दारु

श्रीराजे's picture
श्रीराजे in जनातलं, मनातलं
16 Jun 2010 - 7:14 pm

मित्राहो...!
दारु बद्दल कमी लिहणं म्हणजे दारुचा तसेच पिणार्‍याचा अपमान केल्यासारख आहे. आतच एका मित्राने दारु या विषयावर mp3 file पाठवली. त्यातील चारोळ्या खाली देत आहे त्या तुम्हाला नक्कीच भावतील...

पुन्हा त्या धूंद बार मधुन
मंद सुगंध दरवळेल
आणि पुन्हा एकदा हा
तळीराम वेड्यासारखा बडबडेल....!

प्रत्येकाला एक घर असावं
पिऊन रात्री परतण्यासाठी
प्रत्येक घराला ओसरी असवी
बायकोने हाकलं की बाहेर झोपण्यासाठी..!

दारुच्या गुत्त्यावर गावर्‍यांचा गराडा हाय
पण चौथीच्या पुस्तकात मात्र दारू बंदीवर धडा हाय...!

अशी वेळ येते जेव्हा कुणीच आपलं नसतं
म्हणुन जेव्हा आपण जेव्हा प्यायला बसतो तेव्हा ड्राय डे असतो....!

ज्याची जागा त्याला द्यावी भलती चूक करु नये
पीताना फक्त पीत रहावं चकण्याने पोट भरू नये...!

आपला आवाज दणक्याच हवा उगा लाऊडस्पीकर कशाला
आरं प्यायची तर देशी प्या इंग्लीश दारु कशाला...!

इंग्लीश दारु कितीही प्यावी
काही केल्या चढत नाही
देशी आपली जरशीच प्यावी पण
दोन दोन दिवस उतरत नाही...!

पाजणारा कोण असेल
तर दारु प्यायला अर्थे हाय...
आर्र्र जर स्वतःच्या पैशान प्यायला
मी काय मुर्खय...!

पीऊन पीऊन कधी कधी बेवडापण थकतो
मग काय..
ब्र्यांड बदलुन पुन्हा प्यायला बसतो....!

तसा मी श्रध्दावान
श्रावण नेहमी पाळतो
श्रावण मात्र दारु पितो
नॉन-व्हेज मात्र टाळतो....!

दारु पीणं असतो एक उत्सव
त्याचा ऊरुस होऊ नये..
आणि प्यायल्या नंतर आपला कुणी
वकार युनुस होऊ नये....!

दारु हेच जर जीवन नसेल
तर मेलेलं बर
पणं भीती वाटतेनं मरायची
मगं प्यायलेलं बरं....!

पीऊन पीऊन माझा देह झाला खराब
माझ्या पै प्याला अन. प्याला पै शराब..!

अत्तर गुलाब पुष्पांनी तिरडी माझी सजवा
पण उधळायची फुल मात्र दारुतच भिजवा...!

अंतयात्रेस माझ्या सारेजण प्यायलेले असावेत
चार खांदेकरी मात्र अजिबात शुध्दीत नसावेत...!

तो यम जरी आला मला स्वर्गात मला न्हायला
त्याला सांगा ना र्र् बाबा...
पिऊ देना मला शेवटचा मला एकच प्याला अन..एकच प्याला.........!

Cheers...
-- श्रीराजे --

विडंबनआस्वाद

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

16 Jun 2010 - 7:20 pm | धमाल मुलगा

टांगापलटी घोडे फरार की हो!!!
काय एकेक ओळ है....एकदम खटक्यावर बोट अन माण्साचा लाकूडबाबा! =))

प्रत्येकाला एक घर असावं
पिऊन रात्री परतण्यासाठी
प्रत्येक घराला ओसरी असवी
बायकोने हाकलं की बाहेर झोपण्यासाठी..!

वा वा!! वा वा!! खरंय गड्या. :D

तसा मी श्रध्दावान
श्रावण नेहमी पाळतो
श्रावण मात्र दारु पितो
नॉन-व्हेज मात्र टाळतो....!

खॅ खॅ खॅ!!!
हम कुछ नै बोलेगा... बोलेगा तो बोलोगे के बोलता है ;)

वेताळ's picture

16 Jun 2010 - 7:30 pm | वेताळ

एकदम पहिल्या धारेच्या चारोळ्या आहेत. :D

वेताळ

नावातकायआहे's picture

16 Jun 2010 - 7:34 pm | नावातकायआहे

>>आपला आवाज दणक्याच हवा उगा लाऊडस्पीकर कशाला
>>आरं प्यायची तर देशी प्या इंग्लीश दारु कशाला...!

उद्याच दुकानी रंग्वुन घेतो

टुकुल's picture

16 Jun 2010 - 7:40 pm | टुकुल

=)) =)) =))

आमची पण एक.

संसार उध्वस्त करे दारु,
म्हणुन संसार नका करु

--टुकुल

अवलिया's picture

16 Jun 2010 - 7:41 pm | अवलिया

आलोच जरा पावशेर मारुन
आणी लिहितो भरभरुन

दारु मला सोडत नाही
मी दारुला सोडत नाही

नाते जपेल आयुष्यभर
संपेल फक्त सरणावर

मित्रहो पोचवाल मला
चार खांद्यावरुन प्रवासाला
दोन बाटल्या भरलेल्या
असु द्या माझ्या सोबतीला

--अवलिया

संदीप चित्रे's picture

16 Jun 2010 - 10:23 pm | संदीप चित्रे

न्यू जर्सीत नुकत्याच पार पडलेल्या नाट्य संमेलनात जयंत सावरकर ह्यांनी सादर केलेला 'एकच प्याला'मधला हा प्रवेश हीच ह्या चारोळ्यांना माझी दाद :)

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

sagarparadkar's picture

17 Jun 2010 - 10:14 am | sagarparadkar

टुकुल यांनी आधीच देवून टाकल्येय ...

संसार उध्वस्त करी दारू
बाटलीस स्पर्श नका करू

अन्या दातार's picture

17 Jun 2010 - 11:50 pm | अन्या दातार

पराडकरसाहेब,

अंमळ घेउनच टंकलीत वाटतं प्रतिक्रिया! :?
टुकुल म्हणतात संसार नका करु आणि तुम्ही मारे त्यांना दारु सोडा म्हणून सांगताय! =))