आधुनिक अंधश्रद्धा अर्थात बुवाबाजी...

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in काथ्याकूट
1 Jun 2010 - 10:09 pm
गाभा: 

आजकाल बुवा बाबांची संख्या वारेमाप वाढलीय. पूर्वीची बुवाबाजी अत्याधुनिक रूप घेऊन आलीय. बुवा, बाबा, भगत, मांत्रिक, तांत्रिक हे शब्द बदलून स्वामी, महात्मा, गुरुजी, महाराज, सद्गुरु अशा अनेक हायटेक उपाध्यांमध्ये रूपांतरीत झालेले दिसतात.
आजचे बाबा हुशार आहेत, उच्चशिक्षितही आहेत. समाजमनाचा दांडगा अभ्यास त्यांनी केलेला असतो. मानसशास्त्रही ते कोळून प्यालेले असतात. समाजाची नाडी त्यांनी ओळखलेली असते. म्हणूनच त्यांच्या सत्संगांना हजारो लाखोँच्या संख्येने गर्दी होते.
देव, देवता, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, चौऱ्‍याऐँशीचा फेरा, आत्म्याचे अमरत्व, परमात्म्याशी तादात्म्य पावणे, कुंडलिनी जागृत करणे, मोक्षप्राप्ती अशा अवैज्ञानिक, बिनबुडाच्या संकल्पनांचा समाजाच्या अस्थिर मनावर भडीमार करीत हे बाबालोक आपणाला शरण आल्याशिवाय तरणोपाय नाही हे पटवून देण्यात यशस्वी ठरतात. अशा या भ्रामक कल्पनांच्या आहारी जाऊन सूज्ञ व्यक्तिदेखील स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी बाबांच्या चरणी गहाण ठेवतात हीच ती खरी अंधश्रद्धा. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले, आता मंगळावर मोहीम चालू आहे आणि दुसरीकडे मी मी म्हणणारे सुशिक्षितसुद्धा मोक्षप्राप्तीच्या मृगजळामागे धावतांना दिसतात. हीच ती आधुनिक अंधश्रद्धा.
एकदा का बुवाचे अनुयायी झाले की आपल्याला सुख, समाधान, शांती मिळेल अशी शरणार्थी व्यक्तिची धारणा बनते. मग ती बाबाच्या बुवागिरीत पुरती अडकते, भरडली जाते. ती कशी? ते पुढील उदाहरणांवरून स्पष्ट होईल-
बांबांच्या कंपूत किँवा कळपात फक्त शिरता येते बाहेर पडण्याचा विचार मुळापासूनच छाटला जातो.
बांबांच्या कृपादृष्टीशिवाय तरणोपाय नाही असे बिंबवले जाते.
जीवनातील दुःखे, चिँता, समस्या बाबांमुळे हमखास दूर होतील याची हमी हस्तकांकरवी दिली जाते.
आलेल्या संकटाचा किंवा अडचणीचा सामना आपण नाही तर खुद्द आपले बाबाच करतील असा विचार बळावून व्यक्ति निष्क्रिय बनते.
बांबांनी वेळोवेळी ठरवून दिलेले साधना साहित्य त्यांच्या भांडारातूनच खरेदी करण्याची अलिखित सक्ती असते.
जपमाळा, बाबांच्या प्रतिमा, फोटो, नेमून दिलेले ग्रंथ-पोथ्या, बाबांच्या गौरवार्थ त्यांच्याच मठातून प्रकाशित होणारी मासिके, विशेषांक, कँसेटस्, सीडीज, भिंतीवरची कँलेँडर्स, बाबांची छबी असलेल्या अंगठ्या, ताईत, पदके, गळ्यातल्या माळा, वह्या,पेन इ.इ. भक्ताच्या माथी मारले जाते. ते साहित्य खरिदण्याशिवाय पर्याय नसतो.
बांबांचा जाहीर कार्यक्रम वा सत्संग वा दर्शन सोहळा जेथे असेल त्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित रहावेच लागते.
अमूक रोगावर तमूक औषध म्हणून भांडारातून दिल्या जाणाऱ्‍या गोळ्या भलेही शेणा-मातीच्या असल्या तरी भक्त बाबांचे नाव घेऊन सेवन करतांना आढळतो.
बाबा म्हणतील ती पूर्वदिशा असते. का? कसे? असले फालतू प्रश्न विचारून त्यांना गोत्यात आणणाऱ्‍या भक्ताला जागीच ताकीद देण्याची तजवीज बांबांचे हस्तक करीत असतात.
सर्व भिस्त बाबांवर सोपवून निँवातपणे अध्यात्माच्या नावाखाली बाबांची व्यक्तिपुजा करण्याची सवय लागल्याने व्यक्ति वैचारिक मानसिक शारीरिकदृष्ट्या पंगु बनविली जाते.
बाबांचा अनुग्रह नामांकित व्यक्तिंनी (उदा. नेते, अभिनेते, खेळाडू इ.) घ्यावा असे जाळे हस्तकांमार्फत पसरवले जाते. बाबांचे चरणस्पर्श करा तुम्हांला अपयश येणार नाही असे त्या वलयांकितांना पटवून दिले जाते आणि एकदा का अशी व्यक्ति बाबांकडे आली की प्रसारमाध्यमांना हाताशी धरून त्या बातमीचा उपयोग बाबांची प्रसिद्धी करण्यासाठीच केला जातो. बाबांकडे नक्कीच काहीतरी अद्भूत शक्ति असल्याशिवाय ती व्यक्ति अनुग्रह घेणार नाही अशी समाजमनाची ठाम समजूत होते आणि बाबांचा कळप वाढीस लागतो.
काही व्यक्तिँच्या अगतिकतेचा, असहायतेचा गैरफायदा बुवाबाबांकडून घेतला जाऊन प्रसंगी संमोहन विद्या वापरून तिचा शारीरिक उपभोगसुद्धा घेतला जातो. बाबांना ईश्वरतुल्य मानले जात असल्याने अशी प्रकरणे मठाच्या शयनगृहातच दडपली जातात. फार क्वचितवेळा बाहेर पडणाऱ्‍या भानगडी म्हणजे हिमनगाचे टोक असते.
अशा अनेक प्रकाराने ही बाबागिरी,बुवाबाजी सामान्यजनांची लूट ठरते...

बाबांच्या भजनी लागले जाण्याची कारणे कोणती?
बहुदा ती मानसिक असतात. धावपळीच्या संघर्षमय जगात टिकून राहण्याचा तणाव प्रत्येकाच्या मनावर असतो. त्यातून उद्भवणाऱ्‍या चिँता, काळज्या, विवंचना ह्या मनोकायिक आजारांचे रूप घेऊन येतात. कितीही तपासण्या केल्या तरी शारीरिक आजार सापडत नाही. अशावेळी समुपदेशनाची गरज असते परंतु चांगले सांगणारा गोड बोलणारा कोणी भेटत नाही. पैशालाच सर्वस्व मानणाऱ्‍या या दुनियेत हितचिँतक, मित्र, स्नेही, नातलग भेटतील म्हणता भेटत नाहीत. त्रिकोणी कुटुंब व्यवस्थेमुळे म्हणा किँवा पैशापाठी धावून थकल्यामुळे म्हणा जोडीदारांमध्येही फारसा सुसंवाद होत नाही. परिणामी ताण तणाव वाढतात. मग व्यक्ति मनःशांतीच्या शोधात बाबांपर्यँत येऊन ठेपते. बाबांची अतिसमाधानी मुद्रा, तेजःपुंज चर्या, डोळ्यातील सुखाची शीतल चमक या सर्वाँचा एकत्रित परिणाम म्हणून विदीर्ण मनाच्या व्यक्तिला बाबांची ओढ लागते. बाबांचे मोहमयी दर्शन म्हणजे दुखऱ्‍या व्रणांवरचा लेप वाटतो. त्यांची मिठास वाणी व मधुर संभाषणाची नशा हवीहवीशी वाटू लागते आणि क्षणार्धात व्यक्ति बाबांची भक्त होते.
दडपणाखाली वावरणाऱ्‍या, न्यूनगंड असलेल्या किँवा पारतंत्र्य सोसणाऱ्‍या व्यक्तिँना बाबांच्या सत्संग, प्रवचनांना जाणे म्हणजे स्वातंत्र्य उपभोगणे किँवा स्वतःला सिद्ध करून दाखवणे अशा प्रकारातले असते.
काहीजण खून, दरोडे, चोऱ्‍या, भ्रष्टाचार, व्यभिचार आदी पापांचे क्षालन बाबांच्या माध्यमातून होईल अशा हेतूने बाबांच्या भजनी लागतात.
या बुवाबाजीच्या अंधश्रद्धेला लगाम घालण्यासाठी प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणे, हरेक घटनेच्या मुळाचा चौकस नजरेने शोध घेणे, स्वतःवर, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणे यासारखे उपाय अंगिकारता येतील.

प्रतिक्रिया

पक्या's picture

1 Jun 2010 - 11:13 pm | पक्या

चांगला लेख.
>>स्वामी, महात्मा, गुरुजी, महाराज, सद्गुरु अशा अनेक हायटेक उपाध्यांमध्ये रूपांतरीत झालेले दिसतात
अहो अजून एक उपाधी राहिली त्या यादीमध्ये ...बापू.

आपल्या मिपावरच्या एक ताई खवळणार हे निश्चित ;)

जय महाराष्ट्र , जय मराठी !

पिवळा डांबिस's picture

1 Jun 2010 - 11:32 pm | पिवळा डांबिस

युद्ध ताईसाहेब करणार, डॉ. दिवटे साक्षीदार |
पिडांकाका झाले पसार, पक्या मरणार निश्चित ||
:)

पक्या's picture

2 Jun 2010 - 2:01 am | पक्या

काळजी नसावी पिडाकाका :)
मी कसला इतक्या सहजासहजी मरतोय. युध्द झालेच तर विजय सत्याचाच होईल ना जे ताईंना अजून उमगलेले नाहीये .
जय महाराष्ट्र , जय मराठी !

II विकास II's picture

2 Jun 2010 - 7:26 am | II विकास II

हॅ हॅ हॅ, त्यांच्या नाडीत असेल हो ते.

हलकेच घेणे

'हितचिँतक' चा उच्चार कसा करायचा?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jun 2010 - 9:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

थोडी चूक झाली पिडांकाका! आपलं नाव आपण स्वाक्षरीत घालून त्याला "महावाक्यम्" म्हणवायचं ... कोणालातरी झाडावर चढवा तिसर्‍या चरणात; म्हणजे हे पहा:

युद्ध ताईसाहेब करणार। डॉ. दिवटे साक्षीदार।
पोरंसोरं झाडावर चढणार। पक्या मरणार निश्चित॥
॥इति पिडाकाकांचे महाविडंबन॥

(महा"गुरू") अदिती

शिल्पा ब's picture

1 Jun 2010 - 11:34 pm | शिल्पा ब

ताईच्या अदुगरच दादा खवाळले कि वं !!!
डागदरसायबांनी बराबर लिवलया ....लैच बाबा आन कंच्यातरी मातुश्त्रीच्या मागं पळतेत लोकं.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

अर्धवटराव's picture

1 Jun 2010 - 11:23 pm | अर्धवटराव

आध्यात्मीक बाबींचा काहिच अभ्यास न करता, खोट्या वैज्ञानीक निष्ठेने पछाडलेला, सरसकट सगळ्या गुरूंना एकाच मापाने तोलणारा, एककल्ली लेख !!

(बुद्धीनिष्ठ) अर्धवटराव
-रेडि टु थिन्क

फटू's picture

2 Jun 2010 - 12:20 am | फटू

आध्यात्मीक बाबींचा काहिच अभ्यास न करता, खोट्या वैज्ञानीक निष्ठेने पछाडलेला, सरसकट सगळ्या गुरूंना एकाच मापाने तोलणारा, एककल्ली लेख !!

असेलही. परंतू डॉक्टरांनी त्यांची बाजू अगदी मुद्देसुद आणि सविस्तर मांडली आहे. एका छान लेखाचा "अत्यंत फालतू लेख" अशा शब्दांत तुम्ही निकाल लावलात, तेही एका वाक्यात स्पष्टीकरण देऊन. हरकत नाही. तेव्हढा तुमचा अधिकार असावा. (अधिकार असावा??? च्यायला, मीही एखादया बाबा किंवा बुवाचा भक्त होण्याच्या वाटेवर आहे की काय?)

त्यामुळेच माझ्यासारख्या वाचकांच्या तुमच्याबद्दलच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तुमच्या स्पष्टीकरणातीलच मुद्दयांच्या अनुषंगाने डॉक्टरांची विधाने कशी सरसकट आहेत, हा लेख कसा एककल्ली आहे हे तुम्ही स्पष्ट कराल का?

फटू

अर्धवटराव's picture

2 Jun 2010 - 5:16 am | अर्धवटराव

--तुमच्या स्पष्टीकरणातीलच मुद्दयांच्या अनुषंगाने डॉक्टरांची विधाने कशी सरसकट आहेत, हा लेख कसा --एककल्ली आहे हे तुम्ही स्पष्ट कराल का?

आपण एक एक मुद्दा घेउया. फक्त एक गोष्ट मात्र लक्षात असु द्या कि माझी सर्व मते या लेखाबद्दल आहेत... लेखनकर्त्याबद्दल नाहित.
१) डॉक्टरांची विधाने कशी सरसकट आहेत,
डॉ: आजकाल बुवा बाबांची संख्या वारेमाप वाढलीय. पूर्वीची बुवाबाजी अत्याधुनिक रूप घेऊन आलीय. बुवा, बाबा, भगत, मांत्रिक, तांत्रिक हे शब्द बदलून स्वामी, महात्मा, गुरुजी, महाराज, सद्गुरु अशा अनेक हायटेक उपाध्यांमध्ये रूपांतरीत झालेले दिसतात.
--> यात सगळे स्वामी, सगळे महात्मे, सगळे महाराज डॉ.नी एकजात तांत्रीक-मांत्रीकांची रूपे आहेत असं म्हटलय. पण तांत्रीक, मांत्रीक, भगत हे विशिष्ट समस्या सोडवण्यात पटाईत असलेले व्यवसायीक आहेत (हो.. व्यवसायीकच... आता ज्या गोष्टी ते विकतात, ज्या सर्विसेस देतात त्यांची वैधता किती हा वेगळा मुद्दा) आणि महात्मा, स्वामी, सद्गुरु या मनाच्या, विवेकाच्या, चेतनेच्या अवस्था आहेत. आपण थोडं जरी संतसाहित्यात डोकावुन पाहिलं, तर या उपाधी धारण करणार्‍याच्या मनुष्याचे गूण काय असावे याचे व्यवस्थीत स्पष्टीकरण सापडेल (तोची साधू ओळखावा... सारखे अभंग). अशे लोकं जगात अजुनही निश्चीत आहेत. त्यातले काही प्रसिद्धी पावलेत तर काहि नाहि... मग डॉ.चे हे विधान सरसकट नाहि काय ??
हे कसं आहे, कि सगळेच गुंड, मवालि, चोर..यांचं आधुनीक नाव म्हणजे "नेता" असे सरसकट म्हणणे. पण "नेता" या शब्दाचा खरा अर्थ म. (पुन्हा महत्मा) गांधी, टिळक आणि सुभाषचंद्र नाहि काय ?
२) आता डॉ.चे हे विधान पहा:
"परमात्म्याशी तादात्म्य पावणे, कुंडलिनी जागृत करणे, मोक्षप्राप्ती अशा अवैज्ञानिक, बिनबुडाच्या संकल्पनांचा समाजाच्या...."
--> परमात्म्याशी तादात्म्य पावणे, कुंडलिनी जागृत करणे, मोक्षप्राप्ती... याबद्दल हा अर्धवटराव काय लिहीणार हो... एव्हढेच सांगतो, कि, कबीर, विवेकानंद, ज्ञानेश्वर माउली आणि इतर काहि अश्याच "अवैज्ञानीक" लोकांच्या पाउलखुणा, त्यांचे साहित्य, विचार... जे काहि वाचलं त्यावरुन बाकि काहि नाहि, पण एक नक्की लक्षात आलं, कि या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेणे म्हणजे एव्हरेस्ट चढुन जाणे आहे... आणि मी पायथ्याशी, लुळा-पांगळा-आंधळा होउन पडलोय. डॉ.साहेबांचा अनुभव वेगळा असेल.. ते कदाचीत हे अंतर पार करुन तेथे पोचले असतील आणि म्हणुनच या गोष्टी खोट्या, अवैज्ञानिक आहेत अस म्हणत असतील... मला कसं कळणार... पण मला नेहमीच हा वैज्ञानिक-अवैज्ञानिक निकष गोंधळात पाडतो. मला असं वाटतं कि "वैज्ञानिक" हा एक दृष्टीकोन आहे, विचार करायचा एक प्रकार आहे. आणि वरिल विषयाचं त्याला वावडं हमखास नाहि... प्रश्न हा आहे कि तुम्हाला खरच हे सगळं जाणण्याचि ईच्छा आहे का? तेव्हडा अभ्यास करायचि, मेहनत करायचि तयारि आहे का? पु.लंच्या शब्दात सांगयचं झालं तर आपण केरसुणिने समुद्राच्या लाटा परतवायचा प्रयत्न तर नाहि करत आहे ना?? आणि ते होत नाहि तर आपला आवाका मान्य करण्यापेक्षा आपण समुद्रालाच अवैज्ञानिक तर म्हणत नाहि ना? असहि असेल, नव्हे असं बरेजदा होतं कि आपण निश्चितच अभ्यासाला लागतो... पण मार्ग चुकतो, मार्गदर्शक चुकिचा भेटतो... पण हा मार्ग चुकला म्हणुन ते ध्येय तर चुकिचं नाहि ना ?? खैर... हा विषय फार मोठा आहे, आणि त्यावर बोलायचि आमचि पात्रता नाहि... पण हि माझी मर्यादा झालि ...विषय तर खोटा ठरत नाहि ना राव...
--एककल्ली आहे हे तुम्ही स्पष्ट कराल का?
--> वर म्हटल्याप्रमाणे डॉ. साहेबांनी "अध्यात्म" या विषयच फालतु आहे असं (थोडक्यात पण नि:संदिग्धपणे... बहुतेक पूर्ण अभ्यास करुन) मांडलं. या निष्कर्शावर येताना त्यांना केवळ या विषयाचा बाजार मांडणारे लोकच दिसले. मग हा एककल्लीपणा नाहि काय ? पुणे स्टेशन बाहेर पिवळ्या कव्हरचे साहित्यच केवळ वाचले आणि त्यावरुन "साहित्य म्हणजे केवळ बिभत्सपणा, हिंसा आणि इतर वायफळ गोष्टींचे काळे पांढरे कागद" असा निकाल लावला तर तो एककल्ली नाहि काय??

आता मी या लेखाला "फालतु" का म्हटले तेही सांगतो. ज्याप्रमाणे डॉ.ना शिकल्या-सवरल्या लोकांना बुवाबाजीच्या नादाला लागलेलं बघुन अस्वस्थ होतं (आणि ते योग्यच आहे... कुठल्याहि विचारि मनुष्याला हे नाहिच पटणार) त्याच प्रमाणे मला डॉ.सारख्या (विद्वान... आणि समाजाला मार्गदर्शन करण्याचि जबाबदारि असणार्‍या) लोकांनि जीवनाचे मूळ शोधणार्‍या लोकांच्या कार्याचा-विचारांचा (यालाच बहुतेक अध्यात्म विचार म्हणतात) एकदम अवैज्ञानिक म्हणुन हेटाळणि करणे अस्वस्थ करते...

आणि बॉस... या अंधश्रद्धा दिसुन तरी येतात. आपण एक सोपी श्रद्धा देखील स्वीकारायला तयार नाहि... ती म्हणजे- आपल्याला स्वतःकरता ज्या गोष्टी स्वीकार नाहित त्या दुसर्‍याला देखील त्रासदायक असतील, तेव्हा "दुसरोंसे ऐसा व्यवहार ना करे जो अपको खुद के साथ पसंद ना हो". आणि सगळी शिकली-सवरली मानवजात या श्रद्धेपासुन चार हात लांब आहे. (हे जरा विषयांतर झालं... मान्य आहे.)

खैर... व्यक्ती तितक्या प्रकृती.

(कधी कधी विचार करणारा) अर्धवटराव
-रेडि टु थिंक

शुचि's picture

2 Jun 2010 - 5:43 am | शुचि

प्रतिसाद आवडला.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

फटू's picture

1 Jun 2010 - 11:58 pm | फटू

अगदी अक्षरशः पटला.

आयुष्यभर फकीर म्हणून जगलेल्या साईबाबांच्या नावानं चालणारं शिर्डी संस्थान आज खोर्‍यानं पैसा ओढतंय. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही बाबांचे नवनविन अवतार जन्म घेत आहेत. इतिहासात वर्णन केलेल्या राजे रजवाडयांना लाजवेल अशा ऐहीक सुखात लोळून हे परमेश्वराचे आधुनिक अवतार आपल्या भक्तगणांचा "उद्धार" करत आहेत.

... पण अंगावर चिंध्या पांघरून, हातात खराटा घेऊन गावेच्या गावे साफ करणार्‍या, रोगराई मरीआईच्या कोपाने होत नसते तर ती तुमच्या अस्वच्छ राहण्याने होत असते अशी स्वच्छतेची शिकवण देणार्‍या गाडगेबाबांचा अवतार मात्र महाराष्ट्राच्या बाहेरच काय पण महाराष्ट्रातही जन्म घ्यायला तयार नाही...

फटू

आवशीचो घोव्'s picture

2 Jun 2010 - 7:12 pm | आवशीचो घोव्

पण अंगावर चिंध्या पांघरून, हातात खराटा घेऊन गावेच्या गावे साफ करणार्‍या, रोगराई मरीआईच्या कोपाने होत नसते तर ती तुमच्या अस्वच्छ राहण्याने होत असते अशी स्वच्छतेची शिकवण देणार्‍या गाडगेबाबांचा अवतार मात्र महाराष्ट्राच्या बाहेरच काय पण महाराष्ट्रातही जन्म घ्यायला तयार नाही...

+१

शुचि's picture

2 Jun 2010 - 5:42 am | शुचि

"कुंडलिनी जागृत करणे" - बिनबुडाची संकल्पना असू शकते का खरच जर साक्षात ज्ञानेश्वरांनी ६वा अध्याय या संकल्पनेस वाहीला आहे? :?

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मिसळभोक्ता's picture

2 Jun 2010 - 10:10 am | मिसळभोक्ता

उत्कंठा वाढली की कुंडलिनी आपॉप जागृत होते म्हणतात.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

छोटा डॉन's picture

2 Jun 2010 - 10:34 am | छोटा डॉन

>>उत्कंठा वाढली की कुंडलिनी आपॉप जागृत होते म्हणतात.

आहो , ऑपॉप म्हणजे ऑपॉप ... आता बघा , समजा आपण पाणीपुरी खायला एखाद्या ठेल्यावर थांबलो असु, आणि अचाणक चौथ्या पुरीला पाणीपुरीतल्या पाण्याचा ठसका कुंडलिनीपर्यंत पोहचला आणि शिवाय पुरीच्या कुरुमकुरुम आजावामधुन एक 'केऑस' निर्माण झाला ... ह्या केस मधे कुंडलिनी ऑपॉप जागॄत होण्याची संभावणा दाट आहे , असे वाट्टे ,

- (टर्काशात्री) ऑप्टॉरझन
------
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

टारझन's picture

2 Jun 2010 - 11:42 pm | टारझन

=))

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 9:49 am | मिसळभोक्ता

संपादक झाल्यानंतर देखील सदस्यांना इंटरेस्टिंग वाटेल असे लिहू शकणे, म्हणजे विरळा.

रामदासांनंतर तुम्हीच, डॉन साहेब.

(ता. क. काही पण करा. पण प्रा डॉ डॉन होऊ नका. डॉडॉ उच्चारायला कठीण जाते.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

पिवळा डांबिस's picture

3 Jun 2010 - 10:05 pm | पिवळा डांबिस

आम्ही
"उत्कंठा वाढली की कुंडलिनी पॉप होते"
असं वाचलं!
म्हटलं असेल बुवा! एव्हढे अनुभवी मिभोकाका सांगतायत तर खरं असेल!!
:)
(खुद के साथ बातां: डोळे तपासून घेतले पाहिजेत! आमच्या चष्म्याचा नंबर बदलेला दिसतोय!)
;)

चतुरंग's picture

3 Jun 2010 - 10:22 pm | चतुरंग

पिडांकाका पॉप्स्...आपलं रॉक्स!! ;)

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Jun 2010 - 10:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ते टिंबाच्या आधीचं पाहून मला भलताच प्रश्न पडला. असो, इथे नको! ;-)

अदिती

पिवळा डांबिस's picture

3 Jun 2010 - 10:29 pm | पिवळा डांबिस

ते चतुरंगाचं नगरच्या मराठी शाळेतलं पेशल इंग्रजी आहे...
आपण मनावर नाय घ्यायचं....
:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Jun 2010 - 10:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणूनच लिहीलं मी, लहानपणीच इंग्लिश शिकवा (इंग्रजी नको)!

अदिती

प्रकाश घाटपांडे's picture

4 Jun 2010 - 8:08 am | प्रकाश घाटपांडे

कुंडलिनीच्या पॉप्स ची संख्या वाढली कि पिडांक वाढतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

प्रकाश घाटपांडे's picture

2 Jun 2010 - 8:21 am | प्रकाश घाटपांडे

या बुवाबाजीच्या अंधश्रद्धेला लगाम घालण्यासाठी प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणे, हरेक घटनेच्या मुळाचा चौकस नजरेने शोध घेणे, स्वतःवर, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणे यासारखे उपाय अंगिकारता येतील.

या साठी अंनिस कार्यरत आहेच.
ज्या अंधश्रद्धा अज्ञानातुन येतात त्या प्रबोधनाने ,ज्ञानप्रसाराने दूर होतील ही कदाचित पण ज्या अंधश्रद्धा या अगतिकतेतुन येतात त्यांचे काय? या अगतिकतेची पाळे मुळे समाज व्यवस्थेत आहेत.
अनुनय व अनुयय या प्रवृत्तीचा उगम हा उत्क्रांतीशी आहे. समूहावर पकड ठेवणारे वा बंडखोर हे पाच टक्केच असतील बाकीचे इकडे किंवा तिकडे फॉलोअर्स च असतात. सत्तांतर हे व्यंकटेश माडगुळकरांचे पुस्तक वानरसमूहातील हुप्पेगिरी वर असल्याचे स्मरते.
आपण सांगितलेले उपाय हे प्रखर बुद्धीवादाचे आहे ते सर्वसामान्यांना आपण सांगत आहेत. बुद्धीप्रामाण्य एक कठीण वसा आहे असे तर्कतीर्थ सांगत
असो सध्या इतकेच लेख बाकी उत्तम.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

भडकमकर मास्तर's picture

2 Jun 2010 - 9:26 am | भडकमकर मास्तर

शिवाय फक्त माझा बुवा बाबा ह जेन्युईन असून इतर सर्व बुवा बाबा मानणे हे अंधश्रद्धेचे लक्षण आहे , हे भक्तांना १०० % मान्य असते.मात्र जेव्हा नाव घेऊन एखाद्या बुवाबद्दल बोलले जाते त्यावेळी मात्र त्याचे अनुयायी चिडतात, कधी हिंसक होतात....

फटू's picture

2 Jun 2010 - 11:43 am | फटू

अगदी अचूक निरीक्षण मास्तर.

ईतकंच नव्हे तर तुम्हीही एकदा आमच्या बाबांचा अनुभव घेऊन बघा अशी गळही घातली जाते या भक्तांकडून.

फटू

टारझन's picture

2 Jun 2010 - 11:44 pm | टारझन

तुम्हीही एकदा आमच्या बाबांचा अनुभव घेऊन बघा

शी बै अच्र्ट !!

- (तुमचा बाबा) टारझन
कोण कोण येतंय , अणुभव घ्यायला ? लायणित या !!

पंगा's picture

2 Jun 2010 - 11:48 pm | पंगा

शी बै अच्र्ट !!

'अच्र्ट' नाही. 'अच्र्त'.

कृपया शुद्धलेखनाला फाट्यावर मारू नये.

- पंडित गागाभट्ट.
प्रचारक आणि अध्यक्ष, मिसळपाव शुद्धलेखन चुप्रचारिणी समिती.

टारझन's picture

2 Jun 2010 - 11:51 pm | टारझन

कृपया शुद्धलेखनाला फाट्यावर मारू नये.

सॉरी शक्तिमान !

- (पापोदर) तम्राज किल्विष
अंधेरा कायम रहें !!

शिल्पा ब's picture

3 Jun 2010 - 12:14 am | शिल्पा ब

सॉरी

नाहि टारुबाबा स्वारि म्हनाय्च..

उगा
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मिसळभोक्ता's picture

2 Jun 2010 - 10:09 am | मिसळभोक्ता

बाबांच्या भजनी लागले जाण्याची कारणे कोणती?
बहुदा ती मानसिक असतात. धावपळीच्या संघर्षमय जगात टिकून राहण्याचा तणाव प्रत्येकाच्या मनावर असतो. त्यातून उद्भवणाऱ्‍या चिँता, काळज्या, विवंचना ह्या मनोकायिक आजारांचे रूप घेऊन येतात. कितीही तपासण्या केल्या तरी शारीरिक आजार सापडत नाही. अशावेळी समुपदेशनाची गरज असते परंतु चांगले सांगणारा गोड बोलणारा कोणी भेटत नाही. पैशालाच सर्वस्व मानणाऱ्‍या या दुनियेत हितचिँतक, मित्र, स्नेही, नातलग भेटतील म्हणता भेटत नाहीत.

एवढे सगळे उपाय आठवले, पण सोपा उपाय, दारू, नाही आठवला.

समाजात दारू पिण्याचे प्रमाण वाढले, तर बुवाबाजी कमी होईल.

तेव्हा, ३_४ विक्षिप्त असल्यामुळे...

समाज दारू पीणार, बुवाबाजी संपणार ।
आम्ही झाडावर चढणार, मजा बघत ॥
*इति मिसळभोक्ता महावाक्यम*

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

प्रकाश घाटपांडे's picture

4 Jun 2010 - 8:17 am | प्रकाश घाटपांडे

समाजात दारू पिण्याचे प्रमाण वाढले, तर बुवाबाजी कमी होईल.

तेव्हा, ३_४ विक्षिप्त असल्यामुळे...

हॅहॅ
पण समाजात दारुपिण्याचे प्रमाण वाढले तर दारुबाजी वाढेल त्याचे काय?
सबब उपाय १_१ विक्षिप्त
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Jun 2010 - 8:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे बरं नाही हां, तुम्ही काका लोकं आमच्या "पाय"ला असे लाथाळता ... किती दु:ख होत असेल त्याच्या मनाला!

अदिती

प्रकाश घाटपांडे's picture

4 Jun 2010 - 8:41 am | प्रकाश घाटपांडे

पायाळू लोक मुलतः मायाळू असतात असे ऐकले होते. पण ज्यांनी त्यांच्या लाथा खाल्या असतील ते तसे म्हणत असतील असे वाटत नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

तिमा's picture

2 Jun 2010 - 10:22 am | तिमा

हे सर्व म्हणजे 'पालथ्या घड्यावर पाणी' आहे. तेंव्हा अशा बुवांच्या मागे ज्यांना जायचे आहे, त्यांना जाऊ दे. त्यांच्यावर कोणी सक्ती तर केली नसते. स्वखुषीने जे असल्या मार्गाला जातात ते त्याच लायकीचे असतात.
स्वतःच्या सदसद्विवेकबुध्दीलाच आपला गुरु का मानू नये ? मधल्या दलालांची जरुरच काय ? पण असा विचार फार कमी करतात. तेंव्हा जे जे चालले आहे ते निमूटपणे पहावे. वाद तर अजिबातच घालू नये.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

चिरोटा's picture

2 Jun 2010 - 10:48 am | चिरोटा

दडपणाखाली वावरणाऱ्‍या, न्यूनगंड असलेल्या किँवा पारतंत्र्य सोसणाऱ्‍या व्यक्तिँना बाबांच्या सत्संग, प्रवचनांना जाणे म्हणजे स्वातंत्र्य उपभोगणे किँवा स्वतःला सिद्ध करून दाखवणे अशा प्रकारातले असते.

असहमत्.मी येथे श्री श्री रविशंकर ह्यांच्या आश्रमात जाणार्‍या अनेकांशी बोललो आहे. बरेच जण आवडीने (विशेष करुन सुदर्शन क्रिया शिकण्यासाठीही) असे मला दिसले.बर्‍याच जणांना कुठल्याही प्रकारची मानसिक्/शारिरिक व्याधी नव्हती.रविशंकर ह्यांच्या फाउंडेशनने अनेक देशांमध्येही सामाजिक कार्य केले आहे.तेव्हा काही बाबांभोवती बरीच गर्दी दिसली म्हणजे तो भोंदू/फसवा आहे असे नाही.
http://en.wikipedia.org/wiki/Sri_Sri_Ravi_Shankar

P = NP

पक्या's picture

2 Jun 2010 - 1:02 pm | पक्या

श्री श्री रविशंकर ह्यांना गुरू म्हटले तर ठीक आहे. ते काही तत्त्सम बुवा, बाबा , बापु वाटत नाहीत्. त्यांनी मी अमुक तमुक देवतेचा अवतार आहे असा दावा केलेलाही कधी ऐकला नाही.
श्री श्री रविशंकर , रामदेव बाबा ह्यांचा संबंध प्रामुख्याने योगाभ्यासाशी आहे. शारिरीक , मानसिक दृष्ट्या योगाभ्यास फायदेशीर आहे ह्यावर कोणाचे दुमत नसावे.
त्यामुळेच हे योगा शिकवणारे गुरू बुवाबाजी करणार्‍यांच्या कॅटेगिरीत येत नाहीत असे मला वाटते.
लेख बुवाबाजी करणार्‍यांवर लिहीलेला आहे.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

नितिन थत्ते's picture

2 Jun 2010 - 6:12 pm | नितिन थत्ते

>>त्यामुळेच हे योगा शिकवणारे गुरू बुवाबाजी करणार्‍यांच्या कॅटेगिरीत येत नाहीत असे मला वाटते.

सहमत.

पण जोपर्यंत त्यांचे अनुयायी
"अमक्या तमक्याला ब्लड कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी फार तर ६ महिने जगेल/शस्त्रक्रिया करावी लागेल सांगितले होते. नंतर अमुक तमुक योगाभ्यास केला/ **** क्रिया करायला लागल्यावर ठणठणीत बरा झाला ३ वर्षांहून जास्त झाली या गोष्टीला"
अशा टाईपच्या ष्टोर्‍या सांगू लागत माहीत तोपर्यंतच.

नितिन थत्ते

चिरोटा's picture

2 Jun 2010 - 6:46 pm | चिरोटा

नंतर अमुक तमुक योगाभ्यास केला/ **** क्रिया करायला लागल्यावर ठणठणीत बरा झाला ३ वर्षांहून जास्त झाली या गोष्टीला"

योगाभ्यासाने रोग दूर होवू शकत नाहीत असे कशावरुन्?अनुलोम विलोम(http://knowyoga.org/tiki-index.php?page=Anulom%20Vilom%20Pranayam ) केल्याने फायदा होतो.मी स्वतः अनुभव घेतला आहे.(डोकेदुखी/डोळे लाल होणे/आय प्रेशर(http://en.wikipedia.org/wiki/Intraocular_pressure ) वाढणे-ज्यामुळे ग्लूकोमा होवू शकतो इत्यादि विकार बरे झाले.)
नेत्र रोगतज्ञांना/जनरल डॉक्टर्सना दाखवल्यावर काही उपाय नाही-डोके दुखायचेच/वगैरे उत्तरे आली होती.
P = NP

सहज's picture

2 Jun 2010 - 12:52 pm | सहज

सुंदर लेख.

डॉक्टरसाहेब तुमची हरकत नसल्यास कृपया हाच लेख तुम्ही उपक्रमावर लिहाल का?

नितिन थत्ते's picture

2 Jun 2010 - 6:16 pm | नितिन थत्ते

हा हा हा. लवकर लिहून घ्या.

तिकडे असले लेख म्हणजे "मऊ लागलं म्हणून कोपराने खणणे". या कारणास्तव अशा लेखांवर (अघोषित)बंदी येऊ घातली आहे म्हणे.

नितिन थत्ते

पंगा's picture

2 Jun 2010 - 9:15 pm | पंगा

'इकडच्या' प्रकारांच्या 'तिकडे' आणि 'तिकडच्या' प्रकारांच्या 'इकडे' काड्या घालण्यात 'पांढर्‍यावरचं पांढरं' करण्याचा 'उपक्रम' चांगला चालला आहे, हं!

मानलं आपल्याला!

- पंडित गागाभट्ट.

प्रियाली's picture

2 Jun 2010 - 10:02 pm | प्रियाली

तिकडे असले लेख म्हणजे "मऊ लागलं म्हणून कोपराने खणणे". या कारणास्तव अशा लेखांवर (अघोषित)बंदी येऊ घातली आहे म्हणे.

कृपया, अफवा पसरवू नयेत. :) हे भाकित असल्यास आम्ही तुम्हालाही "बाबा" म्हणू.

तसेही काही लोकांची आम्हाला गंमत वाटते. ते आपले "उपक्रम" राबवत असतात आणि दुसर्‍यांना इथले तिथे करू नका असे शहाजोग सल्ले देत असतात. :)

दिवटे साहेबांचे या लेखाबद्दल कौतुक वाटले पण खाली दिलेले अरुंधती ताईंचा प्रतिसादही महत्त्वाचा आहे. विशेषतः

अन्यथा आपला लेख व पाच-पन्नास वर्तमानपत्रांमधील बातम्या, मासिकांमध्ये छापून आलेले डझनावारी लेख आणि अनेक संकेतस्थळांवर खच पडून असलेले अनेक लेख यांच्यात काहीच फरक नाही असेच खेदाने म्हणावे लागेल.

हे वाक्य.

शिल्पा ब's picture

2 Jun 2010 - 10:58 pm | शिल्पा ब

हो ना ...काही लोकांना भांडण करण्यातच रस असतो...मुळ चर्चा विषयापासून कशी भरकटेल हाच विकृत विचार मनात ठेऊन सगळीकडे बोलणे चालू असते...एका विषयात दुर्स्र्याच विषयाला घुसवून भांडण करणे हाच उद्योग करण्यात स्वारस्य..

बुवाबाजीवर बहुतेक इथेच एक चर्चा झाल्याची आठवते...सत्यसाईबाबावर...काही videos पण टाकले होते या महात्म्याच्या कार्याचे..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Jun 2010 - 1:04 pm | llपुण्याचे पेशवेll

हॅ हॅ हॅ. ज्याची त्याची श्रद्धा आणि अनुभूती (दोघी लै भारी दिसतात). झेपेल त्याने महागड्या बाबाकडं जावं अध्यात्मं करावं नाय झेपेल त्याने स्वस्तात दारू प्यावी. झालं मॅटर खतम.
म्हणतात ना मनी सॉल्व्हस् एव्हरी मॅटर.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

भाग्यश्री कुलकर्णी's picture

2 Jun 2010 - 5:41 pm | भाग्यश्री कुलकर्णी

चांगला लेख आहे.

संजा's picture

2 Jun 2010 - 8:39 pm | संजा

लेख आवडला परंतु विचार चुकीचे आहेत.
बुवांबाजी हा एक धंदा आहे हे कसे विसरता तुम्ही. ह्याच न्यायाने डॉक्टर, वकील, सीए हे व्यवसाय सुद्धा अंधश्रद्धेच्या परीघात येतात. नाही का ?

संजा नंद महाराज.

अरुंधती's picture

2 Jun 2010 - 9:58 pm | अरुंधती

डॉक्टर, तुमचा लेख फारच गुळमुळीत व मोघम झाला आहे राव! त्यात कोणतेही तौलनिक तपशील नाहीत, आकडेवारी नाही, आलेख नाहीत, टक्केवारी नाही. असे लेख तर बर्‍याच साईटांवर दर महिन्यागणिक कोणी ना कोणी पाडतच असते. ह्याच संकेतस्थळावर अशा धर्तीचे अनेक लेख प्रकाशित झालेत. पण दोन लेखांमध्ये काहीतरी फरक हवा ना! तेच मुद्दे, तीच उदाहरणे, तोच युक्तिवाद.... सर्वकाही तेच!
जरा ह्या मोघमपणातून लेख वर उचला की राव! अगदीच बोथट वाटतोय....
त्याची परिणामकारकता काही अंशांनी जरी वाढवावीशी वाटत असेल तर भारतात ह्या बुवाबाजी, स्वामी-महाराज प्रकरणांत किती रुपयांची उलाढाल होते, किती परदेशी चलन मिळते, स्थानिक व्यवसायांना कशी गती मिळते, रोजगार कसा वाढतो, पर्यटनाला कसा जोर मिळतो, किती कर जमा होतो, करचुकवेगिरी किती चालते, काळ्याचा पांढरा कसा व किती प्रमाणात केला जातो, अशिक्षित-अर्धशिक्षित-सुशिक्षित अशा कोणकोणत्या गटातील किती टक्के लोक त्यात गुंतलेले आढळतात, गरीब-मध्यमवर्गीय-श्रीमंत ह्यातील मुख्य कोणता गट सक्रीय आढळतो - टक्केवारी; त्या त्या प्रदेशातील अर्थकारणात बुवाबाजी व्यवसायाची काय भूमिका असते व सहभाग असतो अश्या अनेक गोष्टींवर आपण जर प्रकाश टाकू शकलात तर त्या लेखात काही दम आहे असे म्हणता येईल. अन्यथा आपला लेख व पाच-पन्नास वर्तमानपत्रांमधील बातम्या, मासिकांमध्ये छापून आलेले डझनावारी लेख आणि अनेक संकेतस्थळांवर खच पडून असलेले अनेक लेख यांच्यात काहीच फरक नाही असेच खेदाने म्हणावे लागेल.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jun 2010 - 10:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वैचारिक लेखन कसं असावं यासाठी अतिशय उत्तम सूचना!

अदिती

भडकमकर मास्तर's picture

2 Jun 2010 - 10:31 pm | भडकमकर मास्तर

अरुंधतीताईंचा लै बेस्ट प्रतिसाद...
=D>

डॉ.श्रीराम दिवटे's picture

3 Jun 2010 - 2:25 pm | डॉ.श्रीराम दिवटे

होय हा लेख मोघमच लिहिलाय. आपल्या सूचना मान्य आहेत. परंतु आकडेवारी दिली असती तर लालित्याला बाधा येऊन तो लेख शासनास सादर करावयाच्या मसुद्याचा कागद अथवा अहवाल झाला असता. असो. रोखठोक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

आम्हाघरीधन's picture

3 Jun 2010 - 9:48 pm | आम्हाघरीधन

शासनास सादर करावयाचा असल्यास या वरिल प्रतिक्रिया देणार्‍या व्यक्तिंचे काही खरे नाही........

यांनी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष पणे मुर्खमंत्री माफ करा मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीच्या श्रद्धेला (मुर्खपणाला) आव्हान दिले आहे.... असे बरेच मुर्ख आपल्या देशात आहेत ज्यांच्या मुळे या बापु कापु टापुंचा सुळ्सुळाट वाढला आहे.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

रामपुरी's picture

4 Jun 2010 - 2:07 am | रामपुरी

नाडी विसरला का राव? जिथे हे सर्व बुवा बाया थकतात तिथे महर्षी नाड्या घेउन येतात त्यांच्या *ड्ड्या आवळायला... (वायुदलात खास चौकशी केन्द्र आहे म्हणे)