(गळ)

मोहन's picture
मोहन in जे न देखे रवी...
25 Jun 2010 - 4:29 pm

आमचाही एक प्रयत्न. वाहत्या गंगेत ...

कोणे एके काळी
गळ टाकून मासे पकडायचा आमचा छंद
कधी बसमधे ,कधी कॉलेज कट्टयावर तर कधी चौकात
प्रत्येकाचा गळ वेगवेगळा

गळ जास्त मासे मोजकेच
पण छंदात आम्ही धुंद
एकमेका सहाय्य करायचा पंथ
हार मानायची नव्हती , होतोच बेधुंद

मासा गावायला धीर लागतो
जरा जाग येवून पाहतो
तर मासेपारधी गळ विकून बांधलेले दिसले दावणीला
मी मात्र आताशा करतोय समुपदेशन ... मासा टू मासा

मोहन

करुणविडंबन

प्रतिक्रिया

सहज's picture

25 Jun 2010 - 4:36 pm | सहज

आकडा वाढतच चालला आहे!

गणपा's picture

25 Jun 2010 - 4:41 pm | गणपा

हे हे हे
आरे आवरारे ह्यांना आता
२० मासे लागलेत सध्या नानाच्या गळाला

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Jun 2010 - 4:54 pm | बिपिन कार्यकर्ते

हे एक अज्जून .... चांगलंय... ही खरी वास्तवदर्शी कविता. ;)

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

25 Jun 2010 - 5:22 pm | अवलिया

छान !

--अवलिया