(गाडीवरचा तो हात!)
ह्या लेखाची प्रेरणा ही चतुरंगचा "पाठीवरचा तो हात" हा खर्या अर्थाने हृद्य अनुभव आहे. त्यावरून जरी खालील अनुभव लिहीत असलो आणि म्हणून कंसात शिर्षक दिले असले तरी, ते चतुरंगच्या लेखाचे हे कृपया विडंबन समजू नये ही विनंती. त्याच्या लेखात महाराष्ट्रातील न भूतो न भविष्यती अशा निखळ व्यक्तीमत्वाचा जसा अनुभव आहे, तसाच ह्या लेखात अजून एक व्यक्तीमत्व जे कुणाला आवड न आवडो, त्याच्या शिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही अशा व्यक्तीचा जाता जाता अनुभव आहे. इतकेच काय ते साम्य...
माझी राजकीय विषयातील आवड लहानपणापासूनची. मी साधारण सातवीत, फार तर आठवीत होतो. खोटे वाटेल पण त्या वयात मी मांडलेले काही ठोकताळे ऐकून आणि ते खरे ठरलेले पाहून आमच्या वडीलांना माझी काळजी वाटायची हे त्यांच्या नजरेतून समजायचे. असो. हा विषय माझ्याबद्दलचा नाही तेंव्हा इतके पुरे... तर अशाच सातवी-आठवीत असताना एकदा घंटाळी मैदानात एक विशेष सभा होती. त्या सभेत एक त्या काळात गाजत असलेले, महाराष्ट्राला जिच्याकडून खूप आशा होती (असे मला वाटायचे) असे एक सत्तेत नसलेले राजकीय नेतृत्व बोलायला येणार होते. वकृत्वात ही व्यक्ती फार "स्पेशल" नसावी पण सरळ, सोपे आणि स्पष्ट बोलणे, तसेच "बाईला" (अर्थात इंदिराजींना) आणि "बाईच्या हाताला" झुलवण्यात आपण कमी नाही हे या व्यक्तीमत्वाने नक्कीच दाखवले होते, दाखवले असावे, असे मला तेंव्हा वाटायचे. तर अशा तमाम काँग्रेसजनांना झुलवणारे हे व्यक्तीमत्व हे समर्थांनी सांगितलेल्या तीन गोष्टींपैकी शेवटच्या दोन गोष्टींमधे तरबेज होते: "दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वांविषयी!" असे मी तेंव्हा पर्यंत ऐकून होतो.
तर अशा या राजकीय व्यक्तीमत्वाची सभा झाली. दिल्लीतील बाईपासून ते गल्लीतील बाईपर्यंत (नुसते नावात शालीन असून काय उपयोग? ) मुद्देसूद आणि सडेतोड आगपखड केली. बघता बघता भाषण संपले. बाजूला माझा एक मित्र होता, त्याला भाषणापेक्षा सह्या गोळा करण्यात जास्त रस असल्याने, तो स्वाक्षरीपुस्तिका घेऊन आला होता. मला अशा स्वाक्षर्या गोळा करायचा काही नाद तेंव्हा नव्हता आणि आजही नाही. मात्र अनेक व्यक्तीमत्वांना भेटण्याची संधी मिळाली, काहींना नुसतीच ऐकण्याची संधी मिळाली त्या दोन्हींच्या आठवणी कायम मनात ठेवणे मी करत आलो आहे. तरी देखील त्या क्षणाला मोह झाला की आपणपण स्वाक्षरी घेतली पाहीजे. हे महाशय, अँबेसेडर गाडीत बसण्याच्या मार्गावर असताना माझा मित्र आणि असेच अजून काहीजण स्वाक्षर्या मागायला गेले. त्या क्षणिक मोहापायी, मी माझ्या मित्राला म्हणले अरे तुझ्या (वितभर रूंद) पुस्तिकेतले एक पान फाडून दे. त्याने देखील लगेच दिले. गर्दीतून मी गाडीच्या टपावर पुस्तिका ठेवून सह्या करणार्या त्या हातासमोर तो कागद ठेवला. लवकरच माझा कागद स्वाक्षरीसाठी पुढे आला, तो हात सही करण्यासाठी चालू लागला मात्र... आणि लगेच तसाच तो हात थांबला, नजरेने माझ्याकडे पाहीले आणि त्या सातवी-आठवीतील पोराला ती व्यक्ती म्हणाली, "कोर्या कागदावर मी सही करत नाही"!
हे व्यक्तीमत्व कोण हे सांगायची कदाचीत गरज भासणार नाही, तरी देखील समजले नसेल तर, तत्कालीन विरोधीपक्ष नेते शरदश्चंद्ररावजी पवार! :-)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेख
व्वा !
आदरणीय पवारसाहेब
सस्नेह विश
लै
+१ सहमत
+ १ हेच
चांगले वाक्य...
संपुर्ण
हो
-Nile
काय पण
खल्लास ...
सहजराव तुम
"चे विडंबन
खल्लास!!!!!!!!!!
मस्तच!
खल्लास
सहज हलकट
हा हा हा!! खल्लास!!!
छे..विक्टोर
असू शकेल!
पण सगळ्या
आगयायायाय
(विषय दिलेला नाही)
अगागागा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सहजराव
सहजरावांन
छान स्फूट..
अतीशय
सहमत
छा॑न
हॅहॅ
+१