ब्रेक्फास्ट

पर्नल नेने मराठे's picture
पर्नल नेने मराठे in पाककृती
13 May 2010 - 10:55 am

एकवेळ लन्च स्किप केले तरी चालेल पण हेवी ब्रेक्फास्ट घ्यावा असे म्हणतात.
पण मला नाही बै रोज वेळ मिळत ब्रेक्फास्ट करायला.
आणी मग ऑफिसमधे चिडचिड होते.
आणी रोज काय करायचे तरी काय पोहे उप्मा थालिपिठाच्या पलिकडे जाउन (केलॉग्ज खाउन विटलेय मी )
आज त्यातल्या त्यात मी पोहे न आम्ब्याच्या फोडी घेवुन आले.
घरी कुठे वेळ मिळतो हो (मेकअप करता करता मेला वेळ कसा जातो कळतच नाही)
तुम्हाला काही सोप्या ब्रेक्फास्ट पाकक्रुती माहिती असतिल तर सुचवा.

:>

प्रतिक्रिया

jaypal's picture

13 May 2010 - 11:10 am | jaypal

भरपुर फळे खात जा (त्याने माणुस म्हातरा असला तरी कालांतराने तरुण दिसतो म्हणतात)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

श्रावण मोडक's picture

13 May 2010 - 11:11 am | श्रावण मोडक

चुचु, ब्रेक्फास्ट कुणी करायचा? जे फास्ट करतात त्यांनी. आपण नाही! ;)

निखिल देशपांडे's picture

13 May 2010 - 11:16 am | निखिल देशपांडे

चुचु आज काल अ‍ॅपल खाणे बंद केलेस का???

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

पर्नल नेने मराठे's picture

13 May 2010 - 11:55 am | पर्नल नेने मराठे

अरे कंटाळा आला रोज खाउन

चुचु

निखिल देशपांडे's picture

13 May 2010 - 11:58 am | निखिल देशपांडे

मग आता पाईन अ‍ॅपल खात जा!!
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

कुंदन's picture

13 May 2010 - 11:28 am | कुंदन

आज काल ब्रेक्फास्ट बंद.
कॉस्ट कटिंग ग.
FDI ( Foreign Direct INvestment)मध्ये फटका बसल्यामुळे.

पर्नल नेने मराठे's picture

13 May 2010 - 11:54 am | पर्नल नेने मराठे

FDI =)) हे भारिच

चुचु

वाहीदा's picture

13 May 2010 - 12:59 pm | वाहीदा

FDI ( Foreign Direct INvestment)मध्ये फटका बसल्यामुळे.
दु:खात सहभागी पण हसू आवरत नाही =)) =)) =)) =))
~ वाहीदा

jaypal's picture

13 May 2010 - 1:59 pm | jaypal

१०० % सहमत तुमच्याशी.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

Nile's picture

13 May 2010 - 11:30 am | Nile

सकाळी ब्रेकफास्ट करायचा कंटाळा येतो म्हणुन मी रात्रीच ब्रेकफास्ट बनवतो खातो आणि झोपतो, प्रश्नच मिटला!

-Nile

चिरोटा's picture

13 May 2010 - 12:18 pm | चिरोटा

फळे = {केळे,सफरचंद्,संत्रे,मोसंबे,डाळिंब,चिकू}
पदार्थ = {शिरा,पोहे,खिचडी,थालिपीठ्,इडली,सॅंडविच,ज्वारी बिस्किटे,ब्रेड्+लोणी+जॅम,उकडलेले अंडे,आम्लेट}
पेय = {चहा,दूध,ज्युस}
नाश्ता = कोणतेही फळ + कुठलाही पदार्थ+ कोणेतेही पेय

P = NP

घरी कुठे वेळ मिळतो हो (मेकअप करता करता मेला वेळ कसा जातो कळतच नाही)
मेकअप ला एवढा वेळ ? आता तु मेकअप कसा करावा यावर एक धागा टाक ;-)
मी फक्त सनस्क्रिन फासून office पळते. एवढ्या उन्हात मेकअप विरघळेल ना राणी .
न विरघळणारा मेकअप कसा करायचा ते तरी सांग :-)
~ वाहीदा

पर्नल नेने मराठे's picture

13 May 2010 - 1:34 pm | पर्नल नेने मराठे

हो ग हो ...टाका ग कुणी तरी धागा..मला बै भारिच आवड मेकअपची :P

चुचु

jaypal's picture

13 May 2010 - 2:01 pm | jaypal

मेकअप म्हणुन आपला आप्ण स्व्तःला चुना फासावा ( दुस-याची वाट पाहु नये) =))
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 May 2010 - 1:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

१. कारल्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून रात्री शेपू आणि मेथीच्या बारीक चिरलेल्या पानांमधे ठेवा. सकाळी वरून थोडे पाणी घालून पाच मिनीट उकळवा आणि हे पॉरीजसारखे खा.
२. सध्या आंब्याचे दिवस आहेत. रात्री खालेल्ल्या आंब्याच्या साली नीट धुवून, वाळवून घ्या. मिक्सरमधे त्यांची भुकटी करून बीअरमधे घालून ब्रेकफास्ट सीरीयलप्रमाणेच खा.
३. किंचित तुपात आलं-लसूण-मिरचीची पेस्ट तळून घ्या आणि त्यात रात्रभर भिजवलेले मेथीचे दाणे घाला. मेथीचे दाणे नीट तळले गेले की त्यात कोथिंबीरीच्या काड्या घाला आणि त्या वाफवून घ्या. शिजल्यावर वरून चवीसाठी काबुली चणे भुरभुरून घ्या. मीठ अजिबात घालू नका, वाटल्यास दोन चमचे दूध घाला.
४. अडकुळ्या आणि बीट एकत्र उकडून त्याचं साल काढून घ्या. चांगलं चार दिवस उन्हात वाळवून घ्या. आपोआप भुकटी पडायला लागली की या भुकटीत दही घालून पॉरीजप्रमाणे शिजवून घ्या. दही जास्त झाल्यास वरून इसबगोल घाला आणि घनता हवी तशी करून घ्या. चवीसाठी वरून थोडे त्रिफळा चूर्ण घालून खा.
५. कुकरमधे एरंडेल (वजनाने पाव), हळदीची पानं (वजनाने पाव) आणि शेवया (वजनाने अर्ध्या) असं सात शिट्ट्या होईपर्यंत शिजवा आणि हे मिश्रण गार झाल्यावर बाहेर काढा. त्यात घनता अ‍ॅडजस्ट करायला मिरी टाकून चवीसाठी साखर घाला. रात्री शिजवून हे मिश्रण फ्रीजरमधे ठेवा. सकाळी आईस्क्रीमप्रमाणे खा. हवे असल्यास चवीसाठी वरून टबास्को सॉस घाला.

अदिती

ज्ञानेश...'s picture

13 May 2010 - 1:17 pm | ज्ञानेश...

लंचपर्यंत जिवंत राहिल का माणूस? :O

वाहीदा's picture

13 May 2010 - 1:29 pm | वाहीदा

किंचित तुपात आलं-लसूण-मिरचीची पेस्ट तळून घ्या आणि त्यात रात्रभर भिजवलेले मेथीचे दाणे घाला. मेथीचे दाणे नीट तळले गेले की त्यात कोथिंबीरीच्या काड्या घाला आणि त्या वाफवून घ्या. शिजल्यावर वरून चवीसाठी काबुली चणे भुरभुरून घ्या. मीठ अजिबात घालू नका, वाटल्यास दोन चमचे दूध घाला.

मी पण कधी कधी रात्रीच मोड येणारे कडधान्य भिजत ठेवते अन सकाळी फक्त परतवून खाते.
उन्हाळ्यात मात्र सब्जा चे पाणी खुप पिते .
~ वाहीदा
ब्रेकफास्ट रेसीपी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 May 2010 - 1:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ए बाई, खरंच असं काही खाऊ नकोस ...

अदिती

टारझन's picture

13 May 2010 - 1:29 pm | टारझन

ते ब्रेकफस्ट असावं बहुतेक... ब्रेकफास्ट म्हणणारे गावठी लोकं लगेच कळुन न येतात तर काय नवल ?

-(रंगक्रमी) समारोपराव

पर्नल नेने मराठे's picture

13 May 2010 - 1:32 pm | पर्नल नेने मराठे

=)) बोललास का नको ते

चुचु

अरुंधती's picture

13 May 2010 - 2:30 pm | अरुंधती

चुचु
अगं, ब्रेकफस्ट/ फास्ट साठी भर्पूर पा.कृ. आहेत.

१] गोडाचे पदार्थ आवडत असल्यास :
नाचणी/ रवा/ रताळ्याची/ साबुदाण्याची पॉरिज.
दलिया खीर.
किमान ३-४ तास भिजवलेल्या मनुका,खजुर, बदाम, शेंगदाणे, सुके अंजीर.
लाह्यांचा/ कणकेचा/ सातूचा लाडू किंवा अन्य कोणतेही लाडू
कणीक तुपावर खमंग भाजून तिच्यात भाजलेले खोबर्‍याचे काप, खारकेचे तुकडे, खडीसाखर, तुपावर भाजलेले पोहे असे एकत्र करून ठेवणे. दुधात घालून किंवा नुस्तीही छान लागते.

कणकेचा शिरा.

२] तिखट पदार्थ

इडली/आप्पे/धिरडी/ डोसे/ उत्ताप्पे/ घावन इ.

पराठा/ धपाटे/ भोपळ्याचे घारगे/ सँडविच/ ब्रेड - बटर - जॅम/ चीज चिली टोस्ट/ तिखटामिठाच्या पुर्‍या

उकड/ सांजा/ ताकातला दलिया किंवा ताकातल्या राजगिरा लाह्या/ आंबील/ कॉर्न उपमा/ शेवयांचा उपमा.

पोह्यांचे विविध प्रकार : फोडणीचे/ कोळाचे/ दडपे/ तेल-तिखट-मीठ पोहे इ.

साबु.खिचडी/ पोंगल भात/ फो.भा./ फोडणीची पोळी/ चित्रान्न/ भाताचे खिमट

३]
मोड आलेली कडधान्ये [मूग, मटकी]

वाफवलेल्या व मीठ मिरपूड घातलेल्या भाज्या [कॉर्न, श्रावणघेवडा, फ्लॉवर, बटाटा इ.]

फळांचे रस/ फळे/ लस्सी/ मिल्कशेक/ फ्लेवर्ड मिल्क

सलाड्स : फळे व भाज्या यांचे कॉम्बो.

असे बर्रेच पर्याय आहेत. तुला किमान महिनाभर तरी रोज नवी व्हरायटी करता येईल आरामात.

त्यातले वेळखाऊ प्रकार सोडलेस आणि आदल्या दिवशी थोडी तयारी करून ठेवलीस की कमीत कमी वेळात न्याहारी होऊन जाईल! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अरुंधती,
wow ! that's really cool in Hot Summer .. बरेच पर्याय दिलेस तू
cool content on this hot summer's day :-)

~ वाहीदा
Ignorance is the Best Policy of Taking revenge :-)

पर्नल नेने मराठे's picture

13 May 2010 - 3:51 pm | पर्नल नेने मराठे

अरुंधती मला खुप आवडते. हिचे रिप्ल्याय मस्त असतात. :D

चुचु

शुचि's picture

13 May 2010 - 5:35 pm | शुचि

ए S S S अरु माझी मैत्रिण आहे आणखी कुण्णाची नाही [( [( [(

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पर्नल नेने मराठे's picture

13 May 2010 - 5:51 pm | पर्नल नेने मराठे

अग मला ती आवडते म्हणतेय मी, काही चोरुन नाही नेत हो तुझ्या मत्रिणीला.. :SS
चुचु

शुचि's picture

13 May 2010 - 5:54 pm | शुचि

अले अले ...... चुचु डर मत. मै समझ गइ >:D< >:D< >:D<

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पर्नल नेने मराठे's picture

13 May 2010 - 5:57 pm | पर्नल नेने मराठे

8| नशिबच >:D< अग ति माझी शुची ..

चुचु

शुचि's picture

13 May 2010 - 6:00 pm | शुचि

=)) <:P =D> O:) >:D< =))
चुचु रॉक्स!!!!!!!!

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पर्नल नेने मराठे's picture

13 May 2010 - 6:04 pm | पर्नल नेने मराठे

<:P

चुचु

jaypal's picture

13 May 2010 - 6:39 pm | jaypal

शुचि सहित काय म्हणते ते वाच आधी. ;)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

वाहीदा's picture

13 May 2010 - 11:25 pm | वाहीदा

<:P अरुंधती अलसो रॉक्स!!!!!!!! <:P
~ वाहीदा

नाना बेरके's picture

13 May 2010 - 2:39 pm | नाना बेरके

अडकुळ्या आणि बीट एकत्र उकडून त्याचं साल काढून घ्या. /em> . . . अडकुळ्या ?

चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके

भडकमकर मास्तर's picture

18 May 2010 - 2:53 pm | भडकमकर मास्तर

हडकुळ्या अळकुड्यांना अडकुळ्या म्हणत असावेत जॉड्रलमध्ये

_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?

आशिष सुर्वे's picture

13 May 2010 - 3:27 pm | आशिष सुर्वे

अहो ताई, घावन करा!
एकदम सोप्पा आयटम!

तांदळाचं पीठ घ्या, वाईच मीठ टाका, पाणी टाकून पातळ भिजवून घ्या, एक 'अ-चिकट' तवा घ्या, तो तवा तापवा, त्यावर पळीने तेल पसरून घ्या, त्यावर पिठाचे मिश्रण टा़का, २ मिनिटे शिजू द्या, मग घावन पलटा, परत २ मिनिटे शिजू द्या.. झाला की तुमचा घावन तयार!!

चहा, दूध, नारळाचे दूध.. ह्यांबरोबर खाऊ शकता..

======================
कोकणी फणस

म्या पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

दिपाली पाटिल's picture

13 May 2010 - 10:51 pm | दिपाली पाटिल

छे छे घावन चुकीची आयडीया आहे...मेकअप करताना चुकून चुचुताईने तांदळाचं पीठ लावलं तर???

दिपाली :)

आशिष सुर्वे's picture

13 May 2010 - 3:27 pm | आशिष सुर्वे

अहो ताई, घावन करा!
एकदम सोप्पा आयटम!

तांदळाचं पीठ घ्या, वाईच मीठ टाका, पाणी टाकून पातळ भिजवून घ्या, एक 'अ-चिकट' तवा घ्या, तो तवा तापवा, त्यावर पळीने तेल पसरून घ्या, त्यावर पिठाचे मिश्रण टा़का, २ मिनिटे शिजू द्या, मग घावन पलटा, परत २ मिनिटे शिजू द्या.. झाला की तुमचा घावन तयार!!

चहा, दूध, नारळाचे दूध.. ह्यांबरोबर खाऊ शकता..

======================
कोकणी फणस

म्या पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

पर्नल नेने मराठे's picture

13 May 2010 - 3:43 pm | पर्नल नेने मराठे

~X( अरे ते तव्यावरुन परतताना मोडते.

चुचु

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 May 2010 - 4:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पीठ फार पातळ करू नकोस. १/४ बेसन घाल. चालणार असेल तर कणीक नाहीतर नाचणीचं पीठ घाल ... चव बदलते, पौष्टिकपणा वाढतो.
तवा तापायच्या आत पीठ तव्यावर ओतू नकोस.

अदिती

पर्नल नेने मराठे's picture

13 May 2010 - 6:03 pm | पर्नल नेने मराठे

अग पातळ नाही केले तर जाळी पडत नाही .

चुचु

अरुंधती's picture

13 May 2010 - 6:22 pm | अरुंधती

थोडा रवा, थोडे बेसन, कणीक किंवा अन्य पीठे दही घालून किमान पंधरा मिनिटे तरी भिजव आणि मग गरम तव्यावर धिरडी घाल. जाळी पडणारच! आणि एक बाजू व्यवस्थित भाजली गेली की मगच पलट. घाई केलीस तर धिरडीमोड व तुझा हिरमोड होईल! :D
त्या पिठात थोडे आले, मिरची ठेचा वगैरे घातलास तर नुस्त्या धिरड्याच्या वासानेच भूक खवळेल! :)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

पर्नल नेने मराठे's picture

13 May 2010 - 6:33 pm | पर्नल नेने मराठे

असे म्हण तेस ..बरे करुन पाहिन.

चुचु

आशिष सुर्वे's picture

14 May 2010 - 12:10 am | आशिष सुर्वे

अहो ताई, एक काम करा.. घावनाच्या कडेकडेने पळीने-हलक्या हाताने तेल सोडा.. ही कृती घावन टाकल्यावर दोन मिनिटाने गॅस मोठा करून करावी..

तवा हा बर्‍यापेकी 'नॉन-स्टिक' हवा..

======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

पर्नल नेने मराठे's picture

18 May 2010 - 3:29 pm | पर्नल नेने मराठे

पळीने-हलक्या हाताने तेल सोडा..
:SS अहो असली चैन मला परवडत नाही फारतर्फार चमचा वापरेन.

चुचु

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 May 2010 - 5:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नॉन स्टीक तवा वापर, चमचाही वाचेल आणि तेलही!

अदिती

अरुंधती's picture

13 May 2010 - 3:47 pm | अरुंधती

चुचु, सुरुवातीला छोट्या आकाराची घावने घाल. जर ते खालून व्यवस्थित भाजले गेले असेल तर मोडणार नाही. आणि समजा मोडले, तर मोडले! ;-) खाताना त्याचे तुकडे करावेच लागणार ना! :D

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

वाहीदा's picture

13 May 2010 - 5:29 pm | वाहीदा

अरु,
ultimate =)) =))
आणि समजा मोडले, तर मोडले! खाताना त्याचे तुकडे करावेच लागणार ना!
घावन तोडायचा वेळ वाचला बघ ... ;-)
~ वाहीदा
Ignorance is Best The Policy of Taking Revenge

Dhananjay Borgaonkar's picture

13 May 2010 - 4:51 pm | Dhananjay Borgaonkar

एवढे उपद्व्याप करण्यापेक्षा हॉटेलमधे का नाही जात.
स्व्यंपाकाचा वेळ तुम्हाला मेकअप मधे वापरता येईल ;)

पर्नल नेने मराठे's picture

13 May 2010 - 4:53 pm | पर्नल नेने मराठे

अहो परवडायला हवे ना.
एक तर नोकरी पण शिपाईणीची करतेय मी :S
चुचु

पर्नल नेने मराठे's picture

13 May 2010 - 6:02 pm | पर्नल नेने मराठे

खजुर खा :D
चुचु

मीली's picture

13 May 2010 - 9:59 pm | मीली

अरुंधती चे नाश्त्याचे पर्याय छान आणि खमंग आहेत.वाचून भूक लागली...

मीली

वाहीदा's picture

14 May 2010 - 12:18 am | वाहीदा

हा अगदी छान उपाय आहे . जर आपण ब्रेकफास्ट स्किप केले तर
~ वाहीदा

शिल्पा ब's picture

14 May 2010 - 12:55 am | शिल्पा ब

दुपारी खूप खूप भूक लागेल .. =P~
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

sur_nair's picture

14 May 2010 - 4:16 am | sur_nair

फोडणीचा भात करा अधेमध्ये. नुसता कांदा किंवा टोम्यतो टाकूनही मस्त लागतो.