http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=67938:2... हा आजचा लेख वाचला आणि शेवटचे सुधा मूर्तीचे वाक्याने विचार करायला लावले...घरात पुष्कळ नाही तरी बऱ्यापैकी पैसा असताना मुलांना चैनीची सवय कशी लागू देऊ नये...हे करत असतानाच त्यांना प्रत्येक गोष्टीला "नाही " सुद्धा म्हणायचे नाही हे कसे शक्य करावे? कारण मागितलेल्या सगळ्या.... हो सगळ्या मग ती कोणतीही असो...वस्तूला नाहीच म्हणून "आम्ही आमच्या मुलांना कोणतीही गोष्ट मागितल्यावर कधीही दिली नाही" हे अभिमानाने सांगणारे आई बाप माझ्या पाहण्यातले आहेत...हे सुद्धा अयोग्य वागणे असे मला वाटते...
तुम्ही कसे मुलांना पटवून देता कि उगाचच वायफळ खरेदी करू नये....वायफळ खरेदी कुठली आणि गरजेची कुठली...काय सांगितल्यावर छोट्यांना हे पटते? माझी मुलगी कुठलीही आकर्षक जाहिरात लागली कि
"can you please get me this from the store? " असे विचारते...आपले अनुभव अपेक्षित आहेत....
प्रतिक्रिया
16 May 2010 - 2:43 am | शुचि
शिल्पा काय मस्त मस्त विषय सुचतात ग तुला.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
16 May 2010 - 4:45 am | शिल्पा ब
काही फारसा उद्योग नसतो मग सुचतं असं काहीतरी... :D
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
16 May 2010 - 11:10 am | पर्नल नेने मराठे
मला मुले नाहित पण माझ्या भाचीचा मला अनुभव आहे.
तिला दुकानातले सगळे हवे असते.
लहानपणी भाजी आणायला जाताना ती आईला टॅक्सिने जाउयात असे म्हणे आणी दुकानातली बिसलेरी पाहुन तहान लागली म्हणत असे. :T
वय वाढल्यामुळे फक्त हल्ली तिच्या आवडी बदलल्या आहेत. वडिलाना मागे लागलिये होन्डा सिटि घ्या म्हणुन. :SS
मला तर कायम उल्लु बनवते. ह्या वेळेस भेटली तेव्हा म्हणाली कि मला नेलपेन्ट घेवुन दे. दुकानात गेलो तर तिकडे मी एक नेलपेन्टची बाटली घे म्हटले तर तिला नेलपेन्ट पेन हवे होते, किम्मत १८० रुपये. मला तर पत्ताच नव्हता कि सामान्य लोक सुध्दा असले काहि वापरतात.
नाही तरी कसे म्हणु? आलो घेवुन तर तिचिच आई मला ओरडली कि तिला अक्कल नाही पण तुला तरी....... :(
कसे हॅन्डल करायचे ह्या कार्ट्याना.
चुचु
16 May 2010 - 11:31 am | पंगा
वाचून पहिले गलतफहमी झाली होती, ती पुढचा मजकूर वाचून दूर झाली. #:S
- पंडित गागाभट्ट
18 May 2010 - 2:37 am | शिल्पा ब
L)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
18 May 2010 - 2:41 am | शिल्पा ब
हो ना चुचु ....आजकाल मुलांना आपल्याला माहित नसेल ते माहिती असते... :S
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
18 May 2010 - 11:55 am | सुखदा राव
मलाही अजुन तरी मुले नाहित. पण आई-बाबा १ खुप चान्गली कल्पना राबवायचे. ते 'या महिन्यात आपल्याकडे अमुक इतके पैसे आहेत, आता ते योग्य प्रकारे कसे वापरायचे ते आपण सगळे मिळुन ठरवू या' अस म्हणून आम्हालाही नियोजनात सहभागी करुन घ्यायचे. यामुळे आपोआपच अनावश्यक गोश्टी टळल्या, आम्हाला बाजारभाव कळले, घर कस चालवायच याच शिक्षणही मिळाल. एका दगडात अनेक पक्षी. फक्त आपल्याकडे असणारी खरी रक्कम सान्गू नका, अर्ध्याने किन्वा योग्य वाटेल एवढीच सान्गा.
18 May 2010 - 2:19 pm | अरुंधती
सुखदा, कल्पना खूपच छान आहे! एका दगडात अनेक पक्षी!!
पण अगदीच लहान मुले असतात त्यांना कसे समजावायचे?
माझ्या अडीच वर्षाच्या भाचीला तिच्या चुलत बहिणीकडे आहे म्हणून तश्शी वॉटर बॅग हवी असते. अजून ही चिमुरडी शाळेतही जात नाही. पण ती वॉटरबॅग मिळेपर्यंत तिने घरी, दारी, बाहेर, पाहुण्यांकडे सगळीकडे वॉटरबॅगचाच धोशा लावला होता. शेवटी ती वॉटरबॅग आणल्यावर शांत झाली.
दुसर्या भाचीला असाच प्रिन्सेस टियारा (मुकुट) हवा होता.... तो मिळेपर्यंत तिने घरातील सर्वांच्या सहनशक्तीची पार कसोटी घेतली......
अजून एक भाची : वय वर्षे सात. तिच्या वर्गमित्रांकडे व मैत्रिणींकडे मोबाईल फोन आहेत स्वतःचे, म्हणून तिलाही आता मोबाईल फोन हवाय....
आपल्या ज्या मुलांनी उत्तम वाढावे, खावे, प्यावे, खेळावे, शिकावे, चांगले माणूस बनावे म्हणून आई-वडील झटतात ती मुले अशा लहान सहान गोष्टींवर सध्या अडून बसलेली दिसतात. एक हट्ट पुरा केला की दुसरा तयार! त्यांना नवे नवे, महागडे खेळ हवे असतात, पण त्या खेळाशी फार फार तर आठ-पंधरा दिवस खेळणार आणि मग तो खेळ पुन्हा वर्ष-सहा महिन्यांसाठी तरी पडून.... एक-दोन वर्षांनी त्या खेळाला ''आऊटडेटेड'' करून ही मुले मोकळी!
बरं, आजकाल जमाना एकच मूल होऊ देण्याचा आहे. त्यामुळे त्या एकुलत्या एक अपत्याचे मनही मोडवत नाही.
मला वाटते, इथे पालकांना त्यांचे मुलांशी असलेले संवादकौशल्य वाढवण्याची गरज आहे. मुलांना त्यांच्या भाषेत समजावून सांगता कसे येईल? किंवा ''व्हेटो'' वापरूनही ती दुखावली जाणार नाहीत हे कसे साधता येईल? माहितगारांनी कृ. सांगावे!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
18 May 2010 - 2:55 pm | स्मिता_१३
अगदी सहमत,
माझ्या प्रमाणे अनेक पालकाना हा प्रश्न भेडसावत आहे.
18 May 2010 - 5:19 pm | गणपा
एकदा एका जाहिरातीतली पिगी बँक पाहुन लेकीने हट्ट धरला की तिच्याकडे पिगी बँक नाही.
म्हटल चला बचतीच महत्व कळेल तिला म्हणुन आणुन दिली. तिला ती पिगी बँक कधी एकदा भरते अस झालं.
दुसर्या दिवशी घरातली सगळी चिल्लर गायब. इतपत ठीक होत.
पण मग ती आल्या गेल्या पाहुण्यांकडुन इतकच काय तर चक्क भाजीवाली , मासेवाली आणि कामवाली समोर पण पिगी बँक घेउन उभी राहु लागली आणि त्यांना खंडणी शिवाय गृहप्रवेश मिळण मुश्किल झाल ;)
हल्ली चिल्लर चा कंटाळा आलाय नोटा मागते बया. :(
या एकदा घरी.
19 May 2010 - 12:43 am | शैलेन्द्र
आमंत्रणाची पद्धत फारच आवडली
18 May 2010 - 5:13 pm | भोचक
घरोघरी मातीच्याच चुली...
परवाच नाशिकला गेलो तेव्हा बाजारात सहकुटुंब नित्याची खरेदी करत होतो. खेळण्याचे दुकान पाहून 'काहीतरी' घ्यायचे म्हणून लेक तिकडे घेऊन गेली. तिथे लहान मुलांना लिहिता येईल असे टेबल होते. त्यावर सापशिडी वगैरेचा खेळही होता. दोनशेच्या आसपास असलेली ती वस्तू घ्यावी असे मी लेकीला सुचवत होतो. आणि लेकीचा जीव मात्र, घरी आठ बाहुल्या असूनही दुकानातल्या नवव्या बाहुलीत अडकला होता. खूप समजावून सांगूनही तिने ती बाहुलीच घेतली. घरी आणल्यानंतर संध्याकाळी मात्र ते टेबलच घ्यायला हवे असा नवा धोशा सुरू झाला. तेव्हा खूप समजावून सांगून मग ते टेबल बायकोने तिला घेऊन दिले.
(भोचक)
जाणे अज मी अजर
18 May 2010 - 5:20 pm | टारझन
च्यायला एकेकाच्या असल्या तर्हा ऐकल्यावर मी एखादा १५-२० वर्षाचा पोरगाच दत्तक घ्यायचा विचार करीन म्हणतोय =)) (आत्ता नाही ... तिसेक वर्षांनी ... उठले लगेच)
- (चिंताग्रस्त) टारझन
18 May 2010 - 10:21 pm | मिसळभोक्ता
म्हणजे बापाला रोज दारूसाठी पैसे मागेल :-)
त्यापेक्षा बाहुली घेऊन देणे परवडले :-) :-)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
18 May 2010 - 7:01 pm | नाना बेरके
फक्त आपल्याकडे असणारी खरी रक्कम सान्गू नका, अर्ध्याने किन्वा योग्य वाटेल एवढीच सान्गा. - हा विचार पटला, पण
...आजकाल मुलांना आपल्याला माहित नसेल ते माहिती असते... , हा ही विचार पटला.
खर्चिक मुलेच देवाने आमच्या पदरात घातली आता काय करणार ? :(
चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
'चिपर बाय द डझनवाला' नाना गिलब्रेथ
19 May 2010 - 12:21 am | शैलेन्द्र
मी एक तत्व पाळतो, कोणत्याही मगणीला नाही म्हणायचं नाही पण लगेच वस्तु घ्यायचीही नाही. जर मुलाला खरच त्या वस्तुचं फार आकर्षण व आवड असेल तर तो काही दिवस मागे लागतो, मलाही विचार करायला काही वेळ मिळतो. जर पटली तर आठवणीने ती वस्तु घ्यायची, नसेल पटत तर मुलाने तोपर्यंत काहीतरी नविन मागितलेले असतेच... त्यावर विचार करायचा...
(गरिब पालक) शैलेन्द्र
19 May 2010 - 12:27 am | शुचि
हा हा मॅनेजर दिसता हापीसात.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
19 May 2010 - 12:39 am | शैलेन्द्र
हापीसात आणी आयुष्यातही...
प्रतिक्रिया आवडली...
19 May 2010 - 12:41 am | अनामिक
मी इथे बर्याचदा लहान मुलांना त्यांच्या घराबाहेरच्या यार्डवर लेमनेड विकताना बघितलं आहे. ४ ते १० वयोगटातल्या लहान मुलांना अश्याप्रकारे पैश्याची किंमत करायला शिकवता येऊ शकते. त्या शिवाय इथली शालेय वयोगटातली मुले शेजार्यांचं यार्डवर्क करायला केलेल्या मदतीतूनही पैसे कमवताना दिसून येतात. अश्याच छोट्याछोट्या गोष्टीतून लहान मुलांना वळण लावता येणे शक्य आहे असे वाटते.
-अनामिक
19 May 2010 - 1:03 am | sur_nair
मला नऊ वर्षाची मुलगी आहे. नुकताच एक उपक्रम सुरु केला. दर आठवड्याला ठराविक रक्कम देतो. एक excel spreadsheet करून दिली आहे ती तिलाच update करू देतो. काही मोठी चूक केली तर मग त्या आठवड्याचे नाही मिळत.
तिला नवीन Nintendo DS हवा होता तर सांगितले तेवढे पैसे साठले की घेऊ. दोन महिन्यांनी पैसे साठल्यावर घेतला. (तिचे पैसे नाही घेतले, आम्ही भेट दिला. तिने स्वखर्चाने मग त्यावरचे गेम घेतले) . लगेच घेतला असता तर कदाचित तेवढे मोल राहिले नसते. पण आता ती तो खूप जपते.
याचे दोन तीन फायदे जाणवले. एकतर पैस्याची देवाण घेवाण याची सवय होते. दुसरे कुठली मोठी गोष्ट हवी असेल तर त्याकरता थोडा धीर धरावा लागतो, anticipation build up होतं. मग मिळाल्याचा जास्त आनंद होतो. तिसरे काय हवं नको यात selection करावं लागतं. बघू किती दिवस चालतंय ते.
19 May 2010 - 1:08 am | शिल्पा ब
माझी लेक चार वर्षाची आहे...तिला समजेल का असं काहीतरी खुटू रूटू काम करून पैसे मिळवून मग खरेदी करायचे हे?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
19 May 2010 - 1:28 am | sur_nair
प्रत्येक खुटू खुटू कामाचे द्या असे मी मुळीच म्हटलं नाही. that is like child labor . मी allowance देतो. अपेक्ष हि कि अभ्यास, नीटनेटकिपणा, व इतर वागणूक चांगली असावी.
चार वर्षे हे फार लहान वय आहे. यान फक्त दोन उपाय. हवं ते द्या नाहीतर नाही म्हणून पुढे होईल त्याला सामोरे जा. पण या वयात काय हवे होते तेही विसरतात मुले काही तासात.
19 May 2010 - 2:52 am | शिल्पा ब
हम्म्म.....कधी कधी फारच मागे लागते तेव्हा तिला अजून खूप पैसे आले कि घेऊ, किंवा हे महाग आहे आणि आत्ता गरज नाही असे सांगते...तिला कळतं का नाही माहित नाही पण मग लगेच हट्ट करत नाही...३-४ तास थांबते.. :))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
19 May 2010 - 3:42 am | स्वाती२
३-४ वर्षाच्या मुलांना बरेचदा 'नाही' म्हणावे लागते. फक्त हा नकार वेगवेगळ्या पद्धतीने द्यावा लागतो. आत्ता पैसे नाहियेत , हे खेळणं मोठ्या मुलांसाठी आहे, वाढदिवसाला घेऊ वगैरे सांगावे लागते. इथे खेळण्याच्या खोक्यावर age group लिहिलेला असतो त्यामुळे समजावायला सोपे जाते. थोडा त्रास देतात पण मग विसरतात. माझ्या मुलाला आम्ही तो ५ वर्षाचा असल्यापासुन महिन्याचा allowance द्यायला लागलो. त्यातले १०% saving , १०% charity आणि उरलेल्यात त्याच्या wants त्याने भागवायच्या असे सांगितले. सुरवातीला पहिल्या आठवड्यात खडखडाट झाल्यावर परत पैसे दिले नाहित. महिनाभर थांबायला लावले. हळू हळू तो पैसे जपून वापरायला/ साठवायला शिकला. याच काळात त्याला स्टोअर कुपन वापरून खेळणे स्वस्तात मिळवता येते हेही शिकवले. आम्ही त्याच्यासाठी खेळणी घेतानाही त्याला सुरवातीलाच आमचे बजेट सांगायचो. काही वेळा त्याला हवे असलेले खेळणे तेवढ्या पैशात येत नसले तर वरचे पैसे तो allowance मधून द्यायचा किंवा पुढल्या महिन्या पर्यंत थांबायचा. तो चौथीत गेल्यावर त्याला आमचे महिन्याचे बजेट दाखवले. तसेच ऑनलाईन कॅलक्युलेटर वापरुन त्याच्या कॉलेजखर्चाची , आमच्या रिटायरमेंट मधल्या खर्चाची कल्पना दिली. त्याच्या कॉलेज फंडचे स्टेटमेंट त्याला वाचायला द्यायला लागलो. हळू हळू करत ६ वीत जाईपर्यंत माझा लेक बर्यापैकी शहाणा झाला.
19 May 2010 - 5:27 pm | मी ऋचा
मस्त मस्त कल्पना दिल्यात!! मुलं झाल्यावर नक्की वापरेन!! Thanks a lot!!!!! 8>
मी ॠचा
र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !!
20 May 2010 - 11:31 am | सुखदा राव
रुचासारख म्हणते.