!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!!

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
24 Mar 2008 - 11:29 am
गाभा: 

मि पा पुणे पहीला कट्टा सहसंवादः
मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तः
आभासी दुनेयेतून खर्‍या दुनियेत येवुन भेटायचे म्हणोन मिपा सदस्याना एक्दम उत्साह आला होता.
ति.छोटा डॉन यानी काडी फेकण्याचे उत्तम काम केले आणि मिपा सदस्य पुणे पहीला कट्टा सहसंवाद याची आग भडको लागली;
तेणेकरून धमाल मुलाने जोरात फुंकर( कशाची विचारु नका) मारुन आगोटी जीवित ठेवली.यात तेल तूप लाकडे देण्याची जबाबदारी सगळ्या मिपा पूणे सदस्यानी घेतली.
तेणेकरोन मिपा सदस्य पुणे पहीला कट्टा सहसंवाद याच्या तारखा मुक्रर झाल्या. हुताशनी पौर्णीमा नन्तर ची वैशाख शुद्ध प्रतिपदा धूलीवन्दण इसवी शके २००८ त्रुतीय मासाच्या २२व्या दिनी हा कट्टा पुण्यपत नगरीस्थित कात्रज स्थळी सगळे सदस्यभेटणार असे ठरले.(कोण रे तो खवट ....सदस्यांचा कात्रज होइल म्हणणारा) ईनोबा ; धमाल आदी सरदारानी आपली कामगिरी चोख बजावली. काही सदस्यानी त्याना आडुन स्थळ बदला असे सांगुन पाहीले.पण स्थळ प्रेमामुळे सरदार धमाल आपल्या भूमीकेवर अविचल राहीले.( थोरले आबासाहेब जसे प्रतापगड च्या लढ्यावेळी राहीले होते तसे) त्यानी सगळा बंदोबस्त पक्का ठेवला होत. सगळ्या वाटा डोळ्यात गोडे तेल घालुन राखल्या होत्या.
सर्व सरदाराना निमन्त्रणे चांदीच्या ई मेल द्वारे पोहोच झाल्या. तसेच भ्रमण ध्वनी द्वारेही नीरोप पोहोचवण्यात आले होते. येणे कारणे
तन्त्रज्ञानाचे सर्व प्रकार वापरून खातरजमा करुन घेतली.
ठरलेल्या वेळी एक एक सरदार घोड्यावरून / रथातुन येवु लागली.घोड्याची पागा वगैरेंचा ही बन्दोबस्त होताच त्यामुळे घोडी वाहतूक त्रास निर्मुलन सैन्याने जब्त करण्याची वेळ आली नाही.
सरदार धमाल त्यांच्या कर्यस्थळाहून (मुम्बै) अगोदरच प्रातः प्रहरी पुण्यपतनास विवक्षीत स्थळी जाण्यासठी पोहोचले होते.
सरदार इनोबा , भुईनळा( आतिष्बाजी स्पेष्यालीस्ट्),चित्तर,ॐकार, बिनीचे सरदार विडंबक केशव्सुमार.विवेकग ,आणि सक्षात छत्रपती सह सरदार ठीक गोरज मुहूर्तावर गडावर पोहोचले
सरदार विजुभाऊ अजून पोहोचले नव्हते..चौकशी अन्ती असे कळाले की त्यांना ऑफीस सारख्याबीन महत्वाच्या कार्यात थोडावेळ वरीष्ठ मुकादम असल्यामुळे ममुख्यालयातहजेरी देण्याचे आदेश आले होते.त्या कामातून मिकळे झाल्यावर सर्दार धमाल याना त्याने त्यांच्या फौजा मार्गस्थ झालेल्या आसोन थोड्या विलंबाने का होइना ते गडावर पोहोचत होते.
या अश्वासनानुसार सर्व सरदारनी आपपल्या ओळखी करुन घेण्यास सुरुवात केली.
सर्वांचे स्वभाव तर सर्व जाणून होतेच. फक्तचेहरे परिचयाचे नव्हते.
ऐका पुढील व्रुतान्त पुढील चौकात ( हा बखरी तला चौक आहे...प्रस्तुत लेखकाने हा शब्द फकस्त पवाड्यातच ऐकला आहे..वाद नको)
म्हणे शाहीर विजुभाऊ सर्वांस जी र जी र जी र जी जी जी जी
( मि पा पुणे पहीला कट्टा सहसंवादःचर्चा ठराव्....बखरीच्या पूढील भूर्जपत्रावर)

प्रतिक्रिया

डॉ.प्रसाद दाढे's picture

24 Mar 2008 - 11:35 am | डॉ.प्रसाद दाढे

विजुभाऊ, मस्त लिहिताय, आगे बढो
स॑मेलन स्थळी तुम्ही पोहोचण्याच्या थोडा वेळ अगोदर साक्षात विसोबा खेचरा॑चा फोन आला होता व सगळ्या॑ना त्या॑नी शुभेच्छाही दिल्या होत्या, तुम्हीच राहून गेलात.

धमाल मुलगा's picture

24 Mar 2008 - 11:41 am | धमाल मुलगा

हा हा...विजुभाऊ....

एक न॑ब्बर !

आपली ही बखरीची कल्पना आम्हा॑स बहुत भावली. तसेच आपण ही जिम्मेदारी खा॑देवर घेऊन आपण आम्हा॑स मोठ्या स॑कटातून सोडविले असे आम्ही जरुर नमुद करु इच्छितो !

तसेच आमच्या एकुणच पोरकट व्यवस्थेची अकाळी वर्षावाने उडविलेली खिल्ली कोणिही मनात कि॑तु अथवा किल्मिष न धरता आन॑दे सहन करोन आम्हास वाटणार्‍या दु:खाचा भार हलका केला त्या॑चे काय आभार मानावेत?

तेणेकरून धमाल मुलाने जोरात फुंकर( कशाची विचारु नका) मारुन आगोटी जीवित ठेवल
च्यामारी, धन्य आहात. एक एक गोष्ट लक्षात ठेवली आहे की :-))

पुढील चौकात भारी मजा येणार अस॑ दिसत॑य!

जी जी र जी र जी र जी जी जी जी........

विवेकवि's picture

24 Mar 2008 - 11:44 am | विवेकवि

विजुभाऊ ऊत्तम आहे बखर १
२ री बखर कधी आता

विवेक वि.

विसोबा खेचर's picture

24 Mar 2008 - 11:46 am | विसोबा खेचर

विजूभाऊ,

झक्कास बर्र का! बखर आम्हास आवडते आहे, पुढील घडामोडी काय घडल्या, कुठली चर्चा, खलबतं कटकारस्थानं रचली गेली याच्या वृत्तांताची वाट पाहतो आहे! :)

आपला,
(बखरप्रेमी) तात्या.

इनोबा म्हणे's picture

24 Mar 2008 - 12:07 pm | इनोबा म्हणे

झकास वर्णन जाहले.
पुढील चौकात वाट पाहत आहो!

विजूभाऊंचा विजय असो!
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

प्रमोद देव's picture

24 Mar 2008 - 12:14 pm | प्रमोद देव

काय वो अजूनही त्याच तारेत? अहो जरा नीट शिस्तशीर लिवा की!
किती चुका त्या! तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

आनंदयात्री's picture

24 Mar 2008 - 12:15 pm | आनंदयात्री

छान विजुभाउ .. पुढच्या बखरी पटापट अन मोठ्या मोठ्या टाका.

चतुरंग's picture

24 Mar 2008 - 12:39 pm | चतुरंग

ऐशी जबर खबर देणेस बखर निवडलीत ते उचित जाहलें! थोरले सायबांकडून आपणास शाबासी!
'दारुकाम', 'आतषबाजी', सामिष भोजन, कट-कारस्थाने येकयेक वृत्तांत साद्यंत करणे, जेणेकरोन आमचे जीवास तोशीस न होईल!
बाकी आपण जाणते आहातच!
लेखनसीमा.

चतुरंग

आनंदयात्री's picture

24 Mar 2008 - 1:16 pm | आनंदयात्री

उत्तम शिवकालिन भाषा !
फक्त "लेखनसीमा" म्हणजे काय ते नाही समजले. :(

विजुभाऊ's picture

24 Mar 2008 - 1:58 pm | विजुभाऊ

"लेखनसीमा" अजोन जाहली नाही..
ये बखरीची भाषा ही उत्तर शिवकलीन आसोन तीयेचे मूळ गोडसे भटजींच्या १८५७ च्या प्रवास वर्णनात आहे.
बाकी वाचकगळ आनंदयात्रींचे उत्तर वाचौन बहुत संतोष जाहला...
मूळ बखर्नवीस विजुभाऊ हे त्यांच्या प्रोजेक्ट म्यामेनेजमेंट सारख्या अतीबीन महत्वाच्या कार्यात मग्न असल्यामुळे त्याना बखरीचा प्रवर्गिय भाग उत्खननास काळ उपलब्ध झाल्याबरहुकुम ते त्वरेने जाला वर पोष्ट करतील्.....आणि लेखनसीमा करतील.
कळावे लोभ आहेच तो वर्धिष्णु व्हावा ही श्री चरणी पौष्याची विनंती
मूळ बखर्कार्....बखर्नवीस विजुभाऊ ..
(विजुभाऊंच्या बखरीतुन.........पान३ समास २४)

आर्य's picture

24 Mar 2008 - 2:16 pm | आर्य

येऊद्या अजून ............पुढिल भगाच्या प्रतिक्षेत
आर्य

विजुभाऊ's picture

24 Mar 2008 - 4:54 pm | विजुभाऊ

.

!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!!चौक २
ऐका पुढील व्रुतान्त जी जी जी र जी जी जी र जी जी जी
ओळख समारम्भ झडु लागला...शकुन सांगावा तैसी कडाडकन वीज तळपली .दुंदुभी झडाव्या तैशा मेघगर्जना होवु लागल्या.आकाशालाही आनंदाचे भरते येउन पुष्पव्रुष्टी व्हावी तैशा झडी पडो लागल्या
मिपा सदस्यांचे मिलन पाहोन आसमंतालाही सण साजरा करावाऐसे वाटो लागले.
उत्तर पेशवाईत पानपतात व्हावी तैसी भांडी वाजो लागली.भडभुंज्या लाह्या भाजतो तैसे चोहोकडोन आवाज कानी येवो लागले.
ये कानाचे त्या कानास कळो नये ऐसी गत.
घोडी भीजो लागली..वर्तमान दफ्तर हलवावे ऐसे फर्मान निघो लागले.
समस्त दारुगोळा कोठारातुन सावकाशीने बाहेर येवु लागला होता. सरदार धमाल स्वतः जातीने दारुगोळा वाटपात कोणावर अन्याव होवो नये याची सर्वत्र फीरोन दखल घेत होते.
तेवढ्यात दस्तूर खुद तात्या भ्रमण्ध्वनीवर सदस्यांच्या भेटीस आले.....आकाशवाणी व्हावी तैशा त्यानी कट्ट्यास शुभेछा दिल्या.
एक एक भिडु रन्गी येवु लागला....राज कवी सरदार केशव्सुमार हळुच एखांदी कवीतेची फैर झाडत होते.त्या एकेका फैरीनेच सद्स्य गारद होत होते.
येवढ्यात सरदार विजुभाऊंचे आगमन झाले...पुन्हा एकदा तडीताघात झाला...नंगारा वाजावा तैशा मेघ गर्जना झाल्या.
सरदार विजुभाऊ नी सरदार धमाल मुलांस हळी घातली...आणि जेजाल्या प्रंमाणे भासणारी वीज पुन्हा गरजली.....मिपा कट्ट्यास तोफांची सलामी मिळाली.
ऐका पुढील व्रुतान्त पुढील चौकात जी जी जी र जी जी जी र जी जी जी
म्हणे शाहीर विजुभाऊ..मिपा सदस्य होउ...
व्रुतान्त मी सांगणार्..तुम्ही ऐकणार ..रन्ग तो चढणार रं जी जी जी
धन्य धन्य झाला तो सरदार जी जी जी जी जी जी र जी जी जी
आर रं दाजी जी जी रं दाजी जी जी र जी जी जी र जी जी जी

विसोबा खेचर's picture

24 Mar 2008 - 6:43 pm | विसोबा खेचर

ओळख समारम्भ झडु लागला...शकुन सांगावा तैसी कडाडकन वीज तळपली .दुंदुभी झडाव्या तैशा मेघगर्जना होवु लागल्या.आकाशालाही आनंदाचे भरते येउन पुष्पव्रुष्टी व्हावी तैशा झडी पडो लागल्या
मिपा सदस्यांचे मिलन पाहोन आसमंतालाही सण साजरा करावाऐसे वाटो लागले.

विजूभाऊ, काय सुंदर भाषा आहे! तुमची बखर बाकी रंगते आहे खास!

अजूनही येऊ द्या!

एक विनंती -

पुढचा चौक नवीन भागात सुरू करावा. प्रतिसादाने त्याची सुरवात करू नये ही विनंती. मिपाच्या श्रीमंतीस ते शोभत नाही!

आपलाच,
तात्या.

प्रशांतकवळे's picture

24 Mar 2008 - 5:40 pm | प्रशांतकवळे

झक्कास!..

विजुभाऊ, एका दगडात दोन पक्षी मारताय... वॄत्तांत देताय, आणी आम्हाला पण जळवताय..

पुढच्या वेळेला जर भारतात असू, तर नक्की येऊ.

प्रशांत.

डॉ.प्रसाद दाढे's picture

24 Mar 2008 - 5:50 pm | डॉ.प्रसाद दाढे

विजुभाऊ, कमाल केलीत..भाऊसाहेबा॑च्या बखरीन॑तर इतिहास स॑शोधका॑ना 'विजुभाऊ॑ची बखर अभ्यासावी लागणार असे दिसते आहे. मी तुमची कैफियत एका फर्ज॑दामार्फत भा.इ.स॑.म॑. ला सिताब रवाना केली आहेच..
बहुत काय लिहिणे..

प्राजु's picture

24 Mar 2008 - 6:45 pm | प्राजु

वा वा.. विजुभाऊ,
मानलं तुम्हाला. बखर अगदी झक्कास.. पुढचा भाग येऊद्या लवकर.

- (सर्वव्यापी)प्राजु

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Mar 2008 - 7:37 pm | llपुण्याचे पेशवेll

श्री. रा. रा. विजुभाऊ यांसी,

आपली बखर पोहोचली. वाचोनि परम संतोष जाहला. मि.पा.करीय जरीपटका पुण्यपत्तनाच्या पार (कात्रजात) फडकला हे ऐकोनि संतोष जाहला. पूर्वी आमच्या दादासाहेबानी म्हणजे राघोबादादांनी जरीपटका अटकेपार फडकवला होता. तेव्हा आम्हास असाच परमसंतोष जाहला होता. नंतर त्यांची बुद्धी फिरली. असो .
परंतु पुढील कट्टा सर्व महारष्ट्रनगरीच्या सीमा उल्लंघोन सर्व मि.पा. करीयाना एकत्र आणील याची आम्हास खात्री आहे. आणि वैश्विक मि.पा. करीय कट्ट्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. ते होईल तो सुदिन.

आपण बखरीतून सर्व वृत्तांत साद्यंत वर्णन केल्याने आम्ही आपले ऋणी आहोत.
इति.

लेखन मर्यादा.
मोर्तब सुद
पुण्याचे पेशवे

ता.क. सध्या आमचेकडे उत्तम कारकून नसल्याने खलित्यात काही त्रुटी असतील तर मोठ्या दिलाने माफ करणे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Mar 2008 - 7:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीमंत विजुभौ, साष्टांग दंडवत. मिपा कट्टा मुक्काम पुणे शहरचा मजकूर तपशीलवार कळला.सदर्हू भागाने आम्हास संतोष जाहला असुन सरदाराच्या त्यासमयीच्या हकीकती पेश कराव्यात.

विजुभाऊ's picture

27 Mar 2008 - 1:32 pm | विजुभाऊ

ईर्षाद....एका मित्राला हे सगळे सलग पहायचे आहे

सुधीर कांदळकर's picture

27 Mar 2008 - 9:24 pm | सुधीर कांदळकर

आनंद जाहला.

ऐसेची लिहीत जाणे.
शुभेच्छा.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

मिपाची जुनी पाने चाळताना हे सापडले.
माझा पहिलाच प्रयत्न. तात्याने खूप प्रोत्साहन दिले होते.
ज्या वेळेस भेटायचा तेंव्हा तेंव्हा या बखरीबद्दल बोलायचाच

चौथा कोनाडा's picture

27 May 2023 - 5:40 pm | चौथा कोनाडा

व्वा, भारी !