(एका माळेचे मणी)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
24 Mar 2008 - 10:15 pm

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम कविता एका माळेचे मणी  शेवटी सगळेच जातीचे निघालेहे समीक्षक सर्वपित्रीचे निघालेप्रेम, स्वप्ने, दुःख, आसू सर्व त्यांचेआमचे दिव्वाळखोरीचे निघालेलाभता संधी किती करतात बडबडरोग त्याचे सर्व साथीचे निघालेजे सभा भुंकून गेले आकसानेश्वान ते भलत्याच, चावीचे निघालेलायकी त्यांचीच सर्वांना कळालीसर्व अनुयायी शिखंडीचे निघालेहे बरे स्वातंत्र्य जालावर मिळालेह्या बुवाचे नाव बाईचे निघाले !!शिंपडा गोमुत्र आता तातडीने'देव' हे भलत्याच जातीचे निघाले(मोह झाला का सवंगाचा तुलाही ?"केशवा" हे काव्य टोळीचे निघाले...)

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

25 Mar 2008 - 2:24 am | इनोबा म्हणे

विडंबनातून टोला द्यायची तुझी पद्धत जाम आवडली बॉ!
नाहीतर काहीजण फूका तोंडाची वाफ घालवतात.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

चतुरंग's picture

25 Mar 2008 - 6:56 am | चतुरंग

तुझ्याकडून ह्याहून सरस येऊ शकते.

चतुरंग

केशवसुमार's picture

25 Mar 2008 - 7:13 am | केशवसुमार

रंगाशेठ,
स्पष्ट प्रतिसादा बद्दल धन्यवाद..
पण मला ह्या रचनेतून जो संदेश ज्यांना द्यायचा होता त्याना तो पोचला आहे..
असो..
पुढच्या वेळेस ह्याहून सरस लिहिण्याचा प्रयत्न करेन.
केशवसुमार

प्राजु's picture

25 Mar 2008 - 8:12 am | प्राजु

लायकी त्यांचीच सर्वांना कळाली
सर्व अनुयायी शिखंडीचे निघाले

हे बरे स्वातंत्र्य जालावर मिळाले
ह्या बुवाचे नाव बाईचे निघाले !!

शपथ्थ!!!... एकदम सह्ही

- (सर्वव्यापी)प्राजु

प्रमोद देव's picture

25 Mar 2008 - 8:25 am | प्रमोद देव

केसुशेठ विडंबन मस्तच जमलंय!
पण एक विनंती आहे. करू का?
आता विडंबनात येणारे तेच तेच संदर्भ बदललेत तर जास्त आवडेल.
मेलेल्याला मारण्यात काय हंशील? बघा विचार करा .
पटले नाही तर दूर्लक्ष करा.

केशवसुमार's picture

25 Mar 2008 - 8:52 am | केशवसुमार

आपला मुद्दा पटणारा आहे.
पण जर मुळ कविता/ गझले मधून येणारी तीच ती रुपके, संदर्भ चालत असतील तर विडंबना बद्दल ह्या लोकांना इतका अकस का?
असो.. आपल्या सुचनां आमलात आण्याचा प्रयत्न नक्कीच करेन..
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

केशवसुमार

बेसनलाडू's picture

25 Mar 2008 - 10:36 am | बेसनलाडू

पण जर मुळ कविता/ गझले मधून येणारी तीच ती रुपके, संदर्भ चालत असतील तर विडंबना बद्दल ह्या लोकांना इतका अकस का?

प्रिय केशवसुमार,
--- १. इतरत्र चालू असलेल्या एका चर्चेत स्पष्ट केल्याप्रमाणे, विडंबनाबद्दल आकस नाही (वरील प्रतिसादातील, कस ही टंकलेखनातील चूक समजतो, भाषिक दिवाळखोरी नाही :) ). त्यांच्यातील रूपकांच्या वारंवारतेबद्दल, विषयांच्या वारंवारतेबद्दलही आकस नाही; तर विचार करण्याजोगा आक्षेप आहे.
२. मराठी गझलेस वाहून घेतलेल्या एका संकेतस्थळावरील गझल कार्यशाळेत आलेल्या अनेकोत्तम गझलांमधील रूपके, हाताळले गेलेले विषय यांची सांख्यिकी येथे पहा. हातोहात संगीता जोशींचे 'वेदना-संवेदना' हे पुस्तक लागले, नि त्यातल्या काही गझलांमधील रूपकांची सांख्यिकीय तपासणी केली. यापुढची पायरी म्हणून 'एल्गार' मधील माझ्या आवडत्या निवडक १० गझला, अहमद फराज यांच्या येथील रॅन्डम १० गझलांमधील रूपकांची सांख्यिकीय तपासणी केली. या सगळ्या केसेसमध्ये वापरलेल्या रूपकांची टक्केवारी लक्षात घेता, ती इतरत्र उपलब्ध निकालांशी फारशी फारकत घेते, असे दिसत नाही. अहमद फराज यांच्या 'खानबदोष चाहतें' आणि शहरयार यांच्या 'मेरे हिस्से की जमीन' या पुस्तकातील माझ्या आवडत्या निवडक १० गझलांमधील रूपकांची अशीच तपासणी करायचा आता विचार चालू आहे. निष्कर्ष फारसे वेगळे असतील, अशी अपेक्षा केलेली नाही; अनपेक्षित निकालांचा आश्चर्यमिश्रित आनंदच वाटेल.
सांगण्याचा मुद्दा हा की गझलेतील विकासाच्या विविध टप्प्यांवर रूपकयोजनांमधील वारंवारता बदलत गेलेली असली, तरी जी रूपके गझलेला तिच्या जन्मापासून अत्यंत प्रिय आहेत किंव जी कालौघात गझलेमध्ये रुळत गेली, त्यांना नव्या रूपकांच्या समावेशानंतरही कोणीही कधीही सोडलेले नाही. मराठी संस्कृतीत इतकी रूपके आहेत की कशाची वानवा नाही. पण निसर्ग, फुलेपाने, प्रियकर-प्रेयसी - त्यांचे प्रेम, विरह, चंद्रतारे, समुद्रकिनारे, सोयर्‍यांनी केलेले घाव, मित्रांनी दिलेला दगा यांना कधी कोणी सोडले नाही.
याच धर्तीवर तुमच्याही विडंबनांमधील रूपकांची सांख्यिकीय तपासणी करण्याचा अनिवार मोह झाला होता. पण उद्या झोपेतून उठवूनही कोणी विचारले, तर तुमच्या विडंबनात काय आहे, हे मी नक्की सांगू शकेन, अशी खात्री असल्याने तो मोह आवरला. यावरूनच तपासणीचे निष्कर्ष काय असतील, याची कल्पना यावी.
३. याच विषयावर मागे एकदा जयंतराव कुलकर्णींच्या एका प्रतिसादनिमित्ताने नि मतमतांतरांमुळे तुमच्याशी संवाद साधला होता. तुम्ही स्वतः किती उत्तम नि प्रतिभावंत कवी आहात, याची जाणीव तेव्हाही होती; आताही आहे. मिसळपाववर व्य नि जाहीर करण्यामागची नैतिकता-अनैतिकता मागेच निकाली काढल्याचा स्वानुभव असल्याने तुमच्या नि माझ्या मनोगतावरील खाजगी संवादातील सारांश तुमच्याच शब्दांत येथे देत आहे -
तू जे लिहिले होते ते पोट तिडकीने लिहिले होतेस.. तू तुझ्या मताशी ठाम मी माझ्या मताशी ठाम. वाद घालण्यात काही अर्थ नाही ( वाटला तर व्यनितून घालू उगाच लोकांना फुकटची करमणूक कशाला ).. आणि सगळ्यांना सगळ्यांची मते पटावीत असे कुठे आहे. माझ्या गझलांवर पण कल्पनेत नावीन्य नसल्याचा आरोप होतोच.. चालायचं.. आपलं दुसऱ्याशी काय पटत नाही ह्या पेक्षा काय पटत हे शोधावं ह्या मताचा मी आहे... मतभेद हे सकारात्मक असावे.. त्यामुळे दोघांचा वौचारीक फायदा व्हावा.. असो.. गौरसमज नसावा.. असेच वरचे वर प्रांजळ / परखड प्रतिसाद देत राहा.. नुसतं वाव्वा.. क्या बात है..च्या साखरेनं मधुमेह होण्या पेक्षा.. असल्या प्रतिसादाच अंजन कधी ही उत्तम..

केशवसुमार
४. ज्यांना जे संदेश पोचवायचे ते आपण पोचवत आलेलोच आहोत. एकीकडे अंजन घालण्याचे, परखड प्रतिसादांचे वावडे नसल्याचे सांगून तशा टोलेबाजीस प्रतिटोल्याने प्रत्युत्तर देण्याच्या दुटप्पीपणास जर सकारात्मक मतभेद म्हणत असतील, तर मग असे मतभेद आपल्यात बरेच आधीपासून आहेत, असे मला वाटते. माझी एकच मोठी चूक झाली, की तुमच्या सांगण्याप्रमाणे तुमच्याशी व्य नि तून वाद न घालता मुक्त मंचावर मांडले. त्या चुकीबद्दल आज तुमची या मुक्त मंचावर जाहीर माफी मागतो आहे. क्षमस्व माम्. मात्र माझ्या परखडपणास किंवा तिरकस टोलेबाजीस जर कंपूबाजीचे नि वैचारीक दिवाळखोरीचे लेबल चिकटवायचे असेल किंवा कुणाचे कशामुळे स्वतःबद्दल काही फाजील गैरसमज वगैरे झाले आहेत अशी तुमची समजूत झाली असेल, तर मग आपला असा (गैर)समज माझ्या लेखनाचा किंवा/आणि लेखनशैलीचा दोष समजावा व माझे आपल्या विडंबनांना येथे किंवा/आणि इतरत्रही दिलेले प्रतिसाद दुर्लक्षित करून माझ्यासह सर्व वाचकांना आपल्या विडंबनांचा आस्वाद देत रहावे.
येथून पुढे तुमची सर्व विडंबने वाचताना येथे मी मांडलेले मुद्दे - शब्दयोजना, रूपके, विषय/मुद्दे, मूळ रचनेची व विडंबनाची ताकदीच्या दृष्टीने तुलना, विडंबन कधी कशाचे करावे वगैरे वगैरे - सोडून नक्की कोणत्या निकषांवर त्यांचा आस्वाद घ्यावा, याचा विचार करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल आपला आभारी आहे.
परखड, प्रामाणिक प्रतिसाद देत होतो, आहे, राहीन. प्रामाणिक मत, राग नसावा.
(सस्नेह)बेसनलाडू

विजुभाऊ's picture

25 Mar 2008 - 10:41 am | विजुभाऊ

फुल्ली ऍग्रीड बेसन्या

कृपया वरील प्रतिसाद पुन्हा एकदा वाचून पहा. उगीच कुठे कुणाला टोलेबाजी वगैरे दिसायला नको नि कुणाचे स्वतःबद्दल फाजील (गैर)समजही व्हायला नकोत :)
(टोलेबाज)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

25 Mar 2008 - 8:40 am | विसोबा खेचर

लाभता संधी किती करतात बडबड
रोग त्याचे सर्व साथीचे निघाले

लायकी त्यांचीच सर्वांना कळाली
सर्व अनुयायी शिखंडीचे निघाले

वा वा! झकास रे केशवा! :)

तात्या.

इनोबा म्हणे's picture

25 Mar 2008 - 11:14 am | इनोबा म्हणे

लाभता संधी किती करतात बडबड

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

बेसनलाडू's picture

25 Mar 2008 - 11:35 am | बेसनलाडू

जे सभा भुंकून गेले आकसाने
श्वान ते भलत्याच, चावीचे निघाले
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
(परखड)बेसनलाडू

इनोबा म्हणे's picture

25 Mar 2008 - 11:47 am | इनोबा म्हणे

गुळमट पदार्थही मिसळपाववर आल्यानंतर झणझणीत झाले वाटते. असो.आम्हाला त्याने आनंदच झाला.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

धमाल मुलगा's picture

25 Mar 2008 - 11:57 am | धमाल मुलगा

जे सभा भुंकून गेले आकसाने...

ह्यामध्ये कोणि बाहेरुन येणारे आणि सभा भु॑कुन परत जाणारे श्वान अस॑ काही रुपक आहे का?

विड॑बनाच्या पडद्यामागची उकल झाली तर आस्वाद घेणे सोपे जाईल असे वाटते.

-(अजाण) धमालराव देशमुख-पाटील.

इनोबा म्हणे's picture

25 Mar 2008 - 1:41 pm | इनोबा म्हणे

ह्यामध्ये कोणि बाहेरुन येणारे आणि सभा भु॑कुन परत जाणारे श्वान अस॑ काही रुपक आहे का?
अगदी बरुबर बोल्लात पाटिल.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे