द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ

जीएस's picture
जीएस in जनातलं, मनातलं
10 May 2010 - 5:40 pm

चेतन भगतला सिरिअसली घेणारा एक लेख वाचून राहवले नाही, म्हणून मा़झा त्याचे एक पुस्तक वाचण्याचा जुना अनुभव देत आहे...

चेतन भगतच्या या नव्या पुस्तकाची क्रॉसवर्डमध्ये मोठी चळत पाहिली, त्याची आधीची दोन्ही पुस्तक वाचली होती,
चळतीतून एक पुस्तक सहज उचलल, किंमत पंच्याण्णव रुपये फक्त. 'सो चीप !!!!' ही माझी पहिली प्रतिक्रिया होती, किंमत वाचल्यावर आणि मग पुस्तक वाचल्यावरही.

अमदावादेत क्रीडासाहित्याचे दुकान कम क्रिकेट कोचिंग कम गणित क्लासेस आपल्या ओमी व इश या मित्रांसोबत चालवणारा एक गोविंद पटेल, त्यांचा अली नावाचा पुढे भारतीय क्रिकेटचे भविष्य होउ शकेल असे त्यांना वाटणारा एक बारा तेरा वर्षाचा विद्यार्थी जो सारख्या सिक्स मारत असतो, त्याला क दर्जाच्या हिंदी चित्रपटाला लाजवतील अशा अतर्क्य प्रकारे गोव्यात एका मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या बळंच गळ्यात पडून थेट ऑस्ट्रेलियात नेणे आणि त्याने तिथले नागरिकत्व आणि ऑस्ट्रेलियातर्फे भविष्यात खेळण्याची संधी मी जन्मोजन्मी भारतीयच राहीन असे म्हणत नाकारणे असे हास्यास्पद [त्याने ऑस्ट्रेलियन नागरिकत्व नाकारल्यावर ऑस्ट्रेलियन निराश होतात] घटनातून पाने भरता भरता, गोविंदने त्या दोनपैकी एका मित्राच्या इशच्या बहीणीला गणित शिकवता शिकवता एकमेकांना प्रेमाचे धडे देणे, आणि तिच्या अठराव्या वाढदिवसालाच तिच्याच घराच्या गच्चीवर खाली घरात तिचे आई वडील भाऊ असतांना ती ऍडल्ट झाल्याचा अधिकार बजावणे आणि मग कालानुक्रमे येणारी पुढची चिंता यातही बरीच पाने खर्ची पडल्यावर, ओमीचे मामा जे हिंदुत्ववादी व वाईट्ट असतात आणि अलीचे बाबा जे मुसलमान असल्याने दयाळू, सर्वधर्मसमभाव मानणारे व विचारी आणि काँग्रेस पक्षाचे नेते असतात यांच्यात एकदोन लुटुपुटुचे संघर्ष झाल्यावर काही काळाने म्हणजे आपल्याला अजून थोडा कंटाळा आल्यावर मामांचा लहान मुलगा तेरा चौदा वर्षाचा हा गोध्रा हत्याकांडात जेमतेम दोन तीन ओळीत संक्षिप्त बळी पडतो, मग पुढे पन्नास पाने मामा व इतर पिसाट हिंदू मिळून गरीब मुसलमानांची तपशीलवार कत्तल करू लागतात.

हे तीन मित्र अलीला वाचवायला एकदम रजनीकांतच होतात आणि मामांच्या पन्नास जणांच्या पेटलेल्या सशस्त्र जमावाशी झुंज देतात, त्या जमावावर पेट्रोल ओतून पेटवून काय देतात, गॅस सिलिंडरचा स्फोट काय करतात, हे सगळे अर्थात स्वतःला खरोंच पण येऊ न देता, अशा सर्व मर्कटलीला केल्या पण तरी शेवटी मुख्य व्हिलन मामा व त्याचे पाच साथीदार उरतातच. एवढ्या सगळ्या गडबडीतही इशची बहीण गोविंदला ती प्रेग्नंट नसल्याची खुशखबर एसेमेसने कळवते [ धन्य ती मुलगी !!! कुणाच काय तर कुणाच काय हेच खरे !!] पण ती खबर इशच वाचतो आणि मुळात तो फोन गोविंदकडून आपण पोलिसांना बोलावण्याकरता घेतला होता हे विसरून गोविंदलाच बदडू लागतो. इकडे मामा पद्धतशीर डोळे मिटून मंत्र वगैरे म्हणून मग अलीला त्रिशूळ भोसकणारच [ येथे आपण हसून गडाबडा लोळू लागतो ] तेवढ्यात ओमी 'नही' वगैरे सुटेबल उद्गार काढत मध्ये येतो आणि त्रिशूळ त्याच्याच पोटात भोसकला जातो. मग त्याचे मामा हाय मैने ये क्या कर दिया इत्यादी. पण इथेच आपला छळ थांबत नाही. मामा एकदम वाईट्ट हिंदुत्ववादी असल्याने ते पुन्हा त्रिशूळ घेउन उठतात आणि अलीला मारतात पण आता इश व गोविंद त्याला वाचवतात आणि प्रतिकाराला सज्ज होतात. आता अलीच्या हातात बॅट आणि मामांकडे त्रिशूळ आणि ते आमने सामने.... आता काय होणार ? तर अली बॅट सरसावतो, मामा ही पुढे येतात तेवढ्यात... तेवढ्यात इश त्याला बॉल टाकतो आणि अली मामांच्या टकलावर सिक्सर मारतो, अजून एक बॉल आणि अजून एक सिक्सर कपाळावर की मामा थेट मरूनच खाली पडतात.

एवढे सगळे झाल्यावर लेखकाचे जाउ द्या हो, पण आपल्यासारखे वाचकही एवढे निर्लज्ज की पुढे वाचत रहातात. आता भांडणामुळे इश आणि गोविंदच्या दुकानाचा बटवारा होतो, अलीच्या ऑपरेशनसाठी इश दो लाख रुपये जमवतो तर गोविंद तीन, पण इश गोविंदचे पैसे घेणे नाकारतो एवढेच नव्हे तर त्या पैशाला गोविंदचा स्पर्श आहे म्हणून ते परत देतांना स्वतः हँड्ग्लोव्हज घालून मग ते पैसे परत देतो. आपल्या डोक्यावरचे सर्व केस अगोदरच उपटून झाले असल्याने पुढे वाचणे एवढेच हातात असते. तर हा धक्का सहन न झाल्याने गोविंद आत्महत्या करायचा प्रयत्न करतो, पण तेंव्हाही तो लेखकाचा फॅन असल्याने लेखकाला ईमेल पाठवून वाचकांची गोची करून ठेवतो. मग लेखक सिंगापूरहून अमदावादला येतो आणि विद्या, इश आणि गोविंदचे परस्परांशी त्या त्या नात्याला सुटेबल असे मिलन करून हा छळवाद संपतो.

केवळ मार्केटिंगच्या आधारे एखादी तद्दन फालतू गोष्टही कशी खपवता येते हे असली पुस्तक वाचली आणि त्यांच्या खपाचे आकडे पाहिले की कळते.
मग आता शेवटपर्यंत वाचायच कशाला ? भेळेचा कागदही मागून पुढून पूर्ण वाचायची सवय आहे....मग भोगा आपल्या कर्माची फळं......

मौजमजाआस्वाद

प्रतिक्रिया

महेश हतोळकर's picture

10 May 2010 - 5:43 pm | महेश हतोळकर

मी मागे एकदा अशाच एका चर्चेत तुमच्या मूळ लेखाची लिंक दिली होती. http://www.misalpav.com/node/6770#comment-103128.

मी ऋचा's picture

10 May 2010 - 5:45 pm | मी ऋचा

रिव्ह्यु आवडला आपल्याला!!

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

छोटा डॉन's picture

10 May 2010 - 5:47 pm | छोटा डॉन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

च्यायला पुस्तक आहे की 'बालकॄष्णच्या एखाद्या देमार तेलगु शिन्माची ष्टुरी' ?
मेलो, हसुन हसुन पार खल्लास झालो ...
बरं झालं हे पुस्तक वाचलं नाही ते ...

>>एक पुस्तक सहज उचलल, किंमत पंच्याण्णव रुपये फक्त. 'सो चीप !!!!' ही माझी पहिली प्रतिक्रिया होती, किंमत वाचल्यावर आणि मग पुस्तक वाचल्यावरही.
=))
स्सह्ही, एका वाक्यात 'परिक्षण' !
जबरा लेख जीएस, आवडला !
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

मला वाटल होत कि हा चेतन भगत आय. आय. टी. चा पदवीधर असल्याने जरा नो नॉन्सेन्स काहीतरी लिहील .... :-)

नितिन थत्ते's picture

10 May 2010 - 6:25 pm | नितिन थत्ते

आय आय टी च्या लोकांना एवढं अंडरएस्टिमेट करू नका हो. तीही इतरांसारखीच माणसं असतात. ते नो-नॉन्सेन्सच लिहितील असं कसं समजून चालेल?

नितिन थत्ते

खालील लिंक वरून हे पुस्तक डाऊनलोड करू शकता

http://www.gigasize.com/get.php/3197519234/Three_Mistakes_Of_my_Life.zip

~ वाहीदा

इंटरनेटस्नेही's picture

10 May 2010 - 11:04 pm | इंटरनेटस्नेही

९५ भारतीय रुपये वाचवल्याबद्दल आभारी आहे!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

llपुण्याचे पेशवेll's picture

10 May 2010 - 6:28 pm | llपुण्याचे पेशवेll

ओमीचे मामा जे हिंदुत्ववादी व वाईट्ट असतात आणि अलीचे बाबा जे मुसलमान असल्याने दयाळू, सर्वधर्मसमभाव मानणारे व विचारी आणि काँग्रेस पक्षाचे नेते असतात यांच्यात एकदोन लुटुपुटुचे संघर्ष झाल्यावर काही काळाने म्हणजे आपल्याला अजून थोडा कंटाळा आल्यावर मामांचा लहान मुलगा तेरा चौदा वर्षाचा हा गोध्रा हत्याकांडात जेमतेम दोन तीन ओळीत संक्षिप्त बळी पडतो, मग पुढे पन्नास पाने मामा व इतर पिसाट हिंदू मिळून गरीब मुसलमानांची तपशीलवार कत्तल करू लागतात.
हे वाचल्यानंतरच ते पुस्तक सोडून दिले होते. पुन्हा हाती न धरण्यासाठी. ;)

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

जयंत कुलकर्णी's picture

10 May 2010 - 7:08 pm | जयंत कुलकर्णी

=))

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

नाना बेरके's picture

10 May 2010 - 7:20 pm | नाना बेरके

फार वर्षापूर्वी आलेल्या एका "छोटा चेतन" नावाच्या थ्री डी पिक्चरमध्ये सुध्दा एवढ्या अविश्वसनिय चमत्कृती दाखविल्या नसतील, येवढे भारी भारी प्रसंग ह्या पुस्तकात आहेत म्हणायचे .

तुम्ही केलेले परीक्षण लई भारी.

चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके

प्रशु's picture

10 May 2010 - 8:13 pm | प्रशु

एखाद्या कोंग्रेस कार्यकर्त्याने लिहिलेले अतिशय प्रचारकी आणी ओंगळवाणं पुस्तक....

विनायक पाचलग's picture

29 May 2010 - 3:32 pm | विनायक पाचलग

एखाद्या कोंग्रेस कार्यकर्त्याने लिहिलेले अतिशय प्रचारकी आणी ओंगळवाणं पुस्तक....

सहमत

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

शिल्पा ब's picture

10 May 2010 - 10:23 pm | शिल्पा ब

खरं तर चेतन भगत नावाचा लेखक आहे हे माहिती नव्हतं आणि हा लेख वाचून असं वाटलं बरं झालं माहिती नव्हतं ते....नाहीतर एखादं पुस्तक वाचलं असतं...review चांगला लिहिला आहे...अगदी काँग्रेजी पुस्तक वाटतंय...काही वाचण्याजोगं असलं तर सांगा आणि नसलं तर आवर्जून सांगा...

http://shilpasview.blogspot.com/

किट्टु's picture

11 May 2010 - 1:08 am | किट्टु

>>एक पुस्तक सहज उचलल, किंमत पंच्याण्णव रुपये फक्त. 'सो चीप !!!!' ही माझी पहिली प्रतिक्रिया होती, किंमत वाचल्यावर आणि मग पुस्तक वाचल्यावरही.

अगदी अशीच प्रतिक्रीया त्याच्या नविन " 2 States - The Story Of My Marriage" पुस्तकासाठी पण...... एकदम हिंदी पिक्चर ची script वाचतो आहोत असं वाटत..... ~X(

विनायक पाचलग's picture

29 May 2010 - 3:36 pm | विनायक पाचलग

अगदी अशीच प्रतिक्रीया त्याच्या नविन " 2 States - The Story Of My Marriage" पुस्तकासाठी पण...... एकदम हिंदी पिक्चर ची script वाचतो आहोत असं वाटत..... At Wits End

»
चला , माझ्यासारखे आहे अजुन कोणीतरी..

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

शुचि's picture

11 May 2010 - 1:19 am | शुचि

परीक्षण वाचून खूप हसले. किती अत्याचारी पुस्तक आहे. पण अशा अत्याचारातूनही अस मस्त परीक्षण निघतं हेही नसे थोडके.

इशची बहीण गोविंदला ती प्रेग्नंट नसल्याची खुशखबर एसेमेसने कळवते [ धन्य ती मुलगी =))

इकडे मामा पद्धतशीर डोळे मिटून मंत्र वगैरे म्हणून मग अलीला त्रिशूळ भोसकणारच [ येथे आपण हसून गडाबडा लोळू लागतो =))

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

Pain's picture

11 May 2010 - 8:41 am | Pain

१) चेतन भगतला सिरिअसली घेणारा एक लेख वाचून....
२) 'सो चीप !!!!' ही माझी पहिली प्रतिक्रिया होती, किंमत वाचल्यावर आणि मग पुस्तक वाचल्यावरही

अशक्य भारी परीक्षण लिहिलय. फार आवडले =)) =))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 May 2010 - 10:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

'सो चीप !!!!' ही माझी पहिली प्रतिक्रिया होती, किंमत वाचल्यावर आणि मग पुस्तक वाचल्यावरही

चांगलं ट्वीट बनवलंत! ;-)

अदिती

पाषाणभेद's picture

11 May 2010 - 12:05 pm | पाषाणभेद

धन्यवाद जीएस. पंच्याण्णव रुपये वाचवल्याबद्दल. चेतन भगत आधिच डोक्यात गेला होता. असल्या तद्दन भरताड कादंबर्‍या लिहीण्यापेक्षा तू पुर्ण वेळ नोकरी कर म्हणावं. लिहीण्याची हौस तेथील कागदपत्र लिहून पुर्ण कर म्हणावं.

हिंदुत्ववादी मामा वाईट्ट अन अलीचे बाबा दयाळू काय रे ए चेतन्या? स्वातंत्राच्या वेळी नाही का बरेचसे लेखक भाईबंदगीरी दाखवत असत तेच त्याने उचलले आहे. अरे हिंदू मुसलमानांचा संघर्ष तुमच्यासारखे लोकं पोट भरण्यासाठी उचलतात. प्रत्यक्षात संघर्ष दोन्ही समूदायांच्या तळाच्या लोकांना नकोच आहे रे. पोटं भरण्याची फिकीर त्यांची.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

परिकथेतील राजकुमार's picture

11 May 2010 - 12:49 pm | परिकथेतील राजकुमार

इशची बहीण गोविंदला ती प्रेग्नंट नसल्याची खुशखबर एसेमेसने कळवते [ धन्य ती मुलगी

छे छे, असे नाही करायचे. ती नक्की काय कळवते ते खरे खरे लिहा बर !

पुस्तक वाचुनसुद्धा अजुन जीवंत असलेला
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

सुबक ठेंगणी's picture

11 May 2010 - 3:07 pm | सुबक ठेंगणी

लई भारी परीक्षण ! =)) =))
पुस्तक वाचण्याची मिष्टेक नाही करणार!

@ परा,

छे छे, असे नाही करायचे. ती नक्की काय कळवते ते खरे खरे लिहा बर !

गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या! ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

11 May 2010 - 8:49 pm | बिपिन कार्यकर्ते

=))

बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ's picture

11 May 2010 - 4:57 pm | विजुभाऊ

फोर्थ मिष्टेक ल्ह्या.. हे पुस्तक विकत घेऊन वाचले किंवा नुसतेच हे पुस्तक वाचले असे लिहिले तरी चालले

समंजस's picture

11 May 2010 - 5:27 pm | समंजस

पुस्तक परिक्षण भयंकर आवडले बुवा... :D

लेखकाला मिथुनचे(मागील १० वर्षातील) सिनेमे बघण्याची आवड दिसतेय बहूतेक :)
(नक्कीच लेखक ट्वीटर वर थरुर पेक्षा जास्त अनुयायी मिळवणार) :?

जीएस's picture

11 May 2010 - 5:31 pm | जीएस

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. कोणाला हवे असल्यास मी माझी प्रत मोफत देउ शकतो...

धमाल मुलगा's picture

11 May 2010 - 6:48 pm | धमाल मुलगा

=)) =)) =)) =))
मेलो!!!!

कित्येक दिवसांनी कॉफी पिताना असा जोरदार ठसका लागला...
लेख तर फक्कडच...पण हा वन लाइनरच इतका जब्बरदस्त होता.... फु ट लो!!!!

_/\_ धन्य आहात.

अवांतरः अरे, आता कोणीतरी ह्या लेखाचं (प्रतिसादांसहित) इंग्रजीत भाषांतर करुन त्याचं एक 'अनावृत्त' पत्र पाठवा रे त्या टिवटिवकराला =)) =))

भोचक's picture

17 May 2010 - 5:53 pm | भोचक

अवांतरः अरे, आता कोणीतरी ह्या लेखाचं (प्रतिसादांसहित) इंग्रजीत भाषांतर करुन त्याचं एक 'अनावृत्त' पत्र पाठवा रे त्या टिवटिवकराला

परायक पाचलगांवर ही कामगिरी सोपवा. ही 'साधना' करण्याचा पूर्वानुभव त्यांच्या गाठीशी आहे.

(भोचक)

परिकथेतील राजकुमार's picture

17 May 2010 - 6:17 pm | परिकथेतील राजकुमार

भोचक काका लवकरच तुमची मुर्च्छा.टिके च्या संपादकपदी वर्णी लागणार हे आम्ही तुमच्या प्रतिसादाची नाडी बघुन लगेच ओळखले बघा.

©º°¨¨°º© भयानक पाठलाग ©º°¨¨°º©
आमचे राज्य

धमाल मुलगा's picture

17 May 2010 - 6:24 pm | धमाल मुलगा

=))

भोचकसाहेब,
शेवटी साधना काय, पुर्वानुभव काय सगळंच सापेक्ष..अनुभव आणी अनुभुतीमधला फरकच बर्‍याच गोष्टींचे मुळ असतो.

बाकी प्रतिसादाच्या नाडीचा पर्दाफाश इथे (शोधुन) वाचा.

हॅ हॅ हॅ!!!

-(आनंदीत) सावकाश पाटमांडे.

भारद्वाज's picture

12 May 2010 - 12:25 am | भारद्वाज

कोणाला हवे असल्यास मी माझी प्रत मोफत देउ शकतो...

नको नको...वाचवा वाचवा !!!

फ्रॅक्चर बंड्या's picture

12 May 2010 - 2:32 pm | फ्रॅक्चर बंड्या

'सो चीप !!!!' ही माझी पहिली प्रतिक्रिया होती, किंमत वाचल्यावर आणि मग पुस्तक वाचल्यावरही

मस्तच
binarybandya™

मृत्युन्जय's picture

29 May 2010 - 1:06 pm | मृत्युन्जय

लेख वाचुन खुप सुटल्यासारखे वाटले. नाही लेख खराब नव्हता. पुस्तकच खराब आहे. पण मला उगिचच असे वाटत होते की चेतन भगतचे पुस्तक आहे तर खराब कसे म्हणावे?

माझ्या मताचे अजुन लोक आहेत हे वाचुन बरे वाटले.

पुस्तकाबद्दल एक गोष्ट अजुन झेपली नाही मला ती म्हणजे याच्या प्रत्येक कादंबरीत सेक्स का असतो? लग्नाआधी हनीमून साजरा करणारेच फक्त भारतीय तरुणाईचे प्रतिनिधित्व करतात असे वाटते क याला? की सेक्स असेल तर पुस्त़क लवकर खपेल असे वाटते याला? म्हणजे नेहा धुपिया चा भक्त आहे का हा? ती पण म्हणाली होती ना कि आपल्या देशात फक्त शाहरुख खान आणी सेक्स विकला जातो म्हणुन.

बाकी लेख सुंदर.