तुझी जीन्स पॅन्ट

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
2 Jun 2010 - 10:11 am

तुझी जीन्स पॅन्ट

तुझी जीन्स पॅन्ट चाललीय खाली खाली
काय शोभेना तूझ्या असल्या चाली ||धृ||

शॉर्ट शर्ट जाई वरती वरती
मधेच अंग दिसतया
मागं कंबर लचकवूनी
का उगा आसं चालतीया
गॉगल घालूनी बघतेस कुठे
जरा भडकच पावडर गाली
काय शोभेना तूझ्या असल्या चाली ||१||

सॅन्डल पायात घालूनी
नार नखरेदार चाले
नजरा लोकांच्या झुलवी
कानात झुबके बाळी हाले
काळीज धडधड उडे
जेव्हा स्किन टाईट जीन्स तू घाली
काय शोभेना तूझ्या असल्या चाली ||२||

अशी ग कशी फॅशन तूझी
अंग त्यातून दिसतया
कोण कोणाची तू समजना
रूमालानं तोंड झाकतीया
कापडं घालायची रीत नाही बरी
दुनिया जरी इतकी पुढे गेली
काय शोभेना तूझ्या असल्या चाली ||३||

नविनता सगळीकडे आली
हौस जीवाची करावी न्यारी
रीत जुन्या जमान्याची गेली
नव्याची आस नेहमीच लागते प्यारी
अंगभर साडी चोळी जावूनी
हि काय नविन तर्‍हा आली
काय शोभेना तूझ्या असल्या चाली ||४||

तुझी जीन्स पॅन्ट चाललीय खाली खाली
काय शोभेना तूझ्या असल्या चाली

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०५/०२/२०१०

शांतरसकविता

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

2 Jun 2010 - 2:14 pm | शानबा५१२

=)) =)) =)) =)) =)) =)) =))
मी लेखाचे नाव आणि त्यापुढे आपले नाव वाचुन खुप ह्सलो

का उगा आसं चालतीया
=))

कोण कोणाची तू समजना =))
=))

ये यार!! ही कविता(????????????????????) कोणी लिहली??? प्लीझ खर सांगा आणि अशा अजुन कविता कुठे वाचायला भेटतील ते सांगा.
खुप आवड्ली........का माहीती नाही पण कोणाची तरी आठवण आली,चांगल्या मुड मधे असताना आम्हाला अशी एखाद्याची आठवण करुन दील्याबद्द्ल आपला निषेध!!!!!!!!!!
आणि हसवल्याबद्द्ल आपले आभार!

*************************************************
You want to cope with 'Global Warming'?
Then ban porn movies!!

पक्या's picture

3 Jun 2010 - 1:05 am | पक्या

>>कोण कोणाची तू समजना
रूमालानं तोंड झाकतीया
:D
पुण्यातील पोरींसाठी हे बाकी खरं हा
जय महाराष्ट्र , जय मराठी !

स्पंदना's picture

3 Jun 2010 - 9:40 am | स्पंदना

सेंट पर सेंट पाषाण भेद!!!. कवितेची चालच ( चालायची तर्‍हा ) सांगते ते.

मला एक प्रश्न कायम पडतो..हे एव्हढ घट्ट घालुन या बाया चालतात कश्या? #:S

नाही ...मी पण वापरते सगळे मॉडर्न आउट फिट्स पण कपड्यान "आउट" होण्याइतके नाही बाबा.

कविता..नंबरी...

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.