(धूळ)

llपुण्याचे पेशवेll's picture
llपुण्याचे पेशवेll in जे न देखे रवी...
25 Jun 2010 - 1:47 pm

विडंबन यज्ञात आमची एक शुल्लक आहुती

हातात झाडू
घेवुन आम्ही झाडायचो
ती एका कोपर्‍याला साफ ठेवायची अन्
मी दुस-या कोपर्‍याला साफ ठेवायचो

झाडू सावरत
झाडत असताना पुसत असतांना
रस्ते प्रत्यक्षातही चकाकायचे
एकमेकांना हलकेच चोरुन बघायचो

मुकादमाच्या गाडीवरून
कधीतरी तिची ड्यूटी बदलून गेली
मी मात्र मारतो झाडू रस्त्यांवरून
झाडूवाल्यासारख्या कायम...हा कोपरा ते तो कोपरा.

भयानकवावर

प्रतिक्रिया

नंदन's picture

25 Jun 2010 - 1:49 pm | नंदन

दुसरे विडंबनसम्राटच बाकी होते :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Jun 2010 - 1:52 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा!!!!!!!!!!! आज परत पेटतंय आता...

एक सूचना:

मुकादमाच्या गाडीवरून
कधीतरी ती तोर्‍यात बसून निघून गेली

हे कसं वाटतंय. :D

बिपिन कार्यकर्ते

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jun 2010 - 1:58 pm | llपुण्याचे पेशवेll

वाटतंय तर चांगलं. पण कसं आहे बदललेल्या 'ड्यूटी'त जो अर्थ आहे तो "तोर्‍यात निघून गेली " असं म्हटलं तर अगदीच विस्कटून सांगितल्यासारखा होईल. नाही का?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

छोटा डॉन's picture

25 Jun 2010 - 3:22 pm | छोटा डॉन

>>पण कसं आहे बदललेल्या 'ड्यूटी'त जो अर्थ आहे तो "तोर्‍यात निघून गेली " असं म्हटलं तर अगदीच विस्कटून सांगितल्यासारखा होईल. नाही का?
सध्या जे आहे तेच 'सुचक' आहे.

पुप्या, कविता आवडली रे, मस्त जमते आहे रे तुला विडंबन वगैरे ...

------
छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jun 2010 - 1:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या या या, पेशवे तुमचीच वाट पहात होते. बाकी कोणत्या रस्त्यावर झाडता म्हणे तुम्ही हल्ली?? (हो, हो, आठवतं आहे, आपलं काय ठरलं आहे ते!)

अदिती

सहज's picture

25 Jun 2010 - 1:57 pm | सहज

पुपे विडंबन मस्तच!

मेघवेडा's picture

25 Jun 2010 - 3:16 pm | मेघवेडा

झकास हो पेशवे! झाडून सगळ्या विडंबकांनी विडंबनं पाडली होती, तुम्हीच बाकी होतात! मजा आला! वा वा!

केशवसुमार's picture

25 Jun 2010 - 3:19 pm | केशवसुमार

आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
अस गाव भर बोबलून पुन्हा चुकला पीर मशीदीत परत..
चालू दे..
साफसफाई उत्तम .. ड्यूटी शी सहमत
(सुकादम)केशवसुमार

मस्त कलंदर's picture

25 Jun 2010 - 3:38 pm | मस्त कलंदर

छान झाडू फिरवला आहेस रे.. उत्तम विडंबन!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

आंबोळी's picture

25 Jun 2010 - 3:41 pm | आंबोळी

सुंदर...
ड्युटी आवडली...

आंबोळी

चतुरंग's picture

25 Jun 2010 - 4:54 pm | चतुरंग

मस्तच झाडलाय!! ;)

(कंत्राटदार)चतुरंग

गणपा's picture

25 Jun 2010 - 4:57 pm | गणपा

आयला एवढ्या गाळात ही धुळ झटकायाची राहुनच गेली होती.
चांगलू धुळ उडवली आहे :)

शुचि's picture

25 Jun 2010 - 5:17 pm | शुचि

>> एकमेकांना हलकेच चोरुन बघायचो>>
शी बाई चावट!!

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अवलिया's picture

25 Jun 2010 - 5:24 pm | अवलिया

तरीच म्हटलं आमचे शेट कुठे गेले?

--अवलिया

प्रभो's picture

25 Jun 2010 - 6:38 pm | प्रभो

पुप्या ब्याक इन फॉर्म......सही रे!!

श्रावण मोडक's picture

26 Jun 2010 - 11:18 am | श्रावण मोडक

आलात परत लायनीवर. बरं वाटलं.

दत्ता काळे's picture

26 Jun 2010 - 11:23 am | दत्ता काळे

भारी जमलंय विडंबन.

भडकमकर मास्तर's picture

26 Jun 2010 - 5:16 pm | भडकमकर मास्तर

अहाहा... झाडलोट, कोपरे, गाडी आणि मुकादम...
मस्त ...आवडले....

विसोबा खेचर's picture

26 Jun 2010 - 6:34 pm | विसोबा खेचर

जबरा..!

pravinkh's picture

26 Jun 2010 - 7:08 pm | pravinkh

छान पण छोटिच............

वाहीदा's picture

26 Jun 2010 - 8:33 pm | वाहीदा

रस्ते प्रत्यक्षातही चकाकायचे
एकमेकांना हलकेच चोरुन बघायचो

मी मात्र मारतो झाडू रस्त्यांवरून
झाडूवाल्यासारख्या कायम...हा कोपरा ते तो कोपरा.

रस्ते इतके चकाकायचे की तुम्ही एकमेकांना हलकेच चोरुन बघायचे ?? कुठला फिनेल / पावडर वापरत होता ?? :?

असो किती रस्ते अन कोपरे झाडून पुसून लक्ख केले ?? :?
झटका दिया ...
~ वाहीदा