प्रार्थना

स्पंदना's picture
स्पंदना in जे न देखे रवी...
26 May 2010 - 8:44 pm

साद मागची; साद नसे रे,
हा तर सारा भुलावा.
क्षणभर भुलवी; धरा सोडवी,
भवसागर कैसा तरावा?

चुकार मनाच्या बसे कोनाडी;
हळुवार शिळ जशी विरावी,
हवेत जरी ती नसे कुठेही,
ठोका हृदयाचा चूकवी.

असतील जर पाश कुठे रे
जखडाया मना; तना सोबती,
ऐवज सारा गहाण घालीन
सात जन्म वरती.

सोडव मजला मनापासुनी
नको वेदना; नको भिरभिरणे,
थांबव माझे बंजारेपण,
घाल पदरी स्थिर जगणे.

अपर्णा

शांतरसकविता

प्रतिक्रिया

निरन्जन वहालेकर's picture

27 May 2010 - 7:49 am | निरन्जन वहालेकर

चुकार मनाच्या वसे (कोनाडी) अन्तरी वाचण्यास बरे वाटेल का ? शेवटच्या दोन ओळीचा अर्थ विरुध्ध वाटतो. बंजारेपण, थांबउन स्थिर जगणे अपेक्षित म्हणून
बान्ध पदरी आता असे म्हणणे योग्य वाटते.
मात्र कविता सुंदर ! आवडली !

स्पंदना's picture

27 May 2010 - 8:59 am | स्पंदना

"कोनाडा" अंधारेपण दाखवतो. "कोनाडा" फारसा न उघडता एका बाजुला असतो...

शेवटच्या दोन ओळी....याचक होउन " स्थीर जगणे पदरात घाल" अशी विनवणी आहे.

आभार..

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

फटू's picture

27 May 2010 - 8:49 am | फटू

मनाच्या चंचलतेला लगाम घालण्याची साधने शोधण्याची कल्पना आवडली.

सकळ इंद्रियांचा राजा मन । मनःकल्पना जीवशिवपण ।
श्लोकपदें ’मनसीश्वर’ पूर्ण । मनशींच जाण हरि बोले ॥

- एकनाथी भागवत

- फटू