपाळ

आंबोळी

रंगोजी's picture

2 Jul 2010 - 12:22 pm | रंगोजी

जरा कब्बडी विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यांसारखा वाटतय!!

सागर's picture

2 Jul 2010 - 2:07 pm | सागर

माझे अंदाज

उरुग्वे की घाना? - उरुग्वे
ब्राझील की नेदरलँड्स? - नेदरलँड्स
जर्मनी की आर्जेंटीना? - अर्जेंटीना
पोर्तुगल / स्पेन की पॅराग्वे / - स्पेन

फायनल नेदरलँड्स व अर्जेंटीनात झाली तर खूप धमाल येईल...

लिहून ठेवा... अर्जेंटीना विश्वकप मारणार यावेळी :)
मग मॅराडोनावर ताशेरे ओढण्यासाठी पेलेला पेल्यात बुडवुन घ्यावे लागेल

हे मी स्वप्न समजू की तंतोतंत जुळणारा अंदाज????
मलाच कळत नाही जाऊ देत ;)

Nile's picture

2 Jul 2010 - 7:47 pm | Nile

नेदरलंड!!! =)) =)) =)) =))

-Nile

सागर's picture

2 Jul 2010 - 10:39 pm | सागर

काय बोलू?.. हसू येतंय ब्राझीलची पुंगी वाजवणार्‍यांचं
=)) =)) =))

रंगोजी's picture

3 Jul 2010 - 12:34 am | रंगोजी

तशीही नेदरलँड्सवाल्यांनी ब्राझीलची पुंगीच वाजवली की!!
;) ;)

- रंगोजी

प्रभो's picture

2 Jul 2010 - 7:49 pm | प्रभो

ब्राझीलचा एक गोल झालापण.......

Nile's picture

2 Jul 2010 - 9:22 pm | Nile

माझे प्रतिसाद डीलीट करा रे. *#&(@)@&(#)@*@)(&#)(@)@*@&#@(@@)

-Nile

घाटावरचे भट's picture

2 Jul 2010 - 9:31 pm | घाटावरचे भट

हॅ हॅ हॅ ब्राझिल म्हणे...

उपास's picture

2 Jul 2010 - 10:52 pm | उपास

हायला..
ब्राझील लोळला चक्क.. पटतय ना जे पी बेभरोवशाची टीम का म्हणाला ते.. :ड
उपास मार आणि उपासमार

रंगोजी's picture

3 Jul 2010 - 12:26 am | रंगोजी

न पटून सांगतायत कुणाला??

- रंगोजी

उपास's picture

4 Jul 2010 - 3:23 pm | उपास

ब्रिटिं साहेब,
ब्राझीलने शेण खाल्ल.. घोडा बुजला.. पण बाकी घोडे आले शर्यतीत..
जर्मनी सरळ सरळ समोरच्याला लोळवून विश्वचषकातला थरार कमी करतेय असं वाटतय.. (जसा ऑस्ट्रेलियाने २ वर्ल्ड कप केलं)

उपास मार आणि उपासमार

उपास's picture

4 Jul 2010 - 3:34 pm | उपास

प्रकाटाआ