राजमाची ट्रेनींग कॅम्प - समीट माउंटेनिअर्स (१६,१७,१८ एप्रील, २०१०)

बज्जु's picture
बज्जु in कलादालन
2 May 2010 - 4:57 pm

आपल्या पालकांशिवाय ३ दिवस दुर रहाण्याची बहुतेक मुलांची ही पहिलीच वेळ होती. मुलं गाडीत निट चढ्तील कि नाही?, नीट रहातील ना? जेवतील कि नाही? रात्रीची रड्णार तर नाहीत ना? अशा शेकडो शंका पालकांना. त्यामुळे १६ तारखेला सकाळी ६.३० ला ठाणे स्टेशनला मुलांना सोडायला आलेल्या पालकांच्या चेहर्‍यावरच जास्त काळजी दिसत होती. मुलं एकदम बिनधास्त. मोहिमेचे आयोजक सुजीत साठे यांनी पालकांना आणि मुलांना सर्व सुचना दिल्या आणि ४१ मुलं आणि १० इन्सट्र्क्टर असे आम्ही ५१ जणं इंटरसिटी एक्स. पकड्ण्यासाठी ५ नं. प्लॅट्फार्म कडे रवाना झालो.

रिपोर्टींग साठी पहाटे ६.३० ला ठाणे स्टेशन १ नं. प्लॅट्फार्म - पालक आणि मुलं

५ नं. प्लॅट्फार्म कडे रवाना

सव्वासातला इंटरसिटी एक्स. आली आणि लोणावळ्याक्डे प्रयाण केले.

लोणावळा स्टेशनवर - सकाळी ९.३० वा.

लोणावळा स्टेशनहुन राजमाचीला जाण्यासाठी टमटम, जीप अ‍ॅरेंज केल्या होत्या. त्यात मुलांना बसवलं आणि राजमाचीकडे निघालो.

साधारण ११.०० च्या सुमारास राजमाचीला आलो. राजमाचीतील आमचे मित्र, सहकारी श्री. रंगनाथ वरे (रंग्यामामा) यांच्याकडे ३ दिवसाची रहायची, जेवणाची सोय केली होती. वैशाख वणवा असल्यामुळे ऊकाडा खुप होता म्हणुन पोहोचल्यावर मुलांना लगेच लिंबु सरबत दिलं आणि १० मी. ऊदयसागर तलाव आणि शंकराचे मंदिर पहाण्यासाठी निघालो. तिथेच मुलांची ऊंची आणि वयानुसार सहा गटात विभागणी करायची होती.

ऊदयसागर तलाव

शंकराचे मंदिर

ऊदयसागर तलाव, शंकराचे मंदिर व राजमाची परिसर याची ऐतिहासीक व भौगोलीक माहीती देताना श्री. विलास साठे.

मुलांची ऊंची आणि वयानुसार सहा गटात विभागणी

तलाव, मंदिर परिसर पाहून दुपारच्या जेवणासाठी पुन्हा वरे यांच्या घरी आलो. सगळ्यांना भुका लागल्या होत्याच. नाचणीची भाकरी, बेसन, भाजी, डाळ्-भात, तोंडी लावायला बरोबर पापड, लोणचं, ताक असा झकास बेत होता. मग काय सगळी पोर खूश.

दुपारच्या जेवणानंतर थोडावेळ विश्रांती झाल्यावर सुजीत साठे व अभीजीत दांडेकर यांनी मुलांना डोंगरात ऊपयोगी पड्णार्‍या रोप नॉट्सची बेसीक माहिती दिली.

त्यानंतर रंगनाथ वरे यांनी मुलांसाठी स्नेक शो चे आयोजन केले होते. त्यासाठी सगळी मुलं फार ऊत्सुक होती. यात मुलांना सापांविषयी असलेल्या समजुती, त्यांचे प्रकार, ऊपयोग आणि संवर्धन याविषयीची वेगवेगळी माहिती देण्यात आली.

धामण

अजगर

नाग - किंग कोब्रा

स्नेक शो झाल्यावर संध्याकाळी श्रीवर्धन किल्ला पहाण्यास निघालो.



श्रीवर्धन किल्ल्यावरुन सुर्यास्त

मोहीमेत सहभागी झालेल्या १४ मुली व सौ. सविता परांजपे.

मोहीमेत सहभागी झालेली २७ मुले

संध्याकाळी ७.०० नंतर श्रीवर्धन किल्ल्यावरुन ऊतरलो.

दिवसभराच्या श्रमामुळे काही पोर पटापट जेवली आणि झोपली पण काही मुलांना आईची आठवण येऊन रडायला येत होत त्यांना आंजारुन-गोंजारुन झोपवल.

दुसर्‍या दिवशी सकाळी वॉर्म्-अप

वॉर्म्-अप झाल्यावर चहा आणि तिखट मीठाच्या शिर्‍याचा नाश्ता.

चहा आणि नाश्ता झाल्यावर मनरंजन किल्ल्यावर व्हॅली क्रॉसींग आणि रॅपलींग ही मुख्य अ‍ॅक्टीव्हीटी होणार होती. त्यासाठी २०-२० मुलांचे दोन गट करुन एका गटाला व्हॅली क्रॉसींगला तर दुसर्‍या गटाला रॅपलींगला पाठवले.

रॅपलींगचा डेमो देताना अभीजीत सर

व्हॅली क्रॉसींग साईट

व्हॅली क्रॉसींग करताना


रॅपलींग साईट

रॅपलींग करताना




मनरंजन वरील पाण्याची टाकी

मनरंजन किल्ल्यावरुन सुर्यास्त

रात्री जेवण झाल्यावर मुलांसाठी आकाश दर्शन आणि कॅम्प फायर आयोजीत केले होते. त्यात मुलांना ग्रह, तारे, नक्षत्र यांची माहिती, ग्रह-तारे यावरुन दिशा ओळखणे, याप्रकारची बेसीक माहिती दिली.

कॅम्प फायर

तिसर्‍या दिवशी नाश्ता करुन राजमाचीहुन कोंढाणा लेणी पहाण्यासाठी निघालो.

कोंढाणे गावाच्या दिशेने ऊतरताना

कोंढाणा लेणी

मुख्य चैत्यगृह

कोंदिवडे गावातील कोंडु यांच्या घरी जेवणाची सोय केली होती. जेवण झाल्यावर थोडावेळ आराम केला.

३.०० च्या सुमारास कर्जतला येण्यास ट्मट्म मध्ये बसलो. कर्जतला ४.१५ ची गाडी पकड्ली आणि ६.०० च्या सुमारास ठाण्याला परत आलो.

समीट माउंटेनिअर्स ही संस्था १९८५ पासुन सह्याद्री व हिमालयातील पदभ्रमण (ट्रेकींग) व प्रस्तरारोहण (रॉक क्लायम्बींग) च्या मोहिमा यशस्वीपणे करीत आहे. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये लहान मुलांमध्ये नेतृत्वगुण (लीडरशीप) व संघभावना (टीमवर्क) वृध्दींगत करण्यासाठी अशा प्रकारचे कोर्सेस किंवा मोहिमा अत्यंत ऊपयुक्त ठरतात. या वर्षी संस्थेने दि. १६ ते १८ एप्रील, २०१० या कालावधीत राजमाची येथे "अनुभव" हि मोहिम आखली होती. ना नफा ना तोटा या तत्वावर तिन दिवसांसाठी नाममात्र १,१०० रु. आणि वयोगट वय वर्ष ८ ते १६ अशा मर्यादीत स्वरुपात ही मोहिम होती. १४ मुली आणि २७ मुले असे एकूण ४१ सद्स्य सहभागी झाले. या मोहिमेत मुलांना पदभ्रमण (ट्रेकींग), प्रस्तरारोहण (रॉक क्लायम्बींग), रॅपलींग, व्हॅली क्रॉसींग, अ‍ॅसेंडींग याची बेसीक माहिती देण्यात आली.

इतिहासभूगोलछायाचित्रण

प्रतिक्रिया

मीनल's picture

2 May 2010 - 5:10 pm | मीनल

छान फोटो.
सकाळ सकाळ भारताची सैर करवलीत .तिखट मीठाचा शीरा खावासा वाटतोय.

ही सर्व मुलं ही मजेत दिसताहेत.
नवीन अनुभव, ज्ञान ,निसर्ग .. छानच आहे कॅम्प.

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

टारझन's picture

2 May 2010 - 5:11 pm | टारझन

चित्ताकर्षक :)

-(माऊंटण क्लिंबिंग गोल्ड मेडॅलिष्ट) टारझन

मीली's picture

2 May 2010 - 9:01 pm | मीली

मस्त फोटो आणि वर्णनही !(साप मात्र डेंजर आहेत) माझ्या मुलाने फोटो पहिले तर म्हणाला मला पण जायचे समर कॅम्प ला!
मस्त धमाल केली असणार मुलांनी.

मीली

प्रभो's picture

2 May 2010 - 11:22 pm | प्रभो

झकास!!

सुबक ठेंगणी's picture

3 May 2010 - 8:40 am | सुबक ठेंगणी

माझा आयुष्यातला पहिला वहिला ट्रेक समिट माउंटेनियर्सचा राजमाची कँप हाच होता!
सूर्यास्त पहाताना ऐकलेलं "मावळत्या दिनकरा" आठवलं, पहिल्यांदाच रॅपलिंग आणि व्हॅली क्रॉसिंग करताना आमचे चेहरे कसे दिसले असतील हे पण कळलं! :)
खूप मस्त वाटलं!

विशाल कुलकर्णी's picture

3 May 2010 - 3:06 pm | विशाल कुलकर्णी

छान , मस्त उपक्रम ! शेअर केल्याबद्दल आभार !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

भडकमकर मास्तर's picture

3 May 2010 - 5:03 pm | भडकमकर मास्तर

छान फोटो...
१९८७ च्या मे मधल्या राजमाचीच्या आठवणी जाग्या झाल्या....
त्यात सातवीतला मी लोणावळ्याहून चालत राजमाचीला गेलो होतो.. श्रीवर्धन आणि मनरंजन गड पाहिले.. खाली गावात कसलासा उत्सव आणि मिरवणूक होती....

आणि सिंहगडावर १९८७ च्या एप्रिलमध्ये केलेला असाच बेसिक माउंटेनियरिंग कॅम्प आठवला...
रोप नॉट्स, व्हॅली क्रॉसिंग , रॅपलिंग वगैरे...

१ मे १९८० साली सुरु झालेल्या पुणे वेंचरसने या वर्षी सत्तरावा कॅम्प सिंहगडावरावर पुर्ण केला.

ऋषिकेश's picture

3 May 2010 - 5:42 pm | ऋषिकेश

वा छान आढावा.. छान उपक्रम
नॉस्टॅल्जिक झालो :)

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

satish kulkarni's picture

3 May 2010 - 5:47 pm | satish kulkarni

स्तुत्य उपक्रम...

बिपिन कार्यकर्ते's picture

3 May 2010 - 5:56 pm | बिपिन कार्यकर्ते

झक्कास!!!!!!!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते

भोचक's picture

3 May 2010 - 6:08 pm | भोचक

मस्त उपक्रम. नव्या जगाला सामोरी जाणारी मुलं कसली गोड दिसताहेत.
(भोचक)
महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव

अमोल केळकर's picture

7 May 2010 - 12:39 pm | अमोल केळकर

मस्त उपक्रम !! अभिनंदन

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा