दास्तान एका (खरड) वहीची...

फटू's picture
फटू in जनातलं, मनातलं
26 May 2010 - 10:19 am

हे लेखन पुर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवातल्या कुठल्याच गोष्टीशी कोणताही संबंध नाही. या लेखाचा शेवटचा बराचसा भाग वाचताना मिपाच्या कुणा सन्माननिय सभासदाची खरडवही जशीच्या तशी उचलून इथे चिकटवली आहे असे वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

ही गोष्ट आहे आमच्या सोसायटीतल्या दोन लहान मुलांची. खरं तर एका लहान मुलाची आणि एका लहान मुलीची. मुलाचं नाव गणनायक आणि मुलीचं नाव सुखदा. गणनायक आमच्या सोसायटीच्या बी विंगमधल्या नातलग काकांचा मुलगा. तर सुखदा आमच्याच ए विंगमधल्या कुलकर्णी काकांची मुलगी. गणनायकला खरं तर सारी सोसायटी तसेच आमच्या शाळेतील मुलं गण्या म्हणूनच हाक मारतात. परंतू त्याला ते आवडत नाही. म्हणून मी आपला त्याला गणनायक या त्याच्या पुर्ण नावानेच हाक मारतो. दोघेही तसे लहान आहेत. जवळपास माझ्याच वयाचे. गणनायक यावर्षी सातवीला होता तर सुखदा सहावीला. परंतू दोघेही खुप स्मार्ट आहेत. आमच्या जनरेशनच्या इतर कुठल्याही मुलापेक्षा कितीतरी पटीने बुद्धीमान. गणनायक आमच्या शाळेमध्ये खुप प्रसिद्ध आहे. त्याच्या गोष्टी भंपक, पकपक अशा लहान मुलांच्या प्रसिद्ध मासिकांमध्ये छापून येतात. मग अशीच एखादी भंपक किंवा पकपक मध्ये छापून आलेली गोष्ट गणनायक दर महिन्याला निघणार्‍या शाळेच्या हस्तलिखितातही देतो. आणि खाली अगदी ऐटीत लिहितो की हि गोष्ट भंपक मासिकात छापून आली आहे. त्याच्या या प्रसिद्धीमुळे त्याच्या वर्गातील बरीच मुले त्याच्यावर जळतात. विषेशत: पर्‍या, टार्‍या आणि मन्या अशी जरा थोराड मुले तर अगदी हात धूवून त्याच्या मागे लागतात. या मुलांच्या मनात गणनायकच्या बद्दल ईर्षा निर्माण झाली आहे. ते त्यामुळे शाळेच्या भिंतींवर, गणनायकचा डोळा चुकवून त्याच्या वह्यांमध्ये काहीबाही लिहीतात. पण गणनायक त्यांना भीक घालत नाही.

गेल्या वर्षी गणनायक राष्ट्रीय प्रज्ञाशोध (नॅशनल टॅलेंट सर्च - एन टी एस) परीक्षेला बसला होता. ही परीक्षा देशपातळीवरची असुन पास होण्यास अतिशय कठीण असते. ही परीक्षा उत्तीर्ण होणे हे चिल्लीपिल्ली पोरांचे काम नसते. एकदा का विद्यार्थी या परीक्षेत पास झाला की त्याला चांगली घसघशीत शिष्यवृत्ती तर मिळतेच परंतू शाळेत शिक्षक लोकांमध्ये तसेच शाळेच्या मुलांमध्ये मान मिळतो तो वेगळाच. ही परीक्षा चांगल्या गुणांनी पास होता यावी म्हणून गणनायकने नाक्यावरच्या त्या परीक्षेच्या एका शिकवणी वर्गात आपले नांव घातले होते. शिकवणी वर्गाच्या बाईंनी गणनायकच्या प्रसिद्धीचा पुरेपुर फ़ायदा उचलला होता. गणनायक आपल्या शिकवणी वर्गाला येतो असे सांगून आमच्या आळीतील अजून दहा बारा मुले शिकवणी वर्गासाठी मिळवली होती. परीक्षा झाली. गणनायकने पेपरही छान लिहिले होते. मुळचाच हुशार असल्यामुळे शाळेचा नियमित अभ्यास गणनायक बघता बघता उरकत असे आणि मग त्याच्याकडे भरपूर वेळ उरत असे. हा फ़ावला वेळ गणनायकमधल्या बाललेखकाला स्वस्थ बसू देईना. त्याने मग स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करून घेण्याच्या नावाखाली शिकवणी वर्गवाले कसा शिक्षणाचा बाजार मांडतात आणि हा बाजार मांडताना नितीमुल्ये वगैरे गोष्टींची कशी अजिबात चाड बाळगत नाहीत याचं वर्णन करणारा लेख पकपक मध्ये लिहीला. आणि नंतर हाच लेख त्याने शाळेच्या हस्तलिखितासाठीही दिला. लेखाच्या शेवटी माझा हा लेख पकपकमध्ये प्रसिद्ध झाला आहे हे लिहायला तो विसरला नाही. नेहमीप्रमाणे पर्‍या, टार्‍या आणि मन्याने गोंधळ घातला. यावेळी वर्गातील ईतरही काही मुलांनी त्यांना साथ दिली. परंतू गणनायक डगमगला नाही. मग काही बाई आणि गुरुजींनी त्याची समजूत घातली. प्रगती बाईंनी तर "तू छान लिहितोस. परंतू ही तुझ्या वर्गातील मुलं तुझ्या लेखनावरून का गोंधळ घालतात याचाही विचार कर" असं चक्क गणनायकच्या वहीत लिहीलं. ईतकंच नव्हे तर एरव्ही शांत असणारे गणनायकचे मित्रही त्याच्या बाजूने उभे राहीले. संजूने तर चक्क टार्‍यासारख्या मवाली मुलाशी वाद घातला. गणनायक हा जरी शाळकरी मुलगा असला तरी त्याच्याकडे अगाध प्रतिभा आहे हे त्याने टार्‍याला अगदी ठासून सांगितले. हे पटवून देण्यासाठी त्याने टार्‍याला संत ज्ञानेश्वरांचे उदाहरण दिले. या सार्‍या प्रकारातली खरी ग्यानबाची मेख अशी आहे की गणनायक ज्या शिकवणी वर्गाला जायचा त्याच शिकवणी वर्गाला मीही जात असे. त्या शिकवणी वर्गाच्या बाईंनी गणनायक जेव्हढी म्हणत होता तेव्हढी फी घेतलीच नव्हती. तो आकडा गणनायकने उगाचच वाढवून लिहिला होता, लेखन अधिक भारदस्त व्हावे म्हणून. त्याला मी तसं सांगितल्यावर त्याने "तू जी म्हणतोयस ती फी गेल्या वर्षीची होती" अशी उगाचच सारवासारव केली होती.

असा हा गणनायक. लेखन ही त्याच्या अंगी असलेली एकमेव कला नाही बरं का. तो वेबसाईटही खुप छान बनवतो. तो सहावीला असताना त्याच्या बाबांनी त्याला एमएससीआयटीचा क्लास लावला होता. तिकडे संगणक शिकत असताना त्याला वेबसाईट हा प्रकार ईतका आवडला की त्याने त्या क्लासमध्ये खरं तर वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट असे प्रोग्राम शिकणे अपेक्षित असताना याने मात्र सारे लक्ष एचटीएमेल या संगणकाच्या वेबसाईट बनवायच्या भाषेकडे दिले. त्या भाषेमधल्या बॉडी, टायटल, हेडींग अशा एकदम मुलभूत गोष्टींची जेमतेम तोंडओळख होताच गणनायक एकापाठोपाठ एक वेबसायटी बनवत सुटला. त्याने आमच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी बनवलेली ढंगकर्मी डॉट कॉम ही साईट तर खुपच गाजली. मी आमच्या बाजूच्या सोसायटीच्या मुलांकडून ऐकलं की ती साईट काही गाजली वगैरे नाही. गणनायकच उठसुट जो भेटेल त्याला माझी वेबसाईट पाहा, माझी वेबसाईट पाहा असं सांगत सुटतो. आणि लोकांनी साईट पाहीली की म्हणतो, माझी साईट फ़ेमस आहे. पण कधी कधी मलाही वाटतं की हे सारे गणनायकवर जळतात. असो.

आता आपण सुखदाकडे वळू या. सुखदा एक हुषार, चुणचुणीत पण तरीही सरळ साधी मुलगी. तिलाही संगणक, वेबसाईट वगैरे गोष्टींचं उत्तम ज्ञान. ती स्वत: लेखक नसली तर तिचं वाचन मात्र अफाट आहे. तिला एक गोष्ट मात्र जमत नाही. कुणी जरा जास्तच पकवायला लागलं की त्याला कसं कटवायचं हे. उगीच बिचारी समोरच्याचं म्हणणं ऐकत बसते. गणनायकही आपलं म्हणणं ऐकवायला कुणी भेटला नाही की सुखदाला गाठतो आणि तिला मी सोसायटीच्या ईतर मुलांपेक्षा कसा ग्रेट आहे हे सांगत बसतो. पण तो सुखदाशी बोलताना ईतका हळू बोलतो की नेमकं काय बोलतोय हे अगदी कान टवकारूनही मला कळत नाही. मग मी आमच्या सोसायटीमधल्या चार वर्षाच्या पिंटूला गाठलं. त्याच्या हातावर एक मोठ्ठं बारा रुपयांचं किटकॅट टेकवलं आणि तो गणनायक सुखदाशी काय बोलतो ते मला सांगायला सांगितलं. पण गणनायक पक्का वस्ताद. तो सुखदाशी बोलत असताना पिंटू त्यांच्या जवळ गेला की गणनायक "नंतर बोलू गं" असं म्हणून सटकायचा. त्यामुळे पिंटूलाही काही यश येईना. पण एक दिवस मात्र पिंटू अगदी आनंदाने धावत आला, धापा टाकतच म्हणाला, "दादा दादा, एक गंमत आहे". मी काय म्हणताच पिंटूने एक वही माझ्या हातात ठेवली. ती सुखदाची वही होती. आम्ही शाळेतील मुलं महत्वाच्या गोष्टी वह्यांच्या मागच्या पानावर लिहितो. त्यामुळे मीसुद्धा लगेच सुखदाच्या वहीचे मागचे पान उघडले. आणि आश्चर्य. त्या पानावर चक्क गणनायकच्या अक्षरात काहीतरी लिहिलं होतं. म्हणजे गणनायकच कधी कधी सुखदाच्या वहीत लिहितो तर. आता सुखदाची त्याला उत्तरे पाहावी म्हणून मग मी गणनायकाच्या नकळत त्याच्या सार्‍या वह्या अगदी बारकाईने पाहिल्या. परंतू सुखदाच्या हस्ताक्षरातील एक ओळही मला गणनायकच्या वह्यांमध्ये दिसली नाही. त्यामुळे गणनायकने काही लिहिल्यानंतर सुखदाने त्याला काय उत्तर दिलं हे कळायला मार्ग नव्हता. मला तर वाटतं की सुखदा एकदम सरळ साधी मुलगी असल्यामुळे तिने काही उत्तर दिलेच नसणार. किंवा दिले असले तरी गणनायकने त्याच्या वहीचे ते पान फाडून टाकले असणार. म्हणुन मग मी माझ्याच कल्पनेनं सुखदा काय म्हणाली असेल याचा अंदाज लावला. हा पाहा तो संवाद:

गणनायक: तू ए विंगमध्ये राहतेस ना?
सुखदा: (स्वगत: रोजच तर मला आमच्या ए विंगमधल्या घरात जाताना पाहतो बावळट. उगाच आपलं काहीही विचारत बसतो) हो.
गणनायक: अरे तु मला ओळखतीस का (मी: ह्या गणनायकने एकदम असं कोल्हापुर साईडच्या भाषेत का बरे लिहिले असावे?)
सुखदा: (स्वगत: काय कटकट आहे. आता हे ध्यान रोज आमच्या सोसायटीमध्ये दिसतं म्हणजे आमच्याच सोसायटीमधलं असणार) हो. तू बी विंगमध्ये राहतोस. आणि चौथीपर्यंत एकाच शाळेत होतो आपण. तू चौथीला होता तेव्हा मी तिसरीला होते. तू मला गॅलरीत पाहतोसही पण ओळख दाखवत नाहीस.
गणनायक: तेच ना
पण कोण दुसरे असेल तर म्हणून विचारले नाही
असो मी तुला विसरलेलो नाही
आता एक काम कर
माझे सर्व लेख वाच आणि कशे वाटले ते कळव
माझे लेख तुला वाटचाल मध्ये पाहायला मिळतील
मी काढलेली नवी साईट पाहिलीस का
सुखदा: (स्वगत: याचे लेख, साईट वगैरे हा असेच प्रसिद्ध करतो का?) हो नक्की.

सुखदा जरी हो म्हणाली असावी तरी तिने त्यानंतर काहीच उत्तर दिलं नसावं. पाहा बरे:

गणनायक: बर हे बघ
www.marathibhavand.tk
www.gananayaknatalag.blogspot.com
www.gananayak.tk
यापैकी पहिली साइट तुला आवडल्यास जरुर कळव आणि त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी कर
सुखदा: (स्वगत: शी बाई. हा तर अगदी हात धूऊन मागे लागला आहे.) हो. नक्की करीन हं.

यालाही सुखदाने बहुतेक उत्तर दिले नसावे. पाहा बरे:

गणनायक:
सुखदा,
माझे लेख वाचतेस क जरा
वाटचाल मधुन वाच
आणि काय नवीन
आणि एक चोटेसे काम आहे करशील क (मी: च्यायला. ह्या गणनायकसारख्या शाळेच्या टॉपच्या लेखकाच्या मराठीला काय झालं? की "त्या" शब्दासाठी त्याने जाणूनबुजून अशुद्ध मराठीचा आधार तर घेतला नाही ना? हल्ली कुणाचा भरवसा देता येत नाही.)
सुखदा: (स्वगत: आता हो म्हणुन टाकावं नाही तर हा इथेच ते लेख वहीतून वाचून दाखवेल.) हो रे. वाचते मी तुझे लेख.
गणनायक: http://burjipav.com/node/4321#comment-98765432

इथेही बहुधा सुखदाने गणनायकला उत्तर दिले नसावे. आता गणनायक पुढे काय म्हणतो ते पाहा.

गणनायक:
होय
चेहरा तरी सेम वाततोय
www.burjipav.com/tracker/420420
वर जावुन लेख वाच माझे

(मी: अरेरे. बिचारी सुखदा. आपले लेख तिने वाचावेत म्हणून गणनायक तिच्या अगदी हात धुऊन मागे लागलेला दिसतोय. पण हा चेहरा सेम वाटतोय असे तो कुणाबद्दल बरे म्हणत असावा? सुखदा आपले लेख वाचत नाही म्हणून कुण्या दुसर्‍या मुलीला तर याने पकडलं नाही ना?)

असो. एव्हढा हा एक प्रसिदधीचा हव्यास आणि आणि आपल्या लेखनाला भंपक, पकपक सारख्या प्रसिद्ध मासिकांमध्ये मिळणार्‍या प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन आलेला अहंकार एव्हढे दोन अवगुण सोडले तर आमचा हा गणनायक तसा फार गुणी आहे. तुम्हीही त्याचे लेख वाचा. त्याच्या सायटी पाहा आणि त्यांची जास्तीत जास्त प्रसिद्धी करा. एव्हढंच माझं तुम्हाला सांगणं आहे.

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

टारझन's picture

26 May 2010 - 10:32 am | टारझन

गणनायक:

आरारारारारारा
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
बाड्या ... एक तर आजारी आहे मी आज ... त्यात असला घाण ... वरची ओळ वाचुन डायरेक्ट खाली आलो .. आणि सांडलो =))
लेख वाचतोय

- निर्णायक वाटलग

टारझन's picture

26 May 2010 - 11:37 am | टारझन

(मी: च्यायला. ह्या गणनायकसारख्या शाळेच्या टॉपच्या लेखकाच्या मराठीला काय झालं? की "त्या" शब्दासाठी त्याने जाणूनबुजून अशुद्ध मराठीचा आधार तर घेतला नाही ना? हल्ली कुणाचा भरवसा देता येत नाही.)

=)) =)) =)) =)) =)) =)) तोडलंस फोडलंस चेंदामेंडा केलास ... रगडापुरी भाजीपुरी शेवपुरी दहीपुरी आमरीश पुरी झाला =))
भुर्जीपाव.कॉम ही साईट काळजाला भिडली =))

फट्या .. आज फाडलंस !! आणि असाच मी काल फिरत फिरत इकडे जाऊन आलो होतो ;)

- मवाली (हे कोणा "ली" चं विडंबण वाटल्यास योगायोग समजावा ;) )
जल्ला, आमाना पाहुन शालेतल्या पोरी लामनंच यु-टर्न मारत्यात.

मनिष's picture

26 May 2010 - 10:01 pm | मनिष

=))

ओ मॅडम, आम्ही ना।इ खोड्या काढत. आमचे नाव घेऊन तो फटूच उगाच खोड्या काढत बसतो!

मन्या!

विनायक पाचलग's picture

26 May 2010 - 11:07 am | विनायक पाचलग

एखाद्याने वर्षाभारापुर्वी लिहिलेले आज एका लेखाचा विषय होतो हे पाहुन बरे वाटले
यातुन दोन गोष्टी सिद्ध होतात
१. आजकाल विषयांची कमतरता जाणवत आहे ,त्यामुळे लेखक आपला बहुमुल्य वेळ असा वाया घालवत आहे.
२. खरडवही म्हणजे कोर्टातल्या पुराव्यासारखे झाले आहे कधी वर येईल माहित नाही ,त्यामुळे लिहिण्यापुर्वी धन्यवाद..
फटु साहेब
या शिकवणी बद्दल धन्यवाद................

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

फटू's picture

26 May 2010 - 11:55 am | फटू

साधारण वर्षभरापूर्वी झी टीव्हीवर "जॉनी आला रे" हा कार्यक्रम रात्री नऊ साडेनऊच्या आसपास लागायचा. नामांकित गायक, गायिका, नट आणि नटया यांच्या एकदम हलक्याफुलक्या, हसतखेळत अशा मुलाखती जॉनी लिव्हर या कार्यक्रमात घेत असे.

अशाच एका एपिसोडमध्ये सोनू निगम ची मुलाखत झाली. सोनू निगम बरेच वेळा आपल्या स्टेज शोजमध्ये ईतर नामांकीत गायकांची नक्कल करतो. खुप चांगला नकलाकार आहे तो. तर याबद्दल जॉनी त्याला थोडंसं छेडतो (तसलं छेडणं नाही बरं का. विचारतो या अर्थी)

जॉनी: अच्छा ये लोग आपसे नाराज तो नही होते ना?
सोनू: इट्स नथिंग पर्सनल. हर इन्सान का एक कॅरीकेचर होता हैं. सिंगर्स नीड टू टेक इट मोअर ओपनली. की कुछ होगा तभी कॉपी कर रहा हैं. कुछ नही होगा तो कॉपी भी क्या करेगा. अगर आपमें कुछ मुख्तलिश स्टाईल नही होगा तो कॉपी कैसे कर पायेंगे.

(मुख्तलिश हा शब्द कदाचित मी चुकीचा लिहिला असावा. माझं हिंदीचं अज्ञान :( )

मला वाटतं माझ्याकडून एव्हढं स्पष्टीकरण पुरेसं असावं

राहीली गोष्ट तुझ्या शेर्‍याची:

१. आजकाल विषयांची कमतरता जाणवत आहे ,त्यामुळे लेखक आपला बहुमुल्य वेळ असा वाया घालवत आहे.

त्याचं असं आहे की माझ्या अगाध प्रतिभेला कुठल्याच विषयाचं वावडं नाही. "बयाला धरलं भुतानी, तिला नदीत पाडलंय उताणी" य अप्रतिम, नितांत सुंदर अशा लोकगीतापासून ज्ञानदेवांच्या हरीपाठाच्या अभंगांपर्यंत कुठल्याही विषयावर टंकताना माझी बोटे सारख्याच सहजतेने कळफलकावर चालतात. :)

- फटू

llपुण्याचे पेशवेll's picture

26 May 2010 - 11:59 am | llपुण्याचे पेशवेll

बयाला धरलं भुतानी, तिला नदीत पाडलंय उताणी
फट्या तुझी लेखनप्रतिभा सध्या(या लेखापुरती) त्या गाण्याच्याच मोड मधे आहे असे वाटतंय. :P फक्त बया च्या ऐवजी बाप्या पाहीजे.. अर्थात काहीही म्हटलं तरी काय फरक पडतो.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

फटू's picture

26 May 2010 - 11:51 pm | फटू

श्रीमंत, तुम्ही जो अर्थ लावला आहे तो माझ्या ध्यानीमनीही नव्हता. त्या गाण्याचा उल्लेख मी फक्त "आम्ही ही अशीही गाणी चवीने ऐकतो" हे सांगण्यासाठीच केला होता :P

- फटू

परिकथेतील राजकुमार's picture

26 May 2010 - 1:41 pm | परिकथेतील राजकुमार

एखाद्याने वर्षाभारापुर्वी लिहिलेले आज एका लेखाचा विषय होतो हे पाहुन बरे वाटले

दुर्दैव असे आहे की
असे काही अभिजात क्षण ,गोष्टी ,घटना आमची नवी पिढी हरवत आहे..
पण एकदम "ओरिगिनल" लाईव्हली व्यक्तीचित्रण....
बातमी खुप जणांनी दिली ,पण नक्की हे व्यक्तीमत्व काय होते हे तुम्ही सांगितलेत
खुप खुप आभार

ओरिगिनल मिसळीसाठी आमच्या घरी यावे
चोरटे मिसळवाले आमच्या उधारीवर जगतात..

©º°¨¨°º© भयानक पाठलाग ©º°¨¨°º©
आमचे राज्य

पांथस्थ's picture

26 May 2010 - 5:23 pm | पांथस्थ

ओरिगिनल मिसळीसाठी आमच्या घरी यावे
चोरटे मिसळवाले आमच्या उधारीवर जगतात..

हे मात्र कैच्या कै =)) =)) =))

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

परिकथेतील राजकुमार's picture

26 May 2010 - 1:44 pm | परिकथेतील राजकुमार

प्रकाटाआ

शिल्पा ब's picture

26 May 2010 - 11:08 am | शिल्पा ब

=)) =)) =)) =)) =)) =))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com

llपुण्याचे पेशवेll's picture

26 May 2010 - 11:20 am | llपुण्याचे पेशवेll

अरे फटू लिहीलेस ते छान केलेस. गणनायक अशा छोट्या छोट्या (?) चूकांमधूनच शिकत वगिअरे असतात. आधी ते लेख वहीत लिहीतात आणि मग उनिकोदात परावर्तित करतात.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

सहज's picture

26 May 2010 - 11:24 am | सहज

उनिकोदापरावर्तित

मराठी भाषा काय खतरनाक आहे!!! जय हो!

आंबोळी's picture

26 May 2010 - 11:37 am | आंबोळी

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
हसुन झाले कि प्रतिक्रिया देतोच...

आंबोळी

बिपिन कार्यकर्ते's picture

26 May 2010 - 12:04 pm | बिपिन कार्यकर्ते

वामन परत न आला फटू परतून आला

बिपिन कार्यकर्ते

भारद्वाज's picture

26 May 2010 - 12:12 pm | भारद्वाज

शाल जोडीतली कशी हाणतात ते आज कळले... =)) =))

भोचक's picture

26 May 2010 - 12:13 pm | भोचक

आयचा घो. फटू अरे काय रे हे. फुटलो रे. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
(भोचक)
जाणे अज मी अजर

satish kulkarni's picture

26 May 2010 - 12:58 pm | satish kulkarni

हहपुवा...

मेघवेडा's picture

26 May 2010 - 1:32 pm | मेघवेडा

की "त्या" शब्दासाठी त्याने जाणूनबुजून अशुद्ध मराठीचा आधार तर घेतला नाही ना? हल्ली कुणाचा भरवसा देता येत नाही.)

=)) =)) =))

फटू.. हाण्णतेज्यायला!!!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

Dhananjay Borgaonkar's picture

26 May 2010 - 2:46 pm | Dhananjay Borgaonkar

तुमचा गणनायक लै भावला बघा..
एकदम कडक लेख..

शालजोडीने बडव बडव बडवलत... :)) :)) :))

प्रभो's picture

26 May 2010 - 10:03 pm | प्रभो

लै भारी रे फट्या!!

II विकास II's picture

27 May 2010 - 7:52 am | II विकास II

गणनायकाला अजुन त्याचा काका मिळाला नसावा, म्हणुन असले लेख येत आहेत. असो.

-----

ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

फटू's picture

27 May 2010 - 8:29 am | फटू

काका मिळुनही काही फायदा नाही. काका आपल्या जागी आपल्या पोरालाच बसवणार.

त्यामुळे नवनिर्माण ज्याचं त्यालाच करावं लागतं.

- फटू

सुहास..'s picture

2 Mar 2012 - 12:50 am | सुहास..

आयच्चा घो !!!

=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))

धन्या लेका, हा लेख कसा मिसला काय माहीत , हलकट * १०००००० आहेस लेका !!

मायला, नाव न घेता टोला कसा मारावा हे शिकलो ;)

मी-सौरभ's picture

17 Mar 2012 - 12:05 am | मी-सौरभ

पूर्ण्पणे सहमत

प्रचेतस's picture

17 Mar 2012 - 8:06 am | प्रचेतस

+२

धन्या's picture

17 Mar 2012 - 10:17 am | धन्या

नुकत्याच आलेल्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.

हा लेख पाडून आता जवळपास दोन वर्ष झालीत. गणनायक आता शहाणा झाला आहे. आधीही होता म्हणा, पण त्यावेळी त्याच्या डोक्यात हवा होती. लोकांनी पंक्चर पंक्चर करुन ती हवा काढून टाकली.

नविन वाचकांसाठी: गणनायक कोण हे मी उघड सांगणार नाही. याच पानावर कुठेतरी डावीकडे, उजवीकडे नजर टाका. गणनायकाचे अतिशय सुंदर काम दिसेल.

बा गणनायका, तुझ्याबद्दल तेव्हाही आपुलकी होती, आताही आहेच. नव्हे, तू आता जे करतो आहेस, त्याबद्दल हेवा वाटतो. :)

सूड's picture

30 Dec 2014 - 11:28 am | सूड

मस्तच!!

(भयानक वाटलग) ;)

विजुभाऊ's picture

30 Dec 2014 - 1:18 pm | विजुभाऊ

अरेच्चा हे वाचलंच नव्हते.

प्यारे१'s picture

30 Dec 2014 - 1:30 pm | प्यारे१

खिक्क्क!

नाखु's picture

30 Dec 2014 - 4:34 pm | नाखु

आणि अर्थात आताही.

लेखणी उचला जरा आताच्या "स्वयंभूं" साठी
मिपा वाचक महासंघ बिल्ला क्र १०१५