पाऊस

अनिरुध्द's picture
अनिरुध्द in जे न देखे रवी...
12 Jun 2010 - 3:37 pm

(ही कवीता आधीही प्रकाशित झालेली आहे. परंतु पाऊस चालू झाला आणि ही कवीता पुन्हा टाकायचा मोह झाला. आपण आपल्या प्रतिक्रिया द्यालच ही अपेक्षा ठेवूनच हि कवीता पुन्हा टाकत आहे.)

ग्रिष्माची ती अतिदाहकता
जाळून टाकी प्राणीमात्रा
पावसाची एक सर बरसता
क्षणात येई आल्हादकता

पा़ऊस आला पाऊस आला
सर्वांना भिजवून गेला
झाडे, वेली, पाने, फुले,
गाऊ लागती आनंदी गाणे

पाऊस ओला, पाऊस हिरवा
स्रुष्टी गाते एक मारवा
पाऊस थंडी, पाऊस धुकं
स्रुष्टीला त्याचं किती कवतीकं

हिरवी शेतं, हिरवी रानं
डोळ्याचं फेडती पारणं
डोंगरावरती हिरवी दुलई
आकाशाला इंद्रधनू झिलई

हिरवे डोंगर, वाहती निर्झर
तारुण्याला येई पुन्हा भर
नदी, नालेही भरून वाहती
सागरा मिळण्या अधीर असती

आला श्रावण, गेला श्रावण
भादव्यातले संपले सारे सण
वेद लागले जाण्याचे
वेळी अवेळी बरसण्याचे

पावसातले नक्षत्र हस्त
पाऊस येई गाठून सूर्यास्त
कधी कुठे, कधी किती
वेळी अवेळी पडत जाई

गेला गेला म्हणताना
गर्जत तो येई पुन्हा
गडगडाट अन् विजांचे तांडव
भिजून जाती सारे जीव

शेवटचा तो पडला पाऊस
दिसे न त्याचा काही मागमूस
गेला तो कायमचा आता
वर्ष भराची पुन्हा प्रतिक्षा

शांतरसकविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jun 2010 - 12:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून येऊ द्या....!

-दिलीप बिरुटे

मिसळभोक्ता's picture

14 Jun 2010 - 10:10 am | मिसळभोक्ता

जरा बरे लिहिलेत, तर आम्हीही मालकाचे गुलाम राहणार नाही.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)