रोहीडा: बिनीचा किल्ला उर्फ विचित्रगड

प्रचेतस's picture
प्रचेतस in कलादालन
22 Jun 2010 - 10:03 am

२० जूनला सकाळी कुठेतरी भटकायला जायचे ठरले आणी लगेच ठिकाणही ठरले ते म्हणजे भोरजवळील रोहिडा किल्ला बरेच दिवस तो करण्याचे मनात होते पण काही केल्या जमत नव्ह्ते. आज योग जुळून आला. आम्ही चौघे मित्र निघालो ते मित्राच्या चारचाकीने. सव्वा तासातच भोरपासून ८ किमी असलेली बाजारवाडी गाठली. बाजारवाडी हे रोहीड्याच्या पायथ्याचे अतिशय सुंदर असे गाव. गावापासून लगेच चढाईला सुरुवात होते.

पावसामुळे हवेत मस्त गारवा पसरला होता. शेतं हिरवीगार झाली होती. काळे ढग मधूनच बाजूला सरकून निळाइचे दर्शन घडवत होते. रोहिडयाचे दो बाजूंचे बुलंद बुरुज ठळकपणे दिसत होते. वाटेत रानफुले तसेच कवके उमलली होती. आम्ही त्यात आमची मॅक्रो फोटोग्राफीची हौस पुरवून घेतली.

रोहीड्याची चढण ही किल्ल्याच्या दांडावरून जाते. चढाई अतिशय सोपी आहे. वाटेत तसेच किल्ल्यावर सौरदिवेही बसवलेले आहेत. तासाभरातच पावसाच्या काही सरी झेलत आम्ही किल्याच्या पहिल्या दरवाजापाशी पोहोचलो.


पहिल्या दरवाजाच्या चौकटीवर अस्पष्टशी अशी गणेशपट्टी आहे. येथे नुकताचा लाकडाचा जुन्या काळाप्रमाणे दरवाजा बसवला आहे. पुढे १५/२० पायर्‍या पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो. येथून आत गेल्यावर जवळच पाण्याचे भुयारी टाके आहे. येथून ५/७ पायर्‍या पुढे गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो. येथे दोन्ही बाजूंना हत्तीचे शिर कोरण्यात आलेले आहे. डाव्या बाजूला मराठी(मोडी) व उजव्या बाजूला फारसी शिलालेख आढळतो.

येथून आत गेल्यावर समोरच वाड्याचे व सदरचे अवशेष दिसतात. डावीकडे जिर्णोद्धारीत रोहीडमल्लाचे मंदीर आहे. व उजवीकडे ध्वजकाठी आहे.


आम्ही आता उजवीकडून जाण्यास सुरुवात केली. गडाच्या सर्व बाजूंना भक्कम असे एकूण सहा बुरुज आहेत. गडाच घेर तसा लहानच. पण अतिशय परिपूर्ण असा हा किल्ल आहे. गडाची सर्व वैशिष्ट्ये रोहीड्यात ठासून भरली आहेत. भक्कम दरवाजे, चोरदरवाजा, चोरवाटा, अभेद्य बुरुज, बुरुजांना मारगिरीसाठी असलेल्या जंघ्या, तटबंदी, पाण्याची खोदीव व कोरीव टाकी, पाण्याचे तलाव, कोरीव काम, शिलालेख आदी सर्व काही रोहिड्यावर आहे.


गडाच्या उत्तरेकडील भागात असलेली पाण्याची टाकी अतिशय प्रेक्षणीय आहेत. एकात एक गुंतलेली व उतारावर बांध घातलेली ही टाकी आहेत. थोडे पुढे चुन्याची घाणी आहेत.


गडावरून परिसराचे अतिशय सुरेख दर्शन होते. राजगड धुकटात गुरफटल्यामुळे दिसला नाही. केंजळगड व रायरेश्वरापासून येणारे ढग रोहीड्याला धडका मारून पुढे पुरंदरावर पाउस घेउन जात होते. मधूनच क्षणभर कोवळे उन पडत होते.


सर्व गड पाहून आम्ही तृप्त मनाने गड उतरण्यास सुरुवात केली. उतरताना सारखी मागे रोहीड्याकडे नजर जात होती. खाली शेत नांगरणीचे दृश्य मोठे सुरेख दिसत होते.
गड उतरून आम्ही पायथ्याला आलो. परत एकदा रोहीड्याचे डोळे भरून दर्शन घेतले. मनात सह्याद्री व शिवाजीमहाराज या दोन मैत्रसख्यांचा अभिमान दाटून आला.


आता मन थोडेसे उदास झाले होते कारण ह्या रम्य निसर्गामधून आम्हाला आता पुण्यासारख्या रूक्ष ठिकाणी परत जायचे होते.

कॅमेरा: कॅनन पॉवरशॉट एस एक्स ११० आय एस

प्रवास

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

22 Jun 2010 - 10:17 am | यशोधरा

मस्त आहेत फोटो!

अमोल केळकर's picture

22 Jun 2010 - 10:20 am | अमोल केळकर

गडाची माहिती आवडली

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

शिल्पा ब's picture

23 Jun 2010 - 5:36 am | शिल्पा ब

असेच म्हणेन..फोटो छान आहेत.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पाषाणभेद's picture

22 Jun 2010 - 10:24 am | पाषाणभेद

छान आठवण जागवली.

रम्या's picture

22 Jun 2010 - 2:28 pm | रम्या

हा चुन्याचा घाणा काय प्रकार आहे?

आम्ही येथे पडीक असतो!

प्रचेतस's picture

23 Jun 2010 - 8:33 am | प्रचेतस

किल्ल्याच्या बांधकामात दगडांमध्ये चुना भरला जायचा तसेच चुन्याचा गिलावाही केला जायचा. हा चुना चुनखडीच्या स्वरूपात गडावर यायचा. तो मळून एकसंध करण्यासाठी तो गोलाकार खळग्यात टाकून त्यावर गोलाकार चक्की फिरवली जायची. असे हे चुन्याचे घाणे बहुतेक किल्ल्यांवर पाहायला मिळतात.

गणपा's picture

22 Jun 2010 - 4:34 pm | गणपा

मस्तच.
हल्ली मिपाच कलादालन विविध गड्-किल्यांनी संमृद्ध होउ लागल आहे.
वर्णन आणि फोटो दोन्ही आवडले. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jun 2010 - 4:55 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त!!!!!

बिपिन कार्यकर्ते

प्रभो's picture

22 Jun 2010 - 6:40 pm | प्रभो

मस्त मस्त मस्त!!

किल्लेदार's picture

22 Jun 2010 - 7:15 pm | किल्लेदार

मस्त फोटो........

मदनबाण's picture

23 Jun 2010 - 5:28 am | मदनबाण

मस्त फोटु... :)

मदनबाण.....

"Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once."
Lillian Dickson

सुनील's picture

23 Jun 2010 - 7:09 am | सुनील

सुंदर फोटो आणि माहिती.

शिलालेखाची लिपी मोडी वाटत नाही, बाळबोध देवनागरीच असावी. अर्थात, विरामचिन्हांचा अभाव आणि दोन शब्दांत, वाक्यात जागा न सोडणे, ही मोडीची वैशिष्ठ्ये मात्र दिसताहेत! (म्हणूनच काही अर्थबोध होत नाही!)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्मिता_१३'s picture

23 Jun 2010 - 12:37 pm | स्मिता_१३

स्मिता

जागु's picture

23 Jun 2010 - 3:03 pm | जागु

छानच.